Wednesday, August 29, 2012

स्त्रीने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा

स्त्रीने  अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा
   
    हुंडाबळी , विवाहितेचा जळुन मृत्यू, सासरच्यांकडून छळामुळे  आत्महत्या अशाप्रकारच्या बातम्या वाचायची जणू आता सगळ्यांना सवयच झाली आहे.त्या बातम्या आपण सकळच्या चहा बरोबर वाचतो आणि दुपारपर्यत विसरून जातो. व्यक्ति स्वातंत्र्य  आणि गुलामगिरी विरुद्ध गप्पा मारणाऱ्या  या देशाच्या जवळ जवळ  50 टक्के लोक (ज्यात स्त्रिया आहेत असे गृहीत धरु) छळ , अत्याचार या दुष्ट चक्रात अडकले आहेत.
    माझ्या  मते ज्या घरातली स्त्री  दु:खी असेल, ते घर कधीही सुखी होऊ शकणार नाही  त्या कुटूंबाला  कदापिही मानसिक समाधान व शांतता लाभणार नाही.  छळ  करणारा पती, सासू, सासरा हे गुन्हेगार तर आहेतच पण त्याआधी ते विकृत मनोरुग्ण असतात.  इच्छेपुढे त्यांना परिणामाची फिकीर नसते. नीती, अनीती, सुख  दुखः  यातील सिमारेषांचे त्यांचे भान नाहीसे झालेले असते. अधोगतीला नेऊन पोहोचवणारा अहंकार, पराकोटीचा स्वार्थ आणि लोभाच्या ते पूर्ण आहारी गेलेले असतात. अन्यथा भविष्याच्या सुखद स्वप्‌नांवर तरंगत पतीच्या भक्कम आधाराची  अपेक्षा करून सासरी आलेल्या नवपरिणीत वधूवर हे राक्षसी मनोवृत्तीचे लोक जूलूम का करतील?
    आपल्‌या दारूड्या  आणि व्यसनी मुलाचे लग्न  करून दिले की तो सुधारेल अशी भ्रामक  कल्पना बऱ्याच आईबापांची असते. परंतू मुलीच्या पालकांनी तरी मुलाची समग्र माहिती अवश्य काढायला हवी. बऱ्याच वळा  इतर फायदयाच्या गोष्टी पुढे व्यसनांसारख्या  दुर्गृणांकडे डोळेझाक केली जाते, अशा घरात मुलगी देणे म्हणजे तिच्या दुर्दैवाची  सुरूवात  स्वत:च्या हाताने करून देण्यासारखेच आहे. आपल्या मुलाच्या दुर्गूणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या पत्नीलाच दोषी ठरवून, तिच्यामुळे  हा व्यसनी झाला अशी बोंब करायला हे महाभाग मागेपुढे पाहत नाहीत, मग सगळ्या  स्वप्नांचा चुराडा होऊन तिला आत्महत्या करणे,घटस्फोट घेणे किंवा अत्याचाराला सामोरे जाणे याशिवाय गत्यंतर उरत नाही. खरोखरच हे दुïचक्र आहे, सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या  संस्था, युवकांच्या वेगवेगळ्या  संघटना आणि या *समाजमनाने*  या विषयावर  गंभीर विचार करायला हवा. अत्याचार ग्रस्त दु:खी, गांजलेल्या आणि चिंताक्रांत अशी स्त्री  स्वत:चे भवितव्य बनवू शकत नाही, ती भावी पिढीचे भवितव्य कसे काय बनवणार? नव्या शतकात वाटचाल करणाऱ्या  स्त्रिने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच  हवा. हे प्रत्येक व्यक्तिने समजून घेणे आवश्यक आहे.
                  सुहास सोहोनी -----९४०५३४९३५४
                   उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह २००७]
                   www.suhassohoni.blogspot.com



Sunday, August 26, 2012

जीवनाचे अमूल्य वरदान- नेत्रहिनांना नेत्रदान

      जीवनाचे अमूल्य वरदान- नेत्रहिनांना नेत्रदान

            आज जगभरात अंधत्वाचे प्रमाण वेगाने वाढत आहे.  अज्ञान कुपोषण, प्रदुषण, अपघात, दुरदर्शन किंवा कॉम्प्‌युटरचा अतिरेक अशा अनेक कारणांनी दृष्टीदोष उत्पन्न होतात.  अंधत्वाला  आळा  घालणे अत्यंत आवश्यक आहे.  अन्यथा भविष्यात परिस्थिती गंभीर होईल .  जागतिक स्तरावर अनेक सामाजिक संस्था नेत्रतपासणी, मार्गदर्शन, औषधोपचार ,नेत्र शस्त्रक्रिया, चर्चासत्रे तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत जनजागृती  याप्रकरणी कामे करीत आहेत. 
               बुब्‌बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी  देता येते.  पण त्यासाठी त्यांचा अपारदर्शक झालेला  नेत्रपटल  काढून तेथे निरोगी व पारदर्शक नेत्रपटल  बसवावयास हवे.  ही कॉर्निअल  ट­ान्सप्लांटेशन नावाची शस्त्रक्रिया करण्यास नेत्रदानातूनच निरोगी व पारदर्शक नेत्रपटल  उपलब्ध होऊ शकते.  मृतव्यक्तीने मृत्यूपुर्व नेत्रदानाची इच्छा दर्शविली  असेल  किंवा मृतकाच्या नातेवाईकांची इच्छा असेल  तरीही नेत्रदान करता येते.  या कार्यासाठी जागोजागी स्वयंसेवक तयार होऊन नातेवाईकांचे काही गैरसमज दूर करून नेत्रदानास सहमत करणे हे मोलाचे कार्य आहे.  नेत्रतपासणी शिबीरात एक गोष्ट  प्रकर्षाने जाणवते की, बालकांमध्ये दृष्टी दोषांचे प्रमाण जास्त आहे.  जिवनसत्वाची कमतरता हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे.  शालांमध्ये  मुलांच्या  डोळ्यांची   तपासणी करून या विषयाबाबत जागरूकता आणणे आवश्यक आहे.  योग्य वेळी  योग्य सल्ला   मिळाला  तर नव्‌या पिढीला  अंधत्वापासून वाचवता येईल .
               नेत्रदानासाठी घोषणापत्र भरून देणे हे जनजागृतीचे एक माध्यम आहे.  प्रत्यक्षात मृत व्यक्ती
च्या  परिवारातील  मुख्य व्यक्तीच्या संमतीनेच नेत्रदान होऊ शकते.  मृतव्‌यक्तीचे डोळे  दान करण्याचे कार्य केवळ  दहा मिनिटांत पूर्ण होते.  चेहरा विद्रुप दिसत नाही किंवा  मुद्दाम सांगितल्याशिवाय कुणाला  कळतही  नाही.  या कार्यासाठी कोणताही खर्च होत नाही.  मृत व्यक्तीच्या खोलीतील  पंखे बंद ठेवावे.  पापण्या बंद ठेवाव्या व शक्य असल्यास डोळ्यांचे  औषध   सल्ल्याप्रमाणे थोड्या  थोड्या   वेळाने डोळ्यात घालावे.  मृत्यूनंतर 4 ते 5 तासात नेत्रदान व्हावयास हवे.  मृतव्यक्तीस चष्‌मा, मधुमेह, ब्लडप्रेशर , असेल  तरीही नेत्रदान करता येते.  नेत्रदानासाठी जनजागृती करण्यास प्रत्येक गावात स्वयंसेवक तयार झाले  तर हे कार्य सुलभ होईल  आणि त्यायोगे अनेक अंध व्यक्तींना दृष्टी  येईल .  त्यांची प्रगती होईल .  कुटूंबात आनंद, समाधान वृद्धींगत होईल .  आपण सहजगत्या पसरवलेल्या विचार प्रवाहाने जर कुणी प्रकाशमान पायवाटेने प्रवास करू शकला  तर यापेक्षा वेगळा  आनंद किंवा पुण्य काय असू शकते ?
              **   अपघातात दुर्दैवाने मृत पावलेल्या व्यक्तींचे नेत्रदान होण्यासाठी कायदा पारित व्हावा .त्यासाठी
ड्रायव्हिंग लायसेन्स मध्ये तशी नोंद करता येईल मृताच्या नातेवायीकांची संमतीची गरज नसावी .**
                                                 ***********************************
          सुहास सोहोनी ----९४०५३४९३५४
          वर्तुळाचे टोक [मराठी लेख संग्रह २००५]
          www.suhassohoni.blogspot.com





Saturday, August 25, 2012

हिवाळ्यात पर्यटनाला चला विदर्भात

                  *  हिवाळ्यात पर्यटनाला  चला  विदर्भात *

            भारताच्‌या मध्यभागी असलेला  विदर्भ प्रांत अजून तरी विदर्भाबाहेरील  पर्यटकांना आकृष्ट  करू शकला  नाही हे खरे आहे.  वास्तविक कोणत्याही प्रदेशाचे स्वत:चे असे खास वैशिष्ठ्य  असतेच.  फक्त जरूरी आहे ते जगापुढे मांडण्याची .  पर्यटकांना आकर्षण असते अशा गोष्टी  महणजे नयनमनोहर निसर्ग, पशुपक्षांनी समृद्ध अशी जंगले ,  ऐतिहासीक वास्तू किंवा पुराणकालीन संदर्भ असलेली , स्थानमहात्म्य असलेली  धार्मिक स्थळे .  विदर्भाच्या नकाशावर जरी नजर टाकली  तरी लक्षात येते की वरील  सर्व  वैशिष्ठ्ये  येथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.  अतिप्राचीन संदर्भ असलेली  गणेशाची आठ मंदिरे विदर्भात आहेत,  ही गोष्ट येथील  रहिवाशांना  मुळीच माहीत नाही.  वायगावचा रिद्धीसिद्धी गणेश,  अदासा येथील  शमीविघ्नेश गणेश, कलंबचा चिंतामणी गणेश, भद्रावतीचा वरद विनायक गणेश, केळझर येथील  सिद्धी विनायक, पवनीचा सर्वतोभद्रगणेश, भंडारा येथील  भृशुण्ड  गणेश आणि रामटेकचा अष्टदशभूज गणेश.
    सालेकसा दरेकसा येथील  काचीकोना नैसर्गिक गुहा, हजारा धबधबा, नागझीरा, नवे गाव बांध, तोतलाडोह, पेंच प्रकल्प, नरनाळा  किल्ला  व घनदाट जंगल , ताडोबा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प, आणि भरपूर जंगल  प्रदेश असलेला  संपूर्ण गडचिरोली  जिल्हा आजतरी विदर्भाबाहेरील   पर्यटकांना खुणावत नाही.या प्रदेशातील  नागपूर, रामटेक, शेगांव, लोणार आणि सरहद्दीवरील  मुक्तागीरी, माहुर ही नावे काही प्रमाणात ज्ञात आहेत.  रेल्वेच्या माध्यमातून शेगांव एक्‌सप्रेस ओरेंज एक्सप्रेस अशी नावे रेल्‌वे गाडयाना  देता येऊ शकतात.  सत्ताधारी व्यक्‌तीने ठरवले  तर बरेच काही चांगले  करू शकतात.  हे सर्व होण्यासाठी आपल्या प्रदेशाविषयी आत्यंतिक प्रेम, आपुलकी, आग्रही भूमिका आणि पर्यटनादवारे उदयोग उभे रहावे यासाठी प्रबळ  इच्छाशक्तीची गरज आहे.  थोडा बारकाईने विचार केला  तर असे लक्षात येते की विदर्भातील  बहुसंख्य रहिवासी स्थलांतरीत आहेत.  तेलांगणा, बस्तर, आंध्र , मध्यप्रदेश , उ.प्रदेश, पंजाब सिंध, राजस्थान, गुजरात, विदर्भाबाहेरील  महाराष्ट्र  आणि कर्नाटक या राज्‌यातून स्थलांतरीत झालेले  येथे स्थायिक झाले  आहेत.  हे सर्व श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय  आहेत.  मुळचा भूमिपुत्र एकतर न जमणारी शेती करतो आहे किंवा मजुरी करून दिवस कंठतो आहे.  या प्रदेशाच्या विकासाच्या आर्थिक नाड्या  विदर्भीय   भुमिपुत्राच्या हातात नक्कीच नाहीत. 
    उन्हाळा  व पावसाळ्याचा काळ  वगळता आगस्ट ते फेब्रुवारी पर्यंत हा प्रदेश पर्यटनासाठी योग्य आहे.  कमीतकमी सहा दिवसांसाठी प्रोग्राम आखल्यास सर्व प्रकारच्या पर्यटनाचा आनंद घेता येतो.  गरज आहे ती इथल्या स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीची. विदर्भातील आदरातीत्थ्य सर्वश्रुत आहे . या काळात इथला  प्रसन्न निसर्ग, सणवार, हस्तकला , खानपान, धार्मिक स्थाने आणि जंगलातील  असंख्य पशुपक्षी पर्यटकांना नक्कीच आकर्षित करू शकतात.  आर्थिक  समृद्धीसाठी पर्यटन हा एक फार मोठा उद्योग आहे हे जागतिक सत्य विदर्भाला  समजेले  आहे म्हणूनच  हिवाळ्यात पर्यटनाला या आमच्या विदर्भात .

               सुहास सोहोनी
               ९४०५३४९३५४
           वर्तुळाचे टोक [मराठी लेख संग्रह २००५]
            www.suhassohoni.blogspot.com











हिवाळ्यात पर्यटनाला या आमच्या विदर्भात आपले स्वागत आहे  

Friday, August 24, 2012

" व्यवस्थापन हवे गर्दी चे ""क्राऊड मेनेजमेंट''

    "  व्यवस्थापन हवे गर्दी  चे ""क्राऊड  मेनेजमेंट''

    केवळ  अनियंत्रीत गर्दमुळे  अचानक शेकडो जणांना  प्राण गमवावे लागत आहेत.  हजारो लोकं जखमी होत आहेत.  अशा घटना, या घटना नित्याच्या झाल्या असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काटेकोर नियमावलीचे पालन आवश्यक आहे.  प्राचीन पर्यटन स्थळे , जूनी विख्यात मंदीरे, लोकप्रीय नेत्यांच्या किंवा मार्गदर्शकांच्या  जाहिर सभा, क्रिडास्थाने,  प्रान्तनिहाय पारंपारिक उत्सव, फार मोठ्या  बाजारपेठा, कुंभमेळे , पावसामुळे  किंवा विविध कारणांनी होणारा रस्ताजाम अशा सर्वच ठिकाणी जर गर्दी अनियंत्रीत असेल  आणि तेथे जर एखादा अपघात झाला , अफवा पसरली , जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले  तर चेंगराचंगरीत तुडवले  जावून श्वास कोंडल्याने घडणाऱ्या  भयनाट्यात कितीतरी घरं उध्वस्त होतांना आपण अनुभवतो.  या अशा दुर्दैवी  घटना कशा थांबवता येतील ?
    ज्‌या प्रमाणे इव्हेंट मनेजमेंट, डिसास्टर मनेजमेंट सक्षम असायला  हवे त्याचप्रमाणे क्राऊड मनेजमेंट हे वेगळे  शास्त्र विकसीत होण्याची गरज आहे.  गर्दी  होण्याची खात्री असण्याच्या संभाव्य ठिकाणी इमारती, रस्ता, पुल , कठडे, भिंती, त्या जागेची वजन सहन करण्याची क्षमता या सर्वच बाबींचा सुक्ष्म अभ्यास व्हावा.  एकाच जागी एकाच वेळी  क्षमतेपेक्षा जास्त गर्दी   न होऊ देता लोकांना विविधठिकाणी विखरून गुंतवून ठेवावे.  प्रशिक्षीत स्वयंसेवक भरपूर प्रमाणात तैनात हवेत.  ऐसपैस जागा जर उपलब्ध नसेल  तर संख्या नियंत्रीत करणे व त्याची आगावू कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे.  आवश्यक औषधांसहित मेडिकल  क्येम्प्‌स विविध दिशांना असणे अनिवार्य करावे.  गरज असो किंवा नसो गर्दी च्या प्रमाणात
रुग्णवाहिका आणि काही वाहने तैनात करणे अनिवार्य करावे.  सर्व प्रकारच्या गुन्हेगांरावर वचक आणि लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट, टि.व्ही. क्यामेरे, संगणक प्रणाली  अशा व्यवस्था जरी आजकाल  उपलब्ध असतात तरी बऱ्याच आडजागी पारंपारिक उत्सव, दुर्गम जागेतील  प्राचीन मंदिरे अशा ठिकाणी सुद्धा अनिवार्य करावे.  श्रद्धास्थानी विशेष दिनानिमित्य अफाट गर्द होते, अशा ठिकाणच्या विश्वस्त मंडळावर वर उल्लेखलेल्या सर्व सोई सवलतींचे बंधन हवे.  संभाव्य गर्दी च्या ठिकाणी आधी संरक्षणात्मक उपाययोजना सज्‌ज असण्याची खात्री हवी, आणि नंतरच उत्सवाला  परवानगी दयावी.
    प्रत्येकवेळी  पोलिस यंत्रणा, सरकारी व्यवस्थापन, नेते मंडळी  यांच्यावर तोंडसुख घेणे बंद करावे. 
पोलिसांवर नित्य कामाचा तीव्र ताण असतो. संबंधित संस्था, विश्वस्थांनी केवळ  गर्दमुळे  मिळणाऱ्या  द्रव्याचा विचार न करता संभाव्य अपेक्षीत गर्दी  सुनियंत्रीत करण्याची संपूर्ण जबाबदारी उचलावी.  प्रशासन यंत्रणेला  स्वत:चे प्रशिक्षीत स्वयंसेवक पुरवावे.  विदर्भातील  शेगांव येथील  श्रीगजानन महाराज संस्थानात कायमस्वरूपी स्वयंसेवक विविध कार्यासाठी प्रशिक्षित केले  असून त्यांचे कार्य उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.  अलोट गर्दीत मुलाबालांसह जाणे यात धोका आहेच.  भविष्यात गर्दी  होण्याचे प्रसंग फार वाढणार आहेत.  गलथान कारभार असेल  तर विविध धोके गर्दीत दबा धरून बसले  आहेत.  याचा अभ्यास हवा म्हणून, व्यवस्थापन हवे  गर्दीचे म्हणजेच क्राऊड म्यानेजमेंट.

                        ुुु  सुहास सोहोनी ---मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                www.suhassohoni.blogspot.com   








पंख उधार घेवून उडता येत नाही

    * पंख उधार घेवून उडता येत नाही *

             विदेशातील  सर्वच उत्पादक भारताकडे केवळ  एक बाजारपेठ या भूमिकेतूनच पाहतात.  अगदी गरीब आदिवासी माणसाला   सुद्धा एन.जी.ओ. मार्फत विदेशी वस्तु, पदार्थ पुरवले  जातात.  देशातील गर्भश्रीमंत, श्रीमंत मध्यमवर्गय आणि गरीबी रेषा ओलांडून मध्यमवर्गात प्रवेश केलेले  असे सगलेच, विविध विदेशी वस्तूच वापरतील  अशी पद्धतशीर योजनांच केली  गेली  असावी.  भारत संचार निगम तर्फे गावोगावी इंटरनेट व्यवस्था सुरू केली , त्यासाठी असलेली  उपकरणं पॉवर प्लग सहीत मेड इन चायना आहे.  लाखो करोडो कॉम्प्‌युटर्स, दुरदर्शन संच हमखास विदेशीच आहेत.  वीजेची  समस्या असल्‌यामुळे  कोट्यावधी इन्व्‌हर्टर्सची विक्री झाली  आणि विदेशी उपकरणे व बेंटरी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली .  अगदी सहजपणे आणि सतत आपण विविध विदेशी वस्तु वापरतो.  आणि त्या उत्पादकांना नफा पोहोचवतो.  टेलीव्हिजनच्या सिरियल्‌स किंवा स्पर्धाचं एक व्यसन जडलं  आहे, म्हणून केबल , डिशटीव्ही, आणि इन्व्‌हर्टर या उपकरणांनी घरात जागा बiकावली .  विदेशी कंपनीच सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी, होम थिएटर हट्टाने घरात घुसलं .  मोबाईल   हँडसेट हा कंबरेचा किंवा गळ्यातला  अलंकारच जणू. रिलायनस कं. भारतीय असला  तरी हँन्डसेट मात्र विदेशी,कोरियन
           कर्ज काढून आपण विविध योजनांदवारे किंवा सरकारी निती नुसार विदेशी उपकरणे विकत घेतो.  त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करतो.  खंत वाटते की या सगळ्या  वस्तू अस्सल  भारतीय बनावटीच्या का नसाव्या? पंचतारांकित विदयालयातून तज्ञ बनलेले  इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ नेमके काय करताहेत?  आपल्या
 या देशात विविध तंत्रज्ञान विकसित करून महासत्ता होण्याऐवजी आपण "रेडीमेड-ज्ञान' कर्जाऊ रकमा घेऊन, विकत घेत सुटलो   आहे.  यातील  90 टक्‌के गुंतवणूक मनोरंजन किंवा सुखसोई साठी आहे, म्हणजे उत्पादकता शून्य.  आज या देशाला  गरज आहे मोठ्या  उदयोगसमुहाची, भारतीय जनतेची गरज भागवून विदेशी बाजार पेठ गुणवत्तेने काबीज करणाèया उत्पादनांची.
    भारतीय उद्योग-कारखाने कां आजारी पडताहेत? उद्योजकांचा उत्साह का मावळतोय? उद्योग-निती, सोई सवलती, करांचा बोझा, वीजेची अनियमितता, अधिकारी वर्गाचा जांच, कायद्यातीb त्रुटी, पळवाटा अशा विविध कारणांनी कारखानदारी त्रस्त आहे का? करोडो हातांना काम मिiवून देणारे उद्योग उभारण्याची गरज आहे.  आज जागतीक बँकेचं कर्ज प्रत्येकामागे रू. 15000/- आहे.  हे उधारीचं ओझ खांद्यावर घेवून कशी भरारी मारता येणार? समर्थ खांदेच पेलू  शकतील  महासत्तेचं स्वप्न.  या विदेशी उत्पादनांच्या कुबद्यांनी  आम्ही असा काय आनंद मिळवतोय? गगनात भरारी घेतांना हे पंख बळकट हवेत, सक्षम हवेत, मुख्य म्हणजे हे भरदार पंख स्वत:चेच हवेत, कारण, कधीही** पंख उधार घेवून उडता येत नाही. **
                        ुुु सुहास सोहोनी --मोबा .९४०५३४९३५४
                                क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com






* व्यसनमुक्ती हवी आजपासून *

      * व्यसनमुक्ती हवी आजपासून *

    दारू किंवा अंमली  पदार्थाच्या आहारी गेलेल्यांची संख्या सतत वाढते आहे.  केवळ  गंमत म्हणून सुरू झालेले हे व्यसन क्रमाक्रमाने अधोगतीच्या गर्तेत नेऊन सोडते.  हा एक मनोविकार आहे.  दारूचे व्यसन ही एक भयानक गुलामी आहे.  या व्यसनातून मुक्तता अत्यंत अवघड असली  तरी ते अशक्य मात्र नाहीच.  रोग्यापेक्षा नातेवाईकांची चिकाटी किती यावर ते अवलंबून आहे.  दारू मुक्ती मनापासून हवी असल्यास खालिल  प्रश्नांची उत्तरे शोधावी.
    दारूमुळे  बरेच प्रॉब्लेम्स  निर्माण झाले  आहेत का? कोणते ? * तरीही दारू प्याविशी वाटते का ? 
* आपल्या दारूपिण्यामुळे  आर्थिक नुकसान झाले  आहे का? * कुटुंबाचे हाल  होतात का? * नेमके दारूड्या कुणाला  म्हणावे? * आपले  स्वत:बद्दल  काय मत आहे? *दारूमुक्ती हवी आहे का? त्यासाठी आजवर काही प्रयत्न करून पाहिला  आहे का? *आपल्या व्यक्‌तिमत्वात काही दोष आहेत? कोणते? *ते दोष दुरूस्त व्हावेत असे वाटते का? *स्वत:च्या गुणदोषाची उजळणी करावीशी वाटते का? * जिथे चुक झाली  त्याची कबुली  दयायची आहे का? *आपल्या हातून जे कोणी दुखावले  गेले  आहेत त्यांची मनापासून क्षमा मागायची आहे का? *व्यसनापासून मुक्त होण्यासाठी इतरांना मदतीची हाक मारावीशी वाटते का? * मदत मागण्याची मनाची तयारी असल्यास अडचण काय आहे? *    आपण ईश्वर समजतो अशी एक शक्ती नक्कीच आहे. यावर विश्वास आहे काय? *ती शक्ती व्यसनापासून मुक्ती साठी बळ   देईल  असे खरंच वाटते? घरातल्या प्रत्येकाला   असं वाटतं का? *आई वडील  भाऊ बहिण आणि पत्नीवर मनापासून प्रेम आहे का? *ही सगळी  नाती आणि जीवनातला  आनंद टिकून रहावा असंच वाटत ना? *व्यसन पुर्णपणे सुटल्यास सुखी भविष्याचे चित्र रंगवता येईल  का? *प्रयत्न करावासा वाटतो ना? *मग सुखी भविष्याकडे वाटचाल  करण्यास आज या क्षणापासून सुरवात करणार?
    आपल्या मनाची ताकद अमर्याद असते. कोणतीही गोष्ट  अशक्य नाही. गरज आहे प्रामाणीक प्रयत्नांची आणि त्याचबरोबर समर्थ सहकार्याची. सोबत हवी चांगल्या विचारांची व विचारी मित्रांची.  मनाचा निग्रह पक्का झाल्यास व्यसनापासून मुक्तता मिळवता येते.  मद्यपानाची कितीही प्रलोभने आली  तरी दारूचा ग्लास  मी "आज' हातात घेणार नाही व पिणार नाही".  असे रोज म्हणावयाला  हवे.  दारू मुक्ती ही मनापासून हवी.  आयुष्य हे सुंदर  आहे.  त्याचा मनमुराद आनंद घ्या .
                        ुुु सुहास सोहोनी--- मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]        
                                www.suhassohoni.blogspot.com       



सोळावं वरीस म्हणजे नक्षीदार कांचपात्र

            *    सोळावं वरीस म्हणजे नक्षीदार कांचपात्र     *

    आम्ही पालक आपल्या मुलांची भावनिक गुंतागुंत समजून घेतो? इयत्ता दहावीतील  कमी जास्त १५ वर्ष वयाची ही मुले  आयुष्याच्या एका वेगळ्या  आणि महत्वाच्या टप्प्यावर आलेली  असतात.  पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल  नैसर्गिकपणे नकळत घडत जातात.  त्यासोबत स्वत:चं असं वेगळ  व्यक्तिमत्व आकार घेत असतं.  महत्वाकांक्षेची झालर लेवून मनावर स्वार झालेलं  विचारांच वारू, चौफेर उधळायला  कुणाची सुद्धा परवानगी मागत नाही.  भविष्याच्या अथांग आकाशात भरारी घ्यायला  या तारुण्याच्या उंबरठ्या वर पोहोचलेल्या  मुलामुलींना खऱ्या  अर्थाने मदत होणार असते, ती त्यांच्यावर १५ वर्षे झालेल्या संस्कारांची, सकारात्मक विचारसरणीची. पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातले  त्यांचे आदर्श सुद्धा मुला मुलीं च्या  मनाला   कोणतातरी आकार देऊन गेलेले  असतात.
    समजायला  लागल्या पासून नजरेने टिपलेल्या सर्व गोष्‌टींची साठवण मेंदूच्या संगणकात होऊन, आकलन शक्तीनुसार त्याचे अर्थ काढले  जात असतात आणि नकळत मुलांची धारणा बनत जाते.  चांगले  वाईट, सत्य असत्य, श्रीमंती, गरीबी, दैन्य, असमाधान, समाधान, आईवडिलांचा परस्परांवर असलेला  विश्वास, त्याग, आजीआजोबांचं लाभलेलं  प्रेम, दुर्दैवाने  काही घरांत किंवा घराबाहेर व्यसनांमुळे  बघावे लागलेले  उध्वस्त व्यक्तिमत्व व त्यामुळे  निर्माण झालेली  दहशत, अशा विविध घटना बा लमनावर आपला  कायमस्वरूपी ठसा उमटवतात.  गरजेपेक्षा वा लायकीपेक्षा जास्त पैसा खुळखुळत असलेल्या घरातील  मुलांना नकार ऐकण्याची सवयच नसते.  करमणूकीची अवास्तव व्याप्ती वाढल्याने आम्ही च्यानल्स दवारे मुलांना काय दाखवतो याचे भान संपले  आहे.  मुद्दाम लक्ष ठेवून बघायला  हवं की वाईन शॉप मध्ये दारू विकत घेणाऱ्या   मुलांची वयं काय आहेत. गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेटच्या आहारी किती मुले  गेली  आहेत, आडजागेवर किंवा कोणत्याही बगीच्यामध्ये दररोज खेटून बसलेली  जोडपी २० वर्षे वयाच्या आतील  सुद्धा असतात. शिकवणीच्या निमित्ताने ही मुले  घराबाहेर असतात का?
                       मैत्री, प्रेम आणि शारिरीक आकर्षण या तिनही भावनांचं सरमिसळ  होऊन आकर्षणालाच प्रेम समजण्याची चुक घडते आणि त्यातुनच एखादं भयनाट्य  आकारतं.  शिघ्र संतापी, कमकुवत मन नकार किंवा अडथळा  सहन करत नाही.  पालकांचा मुलांशी सुसंवाद असतो का? त्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे मिळतात का? मुलांचा कल  काय याचा शोध घेतला  जातो का? करिअरच्या बाबतीत मुलांवर विनाकारण अपेक्षांच ओझ लादलं  जातं का? पाल्यांशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा करताना त्यांनी मांडलेल्या विचारांचा आपण आदर करतो का? मुलांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना सकारात्मक पण आनंदी चेहऱ्यानं मदत करून पाठीशी उभं रहायला  आपल्याला  वेळ  तरी असतो का? आपण भ्रष्टाचाराने कमाई केली  असेल  किंवा आपल्‌याला  काही व्यसने असतील  तर या गोष्टी  मुलांना माहिती आहेत काय? अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला  समजेल  की आपल्या मुलांसाठी आपण कोणता मार्ग निवडतो.
                        ुुु  सुहास सोहोनी----मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                     www.suhassohoni.blogspot.com


