Monday, January 7, 2013

* लसीकरण **काही प्रश्न *

 *     लसीकरण --काही प्रश्न    *
                      आरोग्य शास्त्रातील विविध शोधांचा विचार केला तर मन थक्क होते .अनेक प्रकारच्या शारीरिक कमतरता तसेच आजारांवर हमखास गुण देणारी  औषधे,लसी आज उपलब्ध आहेत ,अगदी मरणाच्या दारातून खेचून आणण्याचे सामर्थ्य आज आरोग्य विज्ञानात आहे .एकदा का रुग्णाला डॉक्टरांच्या ताब्यात दिले की रुग्मुक्त होऊन घरी जाईपर्यंत तज्ञांच्या मताने ठराविक उपचार पद्धती चालू असते .औषधे
आणि उपचारांच्या प्रभावाखाली आरोग्य शास्त्राद्वारे अव्याहतपणे हा एक सकरात्मक प्रयोग सुरु असतो .
सततच्या अभ्यासामुळे आणि योग्य निदान व अचूक औषधांमुळे यश मिळते .
                        परंतु काही वेळा  अपयशाचा सामना करावा लागतो .कधी कधी लसीकरणा नंतर काही दुर्दैवी घटना घडतात हि गंभीर बाब आहे यात सारवासारव करून एकमेकांवर दोषारोप केले जातात .नवजात बालकांना ठराविक कालावधीत विविध लसी दिल्या जातात त्यामुळे त्या बाळाचे संपूर्ण आयुष्य सुखी होते .आरोग्याचे संरक्षण दिले जाते .आधुनिक उपचार पद्धतीत गर्भ राहण्याच्या आधीपासून विविध संप्रेरके किंवा पोषक औषधोपचार केले जातात .सोनोग्राफी सारख्या अनेक उपायांनी गर्भावर सूक्ष्म लक्ष ठेवलेजाते ठेवले जाते . बाळाच्या जन्मानंतरही लसी व औषधे चालूच असतात ,मग लस दिल्यानंतर अपयश का येते ?लहान मुलांना विविध आजार का होतात ?लसीकरण अत्यंत महाग कां असावे ?एखादी लस देण्यासाठी ८०० ते
१०००रु.लागतात पण ताप येऊ नये या कारणांनी त्याच लसीकरणाचे रु. २४००/-घेतले जातात असे कां ?
                    मुळात बहुतेक सर्व  लसी विदेशातून येतात, *आपल्या हवामानाला त्या लसी योग्य आहेत कां ?
*विदेशातील कारखान्यात तयार झाल्यानंतर लस टोचली जाई पर्यंतचा काळ किती असतो ?
*आपला देश लसींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण कां नाही ?*शहरी किंवा ग्रामीण भागांत अनेक तासांचे भारनियमन असते,त्यामुळे लसी  ज्या योग्य वातावरणात,तापमानात ठेवावायला हव्यात ते तापमान
[कोल्ड चेन ]कसे सांभाळले जाणार ? *तापमान सांभाळले न गेल्यामुळे लसीकरणाच्या गुणात काय बदल
 होऊ शकतात ?* लहान बालकांचा जीव वाचवणाऱ्या या लसी साठी आरोग्य केंद्रांना अखंड वीज पुरवठा कां
दिला जात नाही ? *सर्व स्तरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना किती दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते ?*कोणत्या देशात कोणत्या लसीवर बंदी घातली आहे ?*आणि कां ? *इतर देशांत बंदी घातलेल्या लसी आपल्या देशात वापरल्या जात नाहीत ना ?*कोणते ब्रांड सुरक्षित आहेत हे सर्व ज्ञान आरोग्य कर्मचाऱ्यांना असते कां ?
*लसींच्या साठवणुकी विषयी सर्व निकष व मापदंड पाळले जात आहेत कां ?
                      बालकांच्या सर्वच आजारांवर उपलब्ध असलेल्या अनेक लसिंविषयी शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे जनकल्याण कार्यक्रम राबविला जातो .हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो .भावी पिढीच्या आरोग्याचा इथे संबंध आहे .शासनाने योग्य संदेश देऊन जनतेचा विश्वास मिळवावा ,लसीकरणाची भीती नको.लस घेण्यात जर धोका वाटू लागला तर लसीकरण न झाल्याचा धोका किती मोठा आहे ?बाळाच्या जन्मापासूनच डॉक्टरांवर विसंबून लसीकरण व विविध औषधोपचार सुरु असतो आणि हे सर्व विद्नानावर व तद्न्यावर असलेल्या विश्वसापाई सुरु असते .डॉक्टर व रुग्ण यांच्या मधील विश्वासाचे हे नाते जपलं जाणे हे समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे .लसीकरणा विषयी वरील प्रश्नांची अधिकृत उत्तरे अपेक्षित आहेत.आरोग्य शास्त्रातील तज्ञांनी जनतेला मार्गदर्शन करण्याची गरज आहे
                  सुहास सोहोनी
                   अमरावती
            www.mazyasamvedana.com