Friday, August 24, 2012

" व्यवस्थापन हवे गर्दी चे ""क्राऊड मेनेजमेंट''

    "  व्यवस्थापन हवे गर्दी  चे ""क्राऊड  मेनेजमेंट''

    केवळ  अनियंत्रीत गर्दमुळे  अचानक शेकडो जणांना  प्राण गमवावे लागत आहेत.  हजारो लोकं जखमी होत आहेत.  अशा घटना, या घटना नित्याच्या झाल्या असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी काटेकोर नियमावलीचे पालन आवश्यक आहे.  प्राचीन पर्यटन स्थळे , जूनी विख्यात मंदीरे, लोकप्रीय नेत्यांच्या किंवा मार्गदर्शकांच्या  जाहिर सभा, क्रिडास्थाने,  प्रान्तनिहाय पारंपारिक उत्सव, फार मोठ्या  बाजारपेठा, कुंभमेळे , पावसामुळे  किंवा विविध कारणांनी होणारा रस्ताजाम अशा सर्वच ठिकाणी जर गर्दी अनियंत्रीत असेल  आणि तेथे जर एखादा अपघात झाला , अफवा पसरली , जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले  तर चेंगराचंगरीत तुडवले  जावून श्वास कोंडल्याने घडणाऱ्या  भयनाट्यात कितीतरी घरं उध्वस्त होतांना आपण अनुभवतो.  या अशा दुर्दैवी  घटना कशा थांबवता येतील ?
    ज्‌या प्रमाणे इव्हेंट मनेजमेंट, डिसास्टर मनेजमेंट सक्षम असायला  हवे त्याचप्रमाणे क्राऊड मनेजमेंट हे वेगळे  शास्त्र विकसीत होण्याची गरज आहे.  गर्दी  होण्याची खात्री असण्याच्या संभाव्य ठिकाणी इमारती, रस्ता, पुल , कठडे, भिंती, त्या जागेची वजन सहन करण्याची क्षमता या सर्वच बाबींचा सुक्ष्म अभ्यास व्हावा.  एकाच जागी एकाच वेळी  क्षमतेपेक्षा जास्त गर्दी   न होऊ देता लोकांना विविधठिकाणी विखरून गुंतवून ठेवावे.  प्रशिक्षीत स्वयंसेवक भरपूर प्रमाणात तैनात हवेत.  ऐसपैस जागा जर उपलब्ध नसेल  तर संख्या नियंत्रीत करणे व त्याची आगावू कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे.  आवश्यक औषधांसहित मेडिकल  क्येम्प्‌स विविध दिशांना असणे अनिवार्य करावे.  गरज असो किंवा नसो गर्दी च्या प्रमाणात
रुग्णवाहिका आणि काही वाहने तैनात करणे अनिवार्य करावे.  सर्व प्रकारच्या गुन्हेगांरावर वचक आणि लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट, टि.व्ही. क्यामेरे, संगणक प्रणाली  अशा व्यवस्था जरी आजकाल  उपलब्ध असतात तरी बऱ्याच आडजागी पारंपारिक उत्सव, दुर्गम जागेतील  प्राचीन मंदिरे अशा ठिकाणी सुद्धा अनिवार्य करावे.  श्रद्धास्थानी विशेष दिनानिमित्य अफाट गर्द होते, अशा ठिकाणच्या विश्वस्त मंडळावर वर उल्लेखलेल्या सर्व सोई सवलतींचे बंधन हवे.  संभाव्य गर्दी च्या ठिकाणी आधी संरक्षणात्मक उपाययोजना सज्‌ज असण्याची खात्री हवी, आणि नंतरच उत्सवाला  परवानगी दयावी.
    प्रत्येकवेळी  पोलिस यंत्रणा, सरकारी व्यवस्थापन, नेते मंडळी  यांच्यावर तोंडसुख घेणे बंद करावे. 
पोलिसांवर नित्य कामाचा तीव्र ताण असतो. संबंधित संस्था, विश्वस्थांनी केवळ  गर्दमुळे  मिळणाऱ्या  द्रव्याचा विचार न करता संभाव्य अपेक्षीत गर्दी  सुनियंत्रीत करण्याची संपूर्ण जबाबदारी उचलावी.  प्रशासन यंत्रणेला  स्वत:चे प्रशिक्षीत स्वयंसेवक पुरवावे.  विदर्भातील  शेगांव येथील  श्रीगजानन महाराज संस्थानात कायमस्वरूपी स्वयंसेवक विविध कार्यासाठी प्रशिक्षित केले  असून त्यांचे कार्य उल्लेखनीय व अनुकरणीय आहे.  अलोट गर्दीत मुलाबालांसह जाणे यात धोका आहेच.  भविष्यात गर्दी  होण्याचे प्रसंग फार वाढणार आहेत.  गलथान कारभार असेल  तर विविध धोके गर्दीत दबा धरून बसले  आहेत.  याचा अभ्यास हवा म्हणून, व्यवस्थापन हवे  गर्दीचे म्हणजेच क्राऊड म्यानेजमेंट.

                        ुुु  सुहास सोहोनी ---मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                www.suhassohoni.blogspot.com   








