Friday, August 24, 2012

" व्यवस्थापन हवे गर्दी चे ""क्राऊड मेनेजमेंट''

    "  व्यवस्थापन हवे गर्दी  चे ""क्राऊड  मेनेजमेंट''

    केवळ  अनियंत्रीत गर्दमुळे  अचानक शेकडो जणांना  प्राण गमवावे लागत आहेत.  हजारो लोकं जखमी होत आहेत.  अशा घटना, या घटना नित्याच्या झाल्या असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काटेकोर नियमावलीचे पालन आवश्यक आहे.  प्राचीन पर्यटन स्थळे , जूनी विख्यात मंदीरे, लोकप्रीय नेत्यांच्या किंवा मार्गदर्शकांच्या  जाहिर सभा, क्रिडास्थाने,  प्रान्तनिहाय पारंपारिक उत्सव, फार मोठ्या  बाजारपेठा, कुंभमेळे , पावसामुळे  किंवा विविध कारणांनी होणारा रस्ताजाम अशा सर्वच ठिकाणी जर गर्दी अनियंत्रीत असेल  आणि तेथे जर एखादा अपघात झाला , अफवा पसरली , जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले  तर चेंगराचंगरीत तुडवले  जावून श्वास कोंडल्याने घडणाऱ्या  भयनाट्यात कितीतरी घरं उध्वस्त होतांना आपण अनुभवतो.  या अशा दुर्दैवी  घटना कशा थांबवता येतील ?
    ज्‌या प्रमाणे इव्हेंट मनेजमेंट, डिसास्टर मनेजमेंट सक्षम असायला  हवे त्याचप्रमाणे क्राऊड मनेजमेंट हे वेगळे  शास्त्र विकसीत होण्याची गरज आहे.  गर्दी  होण्याची खात्री असण्याच्या संभाव्य ठिकाणी इमारती, रस्ता, पुल , कठडे, भिंती, त्या जागेची वजन सहन करण्याची क्षमता या सर्वच बाबींचा सुक्ष्म अभ्यास व्हावा.  एकाच जागी एकाच वेळी  क्षमतेपेक्षा जास्त गर्दी   न होऊ देता लोकांना विविधठिकाणी विखरून गुंतवून ठेवावे.  प्रशिक्षीत स्वयंसेवक भरपूर प्रमाणात तैनात हवेत.  ऐसपैस जागा जर उपलब्ध नसेल  तर संख्या नियंत्रीत करणे व त्याची आगावू कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे.  आवश्यक औषधांसहित मेडिकल  क्येम्प्‌स विविध दिशांना असणे अनिवार्य करावे.  गरज असो किंवा नसो गर्दी च्या प्रमाणात
रुग्णवाहिका आणि काही वाहने तैनात करणे अनिवार्य करावे.  सर्व प्रकारच्या गुन्हेगांरावर वचक आणि लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट, टि.व्ही. क्यामेरे, संगणक प्रणाली  अशा व्यवस्था जरी आजकाल  उपलब्ध असतात तरी बऱ्याच आडजागी पारंपारिक उत्सव, दुर्गम जागेतील  प्राचीन मंदिरे अशा ठिकाणी सुद्धा अनिवार्य करावे.  श्रद्धास्थानी विशेष दिनानिमित्य अफाट गर्द होते, अशा ठिकाणच्या विश्वस्त मंडळावर वर उल्लेखलेल्या सर्व सोई सवलतींचे बंधन हवे.  संभाव्य गर्दी च्या ठिकाणी आधी संरक्षणात्मक उपाययोजना सज्‌ज असण्याची खात्री हवी, आणि नंतरच उत्सवाला  परवानगी दयावी.
    प्रत्येकवेळी  पोलिस यंत्रणा, सरकारी व्यवस्थापन, नेते मंडळी  यांच्यावर तोंडसुख घेणे बंद करावे. 
पोलिसांवर नित्य कामाचा तीव्र ताण असतो. संबंधित संस्था, विश्वस्थांनी केवळ  गर्दमुळे  मिळणाऱ्या  द्रव्याचा विचार न करता संभाव्य अपेक्षीत गर्दी  सुनियंत्रीत करण्याची संपूर्ण जबाबदारी उचलावी.  प्रशासन यंत्रणेला  स्वत:चे प्रशिक्षीत स्वयंसेवक पुरवावे.  विदर्भातील  शेगांव येथील  श्रीगजानन महाराज संस्थानात कायमस्वरूपी स्वयंसेवक विविध कार्यासाठी प्रशिक्षित केले  असून त्यांचे कार्य उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.  अलोट गर्दीत मुलाबालांसह जाणे यात धोका आहेच.  भविष्यात गर्दी  होण्याचे प्रसंग फार वाढणार आहेत.  गलथान कारभार असेल  तर विविध धोके गर्दीत दबा धरून बसले  आहेत.  याचा अभ्यास हवा म्हणून, व्यवस्थापन हवे  गर्दीचे म्हणजेच क्राऊड म्यानेजमेंट.

                        ुुु  सुहास सोहोनी ---मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                www.suhassohoni.blogspot.com   








No comments: