Sunday, November 13, 2016

: * युनिसेफ चे कार्यकर्तेम्हणजे पृथ्वीवरील देवदूत *








  * युनिसेफ चे कार्यकर्ते म्हणजे पृथ्वीवरील देवदूत *
 
              बालके आणि त्यांचे हक्क याविषयी आजकाल बरेच देश व लोकं विचार करू लागले आहेत .वास्तविक हक्क म्हणजे नेमक काय हे या बालकांना काय समजणार आणि त्याचा फायदा त्यांना कसा मिळणार ?सुसंस्कृत व सुरक्षित आईबापांच्या छायेत वाढणाऱ्या मुलांची ही समस्या नाही ,त्यांना संरक्षण असते आणि त्यांचा योग्य विकास होतो परंतु परंपरागत दुराग्रही चालीरीती किंवा नैसर्गिक /मानवनिर्मित आपत्तीत सापडलेली मुले अशी भाग्यवान नसतात .त्याचबरोबर गरिबी ,कुपोषण व रोगराईने ग्रस्त व  त्रस्त असलेली मुले अत्यंत हालअपेष्टात ,मृत्यू येईपर्यंत मिळालेलं जीवन फक्त जगतात.कुठे आहेत ते हक्क ? करोडो मुले शाळेत जात नाहीत मात्र करोडो बालके ज्या प्रकारची मजुरी करतात ती त्यांच्या वयाला वा ताकदीला झेपणारी नसते .या बालकांकडून काय काय कामे करवून घेतली जातात आणि कसल्या अमानुष जीवन पद्धतीत जगावे लागते ही सत्यस्थिती अत्यंत विदारक अशी आहे .भविष्यात ही बालके विविध आपत्तींना सामोरे जातात .
              या परिस्थितीचा विचार करून संयुक्त राष्ट्र परिषदेने बालकांच्या हक्कांसाठी एक ‘राईट ऑफ द चाईल्ड ’ ही संहिता तयार करून २० नोव्हे.१९८९ साली मंजूर केली .त्यानंतर न्यूयॉर्क येथील जागतिक परिषदेत बालकांचे जीवन सुखकर कसे करता येईल याविषयी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे एक जाहीरनामा काढला .या ठरावा प्रमाणे युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था मुलांचे हक्क ,त्याचं अस्तित्व विकास आणि संरक्षण याविषयक कार्य सांभाळते. या कार्यासाठी जगभरातून ऐच्छिक मदत मिळते .ज्यात आर्थिक मदतीसोबत नवनवीन कार्यकर्ते हवे असतात .आपापल्या देशात / विभागात असे अनेक कार्यकर्ते या प्रोजेक्ट साठी व्यग्र असतात .बालकांना मदत करण्याच्या कार्याची माहिती ‘युनिसेफ’च्या तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या विविध साहित्यातून उपलब्ध आहे .
              इतर कोणत्याही कारणांपेक्षा विविध युद्धप्रसंगात आप्तस्वकीय गमावलेल्या मुलांची स्थिती अतिशय दयनीय झालेली असते .मानवी हिंसाचाराचे रौद्र तांडव पाहून ते बालपण करपल नाही तरच नवल .युद्ध,नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी अत्याचार ,जुलूम यामुळे बालपण गमावलेली ,भेदरलेली ही मुले काही समजण्याच्या अवस्थेपलीकडे असतात .या बालकांना जीवनदान देऊन ,मनाला उभारी देऊन ,त्यांना शिक्षण देऊन जीवनात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी झटणारे युनिसेफ चे कार्यकर्ते म्हणजे ‘देवदूत’ आहेत .या परोपकारी अशा देवदूतांची संख्या वाढायला हवी .आपत्तींना आपण थोपविण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे त्याचबरोबर आपद्ग्रस्त व बालकांसाठी मदत कार्य जास्त महत्वाचे ठरते .समाजसेवेची आस्था असणाऱ्या युवक व ज्येष्ठांनी या दिशेने अवश्य विचार करावा कारण गरज फार मोठी असून मदतीचे हात कमी पडतात .थोडे पुढे या आणि या लहान बालकांचे मित्र बना त्यांना मदतीचा हात हवा आहे .
लेख संग्रह : घे उंच भरारी [ २०१६ ]   
लेखक : सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी अमरावती ४४४६०६
मोबा : ९४०५३४९३५४    

