* सोळावं वरीस म्हणजे नक्षीदार कांचपात्र *
आम्ही पालक आपल्या मुलांची भावनिक गुंतागुंत समजून घेतो? इयत्ता दहावीतील कमी जास्त १५ वर्ष वयाची ही मुले आयुष्याच्या एका वेगळ्या आणि महत्वाच्या टप्प्यावर आलेली असतात. पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल नैसर्गिकपणे नकळत घडत जातात. त्यासोबत स्वत:चं असं वेगळ व्यक्तिमत्व आकार घेत असतं. महत्वाकांक्षेची झालर लेवून मनावर स्वार झालेलं विचारांच वारू, चौफेर उधळायला कुणाची सुद्धा परवानगी मागत नाही. भविष्याच्या अथांग आकाशात भरारी घ्यायला या तारुण्याच्या उंबरठ्या वर पोहोचलेल्या मुलामुलींना खऱ्या अर्थाने मदत होणार असते, ती त्यांच्यावर १५ वर्षे झालेल्या संस्कारांची, सकारात्मक विचारसरणीची. पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातले त्यांचे आदर्श सुद्धा मुला मुलीं च्या मनाला कोणतातरी आकार देऊन गेलेले असतात.
समजायला लागल्या पासून नजरेने टिपलेल्या सर्व गोष्टींची साठवण मेंदूच्या संगणकात होऊन, आकलन शक्तीनुसार त्याचे अर्थ काढले जात असतात आणि नकळत मुलांची धारणा बनत जाते. चांगले वाईट, सत्य असत्य, श्रीमंती, गरीबी, दैन्य, असमाधान, समाधान, आईवडिलांचा परस्परांवर असलेला विश्वास, त्याग, आजीआजोबांचं लाभलेलं प्रेम, दुर्दैवाने काही घरांत किंवा घराबाहेर व्यसनांमुळे बघावे लागलेले उध्वस्त व्यक्तिमत्व व त्यामुळे निर्माण झालेली दहशत, अशा विविध घटना बा लमनावर आपला कायमस्वरूपी ठसा उमटवतात. गरजेपेक्षा वा लायकीपेक्षा जास्त पैसा खुळखुळत असलेल्या घरातील मुलांना नकार ऐकण्याची सवयच नसते. करमणूकीची अवास्तव व्याप्ती वाढल्याने आम्ही च्यानल्स दवारे मुलांना काय दाखवतो याचे भान संपले आहे. मुद्दाम लक्ष ठेवून बघायला हवं की वाईन शॉप मध्ये दारू विकत घेणाऱ्या मुलांची वयं काय आहेत. गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेटच्या आहारी किती मुले गेली आहेत, आडजागेवर किंवा कोणत्याही बगीच्यामध्ये दररोज खेटून बसलेली जोडपी २० वर्षे वयाच्या आतील सुद्धा असतात. शिकवणीच्या निमित्ताने ही मुले घराबाहेर असतात का?
मैत्री, प्रेम आणि शारिरीक आकर्षण या तिनही भावनांचं सरमिसळ होऊन आकर्षणालाच प्रेम समजण्याची चुक घडते आणि त्यातुनच एखादं भयनाट्य आकारतं. शिघ्र संतापी, कमकुवत मन नकार किंवा अडथळा सहन करत नाही. पालकांचा मुलांशी सुसंवाद असतो का? त्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे मिळतात का? मुलांचा कल काय याचा शोध घेतला जातो का? करिअरच्या बाबतीत मुलांवर विनाकारण अपेक्षांच ओझ लादलं जातं का? पाल्यांशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा करताना त्यांनी मांडलेल्या विचारांचा आपण आदर करतो का? मुलांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना सकारात्मक पण आनंदी चेहऱ्यानं मदत करून पाठीशी उभं रहायला आपल्याला वेळ तरी असतो का? आपण भ्रष्टाचाराने कमाई केली असेल किंवा आपल्याला काही व्यसने असतील तर या गोष्टी मुलांना माहिती आहेत काय? अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला समजेल की आपल्या मुलांसाठी आपण कोणता मार्ग निवडतो.
ुुु सुहास सोहोनी----मोबा .९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment