Tuesday, October 18, 2016

असा मोर्चा असावा

💥एक अतिभव्य ,महामोर्चा मला काढायचा आहे.
सर्वच भारतीयांना आग्रहाचे आमंत्रण आहे.
★प्रत्येकाने मनाने व कृतीने या महामोर्चात सामील व्हायचं आहे.कन्याकुमारी ते श्रीनगर आणि जगन्नाथ पुरी ते पोरबंदर असा भारतभर करोडो भारतीयांचा अतिभव्य महामोर्चा सुरु होत आहे
■या महा मोर्च्यात मागण्या आणि घोषणा आहेत : -
★जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवा . ★शेतकरी वाचवा .
★ प्रदूषण नष्ट करा (परिसराचे व मनाचे) ★भ्रष्टाचार मुक्त भारत.
★ कायद्याचे पालन व्हावे,लवकर (अविलंब)न्याय मिळावा.
★ प्रत्येकाला शिक्षण
★ प्रत्येकासाठी दर्जेदार आरोग्यसेवा हवी. ★जातीभेद नष्ट करा.
■ करोडो भारतीयांना रोज या मोर्च्यात यायचं आहे.
■सारे भारतीय एक झाले तर काहीही अशक्य नाही.
◆स्वागत आहे◆
◆आजपासून आणि आत्तापासून हा महामोर्चा सुरु झाला आहे.
■ शुभकार्यासाठी मुहूर्ताची गरज नाही ■ * सुहास सोहोनी
★संवेदना★
[ सामाजिक विचार मंच] ,
अमरावती

💥अन्नाचा आदर करावा💥

                                               💥अन्नाचा आदर करावा💥
               ★अन्न वाया जाणे म्हणजे नक्की काय हे आजकाल मोठमोठ्या जेवणावळींच्या ठिकाणी नित्य पहावयास मिळते.अर्धवट खाऊन सोडून दिलेलं अन्न थाळीमध्ये पडलेलं असतं .जेवणात बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जेवतांना अनेक पदार्थ मागवायचे,हवं तेवढं खाऊन बाकीच टाकून दिलं जातं. वाया जाणाऱ्या एवढ्या अन्नात कितीतरी उपाशी परिवार भरपेट जेवले असते.
           ★अन्न हे पूर्ण ब्रम्ह असून पानात घेतलेले सगळे पदार्थ खाल्लेच पाहिजे ही सक्तीची शिकवण आजच्या पिढीला दिली जाते की नाही ? कच्या बच्यांसाठी दररोज अन्नाची सोय करतांना ८०% जनता अक्षरशः जीवाचं रान करते. मोलमजुरी,काबाडकष्ट करून आपल्या अन्नाची सोय करणारे एकीकडे कायम चिंताग्रस्त असतात तर अन्नाची किंमत नसलेले अंगात माज आल्यासारखे अन्नाची नासाडी करतात . इतके अन्न वाया जातांना पाहून हे अस्वस्थ नाही होत ? किती विरोधाभास आहे हा ! ★ लहानपणी मुलांना एका दयाळू राजाची गोष्ट सांगितली जाते.त्या राजाला आपल्या प्रजेची मनापासून काळजी होती .माझ्या राज्यात एकही नागरिक उपाशी झोपू नये यासाठी त्याचे सतत लक्ष असे .प्रजा सुखी,आनंदी व सुरक्षित राहण्यासाठी तत्पर असणे हेच राजाचं कर्तव्य आहे ,अस त्या राजाचं मत होतं. ★भविष्यात असे दयाळू राज्यकर्ते असतील ? ?
          ★गरजेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व कमी श्रमात अती श्रीमंत असणाऱ्या २०% जनतेला अन्न मिळवण्यासाठी काबाडकष्ट करावे लागत नाहीत हे मान्य आहे पण अन्नाची किंमत सुद्धा समजू नये याचं फार वाईट वाटतं . आपल्या शरीराचं सुयोग्य पोषण करणाऱ्या अन्नाचा आदर करण्याची शिकवण बालपणीच देण्याची गरज आहे .अन्नाचा आदर करावा. लेखसंग्रह :घे उंच भरारी. (2016) लेखक : सुहास सोहोनी
अमरावती
मोबा : 8626060646