मा.पंतप्रधान,जुन्या नोटा

प्रती ,
मा.पंतप्रधान महोदय ,
विनम्र अभिवादन ,
*कचरयात फेकून दिलेल्या नोटा,जाळलेल्या नोटा पाहून वाईट वाटतं त्यापेक्षा सरकारने एखादा असा एक अकाऊंट जाहिर करावा जेथे पैसे जमा करणाराची कुठलीही विचारपूस होणार नाही अणि तेथे जमा होणारा पैसा
1 ) सैनिकांसाठी वापरला जाईल ...
2 ) देशात प्रत्येक गावासाठी एक मोठा तलाव निर्माण करता येईल .पुढील हजारो वर्षांसाठी इतिहासात नोंद होईल.
* गाव तलाव + स्मृतिवन = पर्यावरण रक्षण व संवर्धन *
हे सूत्र जर कृतीत आणले तर जमिनीत मुबलक पाणी उपलब्ध होईल, पर्यावरणाचे रक्षण होईल ,संपूर्ण जीवसृष्टी सुखी होईल .
* आपले पंतप्रधान हे कल्याणकारी कार्य करू शकतील हा विश्वास आहे * .धन्यवाद .
**विचार व्हावा**
आपला नम्र
सुहास सोहोनी
सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी ,
अमरावती - ४४४६०६
मोबा.-9405349354
८६२६०६०६४६

Sunday, November 6, 2016

* ब्रेकिंग न्यूज वर निर्बंध हवे *


                  * ब्रेकिंग न्यूज वर निर्बंध हवे *
            प्रसार माध्यमांना दररोज दर तासाला ब्रेकिंग न्यूज हवी हवीशी वाटते हे जरी खरे असले तरी कोणत्या विषयाला कसे हाताळायचे याच भान असण्याची गरज आहे.बर्याच प्रसंगी योग्य अयोग्य याचा विचार केला जात नाही .सध्याच्या भारतीय सैन्य विषयक असलेल्या घटना ,त्या घटनांचा संरक्षण मंत्रालयाशी असलेला संबंध ,कुणी कसे वागायला हवे होते याविषयी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्याच विद्वानांचे अनावश्यक मतप्रदर्शन हे सर्व दुखःद असून दुर्दैवी आहे .शत्रूशी दोन हात करून देशाच संरक्षण करणारी भारतीय फौज ,तिची आजची क्षमता ,लोकशाही प्रणाली मध्ये तिन्ही सैन्यावर असलेला संरक्षण मंत्रालयाचा अंकुश,त्या विषयीची विविध कागद पत्रे ,अहवाल ,आदेश या सगळ्या गोष्टी अत्यंत गोपनीय असाव्यात ,हे अभिप्रेत असतांना देशाच्या प्रत्येक गल्ली गल्लीत याविषयी चेष्टायुक्त चर्चा होते .अत्यंत घिसडघाईने बातम्यांचा मसाला जनतेला पुरविला जातो .हे योग्य आहे का ?
            प्रत्येक बातमी आमच्याच न्यूज च्यानल वर सर्व प्रथम आम्हीच दाखवली ,असे सांगणाऱ्या चेनलला सैन्यदलाच्या क्षमतेचा गोपनीय अहवाल कुणी आणून दिला याची चौकशी व्हावयास हवी .अशा अत्यंत गोपनीय बातम्या नको तितक्या उत्साहात प्रसिद्ध करण्या आधी कुणाची परवानगी घ्यावी लागते की नाही ? काही एडिटिंग करण्याची तरी गरज आहे की नाही ? हातात माईक आणि समोर न्यूज च्यानेल चा केमेरा असतांना खऱ्या अर्थाने संयमाची गरज आहे .अत्यंत गंभीर प्रकरणाशी संबंधित असलेल्या घटना व व्यक्तींवर हि रिपोर्टर मंडळीनुसते आरोप करून थांबत नाहीत तर त्यांना गुन्हेगार ठरवून कोणती शिक्षा दिली जाऊ शकते हे सुद्धा ठरवून मोकळे होतात .हा स्वातंत्र्याचा अतिरेक होत आहे का ?
            ज्या विषयातील आपल्याला कवडीच समजत नाही ,सैन्य ज्यांनी कधीही पाहीले नाही ,कुठलाही अभ्यास नसलेल्या तद्दन लेखणी बहाद्दरांनी आपल्या लेखणीला लगाम घालण्याची गरज आहे .वैचारिक गोंधळ निर्माण होऊ शकेल असे घाईघाईने निष्कर्ष काढून मतप्रदर्शन करण्याची गरज नाही .मुख्य म्हणजे अशा प्रत्येक घटनांच्या वेळी जगासमोर आपल्या देशाची प्रतिमा कशी दिसेल याचा विचार व्हावा .देशाचे अनेक शत्रू असतांना भारतीय फौज सक्षम, प्रबळ हवी .कारण युद्ध संकटाच्या वेळी कुणीही समोर येत नाही,त्या वेळी देशासाठी सर्वोच्य आधार असत आपले बलाढ्य सैन्य .अनिर्बंध स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या भारतीय नागरिकांनी संयमाने ,संतुलित मानाने आत्मपरीक्षण करावे .प्रसार माध्यमांनी जास्त प्रगल्भ व्हावे व ब्रेकिंग न्युजवर निर्बंध आणावे .
*लेखसंग्रह : घे उंच भरारी [२०१६]
*लेखक : सुहास सोहोनी    [ ८६२६०६०६४६ ]

Tuesday, October 18, 2016

असा मोर्चा असावा

💥एक अतिभव्य ,महामोर्चा मला काढायचा आहे.
सर्वच भारतीयांना आग्रहाचे आमंत्रण आहे.
★प्रत्येकाने मनाने व कृतीने या महामोर्चात सामील व्हायचं आहे.कन्याकुमारी ते श्रीनगर आणि जगन्नाथ पुरी ते पोरबंदर असा भारतभर करोडो भारतीयांचा अतिभव्य महामोर्चा सुरु होत आहे
■या महा मोर्च्यात मागण्या आणि घोषणा आहेत : -
★जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा . ★शेतकरी वाचवा .
★ प्रदूषण नष्ट करा (परिसराचे व मनाचे) ★भ्रष्टाचार मुक्त भारत.
★ कायद्याचे पालन व्हावे,लवकर (अविलंब)न्याय मिळावा.
★ प्रत्येकाला शिक्षण
★ प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा हवी. ★जातीभेद नष्ट करा.
■ करोडो भारतीयांना रोज या मोर्च्यात यायचं आहे.
■सारे भारतीय एक झाले तर काहीही अशक्य नाही.
◆स्वागत आहे◆
◆आजपासून आणि आत्तापासून हा महामोर्चा सुरु झाला आहे.
■ शुभकार्यासाठी मुहूर्ताची गरज नाही ■ * सुहास सोहोनी
★संवेदना★
[ सामाजिक विचार मंच] ,
अमरावती

