Thursday, August 23, 2012

महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा

                  *   महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार व्हावा   *

    नेहमीच एक विचार मनात येतो की 6 ते 10हजार रूपये महिना पगार ज्या व्यक्‌तीला मिळतो  त्या कुटुंबाचा खर्च कसा काय सांभाळला  जात असेल  ! अजून तरी 4 ते 6 सदस्य प्रत्येक कुटुंबात आहेत.  अन्न, वस्त्र आणि निवारा एवढ्यावरच प्राथमिक गरजा संपत नाहीत तर आता शिक्षण आणि आरोग्य या गरजा महाग असल्या तरी अत्यावश्यक बनल्या आहेत.  चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे म्हणून बालक मंदिरापासून पालक रांगेत उभे राहतात.  वाटेल  तितके  डोनेशन द्यायला  तयार होतात.  मुलाच्या गणवेशासोबत वर्षभरातील  विविध खर्चाची बेरीज केली  तर अवाढव्‌य खर्च लक्षात येईल .  आरोग्यावरील  खर्च तर संपूर्ण परिवाराला  अगदी पार केविलवाणं करून टाकतो.  घराचं भाडं, धान्य किराणा, खरेदी,ग्यास    सिलेंडर , वीजबील , पाणी बील , दूरध्वनी बिल , मुख्य म्हणजे पेट्रोल चा खर्च असे हे सगळे  खर्च त्या कुटूंबाच्‌या आर्थिक नियोजनाची पार वाट लावून टाकतात.  त्यानंतर हौसमौज, मनोरंजन करता येत असेल ?
    सरकारी नोकरीत असणाऱ्या  सर्वांना सहावा वेतन आयोग लागू झाल्‌याबरोबर सगळ्या  बाजारपेठा महागल्या आणि या महागाईची झळ लोकसंख्येच्या 90% असणाऱ्या , सरकारी नोकरीत नसणाऱ्या  सर्वांना सोसावी लागत आहे.  महिना 25 हजारावर पगार किंवा उत्पन्न असणाऱ्या  व्यक्तिना अजून तरी महागाईची दहशत बसलेली  नाही. याच 30% असलेल्या नव श्रीमंतांच्या भरवश्यावर बाजार गरम होतो आहे.  महागाई वाढते आहे आणि उर्वरित समस्त जनता होरपळून निघते आहे.  उजाडणाऱ्या  प्रत्येक दिवशी महागाईच्या भस्मासूराचं तोंडं आणखी मोठं होत चाललयं.  मुख्‌य म्हणजे पेट­ोल  डिझेल चे दर बेसुमार वाढत चालले आहेत.  यामुळे  ट्रान्सपोर्ट वाढणार नंतर अगदी सहज, प्रत्येक वस्तूंचे भाव वाढणार.  हे एक दुष्ट चक्र आहे.  संबंधित विभागाचा पेट्रोल  भाववाढीवर मुळीच ताबा नाही हे उघड आहे.  त्यातच अतीव लोभापायी प्रत्येक आवश्यक वस्तूतील  भेसळ , हा गुन्हा जरी असला  तरी अशा कृत्यांची जराही भिती वाटेनाशी झाली आहे.  तीच गोष्ट  रासायनिक प्रक्रियेद्वारे पदार्थ, फळे , पिकवण्याबाबत.  हे सगळे  भेसळ माफीये माणसं नाहीतच, तर सामान्यांच्या जीवाशी खेळणारे मृत्यूदूतच आहेत.  खरोखर आज कुणाही गुन्हेगारा कायद्याची जराही भिती वाटत नाही.
    ही अफाट  लोकसंख्या हेच तर महागाईचं मुख्य कारण आहे.  महागाईचे दुष्परिणाम काय असू शकतात हे येत्या काही काळात दिसणारच आहेत. अन्नाचे, धन्याचे साठे, सडताहेत पण जनतेला  स्वस्तात उपलब्ध होत नाहीत.  यावरून काय बोध घ्यायचा? जनतेच्या सुखाची काळजी , तळागाळातल्या गरीबांची काळजी आहे, असे निवडणूकीच्‌या वेळी  सांगणाऱ्या  आमच्या गर्भश्रीमंत राजकारणी नेत्यांना महागाईची झळ  बसते कां? शासनाची इच्छाशक्ती जर जागृत असेल  तर जीवनावश्यक सर्व वस्तूंचे दर नियंत्रीत करावे.  आज समस्त जनतेला  महागाईच्या महाभयानक वणव्यात झोकून दिले आहे.  लोकशाहीत लोक त्रस्त आहेत.  महागाई हा मुद्दा  महÎत्वाचा नाही का? नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे योग्य नाही.  शासनाने* महागाईच्या समस्येचा शुद्धबुद्धीने विचार करावा.**
                        ुुुसुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                  क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                     www.suhassohoni.blogspot.com

No comments: