देव देवलातच असतो का ?
मंदिरात पूजा आर्चा करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली असेल, जो कोणत्याही समाजाचा असेल, त्याच्या शिवाय कुणाही स्त्री किंवा पुरुषाने गाभार्यात स्वतः होऊंन जाऊ नए। खर तर देव दर्शनासाठी केंव्हा जाऊ नए हे स्त्रियांना स्वाताहलाच समजते, पण देवालयात गाभार्यात प्रवेश करणारे पुरुष स्वच्छतेचे कितीसे पालन करतात ? तोंडाला पानमसाला, गुट्ख्याचा उग्र वास, अंघोळ न केलेले अंगाला व कपड्यांना कूबत वास असलेले आणि तोंडाला चक्क दारूचा वास येत असलेले अनेक महाभाग देव दर्शनाच्या रांगेत लागलेले आढल्तात। देव दर्शन प्रत्येकासाठी मुक्त असलेच पाहिजे। व दर्शनासाठी उभे राहिल्यावर पुढे सरका असेही हकालल्या सारखे कुणी म्हणु नए। देव दर्शन हा आनंदाचा क्षण आहे। गाभार्यात जाऊंन मूर्ति ला स्पर्ष करण्यानेच कृपा होते हा एक समज। गाभार्या बाहेर उभ राहून, डोळे भरून, सर्व सुख दुख विसरून, त्या तेजाच्या मूर्ति कड़े बघत बसणे, हा खरा आनंद आहे।देवाचिये द्वारी ऊभा क्षण भरी अशी आनंदाची स्थिति अनुभवणे सोडून , वादाच्या ठिणग्या का फेकल्या जातात ? त्या पेक्षा आपली देवालय शांत, सुन्दर, स्वच्छ कशी राहतील, हे तपासण्याची गरज आहे । मुर्तिवर अभिषेक, त्यामुलेच दूध, दही, पाणी, त्यातच भिजलेली सर्वत्र पसरलेली, वास येत असलेली, फुले, सभामंडपात पायाखाली तुडवली जाणारी फुले, या बाबत कृति हवी। दोन तिन मजले चढून व उतरून, कठडयातुन रांगेत आल्यावर, काही तासांनी देव दर्शन होत। अति श्रीमंत देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान असाही एक भ्रम आहे। शेवटी भक्तान्चिच इच्छा दुसरे काय !
आजकल सगले देव सोन्याचे कसे करता येतील, मुर्तिवर सोन्याचे कपडे, त्यावर हीरे माणके, सोन्याचे सिंहासन, सोन्याचाच कलस कसा बसवता येइल, ह्या धेयाने भक्त गण वेडे ज़लेले आहेत। गावो गावची जुनी मंदिरे व निर्माण होत असलेली नवी मंदिरे, त्यावर होणारा कोट्यावधीचा खर्च , दनाद्वारे येणारा अफाट पैसा, आणि श्रीमंत देव देवता या परश्वाभूमीवर मनात विचारांच आन्दोलन सुरु की या देशात दररोज कुपोषित बालके का मारतात ? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण। औषधोपचार या प्राथमिक गोष्टीपासून करोडो नागरिक का वंचित आहेत ? देव दर्शानासाठी अफाट गर्दी असताना तीच जनता, व्यसनाधीन, भ्रष्ट, विक्रुतान्ध का ? देव देवलातच असतो का ?
सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती
please visit at : www.suhassohoni.blogspot.com