पंख उधार घेवून उडता येत नाही

    * पंख उधार घेवून उडता येत नाही *

             विदेशातील  सर्वच उत्पादक भारताकडे केवळ  एक बाजारपेठ या भूमिकेतूनच पाहतात.  अगदी गरीब आदिवासी माणसाला   सुद्धा एन.जी.ओ. मार्फत विदेशी वस्तु, पदार्थ पुरवले  जातात.  देशातील गर्भश्रीमंत, श्रीमंत मध्यमवर्गय आणि गरीबी रेषा ओलांडून मध्यमवर्गात प्रवेश केलेले  असे सगलेच, विविध विदेशी वस्तूच वापरतील  अशी पद्धतशीर योजनांच केली  गेली  असावी.  भारत संचार निगम तर्फे गावोगावी इंटरनेट व्यवस्था सुरू केली , त्यासाठी असलेली  उपकरणं पॉवर प्लग सहीत मेड इन चायना आहे.  लाखो करोडो कॉम्प्‌युटर्स, दुरदर्शन संच हमखास विदेशीच आहेत.  वीजेची  समस्या असल्‌यामुळे  कोट्यावधी इन्व्‌हर्टर्सची विक्री झाली  आणि विदेशी उपकरणे व बेंटरी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली .  अगदी सहजपणे आणि सतत आपण विविध विदेशी वस्तु वापरतो.  आणि त्या उत्पादकांना नफा पोहोचवतो.  टेलीव्हिजनच्या सिरियल्‌स किंवा स्पर्धाचं एक व्यसन जडलं  आहे, म्हणून केबल , डिशटीव्ही, आणि इन्व्‌हर्टर या उपकरणांनी घरात जागा बiकावली .  विदेशी कंपनीच सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी, होम थिएटर हट्टाने घरात घुसलं .  मोबाईल   हँडसेट हा कंबरेचा किंवा गळ्यातला  अलंकारच जणू. रिलायनस कं. भारतीय असला  तरी हँन्डसेट मात्र विदेशी,कोरियन
           कर्ज काढून आपण विविध योजनांदवारे किंवा सरकारी निती नुसार विदेशी उपकरणे विकत घेतो.  त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करतो.  खंत वाटते की या सगळ्या  वस्तू अस्सल  भारतीय बनावटीच्या का नसाव्या? पंचतारांकित विदयालयातून तज्ञ बनलेले  इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ नेमके काय करताहेत?  आपल्या
 या देशात विविध तंत्रज्ञान विकसित करून महासत्ता होण्याऐवजी आपण "रेडीमेड-ज्ञान' कर्जाऊ रकमा घेऊन, विकत घेत सुटलो   आहे.  यातील  90 टक्‌के गुंतवणूक मनोरंजन किंवा सुखसोई साठी आहे, म्हणजे उत्पादकता शून्य.  आज या देशाला  गरज आहे मोठ्या  उदयोगसमुहाची, भारतीय जनतेची गरज भागवून विदेशी बाजार पेठ गुणवत्तेने काबीज करणाèया उत्पादनांची.
    भारतीय उद्योग-कारखाने कां आजारी पडताहेत? उद्योजकांचा उत्साह का मावळतोय? उद्योग-निती, सोई सवलती, करांचा बोझा, वीजेची अनियमितता, अधिकारी वर्गाचा जांच, कायद्यातीb त्रुटी, पळवाटा अशा विविध कारणांनी कारखानदारी त्रस्त आहे का? करोडो हातांना काम मिiवून देणारे उद्योग उभारण्याची गरज आहे.  आज जागतीक बँकेचं कर्ज प्रत्येकामागे रू. 15000/- आहे.  हे उधारीचं ओझ खांद्यावर घेवून कशी भरारी मारता येणार? समर्थ खांदेच पेलू  शकतील  महासत्तेचं स्वप्न.  या विदेशी उत्पादनांच्या कुबद्यांनी  आम्ही असा काय आनंद मिळवतोय? गगनात भरारी घेतांना हे पंख बळकट हवेत, सक्षम हवेत, मुख्य म्हणजे हे भरदार पंख स्वत:चेच हवेत, कारण, कधीही** पंख उधार घेवून उडता येत नाही. **
                        ुुु सुहास सोहोनी --मोबा .९४०५३४९३५४
                                क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com






* व्यसनमुक्ती हवी आजपासून *

      * व्यसनमुक्ती हवी आजपासून *

    दारू किंवा अंमली  पदार्थाच्या आहारी गेलेल्यांची संख्या सतत वाढते आहे.  केवळ  गंमत म्हणून सुरू झालेले हे व्यसन क्रमाक्रमाने अधोगतीच्या गर्तेत नेऊन सोडते.  हा एक मनोविकार आहे.  दारूचे व्यसन ही एक भयानक गुलामी आहे.  या व्यसनातून मुक्तता अत्यंत अवघड असली  तरी ते अशक्य मात्र नाहीच.  रोग्यापेक्षा नातेवाईकांची चिकाटी किती यावर ते अवलंबून आहे.  दारू मुक्ती मनापासून हवी असल्यास खालिल  प्रश्नांची उत्तरे शोधावी.
    दारूमुळे  बरेच प्रॉब्लेम्स  निर्माण झाले  आहेत का? कोणते ? * तरीही दारू प्याविशी वाटते का ? 
* आपल्या दारूपिण्यामुळे  आर्थिक नुकसान झाले  आहे का? * कुटुंबाचे हाल  होतात का? * नेमके दारूड्या कुणाला  म्हणावे? * आपले  स्वत:बद्दल  काय मत आहे? *दारूमुक्ती हवी आहे का? त्यासाठी आजवर काही प्रयत्न करून पाहिला  आहे का? *आपल्या व्यक्‌तिमत्वात काही दोष आहेत? कोणते? *ते दोष दुरूस्त व्हावेत असे वाटते का? *स्वत:च्या गुणदोषाची उजळणी करावीशी वाटते का? * जिथे चुक झाली  त्याची कबुली  दयायची आहे का? *आपल्या हातून जे कोणी दुखावले  गेले  आहेत त्यांची मनापासून क्षमा मागायची आहे का? *व्यसनापासून मुक्त होण्यासाठी इतरांना मदतीची हाक मारावीशी वाटते का? * मदत मागण्याची मनाची तयारी असल्यास अडचण काय आहे? *    आपण ईश्वर समजतो अशी एक शक्ती नक्कीच आहे. यावर विश्वास आहे काय? *ती शक्ती व्यसनापासून मुक्ती साठी बळ   देईल  असे खरंच वाटते? घरातल्या प्रत्येकाला   असं वाटतं का? *आई वडील  भाऊ बहिण आणि पत्नीवर मनापासून प्रेम आहे का? *ही सगळी  नाती आणि जीवनातला  आनंद टिकून रहावा असंच वाटत ना? *व्यसन पुर्णपणे सुटल्यास सुखी भविष्याचे चित्र रंगवता येईल  का? *प्रयत्न करावासा वाटतो ना? *मग सुखी भविष्याकडे वाटचाल  करण्यास आज या क्षणापासून सुरवात करणार?
    आपल्या मनाची ताकद अमर्याद असते. कोणतीही गोष्ट  अशक्य नाही. गरज आहे प्रामाणीक प्रयत्नांची आणि त्याचबरोबर समर्थ सहकार्याची. सोबत हवी चांगल्या विचारांची व विचारी मित्रांची.  मनाचा निग्रह पक्का झाल्यास व्यसनापासून मुक्तता मिळवता येते.  मद्यपानाची कितीही प्रलोभने आली  तरी दारूचा ग्लास  मी "आज' हातात घेणार नाही व पिणार नाही".  असे रोज म्हणावयाला  हवे.  दारू मुक्ती ही मनापासून हवी.  आयुष्य हे सुंदर  आहे.  त्याचा मनमुराद आनंद घ्या .
                        ुुु सुहास सोहोनी--- मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]        
                                www.suhassohoni.blogspot.com       



सोळावं वरीस म्हणजे नक्षीदार कांचपात्र

            *    सोळावं वरीस म्हणजे नक्षीदार कांचपात्र     *

    आम्ही पालक आपल्या मुलांची भावनिक गुंतागुंत समजून घेतो? इयत्ता दहावीतील  कमी जास्त १५ वर्ष वयाची ही मुले  आयुष्याच्या एका वेगळ्या  आणि महत्वाच्या टप्प्यावर आलेली  असतात.  पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल  नैसर्गिकपणे नकळत घडत जातात.  त्यासोबत स्वत:चं असं वेगळ  व्यक्तिमत्व आकार घेत असतं.  महत्वाकांक्षेची झालर लेवून मनावर स्वार झालेलं  विचारांच वारू, चौफेर उधळायला  कुणाची सुद्धा परवानगी मागत नाही.  भविष्याच्या अथांग आकाशात भरारी घ्यायला  या तारुण्याच्या उंबरठ्या वर पोहोचलेल्या  मुलामुलींना खऱ्या  अर्थाने मदत होणार असते, ती त्यांच्यावर १५ वर्षे झालेल्या संस्कारांची, सकारात्मक विचारसरणीची. पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रातले  त्यांचे आदर्श सुद्धा मुला मुलीं च्या  मनाला   कोणतातरी आकार देऊन गेलेले  असतात.
    समजायला  लागल्या पासून नजरेने टिपलेल्या सर्व गोष्‌टींची साठवण मेंदूच्या संगणकात होऊन, आकलन शक्तीनुसार त्याचे अर्थ काढले  जात असतात आणि नकळत मुलांची धारणा बनत जाते.  चांगले  वाईट, सत्य असत्य, श्रीमंती, गरीबी, दैन्य, असमाधान, समाधान, आईवडिलांचा परस्परांवर असलेला  विश्वास, त्याग, आजीआजोबांचं लाभलेलं  प्रेम, दुर्दैवाने  काही घरांत किंवा घराबाहेर व्यसनांमुळे  बघावे लागलेले  उध्वस्त व्यक्तिमत्व व त्यामुळे  निर्माण झालेली  दहशत, अशा विविध घटना बा लमनावर आपला  कायमस्वरूपी ठसा उमटवतात.  गरजेपेक्षा वा लायकीपेक्षा जास्त पैसा खुळखुळत असलेल्या घरातील  मुलांना नकार ऐकण्याची सवयच नसते.  करमणूकीची अवास्तव व्याप्ती वाढल्याने आम्ही च्यानल्स दवारे मुलांना काय दाखवतो याचे भान संपले  आहे.  मुद्दाम लक्ष ठेवून बघायला  हवं की वाईन शॉप मध्ये दारू विकत घेणाऱ्या   मुलांची वयं काय आहेत. गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेटच्या आहारी किती मुले  गेली  आहेत, आडजागेवर किंवा कोणत्याही बगीच्यामध्ये दररोज खेटून बसलेली  जोडपी २० वर्षे वयाच्या आतील  सुद्धा असतात. शिकवणीच्या निमित्ताने ही मुले  घराबाहेर असतात का?
                       मैत्री, प्रेम आणि शारिरीक आकर्षण या तिनही भावनांचं सरमिसळ  होऊन आकर्षणालाच प्रेम समजण्याची चुक घडते आणि त्यातुनच एखादं भयनाट्य  आकारतं.  शिघ्र संतापी, कमकुवत मन नकार किंवा अडथळा  सहन करत नाही.  पालकांचा मुलांशी सुसंवाद असतो का? त्यांच्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तरे मिळतात का? मुलांचा कल  काय याचा शोध घेतला  जातो का? करिअरच्या बाबतीत मुलांवर विनाकारण अपेक्षांच ओझ लादलं  जातं का? पाल्यांशी विविध विषयांवर मनसोक्त गप्पा करताना त्यांनी मांडलेल्या विचारांचा आपण आदर करतो का? मुलांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना सकारात्मक पण आनंदी चेहऱ्यानं मदत करून पाठीशी उभं रहायला  आपल्याला  वेळ  तरी असतो का? आपण भ्रष्टाचाराने कमाई केली  असेल  किंवा आपल्‌याला  काही व्यसने असतील  तर या गोष्टी  मुलांना माहिती आहेत काय? अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला  समजेल  की आपल्या मुलांसाठी आपण कोणता मार्ग निवडतो.
                        ुुु  सुहास सोहोनी----मोबा .९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                     www.suhassohoni.blogspot.com


