Tuesday, May 10, 2011

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नातवंडात रमलेले आजी आजोबा यांचे स्वर्गसुख

नशीबवान आहेत ते आजी आजोबा ज्यांना नातवंड सोबत राहाण्याच, खेळण्याच भाग्य लागत. अर्ध शतकाच्या लांबलचक प्रवासात सुख दुःखाचे असंख्य चढ उतार पार करीत एका सोनेरी वळणावर नातवंडांच्या प्रतीक्षेचे वेध लागतात. हा काही महिन्यांचा काळ म्हणजे आनंद, काळजी, अनामिक हुरहूर असंख्य भावभावनांचा नुसता कल्लोळ असतो. जन्माला येणाऱ्या बाळाच्या नुसत्या कल्पनेने ती वास्तू कणाकणाने फुलते/ खुलते, आणि एका नेमक्या मुहूर्तावर सुंदर, गुलाबी, मखमली, गोबर्या गालांचे ते बाळ अनेकांना विवध नात्यांनी एकमेकांशी बांधून टाकत. एका नव जीवनाची पुन्हा सुरवात होते. कृतार्थ मातापिता आकंठ आनंदात तरंगत असतात. जणू काही आपली खूप जुनी ओळख आहे अश्या थाटात टुकू टुकू बघत आजी आजोबांना नव चैतन्य मिळवून देत. त्या लबाडाच कौतुक करतांना, खेळवतांना, त्यांचा थकवा दूर पाळतो. शारीरिक व्याधीने त्रस्त असले तरी हाताच्या पाळण्यावर बाळाला घेऊन बडबडगीत गात खोलीभर फिरणारे आजी आजोबा प्रत्यक्ष विधात्याशी गुजगोष्टी करीत स्वर्गसुखाचा अनुभव घेत आहेत असा भास होतो. पलंगावर पहुडलेली पणजी जेंव्हा तिचा ४ वर्षाचा पणतू येतो तेंव्हा टुणकन पुढे येते आणि बोबड्या बोलीत त्याच्या विवध खेळत भान विसरते. तो प्रसंग तिच्या साठी श्रेष्ठ साध्य योग असून त्या संपूर्ण वास्तूसाठी निखळ अमृत योग आहे.

नातवंडांशी मनसोक्त खेळायला मिळण म्हणजे आजी आजोबांसाठी जगातील सर्वोत्कृष्ठ टोनिक मिळण्यासारखच आहे. जादूच्या कान्डीने बदल घडवावा तस मन उल्हासित करणारे हे टोनिक सर्व श्रेष्ठ अशे. नातवंडांचा रुसवा फुगवा, निरागस हास्य, हट्ट, कल्पना विश्व, अनुकरण करण्यातील तीव्र बुद्धिमत्ता आणि कुठल्याही भावविकारांचा स्पर्शहि न झालेला निरागस लोभस पणा या अनोख्या विश्वात पुरेपूर गुंतून जाणे, हा आनंदच आगळा आहे. अफाट सत्ता आणि करोडोची संपत्ती सुद्धा या आनंदापुढे कमीच आहे. भाग्यवान आजी आजोबांनाच हा आनंद मिळतो अस येवढ्याकरता म्हणावस वाटत, कि नोकरी व्यवसायामुळे मुले सुना दूर असतात, अनेक कारणांमुळे आजी आजोबांशी जवळीक राहत नाही. कधीतरी पत्रात किंवा फोनवरच थोडस बोलता येत, बाकी वेळ केवळ आठवणी आणि काळजी आणि हुरहूर.