💥अन्नाचा आदर करावा💥

                                               💥अन्नाचा आदर करावा💥
               ★अन्न वाया जाणे म्हणजे नक्की काय हे आजकाल मोठमोठ्या जेवणावळींच्या ठिकाणी नित्य पहावयास मिळते.अर्धवट खाऊन सोडून दिलेलं अन्न थाळीमध्ये पडलेलं असतं .जेवणात बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जेवतांना अनेक पदार्थ मागवायचे,हवं तेवढं खाऊन बाकीच टाकून दिलं जातं. वाया जाणाऱ्या एवढ्या अन्नात कितीतरी उपाशी परिवार भरपेट जेवले असते.
           ★अन्न हे पूर्ण ब्रम्ह असून पानात घेतलेले सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजे ही सक्तीची शिकवण आजच्या पिढीला दिली जाते की नाही ? कच्या बच्यांसाठी दररोज अन्नाची सोय करतांना ८०% जनता अक्षरशः जीवाचं रान करते. मोलमजुरी,काबाडकष्ट करून आपल्या अन्नाची सोय करणारे एकीकडे कायम चिंताग्रस्त असतात तर अन्नाची किंमत नसलेले अंगात माज आल्यासारखे अन्नाची नासाडी करतात . इतके अन्न वाया जातांना पाहून हे अस्वस्थ नाही होत ? किती विरोधाभास आहे हा ! ★ लहानपणी मुलांना एका दयाळू राजाची गोष्ट सांगितली जाते.त्या राजाला आपल्या प्रजेची मनापासून काळजी होती .माझ्या राज्यात एकही नागरिक उपाशी झोपू नये यासाठी त्याचे सतत लक्ष असे .प्रजा सुखी,आनंदी व सुरक्षित राहण्यासाठी तत्पर असणे हेच राजाचं कर्तव्य आहे ,अस त्या राजाचं मत होतं. ★भविष्यात असे दयाळू राज्यकर्ते असतील ? ?
          ★गरजेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व कमी श्रमात अती श्रीमंत असणाऱ्या २०% जनतेला अन्न मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागत नाहीत हे मान्य आहे पण अन्नाची किंमत सुद्धा समजू नये याचं फार वाईट वाटतं . आपल्या शरीराचं सुयोग्य पोषण करणाऱ्या अन्नाचा आदर करण्याची शिकवण बालपणीच देण्याची गरज आहे .अन्नाचा आदर करावा. लेखसंग्रह :घे उंच भरारी. (2016) लेखक : सुहास सोहोनी
अमरावती
मोबा : 8626060646

Monday, October 10, 2016

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■

■सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे■ 💥युद्धासाठी जनतेचे संपूर्ण सहकार्य लागतं, एकमेकांवर विश्वास हवा,युद्ध केवळ सैनिकच नाही, तर अवघ्या देशाला लढावं लागतं, जनतेच्या विश्वासावर सैनिकी ताकत वाढत असते,देशाबाहेरील प्रत्यक्ष शत्रूपेक्षा देशातील देशविरोधी कारवाया करणारे ,जनतेच्या मनोधैर्यावर वार करणारे जास्त धोकादायक असतात. दुर्दैवाने असे देशात बरेच लोक आहेत आणि ते बुद्धीजीवी,लोकनेते, खेळाडू ,लेखक,पत्रकार, राष्ट्रीय पुरस्कार विजेते,भडकवलेले दुखावलेले वाहवत गेलेले तरुण असेे महत्वाचे लोकं आहेत.ह्यांच्याकडे लक्ष देणे हे युद्धापेक्षा जास्त महत्वाचे आहे,अर्थात सैन्याला या गोष्टी समजतात .युद्ध काळात असंतुष्ट आणि भ्रष्टाचारी लोकांच्या शोधात शत्रू असतो हे कुणी सांगायची गरज नाही .मला वाटतं आजची ही वेळ एकी सिद्ध करण्याची आहे ,आपण सुज्ञ आहात. ★सावध रहा ,रात्र वैऱ्याची आहे★ सुहास सोहोनी

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥
★जबाबदार सेलिब्रिटी,नेते ,राजकीय प्रतिस्पर्धी असलेले लोकं, आपल्याच सैन्याच्या पाकिस्तान विरुद्ध च्या अतिमहत्वाच्या कारवाई बद्दल जाहीर शंका उपस्थित करतात,प्रेस/चॅनलवर तावातावाने चर्चा किंवा वाद घालतात,अनेक मान्यवर म्हणवणारे त्यांच्या बेताल,उर्मट व्यक्तव्याचे समर्थनही करतात ,हे दुख:दायक आहेच,पण त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे.
★सध्या युद्धजन्य परिस्थिती असून आपण कदाचित दीर्घकाळ चालणाऱ्या त्रासदायक युद्धाच्या दिशेने सरकतो आहोत. अशावेळी सैन्याच्या गुप्त हालचाली बद्दल,देशाच्या निर्णया बद्दल, संभ्रम निर्माण होईल असे विचार पसरवणे,जनतेत वैचारिक दुही ,फूट पाडणे,शासनाला/सैन्याला दोषी ठरवणे हा अक्षम्य गुन्हा आहे.या गुन्ह्याला क्षमा नाहीच.
★आपल्या विचारांनी, कृतीने असे लोकं शत्रूचाच फायदा करतात.सैनिक नेहमीच डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात त्यामुळेच आम्ही सुखानं झोपू शकतो.आरामात सगळ्या प्रकारचे उपभोग घेत असतो.मात्र युद्धात सैनिक आणि नागरिक दोघेही शत्रूशी लढत असतात.त्यांचा एकमेकांवर १००% विश्वास असतो.हा विश्वास आजही आहेच ,संपूर्ण देश सैन्या सोबत आहेच . ★काही नतद्रष्ट ,देशविरोधी ,सोय व वेळ साधून स्वार्थ साधणारे, शत्रूला कळत नकळत मदत पोह्चवणारे दळभद्री लोकं दुर्दैवाने प्रत्येक कालखंडात असतातच.त्यांना शोधून निष्क्रिय करणे जरुरी आहे,कारण हा देशाच्या हरण्या जिंकण्याचा प्रश्न आहे,देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे .युद्धात झालेलं नुकसान हे कायमचं नुकसान असतं.
★शत्रूशी सीमेवर लढतांना सैन्याला देशांतर्गत विरोधी कारवाया करणारे/देशविरोधी कृती करणारे ,गैरसमज पसरवणारे ,यांच्या विरोधात सुद्धा लढावे लागणार आहे.अन्यथा शत्रूपेक्षा हे लोकं जास्त धोकादायक आहेत. ●हे युद्ध सीमेच्या बाहेर तर लढावे लागणार आहेच पण देशाच्या आत देशद्रोह्यांशी सुद्धा लढावं लागणार आहे,● ■पण देश महत्वाचा.■
💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत.💥 सुहास सोहोनी
★संवेदना★
(सामाजिक विचार मंच)
अमरावती - ६

Saturday, June 18, 2016

💥Diabetes Survey💥A Ray Of Hope💥

💥Diabetes Survey 
💥A Ray Of Hope💥
The purpose of this short quiz is to find out your chances of being affected by diabetes,
 how to control sugar level &/or how to keep away diabetes forever.
The main purpose of this project is to help** border line**diabetic persons above 30 yrs by awareness of the subject.
 4 pt. programme to keep away diabetes forever :-
1}balance & quality diat.
2} min. 3 km fast walk per day .
 3} 20 mnts physical exercise per day.
 4} mental peace
This diabetes awareness survey was prepared by Mr. Suhas Sohoni
(http://www.suhassohoni.blogspot.in/)
 💥💥 pl.click    for quiz 💥💥
http://survey.24by7exams.com/e-diabetes
SUHAS SOHONI

