*भूगर्भातील पाण्याचे सेव्हिंग अकौंट टोप अप करा *
नळाची तोटी फिरवली की भरपूर पाणी घ्या अशी व्यवस्था ज्यांच्या घरी आहे त्यांना पाण्याचे महत्व कळेलच असे नाही ,पण ज्या गावांना आठ आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही ,दोन तीन मैलांवरून पाणी भरून आणावे लागते अशा नागरिकांना पाणी समस्येचे चटके बसतात पाणी कसे उपलब्ध करता येईल या साठीच्या योजनांना अग्रक्रम देण्यात यावा. 'गाव तेथे तलाव 'ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी होणे गरजेचे आहे . प्रत्येक ग्राम पंचायतीने प्रत्येक गावासाठी किमान दोन एकराची पडीक जमीन गाव तलावासाठी ठरावाद्वारे मंजूर करून तलाव निर्माण करावयास हवा . सध्या अस्तित्वात असलेले तलाव गाळ ,कचरा काढून खोल करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे . रस्त्यावरून वाहणारे पाणी जागोजागी अडवून ते शेततळी किंवा गाव तलावात सोडता येईल .
वाहून जाणारे पाणी विविध ठिकाणी विविध प्रकारे अडवून भूगर्भात पुनर्भरण करायला हवे . ज्याप्रमाणे आपल्या बँक खात्यात आपण जेव्हढी रक्कम भरतो तेवढीच रक्कम आपल्याला काढता येते ,तोच नियम भूगर्भातील पाणी उपसण्या बाबत ही लागू होतो . ठिकठिकाणी तयार केलेल्या तलाव किंवा इतर विविध प्रकारे ,आधी पाणी जमिनीत खोलवर साठायला हवे म्हणजे गावातील प्रत्येक विहिरीला /बोअर वेलला वर्षभर पाणी उपलब्ध राहील .* पिण्यायोग्य पाण्याच्या उपलब्धते पैकी जास्त टक्के पाणी पिण्या व्यतिरिक्त वापरले जाते हे सत्य आहे .*याबाबतीत नियोजन आणि पाण्याची काटकसर व्यक्तीशः करायला हवी . जंगलात तलावांची फारच गरज आहे कारण जंगली पशूंना जर जंगलात पाणी उपलब्ध झाले तर ते गावाकडे वळणार नाहीत व नागरी वस्त्यांवर हल्ले करणार नाहीत . *गावातील घरांच्या छपरांवर पडून वाहून जाणाऱ्या पाण्याची साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची व्यवस्था करता येईल . मध्यम शहरातील असे जमा होणारे पाणी एखाद्या मोठ्या तलावा पेक्षा जास्त नक्कीच असणार आहे . *अशाप्रकारे साठवलेले पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी वापरता येते .
प्रत्येक गावाच्या तलावा भोवती गावकऱ्यांनी विविध वृक्षांची लागवड करून स्मृतिवने निर्माण केल्यास पर्यावरण संवर्धन साध्य होऊन वातावरणातील तापमान कमी करता येईल . पृथ्वीचे तापमान कमी होणे व त्यासाठी सामुहिकपणे योग्य दिशेने प्रयत्न करणे हेच कार्य सर्व देशांनी एकत्रित पणे युद्ध स्तरावर यशस्वी करण्याची गरज आहे कारण यावर पृथ्वी वरील सर्व सजीवांचे अस्तित्व अवलंबून आहे . जोपर्यंत विविध वृक्षराजीने नटलेले डोंगर ,घनदाट जंगले ,प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी ,आकाशात विहार करणारे ,किलबिल करणारे पक्षी, धष्टपुष्ट पशुधन या पृथ्वीतलावर सुख समाधानाने नांदत असतील तोपर्यंतच आपलं मानवाचे अस्तित्व असणार आहे . म्हणून प्रत्येकाने 'पाण्याचे सेव्हिंग अकौंट टोप अप 'करायला हवं .
सुहास सोहोनी
www.suhassohoni.blogspot.com
www.facebook.com/mazyasamvedana