विविध भूतिक कारणांमुळे आज असंख्य वयस्क जेष्ठांना एकट्यानेच रहाव लागत. कितीतरी जोडप्यांना एकमेकांची सावली आधार बनून आहे ते जीवन जगावे लागत, कारण, पर्याय नाही. सुंदर घर आहे, फर्निचर आहे, पैसा अडकाहि भरपूर आहे, पण घरात केवळ दोघाच. घर खायला उठत. हळूहळू सवय व्हायला लागते. ते स्वतः साठी, फर्निचर साठी, घरातल्या बगिच्या साठी जगात राहतात. पण त्या विधात्याच्या मनात काही वेगळाच असाव, कारण असंख्य कारणांनी माता-पित्याच छत्र हरवलेली, घरा-दाराला मुकलेली, आईबापाने त्याग केलेली असंख्य बालके निराधार निराश्रित जीवन का जगतात ? पुन्हा पर्याय नाही. त्या बालकांना सुद्धा जगणे क्रमप्राप्त आहे. जीवन देणे आणि संपवणे हे दोन्ही अधिकार त्या विधात्याने स्वतः जवळ ठेवलेत. या बालकांना आई बापच नाहीत तर आजी आजोबा कुठून मिळणार ? एक गोष्ट खूपच महत्वाची वाटते, ती म्हणजे माये साठी आसुसलेली हि बालके आणि एकाकी जीवन कंठणारे आजी आजोबा यांच्यात त्यांच्याच शहरात फक्त काही मैलांचच अंतर आहे. हे काही मैलांचच अंतर जर मिटवता आल तर स्वतः च म्हणून काहीही नसलेल्या निराधार बालकांना आजी आजोबांची माया तरी मिळेल, आपुलकी, संरक्षण तरी मिळेल. अजूनही आम्ही विचारांच्या परंपरेच्या बंदिस्त कोशात घूसमटण्यात समाधान मानतो आहोत. पण तो बंदिस्त कोश आपल्या बळकट पंखांनी फोडून जेंव्हा विविध रंगी फुलपाखरू आसमंतात गिरक्या घेऊ लागेल तेंव्हा नशीबवान असतील ते आजी आजोबा ज्यांना नातवंडांसोबत राहाण्याच, खेळण्या बागडण्याच, आणि मुख्य म्हणजे खळखळून हासण्याच भाग्य लाभेल. खरच अस होईल ?

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Monday, May 9, 2011

परिचारिका म्हणजे तपस्विता, तत्परता, तेजस्विता.

परिचारिका म्हणजे तपस्विता, तत्परता, तेजस्विता.
(१२ में, जागतिक परिचारिका दिन निमित्त )

बाळाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम त्याला / तिला तळहातावर सुरक्षित उचलून घेणारी परिचारिका (नर्स) असते. बाळाला सर्वप्रथम न्हाऊ घालणे स्वच करणे हि सगळी सेवा नर्स करते, "आईच्याही आधी" . नंतर जन्मभर रुग्णांना हीच परिचारिका अखंड सेवा देत असते. यातना आणि वेदनांनी तळमळणार्या रुग्णाची सुश्रुषा करणारी, धीर देणारी हि एक देवदूतच आहे. अशा देवदूतांच्या प्रशिक्षणाचा पाया रोवणाऱ्या एका दीपस्तंभाचा जन्म १२ मे १८२० साली इटली मध्ये श्रीमंत इंग्रज घराण्यात झाला. हा दीपस्तंभ म्हणजेच फ्लोरेंस नाईटिंगल. त्या काळात फारसा प्रतिष्ठेचा नसलेला हा व्यवसाय तिने निवडला. दोन वर्ष प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रात हजार राहून ३७ नर्सेस ना सोबत घेऊन फ्लोरेंस नाईटिंगल हिने जखमी सैनिकांची सेवा केली. करुणाभाव आणि कर्तव्याची जाण इतकी प्रखर होती कि जखमी सैनिकांची चौकशी करण्यासाठी धीर देण्यासाठी हातात ल्याम्प घेऊन रात्री बेरात्री हॉस्पिटलच्या सर्व वार्डात फ्लोरेंस फिरत असे, त्यावरून तिला "लेडी विथ ल्याम्प", हे संबोधन प्राप्त झाले. नर्सेस ना प्रशिक्षणाची आत्यंतिक गरज हेरून, या प्रशिक्षण कार्यात सुधारणा घडवून आणल्या. स्वतःच संपूर्ण आयुष्य परिचारिका घडवण्याच्या कार्यासाठी समर्पित केल. लंडन मध्ये नर्सेस ट्रेनिंग कॉलेज स्थापित केल. ब्रिटनचा सर्वोच्य नागरीक सन्मान फ्लोरेंसला प्राप्त झाला.

परिचारिकेची नोकरी हे मानव सेवेचे व्रत आहे, याचा विचार हे क्षेत्र निवडताना व्हावा. रुग्ण संखेच्या तुलनेत प्रशिक्षित परिचारिका नाहीत हे सत्य आहे, परंतु आरोग्य सेवेच्या कार्यात हि एक फार मोठी गरज आहे. प्रत्यक शहराची प्रशिक्षित परिचारिकांची गरज पूर्ण होत नसल्याने, अप्रशिक्शिताना नोकरी द्यावी लागते. त्यांना पगार कमी दिला जातो, मात्र रुग्ण सेवेचा दर्जा खालावतो. रुग्ण सेवा हि ईश्वरसेवा आहे. तसेच गरज आणि बेरोजगारी यांचा विचार करता, हा एक चांगला व्यवसाय आहे. जास्तीतजास्त युवक युवतींनी हा अभ्यासक्रम निवडावा. परिचारिकांच्या आरोग्य सेवेतील योगदानाकडे साधी नोकरी म्हणून बघितले जाऊ नये. संपूर्ण समाजाने या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये चालवला जाणारा नर्सिंग अभ्यासक्रम दिवसेंदिवस महाग होतो आहे. यावर काही बंधन हवे.

मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी, आजच्या विज्ञान युगात या आरोग्य दूतांना ओलांडून मृत्यूसुद्धा रुग्णाजवळ पोहोचू शकत नाही. कितीतरी वेळा मृत्यूला तात्पुरता पराभव स्वीकारावा लागतो. नेमके निर्णय, चपळ हालचाली, सांघिक दक्षता, आणि समर्थ अनुभवाच्या जोरावर रुग्णाला मृत्युच्या दाढेतून खेचून काढले जाते. कामाचे तणाव पूर्ण स्वरूप अनियमित वेळा जरी असल्या, तरी कर्तव्याद्वारे आत्मिक समाधान याच कामाद्वारे मिळते हेही खरे आहे. आधुनिक ज्ञानाद्वारे प्रशिक्षित पारीचारकांचे रुग्ण सेवेचे कार्य, हे दैवी कार्य आहे. जीवन रक्षणाचा विश्वास आहे परिचारिका, म्हणजेच तपस्विता, तत्परता, तेजस्विता हेच त्रिगुणात्मक रूप आहे. समाजाने या देवतुल्य कार्याची दाखल घ्यायला हवी.

या देवी सर्व भूतेषु सेवारूपेण संस्थिता !
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनमः !!

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Sunday, May 8, 2011

मॉर्निंग वॉक आणि गुटखा पाकिटे

मॉर्निंग वॉक आणि गुटखा पाकिटे

चांगल्या आरोग्याची आवड असणारे सकाळच्या शांत रम्य समयी शुद्ध हवेत मोकळ्या वातावरणात फिरायला जातात. गावालगतच्या जंगलात थोड दूर, वर एखाद्या तळ्याकाठी, मैदानात किंवा छोट्याश्या टेकडीवर आपल्या आवडत्या स्थळी फिरताना मनाला शरीराला आनंद होतो. कोणत्याही शहराच्या मानन सकाळी फिरायला जाणार्यांचे प्रमाण फारच कमी आहे. हे प्रमाण वाढल तर नक्कीच ती एक चागली गोष्ट आहे. पण सद्य स्थितीत अश्या रम्य स्थळाच्या परिसरात चालण्याच्या वाटेच्या बाजूने दर दहा पावलांवर रिकामी गुटखा पाकिटे भिरकावलेली दिसतात.

सकारात्मक आरोग्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या या मंडळींचे हात तंबाखू जन्य गुटखा पाकिटांना का जवळ करीत असतील ? केवळ एक रुपयाल मिळणार हे चकचकीत रंगच गुटखा पाकीट एखादी रमणीय टेकडी सर करून टेकडीच्या माथ्यावर इतस्ततः विराजमान झालेलं सहज दिसत. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी आवरणामुळे त्या पाकिटांच अस्तित्व चटकन जाणवत. कोणत्याही गावातून कधीही फेरफटका मारला तरी विविध स्वरुपात इतस्ततः फेकलेल्या प्लास्टिकच्या थैल्या, वेस्टने, बाटल्या, कायम पडलेल्या दिसतात.

सतत कोणीतरी कोणाला उपदेश करण्या पेक्षा काही प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनालाच विचारायला हवेत. प्रत्येक प्रश्नाच योग्य उत्तर असत आणि ते प्रत्याकाला माहिती असत, फक्त गरज आहे ते चुकीच काम करणाऱ्या आपल्या हाताला थांबवण्याची. प्लास्टिकच्या थैल्या, वेष्टने किंवा गुटखा पाकिटे, या निर्जीव वस्तू आहेत. स्वतःच्या मर्जीने ती पाकिटे टेकडीवर चढत नाहीत, तेव्हा ती फेकणार्या हातांना योग्य आदेश आपल्या मनानेच द्यायचा आहे. एकदा निर्णय घेतला तर काहीही शक्य आहे.

सुहास सोहोनी,
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सदस्य महाराष्ट्र वृत्त पत्र लेखक असोसीएशन,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती.
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Saturday, May 7, 2011

मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला !

मोबाईल, वाहन आणि फुकटचा सल्ला !

कोणतेही वाहन जेव्हा आपण चालवतो तेव्हा वाहन चालवण्याच्या क्रियेशी आपले हात, पाय, आणि विचार एकरूप होतात. माशीन आणि चालवणारा चालक दोघांच्या संगनमताने ते वाहन सहजपणे चालकाच्या मेंदूच्या आज्ञेप्रमाणे पुढे सरकते, वेग घेते. वाहन चालकाने नजर रस्त्यावर ठेवून शांत बुद्धीने वाहन चालवावे हि अपेक्षा, पण आजच्या मोबाईल काळात सतत नित्य बोलत राहा हेच सांगितल्या मुळे मोबाईल वर बोलणे अगदी आवश्यक आहे. त्या करिता एका हाताने वाहन आणि दुसर्या हाताने कानाला मोबाईल, मोठ्याने बोलणे, त्यापेक्षा बोलताना विषयाला अनुसरून चेहेर्यावर हावभाव, हे सुद्धा फारच आवश्यक आहे. याहीपेक्षा आणखीन एक क्रिया वाहनचालकाला यायलाच हवी, तरच त्याला तरबेज वाहन चालक म्हणता येईल. म्हणजे असे कि ४५ डिग्री आपली मान खंद्याच्या दिशेने झुकवायची आणि ४५ डिग्री ने खांदा उंच करायचा व मान आणि खांदा यांच्या मध्ये अलगद मोबाईल सरकवायचा आणि कितीही वेळ वाहन चालवताना मस्त गप्पा हाणायच्या. आहे कि नाही गम्मत ? नाहीतरी हि नवी पिढी मुळातच हुशार आहे बुवा !

वास्तविक वाहन चालवताना कसरत करत मोबाईल वापरणाऱ्या लोकांना इतर वाहनांनी सन्मानपूर्वक वाट करून द्यायला हवी. वाकडी मान करून येणारे वाहन सामान्य वाहन चालकांना दिसत कसे नाही ? मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या वाहन चालकावर सरळ आदळतात म्हणजे काय ? हे बरोबर नाही प्रत्येक वाहन चालकाला किमान मान वाकडी करून बोलत बोलत वाहन चालवता आलेच पाहिजे. तज्ञ चालकांनी असे कोचिंग क्लासेस काढायला हरकत नाही. आई बाप आणि पालक हि तर एक नंबरची घाबरत मंडळी. अगदी मुळे घरी येई पर्यंत सारखे घाबरत असतात. काही तज्ञ विचारवंत स्वतः ला लेखक वगैरे समजणारी मंडळी तर फुकटचा सल्ला देण्याची एकही संधी सोडत नाही. फुकट सल्ले देण्याच्या यांच्या चिकाटीला मानावे लागेल. खरे म्हणजे अनेक थोर महात्म्यांनी प्रवचकरांनी, संतांनी सांगूनच ठेवले आहे कि, जगतांना उठ सुठ सारखा सारखा मृत्यू चा विचार कधी करू नये. तो काय कधीतरी यायचाच कसे ? तरीपण एक फुकट सल्ला द्यावासा वाटतो कि मोबाईल वर बोलतांना वाहन चालवणे धोक्याचे असते.

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही !

देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

जन्माने किंवा अपघाताने अपंगत्वाचा एकदा का एखाद्या कुटुंबात शिरकाव झाला कि त्या परिवाराला जणू एक्खाद्या युद्ध प्रसंगाला सामोरे जावे, तसे या अपंगत्वावर मात करण्यासाठी झगडावे लागते. अनुवांशिकता, गुणसूत्रातील दोष, गर्भार अवस्थेत मातेचे कुपोषण, चुकीची औषधे, अपघात, ताप, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड चा प्रभाव, अशा अगणित आणि अनाकलनीय कारणाने जन्मतः शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व प्राप्त होते. त्याशिवाय व्यसनांचा अतिरेक, रासायनिक द्रव्य किंवा वायू वा किरणोत्सर्गाने येणारे अपंगत्व म्हणजे कठीण परीक्षाच आहे. अपंग व्यक्ती व तिचे माता पिता यांच्या हृदयाची कालवाकालव इतरांना दिसली तरी त्या यातना त्यांच्या त्यांनाच सोसाव्या लागतात.

आज आरोग्य विज्ञान शास्त्र अत्यंत प्रगत आहे. प्रसूतीपूर्व विविध चाचण्या आहेत. जनता साक्षर आहे. पण तरीही जन्मतः अपंगत्व, त्यापेक्षा मेंदूचे रोग आणि मानसिक अपंगत्वाच प्रमाण काळजी करण्या इतकेच जास्त आहे. प्रसूतीपूर्व चाचण्या द्वारे या प्रकारची कमतरता का सिद्ध होऊ शकत नाही ? चाचणी मशीन ची अचूकता व त्याचे निदान करण्याची प्रगल्भ बुद्धिमत्ता प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात उपलब्ध आहे का ? प्रगत आरोग्य विज्ञान शाश्त्राचा सूक्ष्म अभ्यास होणे गरजेचे असून आर्थिक दृष्ट्या स्वस्त असण्याची गरज आहे, कारण समस्या ग्रस्त परिवारासाठी हा प्रचंड आर्थिक मनस्ताप आहे. एकदा समस्या सिद्ध झाली कि या दवाखान्यातून त्या दवाखान्यात धावणाऱ्या आई बापाला वंशपरंपरागत दोष, गुणसूत्रातील दोष, किंवा गर्भारपणात झालेल्या न झालेल्या चुका यावर प्रश्नांच्या फैरी ऐकाव्या लागतात. जन्मापात्रीकेतील दोष, पूर्वजांचा शाप, नक्षत्र वा ग्रहांचा त्रास, पुनर्जन्म अश्या अनेक गोष्टीतून मनस्ताप होतो. कुठेही उत्तर सापडत नाही. आपला देव आपल्यावर का रुसला हेच कळत नाही.

नीट विचार केला तर सुधृद सशक्त शरीर, चांगल्या सवयी, काही शारीरिक दोषांची पूर्व माहिती त्यावर वेळेआधी केलेले उपचार, शरीर शाश्त्राची आवश्यक माहिती, प्रसन्न मन, योग्य वेळी होणारी गर्भधारणा अशा अनेक गोष्टींचा शास्त्रीय दृष्ट्या विचार करावा लागेल.

