Sunday, October 21, 2012

* महागाई ,शासन आणि विरोधक *

          * महागाई ,शासन आणि विरोधक  *
आजच्या वाढत्या महागाईला आपल्या शासनाने आला घालावा ,त्यामुळे सगळ्या वस्तू स्वस्त भावात
मिळतील अशी आपली साहजिकच रास्त समजूत असते ,पानापान जर सभोवताली निट लक्ष्य दिले
तर अनेक राज्यांत सगळ्या शासन कर्त्यांना आधी स्वतःचे आसन टिकवून ठेवण्याकरिता केवढी धडपड करावी लागत आहे !पक्षांतर्गत कारवाया आणि विरोधकांचा [अनाठाई ? ]विरोध ह्या सगळ्या महत्वाच्या
कामात शासकांना अशा छोट्या छोट्या वस्तूंच्या भाववाढीकडे लक्ष्य द्यायला कुठे वेळ मिळणार ?
              एवढ्या विश्वासाने निवडून दिल्यानंतर,जनते जवळ थोडातरी [म्हणजे नक्की किती ?] सोशिकपणा हवाच .भावाढीची  बरीच कारणे मानव निर्मित असल्याने शासकाचा करडा अंमल नसला की थोडीफार
भाववाढ होणारच .
                      सुहास सोहोनी
                      ९४०५३४९३५४
             www.suhassohoni.blogspot.com

Saturday, October 20, 2012

*सणांच्या निमित्याने असह्य भाववाढ*

*सणांच्या निमित्याने असह्य भाववाढ*
निरनिराळे सण ,आपत्कालीन परिस्थिती ,वार्षिक अंदाजपत्रक या वेळा म्हणजे वाढत्या महागाईस हातभार असे जणू ठरल्या सारखेच आहे .वस्तूंच्या किमती वाढणार हे गृहीत धरून त्या प्रक्रियेला जनतेकडून रीतसर स्वीकृतीच मिळते .या वेळी होणारी साठेबाजी व त्यामुळे होत असलेली भाववाढ जणू आम्ही सहजमान्य
केलेली आहे .ग्राहकांची उधारीत खरेदीची क्रयशक्ती ,प्रलोभनांना बळी पडणे या मानसशास्त्राचा चतुर व्यापारी
,भेसळ करणारे  व काही  कारखानदार पुरेपूर फायदा उठवतात. गुन्हेगार एकतर पुराव्या अभावी सुटतात किंवा किरकोळ आर्थिक दंड भरून सुटतात .वस्तूंच्या किमतीत दंडाची  रकम सुद्धा मिळवलेली असेल काय ?
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
www.suhassohoni.blogspot.com

*मधुमेहींना लाभदायक आरोग्याची चतुःसूत्री *

       *मधुमेहींना लाभदायक आरोग्याची चतुःसूत्री *
             आपण कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर असो किंवा नसो पण आपण भारतीय ,"मधुमेह "या विषयात वर्ल्ड चम्पिअन आहोत  हे दुर्दैवाने सत्य आहे .आगदी सात आठ जणांपैकी एक जण मधुमेही असतोच .काही मधुमेही ज्ञात आहेत तर काही अज्ञात आहेत ,एवढेच .मात्र हे प्रमाण निश्चितच गंभीर आहे आणि चिंता करण्याजोगे आहे .वयाच्या २५ ते ३० पर्यंत प्रकृती सक्षम असली तरीही त्यापुढे ४५ ते ५० च्या वयात क्षमता खालावते व अनुवांशिक मधुमेहाचा धोका सुरु होतो .संधी मिळताच रक्तातील साखरेची स्तिथी बिघडते .
बहुतेक वेळा परीक्षणा अभावी  रोगी अज्ञानात  राहतो आणि नेमके हेच प्रमाण अत्याधिक आहे .बालवयात
मधुमेह असण्याचे प्रमाण सुद्धा फार आहे .हा टाईप -१जुव्हेनैल या नावाने ओळखला जातो .जेव्हा शरीरातील
स्वादुपिंड जरासुद्धा इन्सुलिन निर्माण करीत नाही ,तेव्हा हा मधुमेह होतो .या मुलांचा इन्सुलिन चा खर्च फार
असतो .व्यक्ती प्रमाणे खर्च  कमी जास्त असतो तरी अंदाजे २ ते ३ हजार रुपये महिना खर्च होतो .मध्यम वर्गीयांना या खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज असते सामाजिक संस्थांनी या लहान मुलांना सांभाळण्याची
गरज  जाणवते .
                 टाइप -२ मधुमेह हा इन्सुलिन , इंजेक्शन ,गोळ्या ,व्यायाम अश्या योग्य त्या उपायाने काबूत ठेवता येतो .प्रत्यक्षात ही गोष्ट वाटते तितकी सोपी ,सहज  नसली तरी मधुमेहाची सर्वांगीण माहिती ,पत्थ्य आणि अथक परिश्रमाने रक्तातील साखर" नॉर्मल  " ठेवण्याचा प्रयत्न करता येतो आणि त्यात यश नक्की  मिळते इन्सुलिन , इंजेक्शन ,गोळ्या  या  डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी जास्त करणे योग्य आहेच पणआहार, विहार,योग्याभ्यास [व्यायाम ]आणि मनःशांती ही आरोग्याची चतुःसूत्री प्रत्येकाने अवगत करून त्याप्रमाणे
जीवन शैली घडवणे आवश्यक आहे आणि लाभदायक आहे .कितीतरी मधुमेहींनी ही चतुःसूत्री आचरणात
आणल्याने त्यांच्या गोळ्या वा  इन्सुलिन चा  डोस कमी झाला आहे .
      [१]आहार -योग्य ताजे आणि पाचक आहाराचं फार महत्व असून आपले जेवण दिवसभरात विभागून घ्यायला हवे .आहारातील पदार्थांचे केलारी संदर्भात" मेनेजमेंट "सांभाळले तर मधुमेही सर्वच आवडीच्या
पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो ,अगदी पेढा व आंबा सुद्धा .संयमित आहाराने रक्तशर्करा संतुलित ठेवता
येते .
    [२]विहार -सकाळच्या आल्हाददायक वेळी कमीत कमी ४५ मिनिटे दररोज जलद चालणे आवश्यक आहे .
प्रकृतीनुरूप चालण्याचा वेग, वेळ  सांभाळावा .चालतांना श्वास ,नाडिचे ठोके ,छातीची धडधड यावर मन
एकाग्र करावे .दर दहा मिनिटांनी थोडे थांबावे .शक्य तोवर एखादा मित्र सोबती असावा किंवा ग्रुप असल्यास
उत्तम .
    [  ३  ]योगाभ्यास - [व्यायाम ]ही एक वैशिष्टपूर्ण वेगळी जीवनशैली असून अष्टांग योगाची जास्तीत जास्त   तत्वे अंगीकारणे नक्कीच लाभदायक आहे .यम, नियम ,शौच ,शुचिता ,सत्य ,अस्तेय ,चोरी न करणे
,व्यसनांपासून दूर राहणे अशा अनेक गोष्टींचे पालन व्हावे ,त्यानंतर हलका व्यायाम [प्रत्येकाला झेपेल असा ]
दररोज करणे आवश्यक आहे .
     [४] मनःशांती - गृहस्थ आश्रमात राहून मनःशांती टिकवणे ही तारेवरची कसरत असली तरी मधुमेह
नियंत्रणात ठेवण्यास मन शांत ठेवणे गरजेचे आहे .मानःशांन्ति कुणालाही मागून मिळत नाही पण आपल्या जीवन शैलीवर  बरेच  काही अवलंबून आहे .
          आरोग्यासाठी या चातुह्सुत्रीचा स्वीकार केल्यास रक्तातील साखर ,रक्तदाब ,चरबी अशा अनेक गोष्टी
नियंत्रणात येतात व  पर्यायाने  आरोग्य  सुधरते ,म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे
आरोग्याची चतुःसूत्री . 
     
सुहास सोहोनी ---९४०५३४९३५४
सहसचिव ,डायबेटिक असोसिएशन ,अमरावती .
www.suhassohoni.blogspot.com


 

