स्त्रीने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा
हुंडाबळी , विवाहितेचा जळुन मृत्यू, सासरच्यांकडून छळामुळे आत्महत्या अशाप्रकारच्या बातम्या वाचायची जणू आता सगळ्यांना सवयच झाली आहे.त्या बातम्या आपण सकळच्या चहा बरोबर वाचतो आणि दुपारपर्यत विसरून जातो. व्यक्ति स्वातंत्र्य आणि गुलामगिरी विरुद्ध गप्पा मारणाऱ्या या देशाच्या जवळ जवळ 50 टक्के लोक (ज्यात स्त्रिया आहेत असे गृहीत धरु) छळ , अत्याचार या दुष्ट चक्रात अडकले आहेत.
माझ्या मते ज्या घरातली स्त्री दु:खी असेल, ते घर कधीही सुखी होऊ शकणार नाही त्या कुटूंबाला कदापिही मानसिक समाधान व शांतता लाभणार नाही. छळ करणारा पती, सासू, सासरा हे गुन्हेगार तर आहेतच पण त्याआधी ते विकृत मनोरुग्ण असतात. इच्छेपुढे त्यांना परिणामाची फिकीर नसते. नीती, अनीती, सुख दुखः यातील सिमारेषांचे त्यांचे भान नाहीसे झालेले असते. अधोगतीला नेऊन पोहोचवणारा अहंकार, पराकोटीचा स्वार्थ आणि लोभाच्या ते पूर्ण आहारी गेलेले असतात. अन्यथा भविष्याच्या सुखद स्वप्नांवर तरंगत पतीच्या भक्कम आधाराची अपेक्षा करून सासरी आलेल्या नवपरिणीत वधूवर हे राक्षसी मनोवृत्तीचे लोक जूलूम का करतील?
आपल्या दारूड्या आणि व्यसनी मुलाचे लग्न करून दिले की तो सुधारेल अशी भ्रामक कल्पना बऱ्याच आईबापांची असते. परंतू मुलीच्या पालकांनी तरी मुलाची समग्र माहिती अवश्य काढायला हवी. बऱ्याच वळा इतर फायदयाच्या गोष्टी पुढे व्यसनांसारख्या दुर्गृणांकडे डोळेझाक केली जाते, अशा घरात मुलगी देणे म्हणजे तिच्या दुर्दैवाची सुरूवात स्वत:च्या हाताने करून देण्यासारखेच आहे. आपल्या मुलाच्या दुर्गूणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या पत्नीलाच दोषी ठरवून, तिच्यामुळे हा व्यसनी झाला अशी बोंब करायला हे महाभाग मागेपुढे पाहत नाहीत, मग सगळ्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिला आत्महत्या करणे,घटस्फोट घेणे किंवा अत्याचाराला सामोरे जाणे याशिवाय गत्यंतर उरत नाही. खरोखरच हे दुïचक्र आहे, सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या संस्था, युवकांच्या वेगवेगळ्या संघटना आणि या *समाजमनाने* या विषयावर गंभीर विचार करायला हवा. अत्याचार ग्रस्त दु:खी, गांजलेल्या आणि चिंताक्रांत अशी स्त्री स्वत:चे भवितव्य बनवू शकत नाही, ती भावी पिढीचे भवितव्य कसे काय बनवणार? नव्या शतकात वाटचाल करणाऱ्या स्त्रिने अती परावलंबीत्वाचा त्याग करायलाच हवा. हे प्रत्येक व्यक्तिने समजून घेणे आवश्यक आहे.
सुहास सोहोनी -----९४०५३४९३५४
उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह २००७]
www.suhassohoni.blogspot.com