* इच्छापत्र का करावे ? *

          *   इच्छापत्र का करावे ?  *

    इच्छापत्र हा शब्द उच्चारल्याबरोबर "मृत्यू' या जीवनातील  अटळ  सत्याची आपोआप आठवण होते. एकदा हे अटळ  सत्य मान्य केले  तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या सर्व संपत्तीची योग्य ती व्यवस्था व्हावी असे आपल्याला  वाटणे साहजीक आहे.  त्यासाठी इच्छापत्र करून ठेवणे हा एकच राजमार्ग आहे, हे आता लोकांना पटू लागले  आहे.  प्रत्येक माणसाला  आपले  इच्छापत्र करून ठेवण्याचा हा जो अधिकार आहे, ते त्याच्या हातात असलेले  प्रभावी अस्त्र आहे.
    मृत्यूनंतर आपल्या मालकीच्या संपत्तीचा विनियोग कसा व्हावा याबद्दल  आपल्या मनात ज्या योजना असतील  त्या योजनांचा कायदेशीर जाहीरनामा म्हणजे "इच्छापत्र' असे म्हणता येईल .  हे अगदी खाजगी व गोपनीय स्वरुपाचे कायदेशीर कागदपत्र असून कोणत्याही अधिकाऱ्या पुढे किंवा न्यायालयापुढे सादर करण्याचा हुकुम कुणीही देवू शकत नाही.  इच्छापत्रात सुचविलेल्या योजनांची अंमलबजावणी आपल्या मृत्यूनंतरच व्हावी या उद्देशाने ते तयार केलेले  असते. तसेच बदलत्या परिस्थितीप्रमाणे इच्छापत्रात कितीही वेळा  बदल  करता येतो अगर ते रद्दही करता येते.  मुख्यत्वे आपल्या संपत्तीचा विनियोग कसा व्हावा, हे वारसांना कळावे म्हणूनच इच्छापत्र केले  जाते.  काही वेळा  इस्टेटीचा व्यवस्थापक नेमण्याकरीता, एखादा विश्वस्त निधी उभारण्याकरीता किंवा अज्ञान मुलां करीता तात्पुरता पालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्याकरीता सुद्धा इच्छापत्र करता येते.
    इच्छापत्र न केल्यास मृत्यूनंतर आपली   संपत्ती आपल्या कायदेशीर वारसांमध्ये आपोआप वाटली  जाते.   बहुतेकवेळा  न्यायालयाची संथ प्रक्रिया, वारसांचा लोभीपणा, विविध डावपेच, संपुर्ण इस्टेटीची व्यवस्थीत नोंद  नसणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात.  कालांतराने वारसदार एकमेकांना दुरावतात, कायदेशीर लढाई सुरू राहते.  एखादी विधवा झालेली  मुलगी, आजारी, अपंग मुल , वृद्ध आईवडील  यांच्या विशेष गरजा, कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत अशा नातेवाईकांसाठी थोडी जास्त व्यवस्था करण्याची गरज असते पण कायद्याला  सर्व सारखेच असल्याने न्याय होत नाही.
    संपत्तीचे वाटप कसे व्हावे यासंबंधी स्पष्ट  आदेश इच्छापत्रात असले  तर वाद, भांडणे मिटवता येतात, शिवाय एखादा इमानदार नोकर, जिवलग मित्र, कुणी दुरचा गरजू नातेवाईक यांना आपल्या संपत्तीतून काही द्यावे असे वाटले  तर ते इच्छापत्राद्वारे कृतीत आणता येते.
    इच्छापत्र तयार करणे हे मुळीच गुंतागुंतीचे नसून या कायदेशीर कागदपत्रांची नोंदणी करण्याची गरज नाही. इच्छापत्र हे स्पष्ट  शब्दात त्याच्या अर्थाबद्दल  काहीही संदेह राहणार नाही अशा तऱ्हेने लिहावयाला  हवे.  कमीतकमी दोन साक्षीदारांनी त्यावर सही करावी.  आपल्या इच्‌छेनुसार संपत्तीचे वाटप होईल  ही खात्री व्हावी म्हणून इच्छापत्रामध्येच एक व्यवस्थापक (एक्‌झीक्युटर) नेमण्याची गरज असते. एकूणच संपत्तीचे मुल्य वाढत असल्याने इच्छापत्र करून ठेवणे गरजेचे आहे.
                        ुुुसुहास  सोहोनी  मोबा.९४०५३४९३५४
                             क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com
                               www.mazyasamvedana

विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय

     *      विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय      *

    अर्वाच्य, अश्लील , गलिच्छ, किळसवाणं, घृणास्पद अशा विशेषणांनी वर्णन करता येतील  असे हिडिस प्रकार नित्य, राजरोस घडताहेत.  कुविचारांनी कुप्रवृत्तीशी फारच जवळिक केली  आणि चोऱ्या  खुन, दरोडे, फसवणूक, बलात्कार, अश्लिल  चित्रफित,  मोबाईल  द्वारे गुन्हे घडताहेत.  एकतर्फी प्रेमात कुणी प्रेयसीला  जाळताहेत, कुणी  ब्लेड मारताहेत, हातपाय तोडताहेत, कुठे सामुहिक अत्याचार घडताहेत.  बाप, बहिण, भाऊ, आई किंवा आजी ही सगiी रक्ताची पवित्र नाती सुद्धा विकृतीला  थोपवू शकत नाहीत.   अशा विकृतांधांची लोकसंख्‌या दिवसंदिवस वाढते आहे.  त्यात भर म्हणून माफियांचे हल्ले , पोलिसांच्या हत्या, पोलिसांच्या तर्फे प्रति कारवाई, दमनचक्र, त्यावेळी  कितीतरी निरपराध जीवांची होरपळ  होते.  दररोज अशा मन सुन्न करणाèया बातम्या ऐकायला , वाचायला  व पहाव्या लागतात.  नराधमांच्‌या अत्याचाराला  प्रत्यक्षात एकदा बळी  पडलेल्या महिलेचा फोटो विस्तृत बातमीसह संपूर्ण देशात घराघरात दूरसंचाद्वारे दाखवला  जातो आणि रोज  तिच्या अब्रूची पार लक्‌तरं होतात. पण गुन्हेगाराच्या तोंडावर मात्र काळा  कपडा टाकला  जातो. असं का होतंय?
     आपल्या देशात फार पुर्वपासून महान लोकोत्तर संत, महात्मे, विचारी पुरूषोत्तम आणि सद्‌विचार रुजविणारे दिव्य पुरूष होवून गेले .  आजही जिथे तिथे शेकडो मंदीरे, मठ, आश्रम आहेत.  तेथे समाजाला  त्याग, सेवा, सहकार, प्रेम, शांती, विनम्रता या सद्‌विचारांची शिकवण दिली  जाते.  काया, वाचा आणि मनाच्या शुद्धीकरीता विविध प्रकार, प्राणायाम व योग साधनेद्वारे मन:शांती प्राप्त करण्याकरीता अगदी करोडो लोकं प्रयत्न करतात. लक्षावधी लोक वारकरी बनून समाजाला  आदर्शाचे धडे घालून देतात.  यात्रा, धर्मस्थळे , तिर्थक्षेत्र अशा ठिकाणी पापक्षालन आणि पुण्यसंचयासाठी नित्य लाखो करोडोंच्या संख्येने लोक-भक्ती मार्गाचा अवलंब करून नतमस्तक होतात.  मग इतकं होवूनही आपल्या देशाचं पुण्य कुठे कमी पडतं, की महापापी विकृतांध जन्माला  यावेत?
    षड्‌रिपूंनी थैमान घातलेल्या या भरकटले ल्या जीवांच्या मनावर कधीही नष्ट  न होणाऱ्या  पंचशील  तत्वांच्या मिश्रणाची फवारणी व्हावयास हवी.  अनेक जिवाणू, विषाणू, व्हायरस मानवाला  त्रस्त करीत असतात. अगदी तसाच हा विकृती नावाचा व्हायरस हळू  हळू  मानवी मनात बलवान होतोय आणि फैलावतोय.  आपले  वाचन, मनन, चिंतन, कपडे, फेशन, करमणूकीची माध्यमे, सवई, व्यसने, आपले
 आदर्श अशा अनेक विषयात आपले  काही चुकते आहे का? या विषयी सतर्क राहुन आत्मचिंतन व्हावे.  फोफावणाऱ्या  या विकृती नावाच्या व्हायरस चा नायनाट लवकरच करावयास हवा. आणि हे काम आपल्याला स्वतःलाच करावे लागणार .
                            
                                 सुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                                 www.suhassohoni.blogspot.com





* स्त्रियांचे स्वातंत्र्य व स्त्री मुक्ती आणि वास्तव*

 * स्त्रियांचे स्वातंत्र्य  व स्त्री मुक्ती आणि वास्तव*
-----------------------------------------------------
    प्रत्यक्षात एक वस्तुस्थिती स्पष्ट  आहे की निसर्गात मानवासहित प्रत्येक प्राण्यात (फक्‌त काही अपवाद वगळता) नर आणि मादी या दोनच प्रजाती असून त्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.  जीवन, संगोपन, प्रजातीची वाढ, संवर्धन या निसर्गाच्या संतुलनात्मक क्रिया सहजगत्या साकार होतात, त्या नर आणि मादी यांच्या सहकार्यानेच, आणि त्यासाठी हे दोन्ही घटक एकमेकांसाठी आवश्यक आहेत.  दोघांची प्रकृती व जीवनकार्य परस्परभिन्न आहे.  प्रत्येक वस्तु व जीव विशिष्ट  काळा नंतर नष्ट  होणार या निसर्ग नियमामुळे  जैवसंतुलन साधण्याकरीता प्रजनन आवश्यक ठरते.  नेमक्या याच मुलभूत गरजेमुळे  स्त्री पुरूषांचे कार्यक्षेत्र ठरले .  सहाजीकच दोघांच्या शक्तीच्या मर्यादा निश्चित झाल्या.  विविध आपत्तीपासून स्त्रीचे रक्षण करणे, पालन करणे हे पुरूषांचे महत्वाचे कार्य ठरले .  आणि याचवेळी  स्त्रीयांना "धन' मानले  जाऊ लागले .  त्यातूनच पुरूषप्रधान संस्कृती सहजच मान्य झाली .  धनाचा सांभाळ  करणे, वापरणे, धनासाठी युद्ध करणे आणि व्यापार करणे या गोष्टी  नित्याच्याच घडू लागल्या.  कालांतराने पुरूषप्रधान संस्कृतीचे दुष्परिणाम जगभर दिसू लागले .  पुरूषी महत्वाकांक्षा आणि लोभ जोर धरू लागला  .  शतकानुशतके स्त्रीयांच्या व्यक्ती स्वातंत्र्या वर नेहमीच विविध बंधने घातली  गेली . त्यांना डांबून ठेवणे, स्वत:च्या श्रीमंती निमित्य  त्यांचे प्रदर्शन करणे घडू लागले .  जुलुम, अत्याचार व प्रजनन या चक्रात स्त्री वर्ग कायम त्रस्त होता.
    गेल्या शतकाच्या उत्तरार्धात 1907 साली  अमेरीकेत न्युयार्क येथे उद्योग जगतातील  महिलांची एक परिषद आयोजीत केली  होती.  त्यासाठी जगभरातून मोठ्या  संख्येने स्त्रीया एकत्र आल्या व त्यांनी विविध सोई सवलती सोबत मतदानाच्या हक्कांच्या मागण्याचे निवेदन प्रथमत: दिले .  हजारो वर्षे मत स्वातंत्र्य  जीथे नाही तिथे मतदानाचा अधिकार कसा शक्य असणार? पण 8 मार्च 1908 साली  स्त्रीयांचा मतदानाचा हक्क मान्य झाला  आणि नवे पर्व सुरू झाले .  स्त्रीयांच्या स्वातंत्र्या तील  पहिला  टप्पा पार झाला .  पुरूषाप्रमाणे आपणही स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात बरोबरीने काम करू शकतो हे सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना मिळत गेली .  बौद्धिक गुणवत्तेत स्त्रीया कुठेही कमी नसून वेगवेगल्या  क्षेत्रात स्वावलंबी होऊन स्वत:चा प्रभाव आज स्त्री सिद्ध करीत आहे. मोठ्या  शहरातील  उच्च शिक्षित स्त्रीयांना संधी भरपूर असली  तरी मध्यम शहरे व ग्रामीण भागात आजतरी स्त्रीया विविध संधी पासून वंचित आहेत.  विविध सोयी उपलब्ध नाहीत.  यासोबत कुटुंबातील  पुरूषांची नकारात्मक मानसीकता स्त्रीयांच्या वैचारीक प्रगतीच्या आड येते.  देशात कितीतरी ठिकाणी आदिवासी ग्रामीण भागात स्त्रीयांच्या विचारांना स्थान नाही, मान्यता नाही.  चेहरा पदराने लपवण्याची सक्ती आहे, स्त्रीभृणहत्या समाजाच्या सर्व स्तरात उच्चांक गाठते आहे.  मुलींना शिक्षणाची संधी नाकारली  जात आहे.  शिक्षणाचा आर्थिक भार असह्य आहे.  कायदयाने बंदी असताना सुद्धा बाल विवाह उरकले  जात आहेत.  बाल कामगार म्हणून मुलीं चा वापर फार मोठ्या  प्रमाणात होत आहे.  आनर किलींगच्या निमित्या  ने युवतींचा जीव घेतला  जातोय.  ग्रामीण भागात स्त्रीया दहशतीच्या वातावरणात जगत आहेत हे सत्य आहे.  विशेषत: लहान मुली वर लैगिक अत्याचाराचे प्रमाण फारच चिंताजनक झालेले  आहे.  पुर्वी  चार भिंतीच्या आत स्त्रीयांना धोका होताच, पण शिक्षण व विकासाची दालने जसजसी उघडायला  लागली  तसा स्त्रीयांवरील  अत्याचार, लैगिक शोषण, छेडखानी, विनयभंगाच्या प्रकारात फारच वाढ झाली  आहे.  कायदा कठोर तर हवाच.  गुन्हेगाराला  जन्मठेप वा फाशीची शिक्षा व्हायलाच हवी.  आजही महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजले  जाते हे विदारक सत्य आहे.  ** नवीन जन्म घेणारे बाळ मातेच्या उदरांत संपूर्ण सुरक्षित असतेच पण जन्माला येऊ पाहणारी कन्या [भ्रूण ]मातेच्या गर्भातही सुरक्षित नाही ,हे वर्तमानाचे विदारक सत्य आहे .केवळ मुलगी झाली या कारणाने कितीतरी मातांना जीवघेणा ,मानसिक छळ ,अपशब्द सहन करावे लागतात .**   हा दृष्टीकोन  कसा बदलेल ?
    मुलींना हीन लेखणे योग्य नाही.  मुलगी म्हणजे जगाचा मुलाधार, प्रतिष्ठा  आहे.  माहेर आणि सासरची दोन्ही कुळ  साधणारा दुवा म्हणजे मुलगी.  ती दोन्ही कुलांचं हित साधत असते.  विवाह संस्थेचं महत्व नक्कीच लक्षणीय आहे.  त्यामुळेच फार मोठा वर्ग शांततेच जीवन जगत आहे.  असे सुखी परिवार नेत्रदिपक विकास साधू शकत आहेत.  मात्र धोका इथेही दडून बसला  आहे.  अती उच्चशिक्षित असल्यामुळे  पती पत्नी दोघेही मोठ्या  पगारावर नोकरीत किंवा व्यवसाय, करिअर मध्ये व्यस्त आणि गर्क आहेत.  त्यांना कुणाचीही जबाबदारी नको आहे अगदी स्वत:च्या अपत्याची सुद्धा जबाबदारी नको आहे.  त्यांना मुल च नको आहे.  दोघेही फारसे एकमेकांसाठी वेळ  काढू शकत नाहीत आणि या वर्गामध्ये दुर्दैवा ने घटस्फोटाचे प्रमाण धोकादायक वाढलेल  आहे.  या श्रीमंत वर्गातील  स्त्रीयांना पुरेपूर स्वातंत्र्य  आहे आणि त्यांचे जीवनसुद्धा मुक्त वातावरणात त्यांच्याच इच्छेनुसार असताना कित्येकांना अपयश  का यावे ?
    स्त्रीमुक्ती या संकल्पनेचा सर्वांगीण विचार करावयाचा झाल्यास आजच्या विज्ञाननिष्ठ बदलत्या वातावरणात न जमणाऱ्या , न समजणाऱ्या , कर्मकांडांनी पुरेपूर व्यापून राहिलेल्या, दंतकथेमध्ये शोभून दिसणाऱ्या  अशा अनेक विचार, कल्पना व क्रियांपासून जाणिवपूर्वक मुक्ती मिळवणे व परंपरेच्या नावाखाली अवास्तव दबावाला  स्पष्ट  विरोध करणे गरजेचे आहे, * मात्र परंपरेने चालत आलेल्या शाश्वत सत्यांचा शुद्धबुद्धीने स्विकार करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. *  अनेक तथाकथीत तज्ञ म्हणवणाऱ्या  महाभागांकडून या विषयात जाणीवपूर्वक भ्रम निर्माण केला  जातो आणि या भुलावणीमुळे  आपण नकळत शाश्वत सत्यांनाच विरोध करू लागतो, आणि आयुष्‌यात अपयश प्राप्त होते.  कोणतेही निकष नसलेल्या खुळ्या   कल्पना पासून मुक्त व्हावयास हवे.
    ज्या प्रमाणे पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे त्याचप्रमाणे स्त्रीने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती या संकल्पनेचा विचार होईल .  आजतरी शहर असो की खेडेगाव स्त्रीयांना संरक्षणाची नितांत गरज आहे.  त्याचवेळी  महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले  पाहिजे.  पुरूषांसोबत समाजाची मानसिकताही बदलणे गरजेचे आहे.  कायदे तर आहेतच पण कायद्याचे संरक्षण करणारे सक्षम आहेत ? हुंडाबळी  आणि विकृत, व्यसनी पुरुषांकडून स्त्रीयांवरील  अत्याचारात नित्य वाढ होत आहे.  विविध समाज घटकांनी या विषयावर गंभीरपणे विचार करायला  हवा. " स्त्रीमुक्ती व स्वातंत्र्य "  या संकल्पनाच आहेत.  प्रत्यक्षात दु:खी, गांजलेली , चिंताक्रांत अशी स्त्री स्वत:चे भविष्य बनवू शकत नाही ती भावी पिढीचे भवितव्य कसे काय बनवणार? प्रत्येक कुटुंबात स्त्रीयांना संपूर्ण सन्मान दिला  जातो का? तिच्या विचारांना मान्यता दिली  जाते का? आपसात सुसंवाद आहे का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला  विचारावयास हवेत.  स्त्री पुरूषांनी परस्पर आदर व सन्मान मान्य करून तसे वर्तन घडण्याची गरज आहे.  दोघेही समंजस व सक्षम हवेत.  ज्या घरात स्त्री दु:खी असेल  ते घर कधीही सुखी राहू  शकणार नाही.

                   सुहास सोहोनी    मोबा.९४०५३४९३५४
                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                 www.suhassohoni.blogspot.com
                 www.mazyasamvedana

* आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा *

       *  आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा  *

    आम्ही म्हणजे भारतीय, १२१ कोटींची प्रचंड लोकसंख्या असलेला  आपला  देश, आकाराने सुद्धा अफाट. चालिरीती, बोली , संस्कृती, विचार, कला प्रकार, नैसर्गिक वातावरण या सगळ्यात विविधता असुनही आम्ही एकसंघ आहोत, लोकशाही व्यवस्थेत कालक्रमण सुरू आहे.  वर्षामागुन वर्षे जात आहेत पण सामान्य जनता खरच सुखाने नांदते आहे? या देशाची ८० टक्के जनता सामान्य आहे.  कामगार, मजूर, शेतकरी, छोटे व्यावसाईक अशा विविध गटातील  आहेत आणि यातील  कुणीही सुखी नाहीत.  आनंदी नाहीत.  त्रस्त आहेत वाढत्या महागाईने, रोजच्या छोट्या छोट्या गरजेच्या  वस्तू  मिळवतांना चिंताक्रांत  आहेत , नित्य पसरवल्या जाणाऱ्या  राजकीय विदवेशाने, पावला  गणीक नाडवल्या जाणाऱ्या  भ्रष्टाचाराने सामान्य माणूस त्रस्त आहे.  असुरक्षित आहे नक्षली  हल्ले , दंगे, अत्याचार बाँम्बस्फोट, हलगर्जी  पणाने घडणारे लहानमोठे अपघात, माफीयांचा आतंक, सत्ता आणि पैसा यात आकंठ बुडालेले  नेते, त्यांची सततची बेताल  वक्तव्ये, सगळ्या  समस्या प्रलंबित, त्यात रोज नव्या समस्या, जनता त्रस्त आहे.

    जास्त धोकादायक जर काही असेल  तर ते म्हणजे सामान्य माणसाला  सहन करण्याची, दहशतीत जगण्याची, त्रस्त असण्याची सवय झाली  आहे.  कसला तरी अभिमान वाटावा अस चौफेर काही दिसत नाही सत्तेत असलेले  किंवा सत्तेच्या जवळ  असणारे प्रत्येक विषयात कमाई करताहेत.  शिक्षणाचा पार बाजार झाला . नोकऱ्या  विकावू झाल्यात.  जमीनी पद्धतशीर बiकावल्या जातात.  अवाच्या सव्वा भावाने विकल्या जातात.  त्यासाठी दंगे घडवले  जातात गोळी बार होतो.  आम्ही दहशतीत जगतो.  राजकारण खेळले   जाते, गरीबांच्या प्रेमाचे नाटक खेळले  जाते.  संतत दहशतवादी हल्ले  होतात.  किड्या  मुंग्यासारखे सामान्य लोक रस्त्यात मरून पडतात.  आप्तस्वकीय गमावलेले  धाय मोकलून रडतात, कायमची मोडून जातात.  आपले  कुणी मेलं  नाही म्हणून बाकीचे थोडं सुखावतात.  आणि गप्प राहतात.  काही दिवस धावपळ , कवायत, मेणबत्यांचा मोर्चा, मानवी साखळी , मुंबईकरांची जगण्याच्या स्पिरिट साठी तारीफ आणि पुन्हा दहशतीत रोजच जीवन, पुन्हा राजकारण, बेताल  वक्तव्ये. देशात सर्वोच्च आहे ती संसद, त्या संसदेच्या सार्वभौमत्वावर आतंकी हल्ला   झाला  तरीही आम्ही निषेधाचे खलीते सोपवतोय.  कणखरपणे धडा शिकवू शकत नाही.  याचा आम्ही अभिमान बाळगायचा का?
       नवनवीन आतंकी संघटना नावं बदलवून निर्माण होत आहेत.  विविध मार्गाने आतंकी देशात दाखल  होत असल्याचे सांगितले  जाते.  स्फोटके सहजपणे आणली  जातात, दहशत माजवली  जाते.  काही घडत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत असे म्हणायचे. नक्षल  चळवळ  हा दहशतवादच आहे.  अशा राज्यांमध्ये सरकार नेमकं कुणाचं, हाच प्रश्न पडतो.  अभिमान वाटावा असं काहीही दिसत नाही.  जे आधीच गब्बर आहेत तेच शिक्षण सम्राट, उद्योग सम्राट, मिडिया सम्राट बनून साम्राज्याचा उपभोग घेत आहेत.  शिक्षण स्वस्त नाही, औषधोपचार पराकोटीचा महाग, योजना फक्त उरल्या कागदांवर.  शेतकऱ्याची व्यथातर त्यांच्या घरात जन्म घेतल्याशिवाय खरोखर इतरांना समजणारच नाही. मजूर, शेतकरी, अत्याचारग्रस्तांचे मृत्यू हे चित्र अभिमान वाटावा असं नाहीच.  देशातच लपवून ठेवलेली  आणि विदेशात पळवून नेलेली  संपत्ती लाखो करोडोच्या घरात आहे.  अफाट धन संग्रही असणारे बाबा, संत, महाराज तसेच मोजता येणार नाही इतकी संपत्ती दडवून ठेवलेली  मंदीरे.  काय कामाची ही प्रचंड धनराशी जी देशाच्या काहीही उपयोगी नाही.  देशाचं सामर्थ्य  , विकास यांची भलावण आमच्या समोर केली  जाते पण प्रत्येक क्षेत्रात किती गोंधळ  आहे,* नित्य  प्रचंड घोटाळे  उघडकीस येत आहेत.*  धन कमावण्याची इतकी निलाजरी धडपड दिसते आहे की हे सगळ  कुठे जावून थांबणार हेच कळत नाही. ज्यांनी जनतेचे संरक्षण करायचे तेच खुर्ची ,तिजोरी आणि लाठी च्या जोरावर मलिदा कमावताहेत. सगळेच आरोप नाकारले जातात मग अत्यंत कमी काळात हे सगळे अरबो ची दौलत कशी काय मिळवतात हे  कुणी सिद्ध करून यांना शिक्षा देईल का ? खरंच , ' अभिमान वाटावा असं काही आहे?' आम्ही नक्की कशाचा अभिमान बाळगायचा?*
            सुहास सोहोनी .९४०५३४९३५४
            क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
            www.suhassohoni.blogspot.com

हसा आणि हसवत रहा

       *   हसा आणि हसवत रहा    *

    हास्य आणि निरोगी असणं या दोन गोष्टी चं अतूट नातं आहे.  आपण दिवसातील  किती वेळ  हसतो, अगदी खळखळुन हसतो हा प्रश्न स्वत:लाचच विचारून पहा, उत्तर मिळेल  .  फारस न हसणारे एका नकारात्मक भावनेत जगत असतात.  समस्या आणि फक्त समस्या.  यांचच तुणतुणं वाजवणारे अवतीभवती असतात, अशाच विचारांचा कोष तयार करून त्यातच राहणे पसंत करतात, आणि हसण मात्र विसरून जातात.  आपल्याला  मिळालेलं  हे सुंदर जीवनाचं भाग्य कस उपभोगायच यावर सकारात्मक विचार करण्याची गरज आहेच.  काही व्यक्तींना खळखळु न हसण आवडत नाही, कमीपणा वाटतो, अवखळपणा वाटतो, पण नेमक्या वेळी  मनसोक्त आनंद लुटण्याच राहुन जाते हे बरोबर नाही.
    विनोदी कथा, प्रासंगिक, चुटके, किस्से, टिव्ही चेंनल  वरील  हिंदी मराठी हास्यविनोदी कार्यक्रम यांची अगदी रेलचेल  दिवसभर असताना त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.  आपल्या परिवारासोबत, मित्रमंडळी सोबत हास्यविनोदाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते.  चेहऱ्याचे सगळे  स्नायु मोकळे  होतात.  मन प्रसन्न होते, प्रत्यक्ष हसतांना हसणाऱ्यांचे  मजेदार वेडेवाकडे होत असलेले  चेहरे पाहुनच खरे म्हणजे भरपूर हसायला  मिळते.  मनमुराद हसण्याचा आनंद लुटलाच पाहिजे.  निखळ  हास्यासारखे दुसरे औषध नाही.
    एका विशिष्ट  वयानंतर समस्यांच आक्रमण वाढल्यामुळे  किती तरी वेळा  हसायचं राहुन जात, असं व्हायला  नको. हास्य क्रियेचे बहुमुल्य क्षण सतत जमतील  तसे वेचत रहायला  हवे.  आपण हास्य क्लबचे सक्रीय सदस्य बनण्यातच मजा आहे.  दिवसातून जमेल  तेव्हा मुद्दाम विनोदी किस्सा मोठ्या  ने वाचणे,
 व्यंगचित्र पाहणे, त्यातला  आनंद घेणे, इतरांना हसवणे हे ज्याला  जमले  त्याचे भले  होणार म्हणून समजावे, तेव्हा हसा आणि हसवत रहा हे सुत्र जोपासा आणि जीवन आनंदमय बनवा, हसा आणि लठ्ठ  व्हा, पण निरोगी व्हा.
                        ुुुसुहास  सोहोनी-- मोबा.९४०५३४९३५४
                                क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com

मिडियातील करिअर - आव्‌हानात्मक संधी

         *  मिडियातील  करिअर - आव्हानात्मक संधी  *

    पत्रकारीतेत वृत्त संकलन करून प्रभावीपणे ती घटना जनतेसमोर मांडणे हा महत्वाचा विषय आहे.  आधीच प्रिंट मिडिया आणि टेलीव्हिजन वरील  वृत्तवाहिन्या संख्येने खूप जास्त आहेत, सहाजीकच चढाओेढ आहे.  म्हणजेच कल्पकतेला  प्रचंड वाव आहे.  देशात कुठेही खट्ट झाले  तरी काही मिनीटात ती बातमी दिली  जाते.  नीट विचार केला  तर ही एक संधी आहे करीअरसाठी.  टी.व्ही. वर बातमी येईपर्यंत कितीतरी लोक त्यासाठी काम करतात.  पत्रकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, संगीतकार, असा  मोठा ताफा कायम व्यस्त असतो, तसेच विविध विषय सामाजीक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, गुन्हेगारी, पर्यटन, धार्मिक, वैचारीक अशा अनेक विषयात चतुर पत्रकारांची, सुत्रसंचालकांची, निवेदकांची सतत गरज असते.  प्रिंट मिडीया आणि टि.व्ही. न्युज चेंनल्‌स यांचा पसारा, आवाका इतका मोठा आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात व विदेशात सुद्धा याचं जबरदस्त नेटवर्क आहेच.
    या क्षेत्रात प्रवेश करू इच्छणाऱ्या  तरुणांसाठी काही विशेष गुणवत्तांची गरज आहे.  अनेकानेक भाषा सफाईदारपणे बोलता व वाचता यायला  हव्यात.  सतत अभ्यासू वृत्ती हवी.  या क्षेत्रात नित्य नव्या विषयांच्या मागे धाव घेतली  जाते.  जास्तीत जास्त विस्तृत माहिती त्वरीत आणि आपल्याच  माध्यमाने द्यावी यासाठी अथक परिश्रम घ्यावे  लागतात.  खऱ्या खोट्या ची शहानीशा करून नेमकी व योग्य तेवढीच माहिती प्रस्तृत करायची असते.  कुठेही स्वत:चा कल्पना विलास नसावा.  विविध क्षेत्रातील  नामवंत मंडळी ची भेट होणे, ही सुद्धा नित्याचीच, आनंदाची बाब आहे.  विविध मान्यवरांशी चर्चेची, सिनेमा नाटक क्षेत्रातील  ज्येष्ठाशी मुलाखतीची संधी मिळुन आपले  व्यक्तीमत्वात सकारात्मक गुणवर्धन होते.  मात्र वेळेचे बंधन नसल्याने सदैव सज्ज असावे लागते.  प्रतिकूल  परिस्थितीत सुद्धा कार्यतत्पर असणे आवश्यक आहे, म्हणजेच आपण सुदृढ, निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे.
    इलेक्ट­ॉनिक्स व प्रिंट मिडिया यात करीअर करू इच्‌छणाऱ्या  तरुणांनी मासकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.  अनेक विद्यापिठात सध्या हा विषय आहे.  पत्रकारिता किंवा जनसंवाद हे पदवीनंतरचे अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे असतात.  चेन्नई येथील  अण्णा युनिव्हर्सिटीने पाच वर्षाचे कॉ°म्प्‌युटर सायंन्स, इन्फर्मेशन टेक्‌नॉलोजी, मास्टर आफ सायंन्स इन इलेक्ट­ॉनिक मिडिया हे अभ्यासक्रम सुरू केले  आहेत.  सध्या आपल्या देशात माध्यम क्रांती होत असून चांगल्या व दर्जेदार मनुष्यबळा ची फार चणचण आहे.  वृत्त संकलनात नित्य वेगळे पण ही या क्षेत्रातील  मेख आहे,  नाविन्याचा ध्यास, जिद्द, चिकाटी, परिश्रम, झोकून देण्याची वृत्ती, निडरता, कळवळा  आणि सचोटी या गुणांच्या जोरावर मिडियातील  करिअर जीवनाचा आनंद मिळवून देऊ शकते.  तरुणांनो प्रयत्न करा, शुभेच्छा आहेतच.
                        ुुु सुहास सोहोनी   मोबा.९४०५३४९३५४
                               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                              www.suhassohoni.blogspot.com
                               www.mazyasamvedana

Thursday, August 23, 2012

प्रार्थना - एक संस्कार

           *   प्रार्थना - एक संस्कार      *
   
             मानवी मनाची जडणघडण हजारो वर्षाच्‌या संस्काराने होत असते.  हे संस्कार रक्‌तात भिनलेले  असतात. अनेक चांगल्या वाईट संस्कारांपैकी प्रार्थना हा एक संस्कार आहे. श्रद्धा आणि भक्तीयुक्त प्रार्थनेने कार्य सिद्धी होते हा विश्वास, हा सुद्धा संस्काराचाच भाग आहे. प्रार्थनेने मन शांत होते, सुविचार मनात येतात, आत्मविश्वास वाढतो. वातावरण प्रसन्न-चेतनामय होते. दु:खी-कष्टी  जीवाला  प्रार्थनेने दिलासा मिळतो.सामूहिक प्रार्थनेने एकी वाढते. माणसाच्या प्रगतीस  उपकारक असणाऱ्या  तसेच शक्तीमान तत्वांची  आपसूकच प्रार्थना केली जाते. त्यातून त्या शक्तीची श्रेष्ठता   स्वीकृत केली जाते.
           ही संपूर्ण सृष्टी ज्यापासून उत्पन्न झाली त्या पंचमहाभूतांपेक्षा म्हणजेच निसर्गापेक्षा सर्वशक्तीमान असे दुसरे काहीही नाही, आणि मानव म्हणजे या संपूर्ण ब्राम्हंडा मधील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ  एक जीव. निसर्ग तत्वांचा  सखोल अभ्यास करून जोपासलेलं विज्ञान हे मानवाच्या बुद्धीचे प्रमाण आहे.त्या आधारावर त्याने अनेक आवश्यक-अनावश्यक सुखसोयी उपलब्‌ध करून घेतल्या, परंतू केवळ  एवढ्यावरून निसर्गाच्या श्रेष्ठत्वाला आव्हान दिले जाऊ शकत नाही आणि निसर्गाची प्रार्थना करणे यात काहीच गैर नाही. केवळ  स्वार्थासाठी सत्ता हातात असलेल्या व्यक्तिची प्रार्थना-पूजा होत असलेली आपल्याला नेहमीच दिसते, त्यापेक्षा सर्वचराचराच्या भल्यासाठी निसर्गदेवतेची केलेली प्रार्थना नक्कीच चांगली. पण त्यासोबत योग्य कर्म आवश्यक आहे.
    थोडं बारकाईने आजुबाजूला लक्ष दिले तर असे दिसेल की पूर्वापार सुसंस्काराचा झपाट्याने लोप होत चालला आहे. चांगले विचार, उच्च  नितिमत्ता या कल्पना हास्यास्पद ठरू लागल्‌या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून  अनाचार,अत्याचार व्यसनाधीनता, स्वार्थाचा अतिरेक आणि स्वत:च्या नेमून दिलेल्या कर्तुत्वातील बेजबाबदारपणा फारच वाढला आहे. या दुर्दैवी  पाश्र्वभूमीवर प्रत्येक व्यक्तिने मनावर संयम ठेवण्यासाठी, एकाग्रता वाढीसाठी, आत्मविश्वासासाठी, सूविचारासाठी दररोज या श्रेð निसर्गदेवतेची, पंचमहाभूतांची प्रार्थना करणे तसेच निसर्गाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. प्रार्थनेत प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत फक्त एवढेच म्हणावे.
।। हे निसर्गदेवते मला सुबुद्धी दे।।
               सुहास  सोहोनी ९४०५३४९३५४
          उजळते  क्षितीज [मराठी लेखसंग्रह २००७]
           www.suhassohoni.blogspot.com







मधुमेह म्हणजेच खुले रंगमंच

                        *   मधुमेह म्हणजेच खुले  रंगमंच    *
                                [जागतिक मधुमेह दिन ]

    अपघात झाल्यानंतर रक्तात साखर जास्त आहे ह्या  कारणाने ओपरेशनला  वेळ लागतो आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याचं ज्ञान होतं.  हे स्वास्थ्याबाबतचं अज्ञान बरं नव्हे.  आपल्या रक्तामध्ये विविध घटकांचं प्रमाण निश्चित अशा स्वरूपांत असतं.  त्यात साखर हा सुद्धा एक अतिमहत्वाचा घटक आहे.  जे काही अन्न आपण खातो त्यातील  साखर (ग्लूकोज) रक्तात मिसळली  जाते आणि शरिरातच निर्माण होणाऱ्या  इन्सुलिन नामक द्रव पदार्थाद्वारे रक्‌तातील  साखर  नियंत्रीत केली  जाते.  अनेक कारणांनी शरीरात इन्सुलिन तयार होण्यास बाधा आली  तर सहाजीकच साखर अनियंत्रीत होणार व ती व्यक्ती मधुमेही म्हणून घोषीत होणार.  तेव्हा मधुमेह असणे म्हणजे रक्तातील  साखरेची बिघडलेली  स्थिती.  उत्तम आरोग्य आणि संतुलीत शुद्ध रक्त यांचा फार जवळचा संबंध आहे.
    ज्या प्रमाणे रंगमंचावर विविध नट, नट्या  सहजतेने प्रवेश करतात, आपल्या अस्तित्वाने, प्रभावाने वातावरण निर्मिती करतात, तसे मधुमेही असलेलं   शरीर म्हणजे जणू काही एक रंगमंच असतो, पण हा रंगमंच विविध विषाणू, जिवाणू, रोग विकार यांना आग्रही निमंत्रण देतो आणि शरीरात या विकारांना जागा करून देतो.  हे सगळे  निमंत्रित कलाकार सहाजिकच खलनायकी वर्गातले  असतात आणि खलनायकी प्रवृत्तीनुसार रंगमंचावर प्रभाव पाडून अनारोग्याची वातावरण निर्मिती करतात.  मुख्य म्हणजे एकदा शरीररूपी रंगमंचावर प्रवेश करून जागा मिळवली  की कायमस्वरूपी घर करण्याकडे या खलनायकांची वृत्ती असते.  अनारोग्याने ढासळणारं शरीर म्हणजे खलनायकी पात्रांचा विजय, अशी ही दृष्य परिस्थिती दिसू लागते.
    कोणतेही विकार म्हणजे अनेक वर्षांची हळु हळू  सुरू राहणारी प्रक्रिया असते.  रुग्णाला  त्याची जाणीव नसते.  बालपणातील  विविध समस्या, वातावरण, कुपोषण, पुढे आयुष्यभर असलेला  ताणतणाव, चिंता, तिव्र स्पर्धा, सगळ्याच गोष्टीतील  अनियमितता, व्यसने, खाण्यातील  अतिरेक तसेच व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी हळू  हळू  स्वास्थ्यसंतुलन बिघडण्यास मदतच होते. शेवटी शरीरात इन्सुलिन निर्माण प्रक्रिया मंदावते म्हणून रक्तात साखर साठते, वाढते.  ही इन्सुलीन निर्माण यंत्रणा जी आपल्या शरीरात आहे तिच्यावर आपल्या अनियंत्रित आहार विहार आणि व्यायामाचा परिणाम होतो आणि म्हणून मधुमेह होण्याची शक्यता वाढते.  याचा अर्थ असा की नियंत्रित आहार, विहार आणि नियमीत व्यायामाने रक्‌तातील  साखर नियंत्रित करता येते.  दैनंदिन वागण्यातील  नियमितपणा आणि त्यादवारे होणारं नियंत्रण या  सर्व गोष्टी  खरंतर आपल्याच हातात आहेत.  यासाठी आपल्या रक्तातील  साखरेची स्थिती आणि त्यामुळे  होणारे दुष्परिणाम याचं यथायोग्य ज्ञान असणं ही एक आरोग्यविषयक गरज आहे.  दिवसेंदिवस  रोगसंक्रमणाची तिव्रता वाढते आहे.  विज्ञानामुळे  नव्या जीवनशैली च्या स्विकारण्यामुळे  काही नवे आजार, व्याधी मुऴ   धरताहेत.  प्रदुषण, अती चरबीयुक्त पदार्थ, अती तेल , तुप, साखर यांचा वापर याव्यतिरीक्त व्यायामाचा अभाव अशा विविध कारणांनी आरोग्य संतुलन बिघडते आणि एकदा का रक्तात साखर साचण्याची स्थिती निर्माण झाली  की नाजूक अवयवांवर लवकर हल्ला  होतो.  प्रतिकार शक्ती कमी होवून कोणताही ऋतुमानातील  आजार चटकन होण्याची शक्यता वाढते.
    उत्तम आरोग्यासाठी आपल्या शरीराचं ज्ञान आपल्याला  असणं अतिशय महत्वाचं आहे.  चाळीशीनंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांकरीता  फारच महत्वाची आहे.  चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असल्यामुळे  नेमकी हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून एखादा रोग मुळात होऊच नये यासाठी सज्ज असणे, काळजी घेणे केव्हाही योग्य.  बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाय योजना, सवईत बदल  करून खात्रीने रोखता येतात.  अनेक समस्यांवर आपण स्वत:च नियंत्रण ठेवू शकतो.
                सुहास  सोहोनी    ९४०५३४९३५४
               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                www.suhassohoni.blogspot.com                       




महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा

                  *   महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा   *

    नेहमीच एक विचार मनात येतो की 6 ते 10हजार रूपये महिना पगार ज्या व्यक्‌तीला मिळतो  त्या कुटुंबाचा खर्च कसा काय सांभाळला  जात असेल  ! अजून तरी 4 ते 6 सदस्य प्रत्येक कुटुंबात आहेत.  अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्यावरच प्राथमिक गरजा संपत नाहीत तर आता शिक्षण आणि आरोग्य या गरजा महाग असल्या तरी अत्यावश्यक बनल्या आहेत.  चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे म्हणून बालक मंदिरापासून पालक रांगेत उभे राहतात.  वाटेल  तितके  डोनेशन द्यायला  तयार होतात.  मुलाच्या गणवेशासोबत वर्षभरातील  विविध खर्चाची बेरीज केली  तर अवाढव्‌य खर्च लक्षात येईल .  आरोग्यावरील  खर्च तर संपूर्ण परिवाराला  अगदी पार केविलवाणं करून टाकतो.  घराचं भाडं, धान्य किराणा, खरेदी,ग्यास    सिलेंडर , वीजबील , पाणी बील , दूरध्वनी बिल , मुख्य म्हणजे पेट्रोल चा खर्च असे हे सगळे  खर्च त्या कुटूंबाच्‌या आर्थिक नियोजनाची पार वाट लावून टाकतात.  त्यानंतर हौसमौज, मनोरंजन करता येत असेल ?
    सरकारी नोकरीत असणाऱ्या  सर्वांना सहावा वेतन आयोग लागू झाल्‌याबरोबर सगळ्या  बाजारपेठा महागल्या आणि या महागाईची झळ लोकसंख्येच्या 90% असणाऱ्या , सरकारी नोकरीत नसणाऱ्या  सर्वांना सोसावी लागत आहे.  महिना 25 हजारावर पगार किंवा उत्पन्न असणाऱ्या  व्यक्तिना अजून तरी महागाईची दहशत बसलेली  नाही. याच 30% असलेल्या नव श्रीमंतांच्या भरवश्यावर बाजार गरम होतो आहे.  महागाई वाढते आहे आणि उर्वरित समस्त जनता होरपळून निघते आहे.  उजाडणाऱ्या  प्रत्येक दिवशी महागाईच्या भस्मासूराचं तोंडं आणखी मोठं होत चाललयं.  मुख्‌य म्हणजे पेट­ोल  डिझेल चे दर बेसुमार वाढत चालले आहेत.  यामुळे  ट्रान्सपोर्ट वाढणार नंतर अगदी सहज, प्रत्येक वस्तूंचे भाव वाढणार.  हे एक दुष्ट चक्र आहे.  संबंधित विभागाचा पेट्रोल  भाववाढीवर मुळीच ताबा नाही हे उघड आहे.  त्यातच अतीव लोभापायी प्रत्येक आवश्यक वस्तूतील  भेसळ , हा गुन्हा जरी असला  तरी अशा कृत्यांची जराही भिती वाटेनाशी झाली आहे.  तीच गोष्ट  रासायनिक प्रक्रियेद्वारे पदार्थ, फळे , पिकवण्याबाबत.  हे सगळे  भेसळ माफीये माणसं नाहीतच, तर सामान्यांच्या जीवाशी खेळणारे मृत्यूदूतच आहेत.  खरोखर आज कुणाही गुन्हेगारा कायद्याची जराही भिती वाटत नाही.
    ही अफाट  लोकसंख्या हेच तर महागाईचं मुख्य कारण आहे.  महागाईचे दुष्परिणाम काय असू शकतात हे येत्या काही काळात दिसणारच आहेत. अन्नाचे, धन्याचे साठे, सडताहेत पण जनतेला  स्वस्तात उपलब्ध होत नाहीत.  यावरून काय बोध घ्यायचा? जनतेच्या सुखाची काळजी , तळागाळातल्या गरीबांची काळजी आहे, असे निवडणूकीच्‌या वेळी  सांगणाऱ्या  आमच्या गर्भश्रीमंत राजकारणी नेत्यांना महागाईची झळ  बसते कां? शासनाची इच्छाशक्ती जर जागृत असेल  तर जीवनावश्यक सर्व वस्तूंचे दर नियंत्रीत करावे.  आज समस्त जनतेला  महागाईच्या महाभयानक वणव्यात झोकून दिले आहे.  लोकशाहीत लोक त्रस्त आहेत.  महागाई हा मुद्दा  महÎत्वाचा नाही का? नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे योग्य नाही.  शासनाने* महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार करावा.**
                        ुुुसुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                  क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                     www.suhassohoni.blogspot.com

Tuesday, August 21, 2012

स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा

           *  महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन  च्या   स्वाक्षरी मोहिमेत संघटीत व्हा *
              अमरावती म .न .पा .द्वारा निर्माणाधीन असलेला कत्तल खाना रद्द करावा
*अमरावती म. न. पा.चा प्रस्तावित कत्तलखाना हा संतांच्या, 
विचारवंतांच्या अम्बानगरीला एक कलंक असणार आहे .
*या कत्तलखान्यात दररोज मोठ्या प्रमाणात हजारो दुभती जनावरे नष्ट होणार आहेत .
*गाई ,म्हशीचे दुध सर्वच आबालवृद्धांना हवे आहे.
दुधाच्या बाबतीत जात ,पंथ,धर्म हा भेदभाव नाही .
*2005 साली म.न.पा. च्या आमसभेत "कत्तलखाना रद्द"  चा ठराव बहुमताने पारित झाला होता .
*तत्कालीन म न पा आयुक्तानी" कत्तलखाना रद्द ठराव "विखंडीत करावा असा प्रस्ताव शासनाला दिला. शासनाने हा प्रस्ताव त्वरित मंजूर केला.
*महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने "कन्सेट टू एसट्याब्लीष" असा परवाना  दिला. काम पूर्ण झाल्यावर "कन्सेट टु ओपरेट"असा परवाना दिला जाईल .
*कत्तलखान्याचे उत्पादन निर्यातक्षम करण्याचे प्रावधान आहे .
*कत्तलखान्यासाठी आपले अमरावती शहरच का निवडले ? उर्वरित महाराष्ट्र का नाही ?
*नगरसेवकांनी ठोस निर्णय घेऊन कत्तलखाना रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा ठेवावा व पारित करावा .
*या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 10 लाख नागरिकांनी एकत्रितपणे संघटीत व्हावे .
*बहुसंख्य नागरिकांचा लिखित विरोध असेल तर कायदेशीर मार्गाने, सनदशीर पद्धतीने, कायदेशीर सल्याप्रमाणे शांतता व अहिंसेच्या मार्गाने कत्तलखाना रद्द करता येईल .
*अम्बानगरीच्या सुज्ञ नागरिकांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
एकदा सुरु झालेला कत्तलखाना बंद करता येणे शक्य नाही .
*राष्ट्रसंतांच्या पावन अम्बानगरीत हा कत्तलखाना सुरु होऊ देणार का?
*निर्णय जनतेच्या कोर्टात आहे .
*  "कत्तलखान्याचे शहर "अशी नामुष्कीची,दुर्दैवी ओळख अमरावतीकरांना हवी आहे का?
* **************  स्वाक्षरी  मोहिमेत संघटीत व्हा .***************
*************** महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन ***************

चाळीशीतील मृत्यू

चाळीशीतील  मृत्यू 

            जीवनाची गाडी जन्मापासून असंख्य नागमोडी वळणे घेत घेत, अनेक चढउतार पार करीत शेवटी मृत्यूच्या थांब्यावर थांबते.  फक्त हे स्टेशन केव्हा येणार ही गोष्ट  ते आल्यावरच कळते आणि जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला  असतो.  आयुष्यभर धडधडणारे हृदयाचे  इंजिन बंद पडते,  आणि काही केल्या पुन्हा सुरू होत नाही.  निसर्गातील  प्रत्येक वस्तु व जीवन नाशवंत आहे.  नव्याची उत्पत्ती व जुन्याचा नाश हे निसर्गतत्व आहे.  नाश केव्हा व्हावयाचा ते मात्र कुणाला  माहित नाही.  प्रत्येकाचं हे भविष्य काळाच्या लिफाफ्यात बंद केलेलं  आहे.  वेळ आली  की लिफाफा उघडतो.  मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे.  पण तरीही काही प्रसंग जीवाची कालवाकालव करतात व विचार करायला  लावतात.
    बाह्यता पूर्ण धडधाकट दिसणारा माणूस वय वर्ष फक्‌त बेचाळिस,  जो दैनंदिन जीवनात पूर्ण व्यग्र आहे, ज्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या  आहेत,  तो अचानक छातीत दुखायला  लागून काही उपचार मिळायच्या आत मृत्यूला  शरण जातो,  ही घटनाच मन सुन्न करणारी आहे.  निरनिराळे  आजार किंवा अपघाताने जीवन संपुष्टा त येते हे मान्य पण ऐन चाळीशीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येणारा मृत्यू ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत विचार करायला  लावणारी घटना आहे.  सर्व विकारांमध्ये जशी आधीपासून लक्षणे दिसतात तसेच हृदयविकारात ठराविक लक्षणे नक्कीच दिसतात.  पण बऱ्याच वेळा  धडधाकट दिसणारा माणूस त्या धोक्याच्या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष   करतो, ज्याप्रमाणे आगगाडी स्टेशनवर येण्याआधी अनेक संदेश येतात,   बेल  वाजते.  आऊटर सिग्नल  दिला  जातो.  गाडी येत असल्याची सुचना दिली    जाते.  तसेच आपले  शरीर रोगांची लक्षणे दाखवून आपल्याला  संदेश देत असते.  हे संदेश आपण ओळखू शकत नाही किंवा आप्तस्वकीय चिंता करतील  म्हणून त्यांना सांगत नाही, किंवा सहजतेने त्याकडे दुर्लक्ष  करतो.
              वयाची चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असतो.  त्यावेळी  नोकरी व्यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाऱ्या  पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  लग्न  होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काळ  लोटलेला  असतो.  चिमुकल्यांचे लाड करण्यात व त्यांचे बोबडे बोल  ऐकण्यात वेळ  आनंदात जात असतो.  भविष्यातील  रम्य स्वप्ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय मग्न  असते.  पण हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा अर्थ आहे.
    बऱ्याच वेळा  ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्लॉक  'हे कारण सांगीतले   जाते.  अनावश्यक वाढलेलं  वजन कमी केल्याने आपण असे गंभीर विकार टाळू  शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढलेली  चरबी, कमी किंवा जास्त असलेला  रक्तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेळीच करावी लागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांच्या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुळात होऊच नये म्हणून काळजी घेणे केव्हाही  योग्यच आहे .

  **  वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
        सुहास  सोहोनी 9405349354
        www.suhassohoni.blogspot.com


वयाची चाiीशी हा आयुष्‌यातीb महत्वाचा टप्‌पा असतो.  त्यावेiी नोकरी व्‌यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाèया पेbण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  b¾ होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काi bोटbेbा असतो.  चिमुकल्‌यांचे bाड करण्यात व त्यांचे बोबडे बोb ऐकण्यात वेi आनंदात जात असतो.  भविष्‌यातीb रम्य स्वप्‌ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय म¾ असते.  पण हीच वेi स्वत:च्‌या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते.  काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे असा अर्थ आहे.
    बèयाच वेiा öदयविकाराच्‌या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्‌bॉक 'हे कारण सांगीतbे  जाते.  अनावश्यक वाढbेbं वजन कमी केल्‌याने आपण असे गंभीर विकार टाiू शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढbेbी चरबी, कमी किंवा जास्त असbेbा रक्‌तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेiीच करावी bागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्‌यावर अवbंबून असणाèया सर्वांच्‌या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्‌हा
    वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
    सुहास  सोहोनी 9405349354
    www.suhassohoni.blogspot.com

समाजातील त्रिदोषामुळे वाढतयं कुपोषण

            *    समाजातील  त्रिदोषामुळे  वाढतयं कुपोषण   *
-------------------------------------------------------------------
                       नदीचं मुळ  आणि ऋषीचं कुळ शोधणे महाकठीण काम असल  तरी सध्या वर्षानुवर्षे गाजत असलेल्या कुपोषणाचं मुळ  कारण म्हणजे खुप अंधश्रद्धा, बेरोजगारी, अज्ञान आणि कुटूंबनियोजन योजनेचा बट्ट्याबोळ , हेच आहे.  मध्यम वर्गीयांना  आपल्या एक किंवा दुसऱ्या  मुलाचं भवितव्य सुरक्षित करतांना प्रचंड कसरत करावी लागते, तिथे पाच, सहा मुलां पेक्षा जास्त अपत्ये  असणाऱ्या  दुर्गम प्रदेशात राहणाऱ्या ,  फारसा रोजगार उपलब्ध नसलेल्या, गरीब कुटूंबामध्ये कुपोषित बालके आढळणे स्वाभाविक आहे.  दररोजच्या रोजगार मिळण्याच्या चिंतेत असणाऱ्या  कुटूंबाला , आपल्या, इतक्या जास्त प्रमाणात असलेल्या अपत्या कडे लक्ष दयायला , संगोपन करावयाला  वेळ , पैसा असेल  ?
                गडचिरोली  व मेळघाट सारख्या रमणिय परिसरात निसर्गाने जरी भरभरून दान दिले  असले  तरी अंधश्रद्धेच्या जिवघेण्या दलदलीत तिथले  जिवन फसलेल  आहे.  ज्ञानाच्या अभावामुळे  अंधश्रद्धेच्या जाळ्यात माणसाचा मेंदू बधीर झाला  आहे.  त्यासोबत अस्वच्छता, जिवाणूचा संसर्ग अशी अनेक महत्वाची कारणें कुपोषणाला  मदत करीत आहेत.  अज्ञानी आणि कुपोषीत मातेच्या पोटी जन्म घेणारं बाळ  जन्मत: कुपोषित असण्याची शक्यता जास्त आहे.  जन्मानंतर जीवन जगण्यासाठी त्या बाळाला  हवा आहे  पौष्टिक आहार, स्वच्छ संसर्ग विरहीत निवास, योग्य औषध उपाय योजना , पण सर्वात महत्वाचे म्हणजे नित्यनियमीत लक्ष देणारी, बाळाला  मायेची उब देवून संरक्षण देणारी ज्ञानी माता.  बेरोजगाराच्या झंझावातात सापडलेल्या कुटूंबातील  या मातेला  बाळा च्या संवधर्नासाठी, प्रेम देण्यासाठी निश्चींत असा वेळ  आहे ? प्रसुती पुर्व काळात योग्य औषधी किंवा अन्नाद्वारे जीवनसत्वे व उष्‌मांक मातेला  न मिळाल्यामुळे  त्या बाळाचे निट पोषण होत नाही व जन्मत:च बाळाचे वजन कमी असल्यामुळे  कुपोषणाचा धोका वाढतो.  जन्मानंतर बाळाच्या संगोपनात अक्षम्य हेळसांड झाल्यामुळे  टप्याटप्‌प्याने कुपोषणाचे गांभीर्य वाढते.  प्रतिकार शक्‌ती क्षीण झाल्याने ऋतूमानातील  छोटे बदल  ते बाळ  सहन करू शकत नाही व रोगग्रस्त राहते.
                अफाट जनसमुह असलेल्या या भारत देशात आदीवासी बहुल  प्रांतात एक मोठा समाज घटक कुपोषणाच्या समस्येत त्रस्त आहे.  कुटूंब नियोजन या विषयात उदासीन असलेले  हे आमचे भाईबंद बेरोजगारीच्या वणव्यात खरपूस भाजले  जात असतांनाच कधी कोरडा दुष्‌काळ , नापीकी आणि कर्जाचे ओझे घेवून वाकले  आहेत, तर कधी ओला  दुष्काळ , महापूर यासारख्या प्रलयंकारी वादळात सापडून त्यांचं सर्वस्व हेलकावे खात पाचोळ्या सारखं उडून जात आहे.  निसर्गाच्या लहरीपणाला  कंटाळुन एक मोठा समाजघटक हजारो हेक्टर जमीन पडीक ठेवायला  तयार आहे.  समाजमनाच्या असंतुलीत  मानसीक दवंद्वाचा अर्थ कळतोय का ?  अंधश्रद्धेच्या जबरी मिठीत अडकलेला  हा समाजघटक ज्ञानाच्या प्रकाशकिरणांची वाट शोधतो आहे.  रोगावर किंवा जखमांवर केवळ  फुंकर घालून किंवा वरवर मलमपट्या  लावून किती काळ  आम्ही पक्षीय राजकारण साधणार आहोत ? खरी गरज आहे ती अंधश्रद्धा, बेरोजगारी आणि लोकसंख्या वाढ या त्रिदोषाला  समुळ  उखडून फेकण्याची. गरज आहे अशा धन्वंतरीची.

        सुहास  सोहोनी -9405349354    
      वर्तुळाचे  टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
       www.suhassohoni.blogspot.com

सहनशील जनतेची छुपी लु ट

                   *  सहनशील  जनतेची छुपी लुट *

            आपल्यावर कितीही अन्याय होत अस  तरी त्याला  प्रखर विरोध करणे, अन्यायाला  वाचा फोडणे व निराकरण करणे हे असंघटित सामान्य जनतेला  सहजपणे शक्‌य नाही.  नेमका याच गोष्टी चा फायदा मालक, भांडवलदार कंपन्या व प्रत्यक्ष शासनकर्ते सुद्धा घेत असतात.  एका कमावत्या व्यक्तीवर किती प्रकारचा कररूपी भार पडतो, याचा साधा विचार कुणी करीत नाही.  वीज बिलातील  टि.डी.एल . चार्जेस  बाबत विरोध जनतेने दर्शवला .  त्याबद्दल  अभिनंदन !  तसेच, टेलिफोन व वीज बिलात दरपत्रकाप्रमाणे दर आकारल्यानंतर रेंटल चार्जेस हा सुद्धा विनाकारण भुर्दंड आहे.  एक प्रकारे ही ग्राहकांची छुपी लुट आहे.  देणारे देत आहेत तर घ्या  ओरबडून, ही वृत्ती वाढत आहे.
    खरे म्हणजे, कामगार म्हणजे नोकर.  ठराविक तास काम केल्‌यावर त्याबद्दल  त्याला  जे मिळते तो पगार, मेहनताना, चुकारा किंवा ठरलेला मोबदला  .  मग तो कामगार सरकारी , निमसरकारी, खाजगी कंपनीत, कारखान्यात, दुकानात किंवा कुणा भांडवलदाराकडे काम करणारा असो, तो केवळ  नोकर असतो.  पण, या संघटीत असलेल्या कामगारांकडून चक्क व्यावसायीक कर वसूल  केला  जातो.  कामगार हा व्यावसायीक कसा ? नोकरी करणे हा व्यवसाय आहे काय ?  याच कामगाराकडून आयकर सुद्धा वसूल  केला  जातो.  केलेल्या श्रमाबद्दल  मिळणारा मेहनताना हा नफा समजला  जातो.  एकाच पगारावर दोन प्रकारचे कर कां वसूल  केले  जातात ?  पुन्हा त्यावर अधिभार वसूल  केल्या जातो.  त्यानंतर सर्व्हिस टेक्स, त्यावर पुन्हा अधिभार, दंगल  झाली  म्हणून, भुकंप, नैसर्गक आपत्ती, दहशतवादी कारवाया अशी कारणपरत्वे उद्‌भवणारी करांची यादी मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच जाते.  नोकरी करू दिल्याबद्दल  शासनाने केवळ  एक नोकरी कर पगाराप्रमाणे तक्ता करून लावावा असे आता सुचवावेसे वाटते.  सुसंघटीत असणाऱ्या  कामगार संघटनांना ही लुट मान्य आहे, असे दिसते.  त्याऐवजी वाढीव भत्ता, महागाई भत्ता मागण्यात ते धन्यता समजतात व जनतेचा रोष ओढवून घेतात.  जरूरीप्रमाणे कायदयात बदल  व्हावा.  कायदा हा नेहमी भांडवल  दार व शासनाच्या हिताचा असतो, हेच सिद्ध होत आले  आहे.  दु:खाने म्हणावेसे वाटते की, कायदयाच्या आजुबाजुला  विरोधाभास वा संभ्रम असून मागे पळवाट असते.कितीतरी मान्यवर व्यक्ती टेक्स भरत नाहीत, वाचवतात किंवा चुकवतात.  जनतेचे सेवक असलेली  खासदार आमदार मंडळी  कायदयात सुधारणा करून आपले  मानधन वाढवून घेतात.  त्याचबरोबर त्यांना अनेक कर, टेलीफोन सेवा, वीज खर्च माफ असतो.  पंरतू या विषयी कुठेही, कुणीही विरोध करत नाही.  अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संसदेत हा ठराव मंजूर होतो.  त्वरित कायदा बनतो.  त्याच संसदेत जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न मात्र वर्षानुवर्षे निकालाची वाट पहात असतात.  भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळालेल्या विविध वस्तुंवर कर माफ करण्याचे संयुक्तिक  कारण काय ? वास्तविक हा श्रीमंत वर्ग कर भरण्यास सक्षम असतो.  अनेक परदेशी कंपन्यांच्या मालावर विविध प्रकारची सूट कां दिली  जाते ?
    कोणतेही वाहन खरेदी करतांना ग्राहकांकडून आधीच रोड टेक्स वसूल  केलेला  असतो.  त्यातूनच रस्ते दुरूस्त करण्याचे , पूल  बांधण्याचे ठेके दिले  जातात.  याशिवाय जागतिक बँकेचे कर्ज घेतले  जाते.  म्हणजेच ठेकेदाराला  त्याचे पैसे दिलेले  असतात.  असे असताना ठिकठिकाणी टोल एजंट्‌स वाहनाकडून जाण्यायेण्याचे पैसे कां वसूल  करतात ? एकदा रोड टेक्स भरलेला  असताना जागोजागी होणारी ही लुट कां सहन करायची ? अत्यंत घाणेरड्या  रस्त्यांवर वाहन का चालवावे लागते ? कोणत्याही वाहन चालकाला , धारकाला  हे खचितच आवडत नसावे. माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची उत्तरे जनतेला  शोधता येत नसतील  तर ती चूक केवळ  जनतेचीच आहे.  या सर्व विषयांवर सखोल  अभ्यास होणे व निर्णय होणे गरजेचे आहे.  केवळ  निवडणुकांपूरते हे विषय हाताळू  नयेत.  जनतेला  आधार मिळेल , आपुलकी मिळेल  असे व्यासपीठ तयार होणे गरजेचे आहे.  सहिष्णू असलेली  भारतीय जनता, जरा जास्त सहनशील  आहे.  म्हणूनच नित्यनेमाने दंडेलीचे आघात सहन करावे लागतात. केवळ  मुठभर लोकांची चैन व उधळपट्टी चालू  ठेवतांना सामान्य जनांच्या खिशाला  किती भार पडणार आहे?
   
          वर्तुळाचे टोक [ मराठी  लेखसंग्रह 2005]
          सुहास सोहोनी -9405349354
         www.suhassohoni.blogspot.com 

आरोग्य तपासणी – चाळीशीनंतर

            आरोग्य तपासणी – चाळीशीनंतर
   
    अपघात झाल्‌यानंतर , रक्तात  साखर जास्त आहे øा कारणाने आ°परेशनला वेi लागतो, आणि आपण मधुमेहाचे रोगी आहोत याच ज्ञान होतं. हे स्वास्थ्याबाबत अज्ञान बरं नव्‌हे, चाiीशी नंतर कमजोर होऊ लागलेली गात्रे व रोग प्रतिकार शक्ती, आनंददायी जीवन जगण्यात अडथiा निर्माण करतात. अशावेiी त्रासदायक व जीवघेण्या व्‌याधींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सांध्यांचे विकार, फुप्‌फुसाचे रोग, öदयरोग, मधुमेह, कर्करोग, व कमी,उƒ रक्तदाब या सारखे विकार आश्रयाला येऊ लागतात. हे विकार म्हणजे अनेक वर्षाची हiूहiू सुरू राहणारी प्रक्रिया असते. रूग्णाला त्याची जाणीव होत नसते. रक्तदाब पाहिला असता तो कमी अधिक प्रमाणात असतो. रक्तात साखर आढiते. रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेbे असते. óियांची परिक्षा केली असता अनेक व्‌याधींची सुरूवात होत असल्‌याचे कiते- पण हे सर्व केवi वैद्यकीय परिक्षणानंतर उजेडात येते.
    वयाची चाiीशी ओलांडलेल्‌या प्रत्येक óी-पुरूषाला नियमित वैद्यकीय तपासणीची गरज असते. जेणे करून बरेचसे विकार प्रथमावस्थेत उपाययोजना, सवईत बदल करून खात्रीने रोखता येतात. अनेक समस्यांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
    चाiीशी हा आयुष्‌यातील महत्वाचा टप्‌पा असतो. नोकरी व्‌यवसायात स्थिरता येऊन नवीन जबाबदाèया पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं. चिमुकल्‌यांचे लाड करण्यात व त्यांचा उत्कर्ष पाहण्यात वेi आनंदात जात असतो. भविष्‌यातील रम्य स्वप्‌ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यात हे वय म¾ असते. पण नेमकी हीच वेi स्वत:च्‌या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते. काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून, स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा आहे. चाiीशी नंतरची तपासणी व उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्‌यावर अवलंबून असणाèया सर्वांकरीता फारच महÎवाची आहे.एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्‌हाही योग्य.
      सुहास सोहोनी --9405349354
       उजळते क्षितिज [लेखसंग्रह 2007]
        www.suhassohoni.blogspot.com


शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओळख विदर्भाची

                शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओळख विदर्भाची
   
    भारताच्या नकाशावर मध्यभागी असलेला प्राचीन, पौराणिक व ऐतिहासिक  काळातील  उल्लेख असलेला, भरपूर निसर्ग संपदा व विविधतेने नटलेला आमचा विदर्भ जगात तर नाहीच, पण विदर्भाबाहेरही कुठे फारसा ओळखीचा नाही हा अनुभव  बऱ्याच  वेळा  आला आहे. आपल्या विदर्भात भरपूर निसर्ग सुंदर स्थळ  आहेत. पूर्णा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्या आहेत. मेळघाट, ताडोबा, तोतलाडोह, पेंच, नागझिरा, नवेगाव बांध ही राखीव जंगले, वन्यपशू-पक्षी, अभयारण्य आहेत. डोंगरी किल्ले, पुराणकालीन अती प्राचीन उल्लेख असलेली असंख्य ठिकाणे आहेत. दिक्षाभूमि, शेगाव, रामटेक यासारखी धर्मस्थळे  आहेत. प्राचीनतम मानवी वस्तीचे अवशेष असलेला दरेकसा व अज्ञात असा गडचिरोली जिल्हा, असे कितीतरी दुर्लक्षित, अप्रकाशित प्रदेश आहेत.
    माझ्या  मते विदर्भाची बाहेर ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. निरनिराळ्या   निमित्ताने प्रत्येकजण शुभेच्‌छा पत्र पाठवत असतो. वाढदिवस, शुभकार्य, धार्मिक सण, आनंदोत्सव अशावेळी  आपण सर्वांनी शुभेच्‌छा पत्रांद्वारे (ग्रीटिंग कार्ड्स ) विदर्भाबाहेरील इष्टमित्र,नातेवाईकांना ह्या  प्रांताची ओळख करून द्यावी .  निरनिराळी  ठिकाणे, रमणिय निसर्गचित्रांचे प्रिंट व थोडक्यात माहिती द्यावी.
    विद्यार्थी  संघटना, ग्रुप्‌स व सर्व विदर्भवासियांनी या लोकप्रिय माध्यमाद्वारे एकत्रितपणे* "शुभेच्‌छा पत्रांद्वारे ओऴख -विदर्भाची'*हा उपक्रम राबवावा. त्यानंतर देशांत व देशाबाहेर अनेक ठिकाणी सहजच विदर्भ प्रदेशाबाबत विचारांची देवाण-घेवाण सुरू होईल. विचार प्रवाह सुरू होईल त्यातुनच सोईसवलती, उद्योग, योजना व पर्यटन वाढ होईल.
    येत्या काही दिवसात अनेक सण, उत्सव यांची सुरवात होत आहे. माझा हा विचार जर विदर्भवासियांना रूचला, पटला तर ह्या  विचाराचे प्रायोगिक उत्तर सर्वांना दिसेल. या कल्पनेद्वारे केवळ  लाभच होणार आहे. तरी "*शुभेच्‌छा पत्राद्वारे ओळख विदर्भाची*'हा उपक्रम हाती घ्यावा .
         * उजळते  क्षितिज [लेखसंग्रह 2007]*
           सुहास  सोहोनी ---9405349354
          www.suhassohoni.blogspot.com


