Tuesday, December 29, 2015

*नववर्षाचा संकल्प – उत्तम आरोग्य वर्ष २०१६*

  Keep Fit Health Care
                               (Figure Control & Personal Fitness System) 
                         Sohoni Complex, Vivekanand Colony, Amaravti.
                                              Ph. 2567463, 9405349354
          
      *नववर्षाचा संकल्प – उत्तम आरोग्य वर्ष २०१६*
     वयाची पन्नाशी  उलटली की अनेक जीवनावश्यक जबाबदाऱ्या सुरु होतात. मुलांचे शिक्षण, लग्न, नोकरीतील बढती, बदली, कुणाचेतरी आजारपण, घराची समस्या, स्वतःची कार, त्याचवेळी नातेवाईकांचे रुसवे फुगवे. अस बरच काही.मात्र या गडबडीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अगदी थोडीसुद्धा फुरसत नसते.पण, निसर्ग मात्र कधीही चुकत नाही.वयाप्रमाणे आरोग्याच्या तक्रारी अगदी प्रत्येकाला सुरु होतात. जबाबदाऱ्या पाळणे आणि जास्तीत जास्त अर्थार्जन करणे ही तर प्रत्येकाची गरज आहेच मात्र एक प्रश्न विचारावासा वाटतो की, आरोग्याविना अर्थार्जन, कुणासाठी?
       आपल्या दिनचर्येत कोणत्यातरी व्यायाम प्रकाराचा लहानपणापासून समावेश असणे गरजेचे आहे .वरील प्रश्नाचे च उत्तर आहे .निरोगी शरीरात सुखी मन असते .निरोगी असण्यासाठी *सुयोग्य पाचक आहार *सक्षम पाचन संस्था *विनात्रासाचे मलमूत्र उत्सर्जन *बलप्राप्ती साठी अस्थी /सांधे व मांस पेशींना पुष्ट करून सुयोग्य रक्त संचारासाठी प्रत्येक व्यक्ती परत्वे योग्य व्यायाम *आणि *मनःशांती या पंचासुत्रीचे पालन करणे अत्यावश्यक आहे .
        चाळीशी नंतर विविध सांध्यांचे विकार हळूहळू सुरु होत असतात .हे दुख्ह्दायक विकार केवळ ओषध किंवा तेल /लेप लाऊन बरे होत नसतात तर योग्य वयात योग्य व्यायामाने नियंत्रणात राहू शकतात .म्हणूनच म्हणावेसे वाटते –
**व्यायाम करा !!त्या विना पर्याय नाही**
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा माझा संकल्प आहे **उत्तम आरोग्य वर्ष -२०१६ **
माझ्या सोबत आपण सर्वांनी “उत्तम आरोग्याचा “संकल्प अवश्य करावा –आणि पाळावा .डॉक्टरांकडे जाण्याची गरजच पडू नये –असेच वाटते ना ?
सुहास सोहोनी
Keep Fit Health Care
  (Figure Control & Personal Fitness System) 
   Sohoni Complex, Vivekanand Colony, Amaravti.
   Ph. 2567463, 9405349354

Monday, December 28, 2015

*अयोध्याच्या विवादास्पद जागेवर जागतिक दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र उभारावे.*
                       * एक पर्याय ,एक विकासात्मक,सकारात्मक दृष्टीकोन ,
                       * हि एक सुवर्णसंधी ,राष्ट्रीय एकात्मता सिद्ध करण्याची .
         धर्म निरापेक्षतेचा कितीही डंका भारतीयांनी वाजवला तरी अयोध्या विवाद सारख्या समस्या जेंव्हा जेंव्हा उग्र रूप धारण करतात तेंव्हा तेंव्हा देशाची शांतता धोक्यात येते ,हेच आजपर्यंत सिद्ध झालेले आहे .नेमके याचवेळी ,”बोलणे हा माझा हक्क आहे “या आवेशाने नेते ,सिलीब्रेटी ,आणि विद्वान मंडळी वादविवाद माजवतात ,वातावरण ढवळले जाऊन स्फोटक बनते .भविष्यात अयोध्या मंदिर -मस्जिद प्रकरणात कोर्टाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी देशाचे वातावरण नियंत्रणात ठेवणे हि गोष्ट मात्र प्रशासनाच्या कुशलतेची कसोटी पाहणारी असेल .
         कोणाच्याही बाजूचा जय किंवा पराजय होणे यावरून हा मुद्दा संपणारा नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते ,परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयावर कायमचा तोडगा निघू शकतो .यासाठी कोर्टाची भूमिका फार महत्वाची असणार आहे .जर ----*सन्माननीय न्याय देवतेने प्रशासनाला ती संपूर्ण विवादास्पद जमीन अधिग्रहित करावयास सांगून त्या जागी केवळ “जागतिक दर्जाचे सुसज्ज हॉस्पिटल व संशोधन केंद्र “उभारले जावे ,असे करण्याची विनंती वजा मार्गदर्शन केले तर ती एक वेगळी दिशा ठरेल .
          सर्वोच्य न्यायालयाच्या सूचनेवरून केंद्र सरकारने जर हा उपक्रम सुरु केला तर सर्व धर्म निरापेक्ष्तेच्या दिशेने भारत देशाचा खर्या अर्थाने प्रवास सुरु आहे ,हेच सिध्द होईल .खरे तर आपल्यासमोर हि एक संधी आहे राष्ट्रीय एकात्मता सिध्द करण्याची .असे एक हॉस्पिटल उभारले जावे कि जेथे मानवतेची सेवा सुरु राहील ,नवनवीन संशोधन होईल .रुग्ण हा केवळ रुग्णच असतो त्याला धर्म, जात, पंथ नसतो .रुग्णाला दिल्या जाणार्या रक्ताला सुद्धा जात ,धर्म असे लेबल नसते.एक असा उपक्रम कि जे रिसर्च सेंटर संपूर्ण जगात *मानबिंदू *बनू शकते. देशाला खर्या अर्थाने प्रगती करायची असेल तर आधी शांतता असायला हवी .असे विवाद निकाली काढायला हवेत .हॉस्पिटल चे नाव सुद्धा व्यक्ती धर्म यावरून नसावे. हा वाद आता संपणे हीच खरी गरज आहे. विवादास्पद जागेत असलेले मंदिर व मस्जिद न्यायदेवतेच्या मार्गदर्शनानुसार शासनाने अयोध्येतील दोन वेगवेगळ्या जागी निर्माण करून दिल्याने या विषयावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल असे मला वाटते .
                                    सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी ,अमरावती -४४४६०६ फोन ०७२१-२५६७४६३ ,मोबा -९४०५३४९३५४ ,८६२६०६०६४६