* इच्छापत्र का करावे ? *

          *   इच्छापत्र का करावे ?  *

    इच्छापत्र हा शब्द उच्चारल्याबरोबर "मृत्यू' या जीवनातील  अटळ  सत्याची आपोआप आठवण होते. एकदा हे अटळ  सत्य मान्य केले  तर आपल्या मृत्यूनंतर आपल्या सर्व संपत्तीची योग्य ती व्यवस्था व्हावी असे आपल्याला  वाटणे साहजीक आहे.  त्यासाठी इच्छापत्र करून ठेवणे हा एकच राजमार्ग आहे, हे आता लोकांना पटू लागले  आहे.  प्रत्येक माणसाला  आपले  इच्छापत्र करून ठेवण्याचा हा जो अधिकार आहे, ते त्याच्या हातात असलेले  प्रभावी अस्त्र आहे.
    मृत्यूनंतर आपल्या मालकीच्या संपत्तीचा विनियोग कसा व्हावा याबद्दल  आपल्या मनात ज्या योजना असतील  त्या योजनांचा कायदेशीर जाहीरनामा म्हणजे "इच्छापत्र' असे म्हणता येईल .  हे अगदी खाजगी व गोपनीय स्वरुपाचे कायदेशीर कागदपत्र असून कोणत्याही अधिकाऱ्या पुढे किंवा न्यायालयापुढे सादर करण्याचा हुकुम कुणीही देवू शकत नाही.  इच्छापत्रात सुचविलेल्या योजनांची अंमलबजावणी आपल्या मृत्यूनंतरच व्हावी या उद्देशाने ते तयार केलेले  असते. तसेच बदलत्या परिस्थितीप्रमाणे इच्छापत्रात कितीही वेळा  बदल  करता येतो अगर ते रद्दही करता येते.  मुख्यत्वे आपल्या संपत्तीचा विनियोग कसा व्हावा, हे वारसांना कळावे म्हणूनच इच्छापत्र केले  जाते.  काही वेळा  इस्टेटीचा व्यवस्थापक नेमण्याकरीता, एखादा विश्वस्त निधी उभारण्याकरीता किंवा अज्ञान मुलां करीता तात्पुरता पालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्याकरीता सुद्धा इच्छापत्र करता येते.
    इच्छापत्र न केल्यास मृत्यूनंतर आपली   संपत्ती आपल्या कायदेशीर वारसांमध्ये आपोआप वाटली  जाते.   बहुतेकवेळा  न्यायालयाची संथ प्रक्रिया, वारसांचा लोभीपणा, विविध डावपेच, संपुर्ण इस्टेटीची व्यवस्थीत नोंद  नसणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात.  कालांतराने वारसदार एकमेकांना दुरावतात, कायदेशीर लढाई सुरू राहते.  एखादी विधवा झालेली  मुलगी, आजारी, अपंग मुल , वृद्ध आईवडील  यांच्या विशेष गरजा, कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत अशा नातेवाईकांसाठी थोडी जास्त व्यवस्था करण्याची गरज असते पण कायद्याला  सर्व सारखेच असल्याने न्याय होत नाही.
    संपत्तीचे वाटप कसे व्हावे यासंबंधी स्पष्ट  आदेश इच्छापत्रात असले  तर वाद, भांडणे मिटवता येतात, शिवाय एखादा इमानदार नोकर, जिवलग मित्र, कुणी दुरचा गरजू नातेवाईक यांना आपल्या संपत्तीतून काही द्यावे असे वाटले  तर ते इच्छापत्राद्वारे कृतीत आणता येते.
    इच्छापत्र तयार करणे हे मुळीच गुंतागुंतीचे नसून या कायदेशीर कागदपत्रांची नोंदणी करण्याची गरज नाही. इच्छापत्र हे स्पष्ट  शब्दात त्याच्या अर्थाबद्दल  काहीही संदेह राहणार नाही अशा तऱ्हेने लिहावयाला  हवे.  कमीतकमी दोन साक्षीदारांनी त्यावर सही करावी.  आपल्या इच्‌छेनुसार संपत्तीचे वाटप होईल  ही खात्री व्हावी म्हणून इच्छापत्रामध्येच एक व्यवस्थापक (एक्‌झीक्युटर) नेमण्याची गरज असते. एकूणच संपत्तीचे मुल्य वाढत असल्याने इच्छापत्र करून ठेवणे गरजेचे आहे.
                        ुुुसुहास  सोहोनी  मोबा.९४०५३४९३५४
                             क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com
                               www.mazyasamvedana

विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय

     *      विकृतीच्या व्हायरसचा फैलाव होतोय      *

    अर्वाच्य, अश्लील , गलिच्छ, किळसवाणं, घृणास्पद अशा विशेषणांनी वर्णन करता येतील  असे हिडिस प्रकार नित्य, राजरोस घडताहेत.  कुविचारांनी कुप्रवृत्तीशी फारच जवळिक केली  आणि चोऱ्या  खुन, दरोडे, फसवणूक, बलात्कार, अश्लिल  चित्रफित,  मोबाईल  द्वारे गुन्हे घडताहेत.  एकतर्फी प्रेमात कुणी प्रेयसीला  जाळताहेत, कुणी  ब्लेड मारताहेत, हातपाय तोडताहेत, कुठे सामुहिक अत्याचार घडताहेत.  बाप, बहिण, भाऊ, आई किंवा आजी ही सगiी रक्ताची पवित्र नाती सुद्धा विकृतीला  थोपवू शकत नाहीत.   अशा विकृतांधांची लोकसंख्‌या दिवसंदिवस वाढते आहे.  त्यात भर म्हणून माफियांचे हल्ले , पोलिसांच्या हत्या, पोलिसांच्या तर्फे प्रति कारवाई, दमनचक्र, त्यावेळी  कितीतरी निरपराध जीवांची होरपळ  होते.  दररोज अशा मन सुन्न करणाèया बातम्या ऐकायला , वाचायला  व पहाव्या लागतात.  नराधमांच्‌या अत्याचाराला  प्रत्यक्षात एकदा बळी  पडलेल्या महिलेचा फोटो विस्तृत बातमीसह संपूर्ण देशात घराघरात दूरसंचाद्वारे दाखवला  जातो आणि रोज  तिच्या अब्रूची पार लक्‌तरं होतात. पण गुन्हेगाराच्या तोंडावर मात्र काळा  कपडा टाकला  जातो. असं का होतंय?
     आपल्या देशात फार पुर्वपासून महान लोकोत्तर संत, महात्मे, विचारी पुरूषोत्तम आणि सद्‌विचार रुजविणारे दिव्य पुरूष होवून गेले .  आजही जिथे तिथे शेकडो मंदीरे, मठ, आश्रम आहेत.  तेथे समाजाला  त्याग, सेवा, सहकार, प्रेम, शांती, विनम्रता या सद्‌विचारांची शिकवण दिली  जाते.  काया, वाचा आणि मनाच्या शुद्धीकरीता विविध प्रकार, प्राणायाम व योग साधनेद्वारे मन:शांती प्राप्त करण्याकरीता अगदी करोडो लोकं प्रयत्न करतात. लक्षावधी लोक वारकरी बनून समाजाला  आदर्शाचे धडे घालून देतात.  यात्रा, धर्मस्थळे , तिर्थक्षेत्र अशा ठिकाणी पापक्षालन आणि पुण्यसंचयासाठी नित्य लाखो करोडोंच्या संख्येने लोक-भक्ती मार्गाचा अवलंब करून नतमस्तक होतात.  मग इतकं होवूनही आपल्या देशाचं पुण्य कुठे कमी पडतं, की महापापी विकृतांध जन्माला  यावेत?
    षड्‌रिपूंनी थैमान घातलेल्या या भरकटले ल्या जीवांच्या मनावर कधीही नष्ट  न होणाऱ्या  पंचशील  तत्वांच्या मिश्रणाची फवारणी व्हावयास हवी.  अनेक जिवाणू, विषाणू, व्हायरस मानवाला  त्रस्त करीत असतात. अगदी तसाच हा विकृती नावाचा व्हायरस हळू  हळू  मानवी मनात बलवान होतोय आणि फैलावतोय.  आपले  वाचन, मनन, चिंतन, कपडे, फेशन, करमणूकीची माध्यमे, सवई, व्यसने, आपले
 आदर्श अशा अनेक विषयात आपले  काही चुकते आहे का? या विषयी सतर्क राहुन आत्मचिंतन व्हावे.  फोफावणाऱ्या  या विकृती नावाच्या व्हायरस चा नायनाट लवकरच करावयास हवा. आणि हे काम आपल्याला स्वतःलाच करावे लागणार .
                            
                                 सुहास सोहोनी ९४०५३४९३५४
                                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                                 www.suhassohoni.blogspot.com





* स्त्रियांचे स्वातंत्र्य व स्त्री मुक्ती आणि वास्तव*

 * स्त्रियांचे स्वातंत्र्य  व स्त्री मुक्ती आणि वास्तव*
-----------------------------------------------------
    प्रत्यक्षात एक वस्तुस्थिती स्पष्ट  आहे की निसर्गात मानवासहित प्रत्येक प्राण्यात (फक्‌त काही अपवाद वगळता) नर आणि मादी या दोनच प्रजाती असून त्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.  जीवन, संगोपन, प्रजातीची वाढ, संवर्धन या निसर्गाच्या संतुलनात्मक क्रिया सहजगत्या साकार होतात, त्या नर आणि मादी यांच्या सहकार्यानेच, आणि त्यासाठी हे दोन्ही घटक एकमेकांसाठी आवश्यक आहेत.  दोघांची प्रकृती व जीवनकार्य परस्परभिन्न आहे.  प्रत्येक वस्तु व जीव विशिष्ट  काळा नंतर नष्ट  होणार या निसर्ग नियमामुळे  जैवसंतुलन साधण्याकरीता प्रजनन आवश्यक ठरते.  नेमक्या याच मुलभूत गरजेमुळे  स्त्री पुरूषांचे कार्यक्षेत्र ठरले .  सहाजीकच दोघांच्या शक्तीच्या मर्यादा निश्चित झाल्या.  विविध आपत्तीपासून स्त्रीचे रक्षण करणे, पालन करणे हे पुरूषांचे महत्वाचे कार्य ठरले .  आणि याचवेळी  स्त्रीयांना "धन' मानले  जाऊ लागले .  त्यातूनच पुरूषप्रधान संस्कृती सहजच मान्य झाली .  धनाचा सांभाळ  करणे, वापरणे, धनासाठी युद्ध करणे आणि व्यापार करणे या गोष्टी  नित्याच्याच घडू लागल्या.  कालांतराने पुरूषप्रधान संस्कृतीचे दुष्परिणाम जगभर दिसू लागले .  पुरूषी महत्वाकांक्षा आणि लोभ जोर धरू लागला  .  शतकानुशतके स्त्रीयांच्या व्यक्ती स्वातंत्र्या वर नेहमीच विविध बंधने घातली  गेली . त्यांना डांबून ठेवणे, स्वत:च्या श्रीमंती निमित्य  त्यांचे प्रदर्शन करणे घडू लागले .  जुलुम, अत्याचार व प्रजनन या चक्रात स्त्री वर्ग कायम त्रस्त होता.
    गेल्या शतकाच्या उत्तरार्धात 1907 साली  अमेरीकेत न्युयार्क येथे उद्योग जगतातील  महिलांची एक परिषद आयोजीत केली  होती.  त्यासाठी जगभरातून मोठ्या  संख्येने स्त्रीया एकत्र आल्या व त्यांनी विविध सोई सवलती सोबत मतदानाच्या हक्कांच्या मागण्याचे निवेदन प्रथमत: दिले .  हजारो वर्षे मत स्वातंत्र्य  जीथे नाही तिथे मतदानाचा अधिकार कसा शक्य असणार? पण 8 मार्च 1908 साली  स्त्रीयांचा मतदानाचा हक्क मान्य झाला  आणि नवे पर्व सुरू झाले .  स्त्रीयांच्या स्वातंत्र्या तील  पहिला  टप्पा पार झाला .  पुरूषाप्रमाणे आपणही स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात बरोबरीने काम करू शकतो हे सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना मिळत गेली .  बौद्धिक गुणवत्तेत स्त्रीया कुठेही कमी नसून वेगवेगल्या  क्षेत्रात स्वावलंबी होऊन स्वत:चा प्रभाव आज स्त्री सिद्ध करीत आहे. मोठ्या  शहरातील  उच्च शिक्षित स्त्रीयांना संधी भरपूर असली  तरी मध्यम शहरे व ग्रामीण भागात आजतरी स्त्रीया विविध संधी पासून वंचित आहेत.  विविध सोयी उपलब्ध नाहीत.  यासोबत कुटुंबातील  पुरूषांची नकारात्मक मानसीकता स्त्रीयांच्या वैचारीक प्रगतीच्या आड येते.  देशात कितीतरी ठिकाणी आदिवासी ग्रामीण भागात स्त्रीयांच्या विचारांना स्थान नाही, मान्यता नाही.  चेहरा पदराने लपवण्याची सक्ती आहे, स्त्रीभृणहत्या समाजाच्या सर्व स्तरात उच्चांक गाठते आहे.  मुलींना शिक्षणाची संधी नाकारली  जात आहे.  शिक्षणाचा आर्थिक भार असह्य आहे.  कायदयाने बंदी असताना सुद्धा बाल विवाह उरकले  जात आहेत.  बाल कामगार म्हणून मुलीं चा वापर फार मोठ्या  प्रमाणात होत आहे.  आनर किलींगच्या निमित्या  ने युवतींचा जीव घेतला  जातोय.  ग्रामीण भागात स्त्रीया दहशतीच्या वातावरणात जगत आहेत हे सत्य आहे.  विशेषत: लहान मुली वर लैगिक अत्याचाराचे प्रमाण फारच चिंताजनक झालेले  आहे.  पुर्वी  चार भिंतीच्या आत स्त्रीयांना धोका होताच, पण शिक्षण व विकासाची दालने जसजसी उघडायला  लागली  तसा स्त्रीयांवरील  अत्याचार, लैगिक शोषण, छेडखानी, विनयभंगाच्या प्रकारात फारच वाढ झाली  आहे.  कायदा कठोर तर हवाच.  गुन्हेगाराला  जन्मठेप वा फाशीची शिक्षा व्हायलाच हवी.  आजही महिलांना फक्त उपभोगाची वस्तू समजले  जाते हे विदारक सत्य आहे.  ** नवीन जन्म घेणारे बाळ मातेच्या उदरांत संपूर्ण सुरक्षित असतेच पण जन्माला येऊ पाहणारी कन्या [भ्रूण ]मातेच्या गर्भातही सुरक्षित नाही ,हे वर्तमानाचे विदारक सत्य आहे .केवळ मुलगी झाली या कारणाने कितीतरी मातांना जीवघेणा ,मानसिक छळ ,अपशब्द सहन करावे लागतात .**   हा दृष्टीकोन  कसा बदलेल ?
    मुलींना हीन लेखणे योग्य नाही.  मुलगी म्हणजे जगाचा मुलाधार, प्रतिष्ठा  आहे.  माहेर आणि सासरची दोन्ही कुळ  साधणारा दुवा म्हणजे मुलगी.  ती दोन्ही कुलांचं हित साधत असते.  विवाह संस्थेचं महत्व नक्कीच लक्षणीय आहे.  त्यामुळेच फार मोठा वर्ग शांततेच जीवन जगत आहे.  असे सुखी परिवार नेत्रदिपक विकास साधू शकत आहेत.  मात्र धोका इथेही दडून बसला  आहे.  अती उच्चशिक्षित असल्यामुळे  पती पत्नी दोघेही मोठ्या  पगारावर नोकरीत किंवा व्यवसाय, करिअर मध्ये व्यस्त आणि गर्क आहेत.  त्यांना कुणाचीही जबाबदारी नको आहे अगदी स्वत:च्या अपत्याची सुद्धा जबाबदारी नको आहे.  त्यांना मुल च नको आहे.  दोघेही फारसे एकमेकांसाठी वेळ  काढू शकत नाहीत आणि या वर्गामध्ये दुर्दैवा ने घटस्फोटाचे प्रमाण धोकादायक वाढलेल  आहे.  या श्रीमंत वर्गातील  स्त्रीयांना पुरेपूर स्वातंत्र्य  आहे आणि त्यांचे जीवनसुद्धा मुक्त वातावरणात त्यांच्याच इच्छेनुसार असताना कित्येकांना अपयश  का यावे ?
    स्त्रीमुक्ती या संकल्पनेचा सर्वांगीण विचार करावयाचा झाल्यास आजच्या विज्ञाननिष्ठ बदलत्या वातावरणात न जमणाऱ्या , न समजणाऱ्या , कर्मकांडांनी पुरेपूर व्यापून राहिलेल्या, दंतकथेमध्ये शोभून दिसणाऱ्या  अशा अनेक विचार, कल्पना व क्रियांपासून जाणिवपूर्वक मुक्ती मिळवणे व परंपरेच्या नावाखाली अवास्तव दबावाला  स्पष्ट  विरोध करणे गरजेचे आहे, * मात्र परंपरेने चालत आलेल्या शाश्वत सत्यांचा शुद्धबुद्धीने स्विकार करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. *  अनेक तथाकथीत तज्ञ म्हणवणाऱ्या  महाभागांकडून या विषयात जाणीवपूर्वक भ्रम निर्माण केला  जातो आणि या भुलावणीमुळे  आपण नकळत शाश्वत सत्यांनाच विरोध करू लागतो, आणि आयुष्‌यात अपयश प्राप्त होते.  कोणतेही निकष नसलेल्या खुळ्या   कल्पना पासून मुक्त व्हावयास हवे.
    ज्या प्रमाणे पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे त्याचप्रमाणे स्त्रीने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती या संकल्पनेचा विचार होईल .  आजतरी शहर असो की खेडेगाव स्त्रीयांना संरक्षणाची नितांत गरज आहे.  त्याचवेळी  महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिले  पाहिजे.  पुरूषांसोबत समाजाची मानसिकताही बदलणे गरजेचे आहे.  कायदे तर आहेतच पण कायद्याचे संरक्षण करणारे सक्षम आहेत ? हुंडाबळी  आणि विकृत, व्यसनी पुरुषांकडून स्त्रीयांवरील  अत्याचारात नित्य वाढ होत आहे.  विविध समाज घटकांनी या विषयावर गंभीरपणे विचार करायला  हवा. " स्त्रीमुक्ती व स्वातंत्र्य "  या संकल्पनाच आहेत.  प्रत्यक्षात दु:खी, गांजलेली , चिंताक्रांत अशी स्त्री स्वत:चे भविष्य बनवू शकत नाही ती भावी पिढीचे भवितव्य कसे काय बनवणार? प्रत्येक कुटुंबात स्त्रीयांना संपूर्ण सन्मान दिला  जातो का? तिच्या विचारांना मान्यता दिली  जाते का? आपसात सुसंवाद आहे का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला  विचारावयास हवेत.  स्त्री पुरूषांनी परस्पर आदर व सन्मान मान्य करून तसे वर्तन घडण्याची गरज आहे.  दोघेही समंजस व सक्षम हवेत.  ज्या घरात स्त्री दु:खी असेल  ते घर कधीही सुखी राहू  शकणार नाही.

                   सुहास सोहोनी    मोबा.९४०५३४९३५४
                 क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                 www.suhassohoni.blogspot.com
                 www.mazyasamvedana

* आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा *

       *  आम्ही नक्की कशाचा अभिमान बाlळगायचा  *

    आम्ही म्हणजे भारतीय, १२१ कोटींची प्रचंड लोकसंख्या असलेला  आपला  देश, आकाराने सुद्धा अफाट. चालिरीती, बोली , संस्कृती, विचार, कला प्रकार, नैसर्गिक वातावरण या सगळ्यात विविधता असुनही आम्ही एकसंघ आहोत, लोकशाही व्यवस्थेत कालक्रमण सुरू आहे.  वर्षामागुन वर्षे जात आहेत पण सामान्य जनता खरच सुखाने नांदते आहे? या देशाची ८० टक्के जनता सामान्य आहे.  कामगार, मजूर, शेतकरी, छोटे व्यावसाईक अशा विविध गटातील  आहेत आणि यातील  कुणीही सुखी नाहीत.  आनंदी नाहीत.  त्रस्त आहेत वाढत्या महागाईने, रोजच्या छोट्या छोट्या गरजेच्या  वस्तू  मिळवतांना चिंताक्रांत  आहेत , नित्य पसरवल्या जाणाऱ्या  राजकीय विदवेशाने, पावला  गणीक नाडवल्या जाणाऱ्या  भ्रष्टाचाराने सामान्य माणूस त्रस्त आहे.  असुरक्षित आहे नक्षली  हल्ले , दंगे, अत्याचार बाँम्बस्फोट, हलगर्जी  पणाने घडणारे लहानमोठे अपघात, माफीयांचा आतंक, सत्ता आणि पैसा यात आकंठ बुडालेले  नेते, त्यांची सततची बेताल  वक्तव्ये, सगळ्या  समस्या प्रलंबित, त्यात रोज नव्या समस्या, जनता त्रस्त आहे.

