Friday, April 8, 2016

*रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची महिती मिळवा *



·         रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची माहिती मिळवा *
प्रिय विध्यार्थी मित्रांनो ,
अनेक शुभ आशीर्वाद .
          दहावी ,बारावी परीक्षा आटोपून त्यानंतर AIEEE,pmt,cet वगैरे परीक्षा देण्यासाठी तुम्ही मोकळे झालेले आहात .आता घ्या बर जरा सुट्ट्यांचा आनंद ,म्हणजेच मस्त सगळ्या आवडीच्या गोष्टी  करायच्या .भटकणे,ट्रेकिंग ,पोहणे,भरपूर सिनेमे,क्रिकेट आणि काय काय ! काही दिवस तरी तो अभ्यास ,ते टेन्शन विसरणेच बर आहे .परीक्षांच्या निकालांना अजून भरपूर वेळ आहे ,त्यामुळे हातात बराच वेळ आहे .सुट्टीचा आनंद जरी हवा असला तरी पुढील शिक्षणाची दिशा आणि विविध करिअर संबंधाने माहिती संकलन करून ठेवण्याची हीच नेमकी वेळ आहे .परीक्षांचे अपेक्षित निकाल लागल्या नंतर ही माहिती तुम्ही  मिळवाल तर तेंव्हा फारच धावपळ होईल .त्यावेळी कराव्या लागणाऱ्या धावपळीच्या वेळेचे नियोजन आत्ताच जर करता आले तर ते योग्य ठरेल .
           दहा वर्षापूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल अशा शिक्षण वा रोजगाराच्या संधी आज उपलब्ध आहेत .जागतिकी करणाच्या वेगवान प्रसारामुळे कितीतरी क्षेत्रांची दालने आज आपल्यासमोर उघडली जात आहेत .पूर्वापार चाकोरीबध्द शिक्षणा व्यतिरिक्त अनेक मार्ग आज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत .व्यवसायाच्या विविध प्रकारांत प्रत्येक स्तरावर तज्ञ हवे आहेत,त्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम सरकारी व खाजगी व्यवस्थे कडून तयार केलेले आहेत .गरजांप्रमाणे उपभोगाची नवनवीन साधन बदललेली असून त्यासाठी रोजगाराभिमुख शिक्षण घेतलेल्यांना नोकरी /व्ययसाय मिळण्याची शक्यता जास्त आहे .उदाहरण द्यायचे झालं तर भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ होईल ,तेंव्हा किती पायलट ,केबिन कृ, ग्राउंड ओफिसेर्स इंजिनिअर्स ,एअरक्राफ्ट इंजिनिअर्स ,एअर होस्टेस अश्या कितीतरी लोकांची गरज पडेल याचा जरा विचार करा .अशा विविध अभ्यास क्रमांचा कालावधी ,खर्च ,त्याचे पत्ते, प्रोस्पेक्ट या सगळ्या गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी परीक्षांच्या निकालांची वाट पहात बसू नका .सुट्टीत मजा जरूर करा पण थोडा वेळ शिक्षण / करिअर च्या माहिती संकलनासाठी जरूर राखून ठेवा .बघा कसा फायदा होतो ते .तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा .
कळावे .
तुम्हा सर्वांचा
सुहास सोहोनी ,
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ,४४४६०६
मोबा : ९४०५३४९३५४ ,८६२६०६०६४६ ,०७२१-२५६७४६३