Wednesday, May 18, 2016

गांव तालाब + स्मृतीवने = पर्यावरण रक्षण व संवर्धन



प्रति ,
ग्रामसेवक /सरपंच /संबंधित विभाग अधिकारी /आमदार/खासदार /
  समाजसेवी संस्था /सेलिब्रिटीज ★★★■■★
विषय :देश के हर गांव में एक तालाब जरुरी है |
सन्माननीय महोदय ,
😊क्या हमारे गाव में एक तालाब है  ?
अगर नही है ता आजसे सोचना शुरू करे!
★★ मानवनिर्मित लक्षावधी बड़े बड़े तालाब निर्माण करना अति आवश्यक है |
  हमारे देशमे 638000  से जादा गांव है |
पानी समस्या कायमस्वरूपी सुलझाने के लिए हर गांव में तालाब .यह सोच शासन स्तर पर जरुरी है|      E क्लास जमीं पर हर ग्रामपंचायत द्वारा ५ एकर का तालाब बनाना अनिवर्य होना चाहिए |संसद में ऐसा ठराव पारित करवाना जरुरी है| तद्न्यो द्वारा सर्वेक्षण करवाना आवश्यक है |
जिससे जगह जगह पर पानी की उपलब्धी होगी ,भूगर्भ में पानी जमा होगा ,कुएं का जलस्तर निश्चित बढेगा |.
जंगल में तलाबोंकी विशेष जरूरत है ,जिस कारण वन्य पशु शहर की तरफ नही आएंगे| पेड़, पौधे,वृक्ष  .हरे भरे हो जायेंगे |
जिस तरह हमारे बैंक के बचत खाते में प्रथम कुछ रकम जमा करना आवश्यक है ,तभी हम उसमेसे कुछ रकम निकाल सकते ,उसी तरह प्रथम भूगर्भ में पानी जमा होना चाहिए तभी बादमे थोडा पानी कुए या बोअर वेल से निकला जा सकता है |
हर तालाब के किनारे प्रदेशानुरूप पौधे लगाकर स्मृतिवन निर्माण किया जाये जिसद्वारा आजतक पर्यावरण को जो नुकसान हुआ है उसमे कमी होगी |
भविष्य में कुछ साल तालाब और स्मृतिवन दोनोका सम्पूर्ण रक्षण करनेसे देश का निसर्ग चित्रसुंदर दिखेगा|  
जगह जगह पर पेड़ काटने के कारन नष्ट हुए वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, वटवृक्ष, चिंच, साग, कवीठ, बेल ,आमला , बहावा, अर्जुनवृक्ष ऐसे वृक्षो का फिरसे रोपण करना जरुरी है |
दुनियाभरमे सेलिब्रिटीज के माध्यम से जिसतरह कई कल्पना [विचार ]समझाए जाते है उसी तरह पानी समस्या *गांव तालाब + स्मृतिवन = पर्यावरण रक्षण व संवर्धन *इस सूत्र से लोगोंको अवगत करने हेतु लोकप्रिय व्यक्तिओंके प्रभाव का सदुपयोग किया जाये | सभी सेवाभावी संस्था ,प्रतिभावान जनप्रिय व्यक्ति तथा धनवान लोगोने हमारे पृथ्वी के अस्तित्व के इस सकारात्मक कार्य हेतु *पर्मनंट प्रोजेक्ट* तयार करे |गावोंको गोद लेना आवश्यक है |
वर्तमान के सभी तालाब, नाले, नदिया, बंधारे इनकी पानी क्षमता बढने हेतु साफ सफाई की जाये |
इस सकारात्मक कार्य की भविष्यमे हजारो सालो तक सराहना की जाएगी |
**गावतलाव + स्मृतिवन = पर्यावरण रक्षण व संवर्धन इस सूत्र पर कृति होना जरुरी है |
हमारे सौर मंडल में जिस ग्रह पर पानी नहीं है ,क्या वहाँ जिव सृष्टि है ?
निसर्ग कृपासे जबतक बरसात हो रही है ,तबतक पानी संवर्धन कार्य सम्पन्न हो सकता है |
                   ** हमारा भविष्य हमें बनाना है **
धन्यवाद,
आपका नम्र ,
सुहास सोहोनी,
सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
⛈⛈⛈⛈⛈⛈💥अगर आप मुझसे सहमत है तो कृपया साथ दे |★★★

Thursday, May 12, 2016

पुतळे नको

💥🙏🏽लोकोत्तर महापुरुषांचे भव्य पुतळे जागोजागी उभारले जातात पण त्याच श्रद्धेय महापुरुषांच्या नावाला साजेसा भव्य तलाव निर्माण केला गेला तर पुढील हजारो वर्षांसाठी हे सकारात्मक कार्य म्हणून जगाच्या इतिहासात नोंद होईल.
निसर्गाचे सूत्र:-
💥गावतलाव + स्मृतीवने= पर्यावरण रक्षण व संरक्षण 💥
सुहास सोहोनी
★संवेदना★
अमरावती,-६

