Friday, August 24, 2012

मिडियातील करिअर - आव्‌हानात्मक संधी

         *  मिडियातील  करिअर - आव्हानात्मक संधी  *

    पत्रकारीतेत वृत्त संकलन करून प्रभावीपणे ती घटना जनतेसमोर मांडणे हा महत्वाचा विषय आहे.  आधीच प्रिंट मिडिया आणि टेलीव्हिजन वरील  वृत्तवाहिन्या संख्येने खूप जास्त आहेत, सहाजीकच चढाओेढ आहे.  म्हणजेच कल्पकतेला  प्रचंड वाव आहे.  देशात कुठेही खट्ट झाले  तरी काही मिनीटात ती बातमी दिली  जाते.  नीट विचार केला  तर ही एक संधी आहे करीअरसाठी.  टी.व्ही. वर बातमी येईपर्यंत कितीतरी लोक त्यासाठी काम करतात.  पत्रकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, संगीतकार, असा  मोठा ताफा कायम व्यस्त असतो, तसेच विविध विषय सामाजीक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, गुन्हेगारी, पर्यटन, धार्मिक, वैचारीक अशा अनेक विषयात चतुर पत्रकारांची, सुत्रसंचालकांची, निवेदकांची सतत गरज असते.  प्रिंट मिडीया आणि टि.व्ही. न्युज चेंनल्‌स यांचा पसारा, आवाका इतका मोठा आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात व विदेशात सुद्धा याचं जबरदस्त नेटवर्क आहेच.
    या क्षेत्रात प्रवेश करू इच्छणाऱ्या  तरुणांसाठी काही विशेष गुणवत्तांची गरज आहे.  अनेकानेक भाषा सफाईदारपणे बोलता व वाचता यायला  हव्यात.  सतत अभ्यासू वृत्ती हवी.  या क्षेत्रात नित्य नव्या विषयांच्या मागे धाव घेतली  जाते.  जास्तीत जास्त विस्तृत माहिती त्वरीत आणि आपल्याच  माध्यमाने द्यावी यासाठी अथक परिश्रम घ्यावे  लागतात.  खऱ्या खोट्या ची शहानीशा करून नेमकी व योग्य तेवढीच माहिती प्रस्तृत करायची असते.  कुठेही स्वत:चा कल्पना विलास नसावा.  विविध क्षेत्रातील  नामवंत मंडळी ची भेट होणे, ही सुद्धा नित्याचीच, आनंदाची बाब आहे.  विविध मान्यवरांशी चर्चेची, सिनेमा नाटक क्षेत्रातील  ज्येष्ठाशी मुलाखतीची संधी मिळुन आपले  व्यक्तीमत्वात सकारात्मक गुणवर्धन होते.  मात्र वेळेचे बंधन नसल्याने सदैव सज्ज असावे लागते.  प्रतिकूल  परिस्थितीत सुद्धा कार्यतत्पर असणे आवश्यक आहे, म्हणजेच आपण सुदृढ, निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे.
    इलेक्ट­ॉनिक्स व प्रिंट मिडिया यात करीअर करू इच्‌छणाऱ्या  तरुणांनी मासकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.  अनेक विद्यापिठात सध्या हा विषय आहे.  पत्रकारिता किंवा जनसंवाद हे पदवीनंतरचे अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे असतात.  चेन्नई येथील  अण्णा युनिव्हर्सिटीने पाच वर्षाचे कॉ°म्प्‌युटर सायंन्स, इन्फर्मेशन टेक्‌नॉलोजी, मास्टर आफ सायंन्स इन इलेक्ट­ॉनिक मिडिया हे अभ्यासक्रम सुरू केले  आहेत.  सध्या आपल्या देशात माध्यम क्रांती होत असून चांगल्या व दर्जेदार मनुष्यबळा ची फार चणचण आहे.  वृत्त संकलनात नित्य वेगळे पण ही या क्षेत्रातील  मेख आहे,  नाविन्याचा ध्यास, जिद्द, चिकाटी, परिश्रम, झोकून देण्याची वृत्ती, निडरता, कळवळा  आणि सचोटी या गुणांच्या जोरावर मिडियातील  करिअर जीवनाचा आनंद मिळवून देऊ शकते.  तरुणांनो प्रयत्न करा, शुभेच्छा आहेतच.
                        ुुु सुहास सोहोनी   मोबा.९४०५३४९३५४
                               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                              www.suhassohoni.blogspot.com
                               www.mazyasamvedana

No comments: