Thursday, March 29, 2012

फाशीचे भिजत घोंगडे

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_*__फाशीचे भिजत घोंगडे ...*
     एखाद्या निर्णयाची ठराविक वेळेत अंमलबजावणी  न  झाल्यानेच तो विषय प्रलंबित होऊन त्याचे चक्क भिजत घोंगडे होते. २०-२५ वर्षा पूर्वी जी फाशीची शिक्षा सुनावली गेली तिची अंमलबजावणी आजपर्यंत न झाल्या मुळेच आज देशात वाद विवाद होत आहेत. गुन्हेगारांनी केलेला दयेचा अर्ज, राष्ट्रप्रमुखांनी फेटाळल्या नंतर त्वरित शिक्षेची पूर्तता झाली असती तर आज हि वेळ आलीच नसती, अस वाटत. केवळ शिक्षेला विलंब झाल्यामुळे शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी अशी मागणी खालच्या कोर्टात केली जाते, हे  योग्य नाही. मग फाशीची शिक्षा होऊन जेल मध्ये बंद असलेल्या इतर कैद्यान बाबत अशीच चर्चा  सुरु होऊन त्या विषयाला राजकीय रंग दिल्या जातो हे सुद्धा योग्य नाही.
            मुंबई हल्ल्यातील दहशतवादी कसाब  याला सर्वोच्य न्यायालयाने फाशी कायम केल्यानंतर विशिष्ट दिवसात फाशी द्यायला हवी अशी तरतूद हवी .जनभावनांचा विचार केला जावा .विलंबाने गुन्हेगारांमध्ये  चुकीचा विचार बळावेल,हा धोका वाढतो .

         जन भावनांशी संबंधित असलेल्या प्रत्येक विषयाचे राजकीय भांडवल केले जाते. कायद्यातील पळवाटा शोधून असे विषय दीर्घकाळ प्रलंबित केले जातात, वर्षानुवर्षे हे मुद्दे उगाळले जातात. असे गढूळ वातावरण राष्ट्राच्या आरोग्यास पोषक नक्कीच नाही. दीर्घकाळापासून लांबलेल्या फाशीच्या शिक्षे संदर्भात संपूर्ण न्याय व्यवस्था तसेच राष्ट्रप्रमुख यांनी दिलेल्या निर्णयाचे पालन का होऊ शकत नाही. शिक्षा सुनावल्यावर जास्तीतजास्त १५ दिवसात  हि शिक्षा कार्यान्विन व्हावयास हवी,* अशी काहीतरी ठाम तरतूद असण्याची गरज आहे*. सूक्ष्म संशोधन करून कायदे तज्ञ कालमर्यादेचा निर्णय घेतीलहि, पण केवळ वर्षानुवर्षे फाशी कार्यान्वित न झाल्यानेच अश्या विचारांना डोके वर काढण्यास वाव मिळतो हेच खरे आहे. म्हणजेच शिक्षा जाहीर झाल्या बरोबर फाशी दिली असती तर विषय संपला असता. फाशी तरतूद असल्या मुले त्यात मानवीय अमानवीय असले विचार करतानाच वर्षानुवर्षे दररोज फाशीच्या शिक्षेचा अंमलबजावणीची वाट पाहायला लावणे हे मात्र अमानवीयच आहे.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]