    जास्त धोकादायक जर काही असेल  तर ते म्हणजे सामान्य माणसाला  सहन करण्याची, दहशतीत जगण्याची, त्रस्त असण्याची सवय झाली  आहे.  कसला तरी अभिमान वाटावा अस चौफेर काही दिसत नाही सत्तेत असलेले  किंवा सत्तेच्या जवळ  असणारे प्रत्येक विषयात कमाई करताहेत.  शिक्षणाचा पार बाजार झाला . नोकऱ्या  विकावू झाल्यात.  जमीनी पद्धतशीर बiकावल्या जातात.  अवाच्या सव्वा भावाने विकल्या जातात.  त्यासाठी दंगे घडवले  जातात गोळी बार होतो.  आम्ही दहशतीत जगतो.  राजकारण खेळले   जाते, गरीबांच्या प्रेमाचे नाटक खेळले  जाते.  संतत दहशतवादी हल्ले  होतात.  किड्या  मुंग्यासारखे सामान्य लोक रस्त्यात मरून पडतात.  आप्तस्वकीय गमावलेले  धाय मोकलून रडतात, कायमची मोडून जातात.  आपले  कुणी मेलं  नाही म्हणून बाकीचे थोडं सुखावतात.  आणि गप्प राहतात.  काही दिवस धावपळ , कवायत, मेणबत्यांचा मोर्चा, मानवी साखळी , मुंबईकरांची जगण्याच्या स्पिरिट साठी तारीफ आणि पुन्हा दहशतीत रोजच जीवन, पुन्हा राजकारण, बेताल  वक्तव्ये. देशात सर्वोच्च आहे ती संसद, त्या संसदेच्या सार्वभौमत्वावर आतंकी हल्ला   झाला  तरीही आम्ही निषेधाचे खलीते सोपवतोय.  कणखरपणे धडा शिकवू शकत नाही.  याचा आम्ही अभिमान बाळगायचा का?
       नवनवीन आतंकी संघटना नावं बदलवून निर्माण होत आहेत.  विविध मार्गाने आतंकी देशात दाखल  होत असल्याचे सांगितले  जाते.  स्फोटके सहजपणे आणली  जातात, दहशत माजवली  जाते.  काही घडत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत असे म्हणायचे. नक्षल  चळवळ  हा दहशतवादच आहे.  अशा राज्यांमध्ये सरकार नेमकं कुणाचं, हाच प्रश्न पडतो.  अभिमान वाटावा असं काहीही दिसत नाही.  जे आधीच गब्बर आहेत तेच शिक्षण सम्राट, उद्योग सम्राट, मिडिया सम्राट बनून साम्राज्याचा उपभोग घेत आहेत.  शिक्षण स्वस्त नाही, औषधोपचार पराकोटीचा महाग, योजना फक्त उरल्या कागदांवर.  शेतकऱ्याची व्यथातर त्यांच्या घरात जन्म घेतल्याशिवाय खरोखर इतरांना समजणारच नाही. मजूर, शेतकरी, अत्याचारग्रस्तांचे मृत्यू हे चित्र अभिमान वाटावा असं नाहीच.  देशातच लपवून ठेवलेली  आणि विदेशात पळवून नेलेली  संपत्ती लाखो करोडोच्या घरात आहे.  अफाट धन संग्रही असणारे बाबा, संत, महाराज तसेच मोजता येणार नाही इतकी संपत्ती दडवून ठेवलेली  मंदीरे.  काय कामाची ही प्रचंड धनराशी जी देशाच्या काहीही उपयोगी नाही.  देशाचं सामर्थ्य  , विकास यांची भलावण आमच्या समोर केली  जाते पण प्रत्येक क्षेत्रात किती गोंधळ  आहे,* नित्य  प्रचंड घोटाळे  उघडकीस येत आहेत.*  धन कमावण्याची इतकी निलाजरी धडपड दिसते आहे की हे सगळ  कुठे जावून थांबणार हेच कळत नाही. ज्यांनी जनतेचे संरक्षण करायचे तेच खुर्ची ,तिजोरी आणि लाठी च्या जोरावर मलिदा कमावताहेत. सगळेच आरोप नाकारले जातात मग अत्यंत कमी काळात हे सगळे अरबो ची दौलत कशी काय मिळवतात हे  कुणी सिद्ध करून यांना शिक्षा देईल का ? खरंच , ' अभिमान वाटावा असं काही आहे?' आम्ही नक्की कशाचा अभिमान बाळगायचा?*
            सुहास सोहोनी .९४०५३४९३५४
            क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
            www.suhassohoni.blogspot.com