Friday, December 25, 2015

Thursday, December 17, 2015

*प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज आहे .*

*प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज आहे .*
               स्मार्ट सिटी जर शहराबाहेर साकारली जाणार असेल तर तीनशे चारशे एकर जमीन ताब्यात घेतली जाईल .त्यासाठी किती किंमत दिली जाईल ? कुणाकुणाचा लाभ होईल ? किती जंगल नष्ट होईल ,टेकड्या उध्वस्त होतील .वन्य पशुंचे मुळ आश्रय स्थान नष्ट होऊन ते स्थलांतरित होतील .कसेतरी तग धरून असलेल्या वनांचा नाश होईल .जमिनींचे अवास्तव सौदे होतील .बाधकाम करणाऱ्या कंपन्या ,ठेकेदार ,बांधकाम साहित्याचे व्यापारी यांची पळापळ सुरु होऊन संबंधित सरकारी अधिकारी,नेतेमंडळी ,समाजावर दबाव ठेऊन असणारे बाहुबली सर्वजण सक्रीय होतील .प्रत्येक साध्या साध्या गोष्टींसाठी “फिल्डिंग “ लावली जाईल .अब्जावधी रुपयांसाठी रस्सीखेच सुरु होईल .कोणतीही योजना साकारतांना लोकशाही प्रणालीतील अनेक अडथळे, धोके पार करून ही प्रस्तावित “ सिटी ‘ साकारली तर तिथे राहायला कोण जाऊ शकेल ?तिथे काय भाव असेल ?कोणत्याही मार्गाने धनाढ्य ,अब्जाधीश झालेल्यांनाच फक्त स्मार्ट सिटीत जागा घेणे शक्य होणार आहे .स्मार्ट सिटी टेक्स सर्व शहरवासीयांना भरावा लागेल .सामान्य नागरिक मध्यमवर्गीय यांचे स्मार्ट सिटीत काय स्थान असणार आहे ?समाजातील गरीब घटक, शेतकरी यांच्यासाठी हा विषय नाहीच ,कारण निवडणुकांसाठी अजून वेळ आहे .
              स्मार्ट सिटी उभारण्यात लागणारा पैसा हा म.न.पा.,राज्य शासन व केंद्र शासनाचा आहे , म्हणजेच पर्यायाने प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे .त्यामुळे या योजनेद्वारे आजचे आपले शहर स्मार्ट सिटीत रुपांतरीत व्हावे असे वाटणे गैर नाहीच .या अनुदानाचा वापर करून आजचे आपले शहर दर्जेदार व्हावे हि शहरवासीयांची अपेक्षा आहे ,मागणी आहे . आपले शहर दर्जेदार स्मार्ट होणे म्हणजेच ......
         [१ ]संपूर्ण शहरातील रस्ते road normsप्रमाणे बनवून योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर्स ,रंगीत पट्टे ,झेब्रा क्रॉसिंग व्हावे .’ रस्ते स्मार्ट तरच सिटी स्मार्ट ‘
         [२] शहर १००% स्वच्छ असावे .कचरा व्यवस्थापन अत्याधुनिक असावे.
         [३] सर्व प्रकारचे प्रदूषण मुक्त शहर .
         [४] २४ तास वीज उपलब्धी .
         [५] २४ तास पाणी उपलब्ध व्हावे .
         [६] भुयारी गटार योजना कार्यान्वित होऊन कुठेही उघड्या नाल्या / नाले  नकोत .
         [७] अद्ययावत वाहतूक व्यवस्था व्हावी .आवश्यक तेथे सब-वे, उड्डाण पुलाचे निर्माण होऊन रहदारी नियंत्रित राहावी .
         [८] मोकाट जनावरांना संपूर्ण प्रतिबंध हवा.
         [९] सर्व रोगांची चिकित्सा ,उपचार होर्इल असे सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल व्हावे .
         [१०] शहराच्या प्रत्येक सेक्टर [विभाग] साठी वेगळा  मार्केट झोन असावा .
         [११] सौर उर्जेचा वापर अनिवार्य करावा .
         [१२] वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करावी .या अशा शहराच्या अनेक सुविधा आहेत .
                  गगनचुंबी इमारती एवढाच स्मार्ट सिटीचा मापदंड नसून आपले शहर स्वच्छ ,स्वस्थ –आरोग्य संपन्न नागरिक असलेले आणि सर्व दृष्टीने सुरक्षित शहर असावे हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे .हे सर्व मापदंड पळून प्रत्येक गांव स्मार्ट होण्याची गरज आहे .
                                                      सुहास सोहोनी
                                              विवेकानंद कॉलोनी ,अमरावती ४४४६०६
                                             ,फोन :०७२१-२५६७४६३मोबा :८६२६०६०६४६
                                               www.suhassohoni.blogspot.com         
: