Saturday, February 11, 2012

आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी

 सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
आरोग्याविना अर्थार्जन - कुणासाठी

     लहानपणी वयवर्ष १५ पर्यंत भरपूर हालचाल आणि खेळ यामुळे शरीर व्यवस्थित असते, म्हणजेच  आरोग्याच्या दृष्टीने करोडपती असते, मात्र पुढे आयुष्यभर तसेच राहील कि नाही हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. बैठी जीवन पद्धत्ती अळस व्यायामाचा अभाव अबर चबर खाणे या मुले वाढलेले वजन, शरीराचा मोठा घेर आणि तरीही शरीर बिचारे विनातक्रार वयाच्या ४० - ४५ वर्ष पर्यंत काम करताच असते. आर्थिक साम्पातीत भर पडत असते, भौतिक सुखाची चटक वाढलेली असते, नंतर मात्र शरीराचा मेनटेनन्स खर्च सुरु होतो. पावलान पासून डोक्या पर्यंत सगळे अवयव दुखू लागतात. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत ही व्यक्ती करोडपतीची लखपती बनलेली असते. मग सुरु होतात डॉक्टरांकडे वाऱ्या. कुणीतरी सांगितले म्हणून प्याथी बदलवून नव नवे उपचार सुरु होतात. आधी गावातले हॉस्पिटल, मग मोठ्या शहरातले मोठे हॉस्पिटल.  पुढे काय ?   सुज्ञास सांगणे न लागे !  घरात भिंतीवर फ्रेम मध्ये हक्काची जागा .

         जस जशी आर्थिक संपत्तीत वाढ होते आणि भौतिक सुखाच्या पूर्ण आहारी माणूस जातो तेव्हा अधिक संपत्ती, मग अधिक सुख या दीर्घ चक्रव्युहात तो गरा गरा फिरत राहतो. त्याची सुटकाच होत नाही. कुटुंबाच्या महागड्या मागण्या त्याला पूर्ण करावयाच लागतात त्यासाठी अर्थार्जन आणि फक्त अधिक अर्थार्जन एवढेच करणे क्रमप्राप्त ठरते. नीती नियमांचे बान्ध त्याला थोपवू शकत नाहीत. त्याच्या मालकीच्या आणि  उपयोगाच्या प्रत्येक वस्तूंची तो उत्तम काळजी घेतो. संगणक, कार, स्कूटर, फ्रीज यांची तो तत्परतेने दुरुस्ती करतो. या तत्पर्तेबद्दल नेहमी अभिमानाने सगळ्यांना सागतो. मात्र सतःच्या शरीराची वर्तमान स्थिती समजून घ्यायला नकळत विसरतो. आरश्यान न मावणार स्वतःच शरीर पाहून सुखावतो. पण याच वेळी आरोग्याच्या बाबतीत लाखपतीचा दरिद्री झालेला असतो. सगळ्यात दुर्दैवी बाब अशी कि, अफाट मिळवलेली संपत्ती सुद्धा जीव आहे तोवर जगवा, म्हणून खर्च करावी लागते.

      स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून केलेलं अर्थार्जन खरच काय कामाचं. कुणासाठी केलं हे अर्थार्जन ? मुलांसाठी. विनामेहनत मिळालेली संपत्ती, मुलं टिकवतील कि उधळतील ?
मग ! डॉक्टर मंडळी मात्र नक्कीच श्रीमंत होतात. प्याथ्यालॉजी ल्याब, केमिस्ट, सगळ्यांना चं धंदा मिळतो. पण आपल काय ? लहानपणी मिळालेल्या करोडपती शरीराला आपण आपल्याच कर्माने आरोग्याच्या दारिद्र्य रेषेकडे घेऊन जातो. आरोग्याची संपत्ती नष्ट होण्या आधी मधेच कुठे तरी थांबायला हवे. आरशात बाह्य शरीर बघतांनाच शरीराच्या आत डोकावून पाहायला हवे. काही दुरुस्त्या, सुधारणा, जीवनशैलीत बदल साधायला हवा. सुधृढ आरोग्याच्या लाभासाठी चतुःसुत्रीचे आचरण स्वीकारावयास हवे. ही लाख मोलाची चतुः सूत्री म्हणजेच  १. आहार,  २. विहार, ३. योगाभ्यास (व्यायाम), ४. मनः शांती. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली व शरीरावर प्रेम केले तर पुन्हा लखपती आरोग्यवान होता येते. तेव्हा आरोग्याविना अर्थार्जन कुणासाठी ?

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Tuesday, February 7, 2012

अशीही एक लढाई पाण्यासाठी

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
अशीही एक लढाई पाण्यासाठी 

    आपल्या सूर्यमालेतल्या ज्या ग्रहांवर पाणी उपलब्ध नाही तेथे जीवसृष्टी आहे का ? आपल्या पृथ्वीवर जेथे आज वालवंत आहे अश्या ठिकाणी सुद्धा जीवन थांबलेले आहे. ज्यांना शक्य झाले त्यांनी स्तलंतर केले व जेथे पाणी आहे तेथे वस्ती केली. पाणी या दोन अक्षरी शब्दांमध्ये किती प्रचंड शक्ती आहे हे आपण नेहेमी पाहत आलो आहोत. पाण्याच्या थेम्बाने जीवन दान मिळते. शांत शुद्ध जलाशयामध्ये कितीतरी जीव संस्कृती कालक्रमण करतात तर त्याच पाण्याच्या अनिर्बंध वेगवान प्रवाहामुळे जीवसंस्कृतीचा नाश होत आला आहे, हे काही नवीन नाही. हि निसर्ग लीला आहे. पृथ्वी वरील उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठया पैकी पिण्या योग्य गोड्या पाण्याचा साठा कमी होत आहे. हे खरे आहे. पाऊस लहरी झाला आहे. 
 
       या पार्श्वभूमीवर जेव्हा एखाद्या ठिकाणी गाव तलावाचे काम सुरु आहे, दुरुस्ती सुरु आहे, गाळ उपसणे सुरु आहे, अश्या बातम्या कळतात तेव्हा सुखद आनंद होतो. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या पाणी विश्वक लढ्यात तत्परतेने गावतलाव निर्माण करणे या संकल्पनेला फार महत्व आहे. सरकारी अनुदानाने असो किंवा सामाजिक संस्थांच्या मदतीने असो पण कमीत कमी दोन एकराचा तलाव प्रत्येक गावासाठी अनिवार्य केले गेले पाहिजे. पाण्याचे असे असंख्य साठे निर्माण व्हायला हवेत. गावकर्यांमध्ये जागृती हवी. आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीसाठी गावतलावासाठी दान करावे. हे दान सत्पात्री असून हे सत्कार्य आहे. समाजामध्ये काही लोकांकडे अफाट संपत्ती आहे. त्यांनी त्यांच्याच गावात जरी तलाव निर्माण केला तर त्यांच्या जीवनाचे सोने होईल. अश्या साठ्यांमुळे जवळपासच्या विहिरींना पाणी झिरपेल, प्रत्येक तलाव भोवती "स्मृतीवनाची" कल्पना अमलात आणावी, म्हणजे अनायसे वृक्ष संवर्धन होईल.
        आपल्या देशात अंदाजे तीन लाख छोटी मोठी गावं आहेत. तेवढे पाण्याचे साठे आणि स्मृतीवाने निर्माण झाली तर हे निसर्गचित्र नक्की सुंदर दिसेल. दरवर्षी उत्तर भारतात नद्यांचे पाणी प्रलय निर्माण करतात. या नद्या समुद्र सपाटीपासून ५ ते ८ हजार फुटावर वाहतात. कोठेही मोठी धरणे न बांधता  " सायफन " पद्धतीने देशात अनेक ठिकाणी पाणी साठवता येईल. जगात तेलाच्या पाईपलाईन आहेत. तर ते मध्यम आपण पाण्यासाठी वापरायला हवे. त्या पद्धतीमुळे कोणतेही गावं किंवा जमीन पाण्याखाली जाणार नाही. पाणी संवर्धनाचा मोठा शत्रू म्हणजे बोअरवेल. जमिनीतील पाण्याचा फार मोठा उपसा या बोअरवेल पद्धतीने झाला आहे. भूगर्भातील पाण्याचा साठा आटत चालला आहे. जमिनीत पाणी जिरवण्याच इच्छाशक्ती किंवा जाणीव नसतांना पाण्याचा उपसा करण्याचा काय अधिकार आहे ? 

       रोटरी क्लब, लायन्स इंटरन्याशनल, अश्या अनेक संस्थांनी या कार्याला आग्रा क्रम द्यावा. प्राणी मात्रांचे जीव सुखावतील. हे कार्य म्हणजे पुढील अनेक शतकांसाठी सकारात्मक कार्य म्हणून इतिहासात नोंद होईल. सेवाभावी संस्था व धनवान लक्ष्मीपुत्रांनी हे सकारात्मक कार्य करावे ही माझी कळकळीची विंनती आहे. भारतीयांचे कोट्यावधी हात या निसर्गाचे संतुलन सांभाळतील हा विश्वास आहे.

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.