हसा आणि हसवत रहा

       *   हसा आणि हसवत रहा    *

    हास्य आणि निरोगी असणं या दोन गोष्टी चं अतूट नातं आहे.  आपण दिवसातील  किती वेळ  हसतो, अगदी खळखळुन हसतो हा प्रश्न स्वत:लाचच विचारून पहा, उत्तर मिळेल  .  फारस न हसणारे एका नकारात्मक भावनेत जगत असतात.  समस्या आणि फक्त समस्या.  यांचच तुणतुणं वाजवणारे अवतीभवती असतात, अशाच विचारांचा कोष तयार करून त्यातच राहणे पसंत करतात, आणि हसण मात्र विसरून जातात.  आपल्याला  मिळालेलं  हे सुंदर जीवनाचं भाग्य कस उपभोगायच यावर सकारात्मक विचार करण्याची गरज आहेच.  काही व्यक्तींना खळखळु न हसण आवडत नाही, कमीपणा वाटतो, अवखळपणा वाटतो, पण नेमक्या वेळी  मनसोक्त आनंद लुटण्याच राहुन जाते हे बरोबर नाही.
    विनोदी कथा, प्रासंगिक, चुटके, किस्से, टिव्ही चेंनल  वरील  हिंदी मराठी हास्यविनोदी कार्यक्रम यांची अगदी रेलचेल  दिवसभर असताना त्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे.  आपल्या परिवारासोबत, मित्रमंडळी सोबत हास्यविनोदाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच असते.  चेहऱ्याचे सगळे  स्नायु मोकळे  होतात.  मन प्रसन्न होते, प्रत्यक्ष हसतांना हसणाऱ्यांचे  मजेदार वेडेवाकडे होत असलेले  चेहरे पाहुनच खरे म्हणजे भरपूर हसायला  मिळते.  मनमुराद हसण्याचा आनंद लुटलाच पाहिजे.  निखळ  हास्यासारखे दुसरे औषध नाही.
    एका विशिष्ट  वयानंतर समस्यांच आक्रमण वाढल्यामुळे  किती तरी वेळा  हसायचं राहुन जात, असं व्हायला  नको. हास्य क्रियेचे बहुमुल्य क्षण सतत जमतील  तसे वेचत रहायला  हवे.  आपण हास्य क्लबचे सक्रीय सदस्य बनण्यातच मजा आहे.  दिवसातून जमेल  तेव्हा मुद्दाम विनोदी किस्सा मोठ्या  ने वाचणे,
 व्यंगचित्र पाहणे, त्यातला  आनंद घेणे, इतरांना हसवणे हे ज्याला  जमले  त्याचे भले  होणार म्हणून समजावे, तेव्हा हसा आणि हसवत रहा हे सुत्र जोपासा आणि जीवन आनंदमय बनवा, हसा आणि लठ्ठ  व्हा, पण निरोगी व्हा.
                        ुुुसुहास  सोहोनी-- मोबा.९४०५३४९३५४
                                क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com

मिडियातील करिअर - आव्‌हानात्मक संधी

         *  मिडियातील  करिअर - आव्हानात्मक संधी  *

    पत्रकारीतेत वृत्त संकलन करून प्रभावीपणे ती घटना जनतेसमोर मांडणे हा महत्वाचा विषय आहे.  आधीच प्रिंट मिडिया आणि टेलीव्हिजन वरील  वृत्तवाहिन्या संख्येने खूप जास्त आहेत, सहाजीकच चढाओेढ आहे.  म्हणजेच कल्पकतेला  प्रचंड वाव आहे.  देशात कुठेही खट्ट झाले  तरी काही मिनीटात ती बातमी दिली  जाते.  नीट विचार केला  तर ही एक संधी आहे करीअरसाठी.  टी.व्ही. वर बातमी येईपर्यंत कितीतरी लोक त्यासाठी काम करतात.  पत्रकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार, संगीतकार, असा  मोठा ताफा कायम व्यस्त असतो, तसेच विविध विषय सामाजीक, राजकीय, आर्थिक, औद्योगिक, गुन्हेगारी, पर्यटन, धार्मिक, वैचारीक अशा अनेक विषयात चतुर पत्रकारांची, सुत्रसंचालकांची, निवेदकांची सतत गरज असते.  प्रिंट मिडीया आणि टि.व्ही. न्युज चेंनल्‌स यांचा पसारा, आवाका इतका मोठा आहे की देशाच्या कानाकोपऱ्यात व विदेशात सुद्धा याचं जबरदस्त नेटवर्क आहेच.
    या क्षेत्रात प्रवेश करू इच्छणाऱ्या  तरुणांसाठी काही विशेष गुणवत्तांची गरज आहे.  अनेकानेक भाषा सफाईदारपणे बोलता व वाचता यायला  हव्यात.  सतत अभ्यासू वृत्ती हवी.  या क्षेत्रात नित्य नव्या विषयांच्या मागे धाव घेतली  जाते.  जास्तीत जास्त विस्तृत माहिती त्वरीत आणि आपल्याच  माध्यमाने द्यावी यासाठी अथक परिश्रम घ्यावे  लागतात.  खऱ्या खोट्या ची शहानीशा करून नेमकी व योग्य तेवढीच माहिती प्रस्तृत करायची असते.  कुठेही स्वत:चा कल्पना विलास नसावा.  विविध क्षेत्रातील  नामवंत मंडळी ची भेट होणे, ही सुद्धा नित्याचीच, आनंदाची बाब आहे.  विविध मान्यवरांशी चर्चेची, सिनेमा नाटक क्षेत्रातील  ज्येष्ठाशी मुलाखतीची संधी मिळुन आपले  व्यक्तीमत्वात सकारात्मक गुणवर्धन होते.  मात्र वेळेचे बंधन नसल्याने सदैव सज्ज असावे लागते.  प्रतिकूल  परिस्थितीत सुद्धा कार्यतत्पर असणे आवश्यक आहे, म्हणजेच आपण सुदृढ, निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे.
    इलेक्ट­ॉनिक्स व प्रिंट मिडिया यात करीअर करू इच्‌छणाऱ्या  तरुणांनी मासकम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.  अनेक विद्यापिठात सध्या हा विषय आहे.  पत्रकारिता किंवा जनसंवाद हे पदवीनंतरचे अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे असतात.  चेन्नई येथील  अण्णा युनिव्हर्सिटीने पाच वर्षाचे कॉ°म्प्‌युटर सायंन्स, इन्फर्मेशन टेक्‌नॉलोजी, मास्टर आफ सायंन्स इन इलेक्ट­ॉनिक मिडिया हे अभ्यासक्रम सुरू केले  आहेत.  सध्या आपल्या देशात माध्यम क्रांती होत असून चांगल्या व दर्जेदार मनुष्यबळा ची फार चणचण आहे.  वृत्त संकलनात नित्य वेगळे पण ही या क्षेत्रातील  मेख आहे,  नाविन्याचा ध्यास, जिद्द, चिकाटी, परिश्रम, झोकून देण्याची वृत्ती, निडरता, कळवळा  आणि सचोटी या गुणांच्या जोरावर मिडियातील  करिअर जीवनाचा आनंद मिळवून देऊ शकते.  तरुणांनो प्रयत्न करा, शुभेच्छा आहेतच.
                        ुुु सुहास सोहोनी   मोबा.९४०५३४९३५४
                               क्षण  वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
                              www.suhassohoni.blogspot.com
                               www.mazyasamvedana