सावधान मनोरूग्ण वाढताहेत
[ जागतिक मानसिक आरोग्य साप्ताह ]
येत्या दहा वर्षांत मनोविकारात अत्यंतिक वाढ संभवते, हे विधान धाडसाचं आणि अप्रिय असल तरी ते खरं ठरेल अशी आज स्थिती दिसते आहे. समाजस्वास्थाला हानी पोहोचविणाऱ्या जितक्या जास्त घटना घडत जातील , तितक्या जास्त प्रमाणात मनोरूग्णांचं प्रमाण वाढणार आहे. अस्मानी किंवा सुलतानी परिस्थीती वा घटनांमुळे अचानक पण दिर्घ काळ असंख्य मनांवर खोल परिणाम होतो. कायमचा ठसा उमटविणाऱ्या अशा प्रसंगामुळे दुबळे मन मनोकायिक विकारांनी ग्रासले जाते आणि सुरू होतो स्वत:चा स्वत:शीच चालणारा लढा . आतंकवादी हल्ला , नसर्गिक असमतोल , अपघात अशा विविध परिस्थितीत जीव गमावलेले तर यातनातून सुटतात, पण जखमी झालेले , थोडक्यात बचावलेले आणि घटना स्थळी असलेले , मनाने सुन्न झालेले , मदतकार्यात व्यस्त असताना परिस्थितीची दाहक तिव्रता अनुभवित असलेले, अशा असंख्य लोकांच्या मानसिक अवस्थेची पार लक्तरं झालेली असतात. मन पिळवटून टाकणारी भेसूर दृष्ये मनावर कोरली जाऊन मनोविकार जडण्याची शक्यता वाढते.
शिक्षण तसेच नोकरी-व्यवसायातील तिव्र स्पर्धा, सततचे अपयश, जांच, जुलुम, कोणत्याही प्रकारचा क्षमतेपेक्षा अती ताण, कर्जबाजारी अवस्था, अपराधाची टोचणी, व्यसनाधीनतेने अंधारलेले भविष्य, घरी किंवा बाहेर होणारी अवहेलना, अपमान, तिरस्कार, अती राग, लोभ-मोह-मत्सर किंवा सद्सद् विवेक बुद्धीचा लवलेश नसलेले विकृत कामुक व्यक्ती, आर्थिक स्थिती बाबत म्हणायचे झाले तर अत्यंतिक विपन्नावस्था आणि अती आर्थिक सुबत्ता या दोन्ही परिस्थितीत मनोरूग्ण निर्माण होतात. विपन्नावस्था व
कर्जबाजारीअसणाऱ्या शेतकऱ्यांचे उदाहरण अतीशय बोलके आहे. चिंताग्रस्त होवून ताण असह्य झालेला मनोरूग्ण एका बेभान क्षणी मृत्यूला कवटाळतो. प्रचलित व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास भविष्यात मनोरूग्ण शेतकऱ्याच्या संख्येत सहस्त्रपटीने वाढ होईल अशी साधार भीती वाटते. या घटक समुहाला "मानसिक तसेच भावनिक संरक्षणाची' गरज आहे. संपूर्ण "संरक्षित पुनर्वसनाची' गरज आहे.
प्रसारमाध्यमांच्या तिव्र स्पर्धेचा बळी मध्यमवर्गीय ठरतो आहे. माहिती आणि सत्याच्या अतिरंजीत हव्यासापाई नितीनियमांना बाजुला ठेवून अगदी "वाट्टेल ते' समोर आणले जाते आणि कोणत्या वयोगटावर कशाचा काय परिणाम होईल , याचे सोयर सुतक कुणालाच नाही. अती श्रीमंतांसाठी पावला गणिक मोहजाल पसरवलेले आहे. उच्च संस्काराचे सकारात्मक कवच जर नसेल तर कोण कसा, कधी भरकटेल याचा काहीच नेम नाही. अत्यंतिक क्रौर्य, बिभत्स, भेसूर, अश्लील , किळसवाणे आणि देशविघातक अशा विविध कारवायात भाग घेणारे, मदत करणारे अशा सर्व व्यक्ती मनोरूग्णच नाहीत का ?
सहज ऐकू येणारी शिव्यायुक्त हीन भाषा व विचारसरणीं, शिक्षण आणि संयमाच्या अभावामुळे अगदी "हवे ते' आणि "हवे तेंव्हा' हिंसक पद्धतीने ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढते आहे. ही मनोवृत्ती भविष्यात काय फळे देणार ?
आपल्या मुला मुलींना खुप मोठ व्हायला पाहिजे या हट्टापाई सर्वच आईबाप आपल्या मुलांवर किती दडपण आणतात, हे आपल्या मनाशी विचारून पहा. कितीतरी प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला सापडतील . विज्ञानामुळे आकलनशक्तीला भरपूर खादय असल्यामुळे आजची लहान मुले खुपच हुशार आहेत. त्यांच्या आयुष्याची ध्येयं निवडण्यासाठी आपण सकारात्मक मदत करूया. सुंदर जीवनशैलीतील
विलोभनीय सकारात्मक बाजू ,पालक म्हणून त्यांना समजावून सांगू या .सुसंस्कारित आणि दक्ष आई बाप,
गुरुजनच थोपवू शकतात भविष्यात होणारी मनोरुग्णांची वाढ .
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह २००७]
www.suhassohoni.blogspot.com