सहनशील नागरिकांची ऐशीतैशी
स्वच्छ ,स्वस्थ आणि सुंदर शहर कसे ओळखावे ?तर,ज्या शहराचे मुख्य आणि छोटे ,
मोठे आणि गल्लीबोळातील सर्वच रस्ते सुस्थितीत असतील ,खाच खळगे ,गड्डे नसतील ,चिखल
नसेल रस्त्याच्या दुतर्फा उकिरडे नसतील ,प्लास्टिक आणि विविध प्रकारचा कचरा शहरभर
पसरलेला नसेल ,तुंबलेल्या नाल्या नसतील ,नाल्या ,नाले व्यवस्थित बांधकाम केलेल्या असून
उघड्या नसतील ,रस्ताभर ठिकठिकाणी जनावरांनी घाण केलेली नसेल,योग्य ठिकाणी योग्य
उंचीचे स्पीडब्रेकर्स असतील ,आपल्या घराच्या बाजूला पण दुसऱ्याच्या घरासमोर कचरा फेकलेला
नसेल [वाचकांना अजून काही सुचले तर अवश्य कळवावे .]तर अशा शहराचे आणि त्या शहरातील
नागरिकांचे आरोग्य चांगले असेल असे समजावे .
ज्याप्रमाणे सुदृढ माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ व निरोगी असतात त्याप्रमाणे
स्वच्छ व सुंदर शहराचे रस्ते स्वच्छ व सुंदर असतात .अवरूध्ह असलेल्या रक्तवाहिन्या शरीराला
गंभीर आजाराने त्रस्त करतात तसेच अयोग्य आणि विद्रूप रस्ते नागरिकांचे हाल हाल करून त्रस्त
करतात .मनस्ताप,चिडचिड पाठीचे मणक्यांचे व कंबरेच्या दुखण्यांनी शहरातील नागरिक त्रस्त
होतात ,पण यावर उपाय काय ?प्रशासनातील संबंधित अधिकार्यांना आपल् कर्तव्य,उत्तर दायित्व
कधीतरी समजेल का ? पण आमचे नागरिक बंधू सुद्धा तितकेच उपद्रवी आहेत .आम्ही स्वतःला
उत्सवप्रिय म्हणवतो आणि कमानी लावण्याकरिता पहिला घाव रस्त्यावरच घातला जातो .उत्सव
,कार्य , उद्घाटन काहीही असले तरी शहरभर रस्त्यावर कमानी मंडप टाकले जातात ,रोषणाई
केली जाते आणि काम संपले की रस्त्यावरचे गड्डे तसेच सोडून दिले जातात ,ओकेबोके आणि
केविलवाणे .दिवसा आम्ही खाचखळगे सराईतपणे चुकवतो पण रात्रीच्या अंधारात आम्ही वाहना
सकट त्यात उसळतो .
शहरातील सगळेच[लहानथोर] नेते निवडणुकीपूर्वी याच रस्त्यांवरून जा ये करीत होते
आणि आजही आमच्यासारखेच खड्डे चुकवत जात आहेत .या नेते मंडळींना [?]"योग्य आणि अयोग्य"
याची जाणीव असेल ? सर्व प्रकारचे कर विनातक्रार भरणाऱ्या नागरिकांचे असे हाल का होतात ?
याचे कारण सर्वांना सहन करण्याची सवय झाली असून जनता अती सहनशील आहे .निवडणुकी
पुरती साखर पेरलेली आश्वासने द्यायची आणि नंतर .........."सहनशील जनतेची ऐशीतैशी "असे
होऊ नये .आपलं शहर स्वच्छ, स्वस्थ,आणि सुंदर कसं ठेवता येईल ?
सुहास सोहोनी 9405349354
www.suhassohoni.blogspot.com