Monday, June 22, 2015

ट्रेफिक सेफ्टी संबंधी .... काही प्रश्न आपलेच ...उत्तर ही आपल्याच मनात


ट्रेफिक सेफ्टी संबंधी ....
काही प्रश्न आपलेच ...उत्तर ही आपल्याच मनात
१] घरातील सर्वांचे वाहन परवान्यांचे नुतनीकरण झाले आहे ?
२] वाहनांची नियमित सर्व्हिसिंग होते ?
३] रस्त्यावरील गड्डे ,अयोग्य व अनधिकृत स्पीड ब्रेकर्स ,पार्किंग, सिग्नल्स,सूचना फलक योग्य आहेत ?
यापासून काही त्रास जाणवतो ?
४] आपल्या वाहनाचा वेग योग्य असतो ना?
५] वाहन चचालवतांना आपण मोबाईलवर बोलता का ?
६] वाहन चालवतांना ऑफिस /घरातील विचार /हातवारे करणे / पुटपुटणे असे होते का ?
७] घरातील प्रत्येकाचा **ट्रेफिक एक्सिडेंट इन्सुरंस** [रस्ता अपघात विमा ] आहे का ?
 ८ ] वाहन क्षमते पेक्षा जास्त व्यक्ती बसवता का ?
*बर्याच वेळा निष्काळजी पणाने सुद्धा नुकसान होते *
सुहास सोहोनी ,
मोबा :९४०५३४९३५४
ट्राफिक सेफ्टी ग्रुप

Wednesday, June 17, 2015

* आमची उत्सवप्रियता आणि रस्त्यांची दुर्दशा *



==================================
* आमची उत्सवप्रियता आणि रस्त्यांची दुर्दशा *
                                        आम्ही स्वतःला उत्सवप्रिय म्हणवतो आणि कोणत्याही कार्य ,उत्सव प्रसंगी मंडप,कमानी लावण्याकरिता पहिला घाव रस्त्यांवरच घातला जातो .कार्य काहीही असले तरी शहरभर ठिकठिकाणी रस्त्यांवर शामियाने टाकले जातात ,रोषणाई केली जाते आणि काम संपले की रस्त्यावरचे गड्डे तसेच सोडून दिले जातात .ते विद्रूप झालेले ओकेबोके केविलवाणे रस्ते बघवत नाहीत .दिवसा आम्ही ते खाचखळगे सराईत पणे चुकवतो पण रात्रीच्या अंधारात आम्ही वाह्नांसकट त्यात उसळतो .
                   ज्याप्रमाणे सुदृढ माणसाच्या शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ व निरोगी असतात त्याचप्रमाणे शहरातील रस्ते स्वच्छ व मजबूत असावेत .अवरुद्ध झालेल्या रक्तवाहिन्यांनी शरीराला गंभीर आजार होतो तसेच अयोग्य व विद्रूप रस्ते नागरिकांचे हाल हाल करतात .मनस्ताप ,चिडचिड ,सांधे,मणके,व कंबरेच्या दुखण्यांनी नागरिक त्रस्त होतात .
                   यावर उपाय काय ?प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या उत्सव समस्येचा विचार करावा .आजचे सुंदर रस्ते उसाव काळात विद्रूप होण्यापासून वाचवा .नागरिकांनी सुद्धा सकारात्मक विचार व कृती करून प्रसाशनाला सहकार्य करावे हि विनंती .
सुहास सोहोनी
*संवेदना*
[सामाजिक विचार मंच ]
विवेकानंद कॉलोनी,अमरावती.मोबा -९४०५३४९३५४

Monday, June 15, 2015

## रस्ते स्मार्ट तरच शहर स्मार्ट ##


संवेदना 
(सामाजीक विचार मंच, अमरावती )
==================================
## रस्ते स्मार्ट तरच शहर स्मार्ट ##
     एखाद शहर  स्वच्छ , सुंदर आहे का ? हे ठरवायचे असेल तर त्या शहरातील रस्ते कसे आहेत ते आधी बघावे लागेल . रस्त्यातील खाचखळगे गड्डे,फुटपाथ ,आजूबाजूच्या उघड्या नाल्या ,गटार ,सर्विस लाईन,जोडरस्ते या सर्वांचा आढावा घ्यावा लागेल .याबरोबरच स्पीड ब्रेकर च  बांध  काम फारच महत्वाच ठरत .स्पीड ब्रेकर्स कुठे ? कसे? किती? आणि किती उंच असावेत याची विशिष्ठ संहिता आहे .जिथे आवश्यक तेथे नेमके स्पीड ब्रेकर्स नसतात ,पण नको तेथे जास्त संख्येने असतील तर काय घडेल ?
        अतिशय महत्वाचे म्हणजे प्रत्येक स्पीडब्रेकर वर पिवळे पांढरे पट्टे असण अत्यंत महत्वाच आहे ,जेणेकरून पुढे स्पीडब्रेकर आहे हे जाणवत आणि वाहनांची गती नियंत्रित करता येते,म्हणजेच अपघात होण्याची शक्यता कमी होते.नियमापेक्षा जास्त उंच स्पीडब्रेकर असल्यास आजूबाजूने वाहन नेण्याचा प्रयत्न होतो आणि धोका वाढतो.रंगीत पट्टे नसल्याने अचानक वाहन उसळते ,घसरते ,गंभीर अपघात होतात .कंबर पाठीचे दुखणे सुरु होते ,म्हणजेच चांगल्या रस्त्यांवर योग्य स्पीडब्रेकर्स ला फारच महत्व आहे .
         महानगर पालिका ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,प्रादेशिक परिवहन विभाग च्या संबंधित अधिकार्यांना नम्र विनंती आहे कि मजबूत रस्ते,स्पीड ब्रेकर्स,रंगीत पट्टे ,आणि झेब्रा क्रॉसिंग याकडे कृपया जातीने लक्ष द्या .जर तृटी असतील तर कृपया लवकर दुरुस्ती करावी.शहरातील व शहराबाहेरील वाहतूक सुसह्य करा .पिवळ्या पांढर्या पट्ट्यांमुळे आपोआपच वाहतूक नियंत्रित होईल ,अपघात होणार नाहीत.कारण- रस्ते स्मार्ट तरच शहर स्मार्ट .
सुहास सोहोनी
[सामाजिक विचार मंच,अमरावती ]
विवेकानंद कॉलोनी,अमरावती.मोबा -९४०५३४९३५४