Wednesday, October 17, 2012

‎* आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी *

‎* आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी *

लहानपणी वयवर्ष १५ पर्यंत भरपूर हालचाल आणि खेळ यामुळे शरीर व्यवस्थित असते, म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने करोडपती असते, मात्र पुढे आयुष्यभर तसेच राहील कि नाही हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. बैठी जीवन पद्धत्ती अळस व्यायामाचा अभाव अबर चबर खाणे या मुले वाढलेले वजन, शरीराचा मोठा घेर आणि तरीही शरीर बिचारे विनातक्रार वयाच्या ४० - ४५ वर्ष पर्यंत काम करताच असते. आर्थिक साम्पातीत भर पडत असते, भौतिक सुखाची चटक वाढलेली असते, नंतर मात्र शरीराचा मेनटेनन्स खर्च सुरु होतो. पावलान पासून डोक्या पर्यंत सगळे अवयव दुखू लागतात. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत ही व्यक्ती करोडपतीची लखपती बनलेली असते. मग सुरु होतात डॉक्टरांकडे वाऱ्या. कुणीतरी सांगितले म्हणून प्याथी बदलवून नव नवे उपचार सुरु होतात. आधी गावातले हॉस्पिटल, मग मोठ्या शहरातले मोठे हॉस्पिटल. पुढे काय ? सुज्ञास सांगणे न लागे ! घरात भिंतीवर फ्रेम मध्ये हक्काची जागा .
                       जस जशी आर्थिक संपत्तीत वाढ होते आणि भौतिक सुखाच्या पूर्ण आहारी माणूस जातो तेव्हा अधिक संपत्ती,
मग अधिक सुख या दीर्घ चक्रव्युहात तो गरा गरा फिरत राहतो. त्याची सुटकाच होत नाही. कुटुंबाच्या महागड्या मागण्या त्याला पूर्ण करावयाच लागतात त्यासाठी अर्थार्जन आणि फक्त अधिक अर्थार्जन एवढेच करणे क्रमप्राप्त ठरते. नीती नियमांचे बान्ध त्याला थोपवू शकत नाहीत. त्याच्या मालकीच्या आणि उपयोगाच्या प्रत्येक वस्तूंची तो उत्तम काळजी घेतो. संगणक, कार, स्कूटर, फ्रीज यांची तो तत्परतेने दुरुस्ती करतो. या तत्पर्तेबद्दल नेहमी अभिमानाने सगळ्यांना सागतो. मात्र सतःच्या शरीराची वर्तमान स्थिती समजून घ्यायला नकळत विसरतो. आरश्यान न मावणार स्वतःच शरीर पाहून सुखावतो. पण याच वेळी आरोग्याच्या बाबतीत लाखपतीचा दरिद्री झालेला असतो. सगळ्यात दुर्दैवी बाब अशी कि, अफाट मिळवलेली संपत्ती सुद्धा जीव आहे तोवर जगवा, म्हणून खर्च करावी लागते.
                            स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून केलेलं अर्थार्जन खरच काय कामाचं. कुणासाठी केलं हे अर्थार्जन ? मुलांसाठी. विनामेहनत मिळालेली संपत्ती, मुलं टिकवतील कि उधळतील ?मग ! डॉक्टर मंडळी मात्र नक्कीच श्रीमंत होतात. प्याथ्यालॉजी ल्याब, केमिस्ट, सगळ्यांना चं धंदा मिळतो. पण आपल काय ? लहानपणी मिळालेल्या करोडपती शरीराला आपण आपल्याच कर्माने आरोग्याच्या दारिद्र्य रेषेकडे घेऊन जातो. आरोग्याची संपत्ती नष्ट होण्या आधी मधेच कुठे तरी थांबायला हवे. आरशात बाह्य शरीर बघतांनाच शरीराच्या आत डोकावून पाहायला हवे. काही दुरुस्त्या, सुधारणा, जीवनशैलीत बदल साधायला हवा. सुधृढ आरोग्याच्या लाभासाठी चतुःसुत्रीचे आचरण स्वीकारावयास हवे. ही लाख मोलाची चतुः सूत्री म्हणजेच १. आहार, २. विहार, ३. योगाभ्यास (व्यायाम), ४. मनः शांती. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली व शरीरावर प्रेम केले तर पुन्हा लखपती आरोग्यवान होता येते. तेव्हा आरोग्याविना अर्थार्जन कुणासाठी ?

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Friday, October 5, 2012

सावधान मनोरूग्ण वाढताहेत

सावधान मनोरूग्ण वाढताहेत
[ जागतिक मानसिक आरोग्य साप्ताह ]

        येत्या दहा वर्षांत मनोविकारात अत्यंतिक वाढ संभवते, हे विधान धाडसाचं आणि अप्रिय असल  तरी ते   खरं ठरेल  अशी आज स्थिती दिसते आहे.  समाजस्वास्थाला  हानी पोहोचविणाऱ्या  जितक्या जास्त घटना घडत जातील , तितक्या जास्त प्रमाणात मनोरूग्णांचं प्रमाण वाढणार आहे.  अस्मानी किंवा सुलतानी परिस्थीती वा घटनांमुळे  अचानक पण दिर्घ काळ  असंख्य मनांवर खोल  परिणाम होतो.  कायमचा ठसा उमटविणाऱ्या  अशा प्रसंगामुळे  दुबळे  मन मनोकायिक विकारांनी ग्रासले  जाते आणि सुरू होतो स्वत:चा स्वत:शीच चालणारा लढा . आतंकवादी हल्ला , नसर्गिक असमतोल , अपघात अशा विविध परिस्थितीत जीव गमावलेले  तर यातनातून सुटतात, पण जखमी झालेले , थोडक्यात बचावलेले  आणि घटना स्थळी  असलेले , मनाने सुन्न झालेले , मदतकार्यात व्यस्त असताना परिस्थितीची दाहक तिव्रता अनुभवित असलेले,  अशा असंख्य लोकांच्या मानसिक अवस्थेची पार  लक्तरं झालेली  असतात.  मन पिळवटून टाकणारी भेसूर दृष्‌ये मनावर कोरली  जाऊन मनोविकार जडण्याची शक्यता वाढते.
       शिक्षण तसेच नोकरी-व्यवसायातील  तिव्र स्पर्धा, सततचे अपयश, जांच, जुलुम, कोणत्याही प्रकारचा क्षमतेपेक्षा अती ताण, कर्जबाजारी अवस्था, अपराधाची टोचणी, व्यसनाधीनतेने अंधारलेले  भविष्य, घरी किंवा बाहेर होणारी अवहेलना, अपमान, तिरस्कार, अती राग, लोभ-मोह-मत्सर किंवा सद्‌सद्‌ विवेक बुद्धीचा लवलेश  नसलेले  विकृत कामुक व्यक्ती, आर्थिक स्थिती बाबत म्हणायचे झाले  तर अत्यंतिक विपन्नावस्था आणि अती आर्थिक सुबत्ता या दोन्ही परिस्थितीत मनोरूग्ण निर्माण होतात.  विपन्नावस्था व
कर्जबाजारीअसणाऱ्या  शेतकऱ्यांचे  उदाहरण अतीशय बोलके आहे.  चिंताग्रस्त होवून ताण असह्य  झालेला  मनोरूग्ण एका बेभान क्षणी मृत्यूला  कवटाळतो.  प्रचलित व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास भविष्यात मनोरूग्ण शेतकऱ्याच्या संख्येत सहस्त्रपटीने वाढ होईल  अशी साधार भीती वाटते.  या घटक समुहाला  "मानसिक तसेच भावनिक संरक्षणाची' गरज आहे.  संपूर्ण "संरक्षित पुनर्वसनाची' गरज आहे.
          प्रसारमाध्यमांच्या तिव्र स्पर्धेचा बळी  मध्यमवर्गीय  ठरतो आहे.  माहिती आणि सत्याच्या अतिरंजीत हव्यासापाई नितीनियमांना बाजुला  ठेवून अगदी "वाट्टेल  ते' समोर आणले  जाते आणि कोणत्या वयोगटावर कशाचा काय परिणाम होईल , याचे सोयर सुतक कुणालाच नाही.  अती श्रीमंतांसाठी पावला गणिक मोहजाल  पसरवलेले  आहे.  उच्च संस्काराचे सकारात्मक कवच जर नसेल  तर कोण कसा, कधी भरकटेल  याचा काहीच नेम नाही.  अत्यंतिक क्रौर्य, बिभत्स, भेसूर, अश्लील , किळसवाणे आणि देशविघातक अशा विविध कारवायात भाग घेणारे, मदत करणारे अशा सर्व व्यक्ती मनोरूग्णच नाहीत का ?
               सहज ऐकू येणारी शिव्यायुक्त हीन भाषा व विचारसरणीं, शिक्षण आणि संयमाच्या अभावामुळे  अगदी "हवे ते' आणि "हवे तेंव्हा' हिंसक पद्धतीने ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढते आहे.  ही मनोवृत्ती भविष्यात काय फळे  देणार ?
    आपल्या मुला मुलींना खुप मोठ  व्हायला  पाहिजे या हट्टापाई सर्वच आईबाप आपल्या मुलांवर  किती दडपण आणतात, हे आपल्या मनाशी विचारून पहा.  कितीतरी प्रश्नांची उत्तरे लगेच आपल्याला  सापडतील .  विज्ञानामुळे   आकलनशक्तीला  भरपूर खादय असल्यामुळे   आजची लहान मुले  खुपच हुशार आहेत.  त्यांच्या आयुष्याची ध्येयं निवडण्यासाठी आपण सकारात्मक मदत करूया. सुंदर जीवनशैलीतील
विलोभनीय सकारात्मक  बाजू ,पालक म्हणून त्यांना समजावून सांगू या .सुसंस्कारित आणि दक्ष  आई बाप,
गुरुजनच  थोपवू शकतात भविष्यात होणारी मनोरुग्णांची वाढ .

           सुहास सोहोनी
          ९४०५३४९३५४
        उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह २००७]
        www.suhassohoni.blogspot.com