अपंग, अंध वा मतीमंद अश्या समाज घटकांसाठी बँकेच्या ठेवींवर २ टक्के व्याज जास्त मिळावे, तसेच समस्या ग्रस्त असलेल्यांसाठी औशोधोप्चार, चाचण्या सरकारी व खाजगी रुग्णालयात सुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध असाव्या. हा खर्च भरून काढण्यासाठी धनवान व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर पुन्हा कोणी हिम्मतवाला एवरेस्ट सर करेल. अथांग सागर पोहून जाईल. नवनवी कल्पना जिद्दीने साकार केल्या जातील. आत्मविश्वास जागृत करून या समाज घटकाला दिशा दाखवायची गरज आहे. देवाचा रुसवा आपण घालवू या !

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com

Wednesday, May 4, 2011

देव देवलातच असतो का ?

देव देवलातच असतो का ?
मंदिरात पूजा आर्चा करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली असेल, जो कोणत्याही समाजाचा असेल, त्याच्या शिवाय कुणाही स्त्री किंवा पुरुषाने गाभार्यात स्वतः होऊंन जाऊ नए। खर तर देव दर्शनासाठी केंव्हा जाऊ नए हे स्त्रियांना स्वाताहलाच समजते, पण देवालयात गाभार्यात प्रवेश करणारे पुरुष स्वच्छतेचे कितीसे पालन करतात ? तोंडाला पानमसाला, गुट्ख्याचा उग्र वास, अंघोळ न केलेले अंगाला व कपड्यांना कूबत वास असलेले आणि तोंडाला चक्क दारूचा वास येत असलेले अनेक महाभाग देव दर्शनाच्या रांगेत लागलेले आढल्तात। देव दर्शन प्रत्येकासाठी मुक्त असलेच पाहिजे। व दर्शनासाठी उभे राहिल्यावर पुढे सरका असेही हकालल्या सारखे कुणी म्हणु नए। देव दर्शन हा आनंदाचा क्षण आहे। गाभार्यात जाऊंन मूर्ति ला स्पर्ष करण्यानेच कृपा होते हा एक समज। गाभार्या बाहेर उभ राहून, डोळे भरून, सर्व सुख दुख विसरून, त्या तेजाच्या मूर्ति कड़े बघत बसणे, हा खरा आनंद आहे।

देवाचिये द्वारी ऊभा क्षण भरी अशी आनंदाची स्थिति अनुभवणे सोडून , वादाच्या ठिणग्या का फेकल्या जातात ? त्या पेक्षा आपली देवालय शांत, सुन्दर, स्वच्छ कशी राहतील, हे तपासण्याची गरज आहे । मुर्तिवर अभिषेक, त्यामुलेच दूध, दही, पाणी, त्यातच भिजलेली सर्वत्र पसरलेली, वास येत असलेली, फुले, सभामंडपात पायाखाली तुडवली जाणारी फुले, या बाबत कृति हवी। दोन तिन मजले चढून व उतरून, कठडयातुन रांगेत आल्यावर, काही तासांनी देव दर्शन होत। अति श्रीमंत देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान असाही एक भ्रम आहे। शेवटी भक्तान्चिच इच्छा दुसरे काय !

आजकल सगले देव सोन्याचे कसे करता येतील, मुर्तिवर सोन्याचे कपडे, त्यावर हीरे माणके, सोन्याचे सिंहासन, सोन्याचाच कलस कसा बसवता येइल, ह्या धेयाने भक्त गण वेडे ज़लेले आहेत। गावो गावची जुनी मंदिरे व निर्माण होत असलेली नवी मंदिरे, त्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च , दनाद्वारे येणारा अफाट पैसा, आणि श्रीमंत देव देवता या परश्वाभूमीवर मनात विचारांच आन्दोलन सुरु की या देशात दररोज कुपोषित बालके का मारतात ? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण। औषधोपचार या प्राथमिक गोष्टीपासून करोडो नागरिक का वंचित आहेत ? देव दर्शानासाठी अफाट गर्दी असताना तीच जनता, व्यसनाधीन, भ्रष्ट, विक्रुतान्ध का ? देव देवलातच असतो का ?


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com