Monday, August 20, 2012

सावधान मनोरूग्ण वाढताहेत

    येत्या दहा वर्षांत मनोविकारात अत्यंतिक वाढ संभवते, हे विधान धाडसाचं आणि अप्रिय असल  तरी ते खरं ठरेल  अशी आज स्थिती दिसते आहे.  समाजस्वास्थाला  हानी पोहोचविणाèया जितक्‌या जास्त घटना घडत जातील  तितक्‌या जास्त प्रमाणात मनोरूग्णांचं प्रमाण वाढणार आहे.  अस्मानी किंवा सुलतानी दुर्दैवी  परिस्थीती वा घटनांमुळे  अचानक पण दिर्घ काळ असंख्‌य मनांवर खोल  परिणाम होतो.  कायमचा ठसा उमटविणाऱ्या  अशा प्रसंगामुळे  दुबळे  मन मनोकायिक विकारांनी ग्रासले  जाते आणि सुरू होतो स्वत:चा स्वत:शीच चालणारा लढा.  आतंकवादी हल्ला , नैसर्गिक असमतोल , अपघात अशा विविध परिस्थितीत जीव गमावलेले  तर यातनातून सुटतात, पण जखमी झालेले , थोडक्‌यात बचावलेले  आणि घटना स्थळी  असलेले , मनाने सुन्न झालेले , मदतकार्यात व्‌यस्त असताना परिस्थितीची दाहक तिव्रता अनुभवित असलेले  अशा असंख्य   लोकांच्या  मानसिक अवस्थेची पार लक्‌तरं झालेली  असतात.  मन पिळवटून टाकणारी भेसूर दृष्‌ये मनावर कोरली  जाऊन मनोविकार जडण्याची शक्‌यता वाढते.
    शिक्षण तसेच नोकरी-व्‌यवसायातीb तिव्र स्पर्धा, सततचे अपयश, जांच, जुलुम, कोणत्याही प्रकारचा क्षमतेपेक्षा अती ताण, कर्जबाजारी अवस्था, अपराधाची टोचणी, व्यसनाधीनतेने अंधारलेले  भविश्य , घरी किंवा बाहेर होणारी अवहेलना, अपमान, तिरस्कार, अती राग, लोभ-मोह-मत्सर किंवा सद्‌सद्‌ विवेक बुद्धीचा लवलेश  नसलेले  विकृत कामुक व्यक्ती , आर्थिक स्थिती बाबत म्हणायचे झाले  तर अत्यंतिक विपन्नावस्था आणि अती आर्थिक सुबत्ता या दोन्ही परिस्थितीत मनोरूग्ण निर्माण होतात.  विपन्नावस्था व कर्जबाजारीअसणाऱ्या  शेतकऱ्याचे उदाहरण अतीशय बोलके आहे.  चिंताग्रस्त होवून ताण असह्य  झालेला  मनोरूग्ण एका बेभान क्षणी मृत्यूला  कवटाळतो.  प्रचलीत व्यवस्थेत सुधारणा न झाल्‌यास भविष्‌यात मनोरूग्ण शेतकऱ्याच्या संख्‌येत सहस्त्रपटीने वाढ होईल  अशी साधार भीती वाटते.  या घटक समुहाला  "मानसिक तसेच भावनिक संरक्षणाची' गरज आहे.  संपूर्ण "संरक्षित पुनर्वसनाची' गरज आहे.
    प्रसारमाध्यमांच्या तिव्र स्पर्धेचा बळी   मध्यमवर्गीय  ठरतो आहे.  माहिती आणि सत्याच्या   अतिरंजीत हव्‌यासापाई नितीनियमांना बाजुला  ठेवून अगदी "वाट्टेल  ते' समोर आणले  जाते आणि कोणत्या वयोगटावर कशाचा काय परिणाम होईल , याचे सोयर सुतक कुणालाच नाही.  अती श्रीमंतांसाठी पावलागणिक मोहजाल  पसरवलेलं  आहे.  उच्च  संस्काराचे सकारात्मक कवच जर नसेल  तर कोण कसा, कधी भरकटेल याचा काहीच नेम नाही.  अत्यंतिक क्रौर्य, बिभत्स, भेसूर, अश्लील , किळसवाणे आणि देशविघातक अशा विविध कारवायात भाग घेणारे, मदत करणारे अशा सर्व व्यक्ती  मनोरूग्णच नाहीत का ?
    प्रत्येक शहरातील  झोपडपट्टीत सहज ऐकू येणारी शिव्या युक्त  हीन भाषा व विचारसरणीं, शिक्षण आणि संयमाचा  अभावामुळे  अगदी "हवे ते' आणि "हवे तेंव्हा ' हिंसक पद्धतीने ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढते आहे.  ही मनोवृत्ती भविष्‌यात काय फळे देणार ?
    आपल्‌या मुला मुलिंना खुप मोठ्ठ  व्हायला  पाहिजे या हट्टापाई सर्वच आईबाप आपल्‌या मुलांवर किती दडपण आणतात, हे आपल्या मनाशी विचारून पहा.  कितीतरी प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला सापडतील .  विज्ञानामुळे  आकलनशक्तीला  भरपूर खाद्य असल्यामुळे  आजची लहान मुले   खुपच हुशार आहेत.  त्यांच्या आयुष्याची ध्येयं निवडण्यासाठी आपण सकारात्मक मदत करूया.  योग्य- अयोग्य, सुसंस्कार, संयम, धैर्य, उत्तम आरोग्य, चिकाटी तसेच सुंदर जीवनशैलीतील  सकारात्मक विलोभनीय बाजू, पालक म्हणून त्यांना समजावून सांगू या.  सुसंस्कारीत आणि दक्ष आईबाप, गुरुजनच थोपवू शकतात भविष्‌यात होणारी मनोरुग्णांची वाढ.
               सुहास  सोहोनी
                 9405349354



Saturday, August 18, 2012

* सोन्याची मूर्ती आणि सोन्यासारखी जनता *

      *  सोन्याची मूर्ती आणि सोन्यासारखी जनता *
                          एका  धनाढ्य मंदिरात एक सरावलेला सराईत चोर ईश्वराचे मनोभावे गुणगान गात
होता .हे ईश्वरा ,तू आहेस म्हणून हि श्रीमंत मंदिरे आहेत .तुझ्या अंगाखांद्यावर सोन्याचांदीचे अलंकार,
समोरच्या दानपेटीत करोडो रुपये नित्य येत राहो .तुझ्याच कृपेने ही संपत्ती मला भरभरून मिळत राहो.
तुझे वेडे भक्त  तुला नवनवीन अलंकार देतच असतात .खरे दागिने घालणाऱ्या धनिक लोकांजवळ मी
असतांना त्यांना बेसावध राहू दे ,एवढ माझ्यासाठी तू कर .पोलिसांची माझी कधीही भेट होऊ देऊ नको .
प्रत्येक रात्र काळोखी रात्र तुला करता आली तर किती छान होईल .किंवा रोज पूर्ण रात्रभरासाठी  लोडशेडिंग
करून टाक .मला उत्तम आरोग्य लाभू दे .चौर्य कर्म करीत असतांना मला खोकला ,सर्दी ,शिंका येऊ देऊ
नको .माझ्या हातापायाला कंप यायला नको .हे ईश्वरा तुझ्या कृपेने सध्या बरे दिवस आले आहेत ,अशीच
कृपा असू दे .
                           चोर हे धर्म ,जात,पंथ,पक्ष या सगळ्यांच्या पलीकडे असतात . कार्यपद्धती आणि
श्रेष्ठ्वात भिन्नता असली तरी ते सगळे एकजात चोरच असतात .देवाची सोन्याची मूर्ती चोरतांना ज्यांचे
हात थरथरत नाहीत व देवदेवतांच्या अंगावरील दागिने चोरतांना  सुद्धा मन शांत ठेवणारे हे खरे स्थितप्रज्ञ.
कर्म करा आणि त्वरित फळ मिळवा  [चांगले किंवा वाईट ] हा यांचा मंत्र .प्रसिद्धीची अजिबात हांव
नसलेले हे चोर फक्त पकडले गेले तरच चोर ठरतात आणि अनिच्छेने प्रसिद्धीच्या झोतात येतात .पण
आपली जनता अल्पकाळात सर्व काही विसरते यावर या चोरांचा गाढ विश्वास आहे ,त्यामुळेच हे चोर
उजळमाथ्याने व सन्मानाने गांवभर फिरू शकतात .पोलिसांची यांची अधूनमधून नशिबाने गाठभेट
होत असते .चोर पोलीस हा शब्द सुद्धा कसा जोडीने येतो .बर्याच वेळा हा  एकच शब्द आहे कि काय
असं सुद्धा वाटते .चोरांची संख्या कमी होऊन चोऱ्या होऊ नयेत असं पोलिसांना अधूनमधून वाटते ,पण
पोलिसच नसले तर किती बरे होईल असे चोरांना नक्कीच वाटत असणार .चोर आणि पोलिसांचे नाते
अतूट आहे हे मात्र खर .
                            * पाकीटमार ते सरकारी प्याकेजमार *हे सगळे चोरच असले तरी त्यांच्या 'ग्रेड '
मध्ये बराच फरक आहे .दोघांच्या सुरक्षिततेत फरक आहे .प्याकेजमारांना ऑफिस आहे ,गाडी आहे,
पेन्शन पण आहे .बिंग फुटले तरच अडचण, तीही फक्त काही काळ ,तोपर्यंत सर्व आलबेल .  अहो
शेवटी तो ईश्वर आहेच की !आपण त्याची मनोभावे पूजा करतो कि नाही ?मग !शिवाय तोच तर बुद्धी
देतो ,तोच वाचवेल न ?मग आपण  ही सगळी मंदिर आणखीन  श्रीमंत करू .आपली ही सोन्यासारखी
जनता ,कालांतराने सगळ विसरते ,एवढंच लक्षात ठेवायचं या सोन्यासारख्या गरीब जनतेला कितीही
वेळा ,कुठेही लुटलं तरी चालतंय की !
                 सुहास सोहोनी  9405349354  -0721-2567463
                  www.suhassohoni.bloogspot .com
        
    




 

Friday, August 17, 2012

सहनशील नागरिकांची ऐशीतैशी

             सहनशील नागरिकांची ऐशीतैशी
              स्वच्छ ,स्वस्थ आणि सुंदर शहर कसे ओळखावे ?तर,ज्या शहराचे मुख्य आणि छोटे ,
मोठे आणि गल्लीबोळातील सर्वच रस्ते सुस्थितीत असतील ,खाच खळगे ,गड्डे नसतील ,चिखल
नसेल रस्त्याच्या दुतर्फा उकिरडे नसतील ,प्लास्टिक आणि विविध प्रकारचा कचरा शहरभर
पसरलेला नसेल ,तुंबलेल्या नाल्या नसतील ,नाल्या ,नाले व्यवस्थित बांधकाम केलेल्या असून
उघड्या नसतील ,रस्ताभर ठिकठिकाणी जनावरांनी घाण केलेली नसेल,योग्य ठिकाणी योग्य
उंचीचे स्पीडब्रेकर्स असतील ,आपल्या घराच्या बाजूला पण दुसऱ्याच्या घरासमोर कचरा फेकलेला
नसेल [वाचकांना अजून काही सुचले तर अवश्य कळवावे .]तर अशा  शहराचे आणि त्या शहरातील
नागरिकांचे आरोग्य चांगले असेल असे समजावे .
            ज्याप्रमाणे सुदृढ माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ व निरोगी असतात त्याप्रमाणे
स्वच्छ व सुंदर शहराचे रस्ते स्वच्छ व सुंदर असतात .अवरूध्ह असलेल्या रक्तवाहिन्या शरीराला
गंभीर आजाराने त्रस्त करतात तसेच अयोग्य आणि विद्रूप रस्ते नागरिकांचे हाल हाल करून त्रस्त
करतात .मनस्ताप,चिडचिड पाठीचे मणक्यांचे व कंबरेच्या दुखण्यांनी शहरातील नागरिक त्रस्त
होतात ,पण यावर उपाय काय ?प्रशासनातील संबंधित अधिकार्यांना  आपल् कर्तव्य,उत्तर दायित्व
कधीतरी समजेल का ? पण आमचे नागरिक बंधू सुद्धा तितकेच उपद्रवी आहेत .आम्ही स्वतःला
उत्सवप्रिय म्हणवतो आणि कमानी लावण्याकरिता पहिला घाव रस्त्यावरच घातला जातो .उत्सव
,कार्य , उद्घाटन काहीही असले तरी शहरभर रस्त्यावर कमानी मंडप टाकले जातात ,रोषणाई
केली जाते आणि काम संपले की रस्त्यावरचे गड्डे तसेच सोडून दिले जातात ,ओकेबोके आणि
केविलवाणे .दिवसा आम्ही  खाचखळगे सराईतपणे चुकवतो पण रात्रीच्या अंधारात आम्ही वाहना 
सकट त्यात उसळतो .
             शहरातील सगळेच[लहानथोर] नेते निवडणुकीपूर्वी याच रस्त्यांवरून जा ये करीत होते 
आणि आजही आमच्यासारखेच खड्डे चुकवत जात आहेत .या नेते मंडळींना [?]"योग्य आणि अयोग्य"
याची जाणीव असेल ? सर्व प्रकारचे कर विनातक्रार भरणाऱ्या नागरिकांचे असे हाल का होतात ?
याचे कारण सर्वांना सहन करण्याची सवय झाली असून जनता अती सहनशील आहे .निवडणुकी
पुरती साखर पेरलेली आश्वासने द्यायची आणि नंतर .........."सहनशील जनतेची ऐशीतैशी "असे
होऊ नये .आपलं शहर स्वच्छ, स्वस्थ,आणि सुंदर कसं ठेवता येईल ?
         सुहास सोहोनी   9405349354
          www.suhassohoni.blogspot.com

Tuesday, August 14, 2012

जंगल निर्माणाचे महान कार्य

                  *जंगल निर्माणाचे महान कार्य*
     प्रयत्नपूर्वक आणि जाणीवपूर्वक जंगलांचे निर्माण होणे गरजेचे आहे .शहरात प्रत्येक घराच्या
अंगणात काही वृक्ष आहेत पण शहराबाहेर शेतीचे पट्टे सोडून बाकी जंगल ओकबोक दिसत्,
मैल न मैल खुरटी किंवा काटेरी झाडे दिसतात .विविध पक्षी, प्राणी,पशु याचं आश्रयस्थान,घनदाट
जंगल,तेच नाहीसे होत असल्यामुळे  पशु पक्षी साहजिकच शहरांकडे वळतात ,शेतांकडे आकृष्ट
होतात आणि मानवाच्या रोषाला बळी पडतात .शहरातील झाडे वाळल्यामुळे  वादळात लवकर
पडतात ,वीज खंडित  ,वित्त हानी ,जीव हानी होते .
    **   ज्याप्रमाणे वृक्ष तोडी साठी कंत्राट दिले जाते तसेच जंगल निर्माणासाठी कंत्राट दिले जावे .**
विविध संस्था ,सेवाभावी संस्था ,धनवान व्यक्ती यांनी सामाजिक वनीकरण विभागाद्वारे हे
कार्य हाती घ्यावे .अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत असलेली मुळ  भारतीय वृक्ष
 संपदा वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब ,बहावा ,अर्जुनवृक्ष ,कवीठ ,चिंच आवळा यांचे रोपण कटाक्षाने
केले जावे .पहिले पाच वर्षे या वृक्षांची योग्य निगा राखल्यास पुढे 250 ते 300 वर्षे हे वृक्ष मानवास
 व निसर्गास उपकारक आहेत .प्रिय व्यक्तींच्या स्मृती निमित्याने स्मृतीवनांची कल्पना प्रत्येक
गावाने राबवावी.गावतलावाच्या सभोवताली घनदाट वृक्ष निर्माण झाले तर निसरगाच संतुलन
साधेल .विविध जीव संस्कृती अरण्याच्या सहाय्याने बहरतील .प्राणी ,पशु ,पक्षी त्यांच्या खर्या खुर्या
आश्रय स्थानात सुखनैव विसावतील .निसर्गाच्या  अन्न साखळीची प्रत्येक कडी सक्षम बनेल .
पर्यायाने विनाश थांबेल .पाण्याचे प्रयत्न पूर्वक साठवण व घनदाट अरण्याच निर्माण व संवर्धन
निसर्गाच्या अन्न साखळीच्या लहरीपणाला लगाम घालू शकेल.नुकसानीची तीव्रता कमी होईल .
जोपर्यंत आपल्या पृथ्वीवर घनदाट अरण्य ,असंख्य तलाव, पशु, पक्षी भरपूर प्रमाणात असतील
तोपर्यंतच मानव सुखात असणार आहे .पृथ्वीच संतुलन कायम राहण्यासाठी मानवाने सुरु केलेलं
जंगल निर्माण हे महान कार्य असणार आहे .
         सुहास सोहोनी 9405349354
       www.suhassohoni.blogspot.com
                क्षण वेचतांना [लेख संग्रह 2012]