Thursday, May 5, 2016

★★★■■★★★ प्रती , ★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★

★★★■■★★★
प्रती ,
★ग्रामसेवक/ सरपंच/ संबंधित विभाग अधिकारी /आमदार/ खासदार/ समाजसेवी संस्था/ सेलिब्रिटीज★
विषय :◆प्रत्येक गावासाठी एक तलाव तयार करावा.◆
सन्माननीय महोदय ,
😊
●आपल्या प्रत्येकाच्या गावाला एकतरी तलाव आहे ना ?●

नसेल, तर आजच विचार करा.
★★पाण्याचे मानवनिर्मित लक्षावधी प्रचंड साठे निर्माण करा★■
★आपल्या देशात 638000 पेक्षा जास्त गांवे आहेत.
■“गाव तेथे तळे”[जलयुक्त शिवार] ही संकल्पना सरकारी पातळीवर राबविल्यास प्रत्येक गावाला पडीक जमिनीवर कमीतकमी 4 एकराचा तलाव असणे अनिवार्य ठरेल .संसदेत तसा ठराव मंजूर करून ग्रामपंचायतीला तसे स्पष्ट निर्देश द्यायला हवेत .तरच पाण्याचा प्रश्न/तुटवडा कायमस्वरूपी संपेल.
★ठिकठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध राहील.पाणी जमिनीत जिरेल व गावातील विहिरींना पाणी पाझरेल.
★जंगलात सुद्धा भरपूर तलाव हवेत.अनेक तांत्रिक प्रश्नांचा मागोवा घेऊन सर्वेक्षण करता येईल .
★ज्याप्रमाणे आपल्या बँकेच्या खात्यात प्रथम पैसे जमा करावे लागतात नंतरच त्यातील थोडे काढता येतात,तसे जमिनीत प्रथम पाणी मुरवावे आणि नंतरच त्याचा उपसा करावा ,असे वाटते .
★प्रत्येक तलावाभोवती त्या गावातर्फे “ स्मृतिवनाची “ कल्पना रुजविल्यास तलावाभोवती प्रदेशानुरूप वृक्षांची रोपे लाऊन आजपर्यंत पर्यावरणाचा जो ऱ्हास झाला आहे तो काही प्रमाणात भरून काढता येईल .
★पुढील काही वर्षे तलाव व त्याभोवतीची “स्मृतीवने” यांचे रक्षण केल्यास देशाचे “निसर्गचित्र “सुंदर दिसेल.
★अनेक कारणांनी झालेल्या वृक्षतोडीमुळे नष्ट होत चाललेले वड ,पिंपळ ,सिसम ,कदंब, चिंच, साग, कवीठ, बेल ,आवळा, बहावा, अर्जुनवृक्ष हे पुन्हा लावले पाहिजेत .
★असंख्य कल्पना मांडतांना ज्याप्रमाणे जगभरातील” सेलिब्रिटीज “च्या माध्यमातून मांडल्या जातात ,लोकप्रिय व्यक्तींच्या प्रभावाचा वापर केला जातो ,त्याप्रमाणे प्रसिध्द व्यक्तींच्या वलयाचा लाभ या कार्यासाठी व्हावा .सर्व सेवाभावी संस्था व धनवानांनी “ पृथ्वीच्या अस्तित्वाच्या या सकारात्मक कार्या साठी” परमनंट प्रोजेक्ट तयार करावेत .गाव दत्तक योजना राबवावी .
★सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक दुर्लक्षित तलावांसाठी सुद्धा हा कार्यक्रम राबवता येईल .
★प्रत्येक ग्रामसभेत आपत्कालीन सभा घेऊन, या विषयावर चर्चा होऊन,पडित जमिनीवर जागा मंजूर करून, ठराव करून हे कार्य सुरु होऊ शकते ,जे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून देशाच्या इतिहासात नोंद होईल .
*■*गावतलाव + स्मृतीवने = पर्यावरण संवर्धन*■*हे सूत्र यशस्वी पणे वापरणे आवश्यक आहे .
★पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हि काळाची गरज आहे.हवामान खात्यानुसार यंदा राज्यात समाधानकारक पाउस होईल.
★माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपसातील सर्व मतभेद विसरून परिसरातील तलाव,पाणवठे,धरणे यातील कचरा काढून, खोली वाढवून ,साठवण क्षमता वाढविण्यासाठी आपल्या निधीतील काही भाग तातडीने खर्च करावा★
■पाऊस पडत असतांनाच पाणी संवर्धनाचे कार्य होऊ शकते ,अन्यथा पाणी टंचाई अटळ आहे .
★आपल्या सूर्यमालेत ज्या ग्रहावर पाणी नाही तेथे जीवसृष्टी आहे का★?मनरेगा च्या मजुरांमार्फत हे कार्य व्हावे.
*कृपया माझ्या सूचनेचा विचार करावा .
धन्यवाद . आपला नम्र,
सुहास सोहोनी,सोहोनी कॉम्प्लेक्स ,विवेकानंद कॉलोनी अमरावती [महाराष्ट्र ] मोबा-९४०५३४९३५४
⛈⛈⛈⛈⛈⛈💥गावतलाव विषयी माझे विचार पटत असतील तर कृपया शेअर करा.⛈💥

Sunday, May 1, 2016

*बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *



                     * बेरोजगारांचे तांडे आणि कामगार दिन *
              भरपूर कामगार नोकरीवर ठेऊन कारखान्यात उत्पादन घ्यायचं की दिवसातले १६ -१८ तास काम करून अफाट उत्पादन देणारे यंत्र /संगणक वापरायचे !यात अखेर संगणकांचा विजय होतांना दिसतो आहे .निर्मिती क्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारे हे राक्षसी क्षमतेचे महागडे संगणक जणू कामगारांचे शत्रू सिध्द होत आहेत .उत्पादन प्रक्रियेतून कामगार वर्गाला कमी करणे किंवा वगळणे हे भांडवलशाही समाज व्यवस्थेचे अंतिम उद्दिष्ट असेल ,असे चित्र जिकडे तिकडे दिसते आहे .प्रत्येक उद्योग किंवा सेवा व्यवस्थापनाला शेवटी नफ्याचे गणित करावे लागणार आहे .प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या विदेशी उद्योग समूहाकडून सध्या मोठ्या प्रमाणात अनेक वस्तू आयात होत आहेत त्यांमुळे जीवघेण्या स्पर्धेला सुरवात झाली आहे ,त्याचा परिणाम म्हणजे कामगार कपात किंवा उद्योग बंद करण्यात येत आहेत .
               बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे ,समाजातील प्रत्येक घटक आपापल्या विचारधारेत मश्गुल आहे .विविधते बरोबर विषमता सुद्धा वाढते आहे .कुणाला कुणाचे सोयरसुतक नाही.या असंख्य हातांना काम मिळणे गरजेचे आहे .हा भविष्यातील स्थिरतेचा प्रश्न आहे .बेकारी व स्थिरतेच्या समस्येवर त्वरित विचार कार्यान्वित होणे गरजेचे आहे अन्यथा मनाचे विकार ,गुन्हेगारी ,हिंसाचार ,वाढती वाटमारी ,सामाजिक ताणताणाव असे अनेक धोके आहेत .हे प्रखर सत्य आजचे समाजशास्त्रज्ञ कसे काय विसरताहेत .सर्व समाज घटकांचा विचार करणे गरजेचे आहे . देशभर छोट्या उद्योगांचे जाळे उभारण्याची गरज आहे .
लेख संग्रह : वर्तुळाचे टोक    
लेखक : सुहास सोहोनी ,अमरावती -६