Wednesday, May 31, 2017

प्रति, महाराष्ट्रातील शांतताप्रिय सन्माननीय नागरिक,

प्रति,
महाराष्ट्रातील शांतताप्रिय सन्माननीय नागरिक,
नमस्कार,
★आपणा सर्वांना माहीतच आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सुद्धा सर्व दारूची दुकाने ,बार,परमिट रूम बंद आहेत त्यामुळे गावात/शहरात शांतता आहे,केवळ शहरातील काही दुकाने सुरु असून तेथे मात्र कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ★अशा परिस्थितीत दारू व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नाने राष्ट्रीय व राज्य महामार्ग महानगरपालिका ,नगरपालिका ला हस्तांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे,वास्तविक ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना आहे ,असे असूनही जर केवळ दारू दुकाने पूर्ववत सुरु व्हावी म्हणून असे अनैतिक हस्तांतरण झालेच तर आपणा सर्वांना आपल्या परिसरात ती #बंद झालेली दारूची दुकाने आपल्या नाकावर टिच्चून पुन्हा सुरु झालेली दिसतील.मग तोच ओंगळवाणा गोंधळ आपल्या अजूबाजूला असणार आहे. निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे.लाभलेली हि शांतता टिकवायची कि दारू दुकाने पुन्हा सुरु होऊ द्यायची.
★शांतताप्रिय नागरिकांनी/महिलांनी आता सक्रिय होण्याची फारच गरज आहे ,आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे,आणि त्यासाठी
★ 1) महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे.
★ 2) गाव/ शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही.
★मनपा आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अशा आशयाची पत्रे व्यक्तिगत किंवा सामाजिक हित जोपासणाऱ्या सार्वजनिक/धर्मदाय संस्थां /महिला संगठना/बचत गट या सर्वांनी द्यावीत .एकत्रित समोर येऊन प्रखर विरोध करायला हवा . संस्थेच्या पत्रकाद्वारे लेखी निवेदन द्यावे,हि आपणा सर्वांस नम्र विनंती.
*सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शांतताप्रिय व दारू विरोधी नागरिकांना एक संधी मिळाली आहे ,या संधीचा लाभ घ्या,
*दारूला हद्दपार करा.
*आपल्या परिसरात शांतता कायम ठेवा. *शुभेच्छा आहेतच*
आपला शुभेछुक
सुहास सोहोनी
*संवेदना* ,
सामाजिक विचार मंच ,
अमरावती -४४४६०६
मोबा : ९४०५३४९३५४

विषय : -* महामार्ग का हस्तांतरण रोके *

प्रति,
आदरणीय मुख्य न्यायाधीश,
सर्वोच्च न्यायालय,
तिलक मार्ग
नई दिल्ली - 110201
◆इस पत्र को जनहित याचिका समझे◆

विषय : -* महामार्ग का हस्तांतरण रोके *
सन्माननीय महोदय,
आप से नम्र निवेदन है कि महाराष्ट्र सहित कुछ राज्यो में राष्ट्रीय तथा राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्था को हस्तांतरित करनेकी साजीश हो रही है,*ताकी महामार्ग पर फिरसे शराब कि दुकाने खुल सके।
*क्या यह न्यायालय का #अवमान नही है ? *कृपया आप इसे रोके ।
*शराब के कारण पुरे देश में कई परिवार बरबाद हो चुके है ।
* समस्या भयावह है ।जब तक शराब आसानिसे मिलेगी कोई ★व्यसनमुक्ती प्रबोधन ★लाभकारक नही हो सकता, इसलीये सम्पूर्ण शराब बंदी के सक्त कानून की आवश्यकता है।
इसी प्रार्थना के साथ,
आपका नम्र
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
अमरावती - 444606
मोबा: 9405349354

◆एक विदारक सत्य◆

◆एक विदारक सत्य◆
💥एखाद्या देशाला हीन-दीन-दुबळें, बरबाद करून टाकायचं म्हणजे नेमकं काय !
★म्हणजे त्या देशातले लहान मुले, तरुण पिढीला सगळ्या व्यसनांमध्ये पूर्णपणे बुडवून टाकायचं,जर्जर करून सोडायचं,त्याबदल्यात शासनाने प्रचंड #*महसूल* गोळा करायचा. ★गोरगरिबांच्या,श्रीमंतांच्या मुलींना वाममार्गाला लावायचं,
★ म्हणजे ती पिढी स्वतःची,माय बापाची,भावाबहिणीची सुद्धा काळजी घेऊ शकणार नाहीत ,मग ते
💥देशाला कसे काय सांभाळणार ???💥 ★अयोग्य व्यक्तीचा मान सन्मान करून त्याला पुरस्कृत करायचे .असे आणखीन काही स्व-फायद्यासाठी सुचेल ते केले म्हणजे त्या देशाचा *अधोगतीच्या / *विनाशाच्या मार्गाचा प्रवास सुरु झालाच म्हणून समजावे.
★विचार करा - देश वाचवा
★तो सर्वश्रेष्ठ ईश्वर,परमात्मा तरी काय करणार ! *सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच,
अमरावती ४४४६०६ ,
*मोबा : ९४०५३४९३५४

★विषय : * अधिकृत असलेल्या सर्व दारू दुकानांना गाव/ शहराबाहेर जागा उपलब्ध करून द्यावी

प्रति,
गृहमंत्री,
महाराष्ट्र शासन,
★विषय : * अधिकृत असलेल्या सर्व दारू दुकानांना गाव/ शहराबाहेर जागा उपलब्ध करून द्यावी . ***************************************
★ ★ देशातील मद्यप्रेमींची जबरदस्त संख्या पाहता जर संपूर्ण दारूबंदी केली तर करोडो लोकांना दारुअभावी हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल .ही वास्तुस्थिती मान्य केली तरी *देशातील ७०% जनतेचा विचार करता,【 ज्यात स्त्रिया, १८ वर्षापर्यंत मुले,मुली आणि दारू न पिणारे ज्येष्ठ नागरिक आहेत】गाव/शहरात शांतता असावी यासाठी ,गाव/शहरांतर्गत मद्य विक्रीस संपूर्ण बंदी घालावी व सध्या सुरू असलेल्या अधिकृत दारू दुकानांना गाव/शहरांच्या बाहेर काही अंतरावर जागा उपलब्ध करून द्यावी. * सुप्रीम कोर्टाच्या महामार्गावरील दारूबंदी च्या निकालानंतर शहरांतर्गत बऱ्याच निवासी प्रभागात अभूतपूर्व दारू - गोंधळ सुरु झाला आहे, * * वाईन शॉप मधून ५० - १०० बाटल्या खरेदी करून गावभर वेगवेगळ्या मोहल्ल्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे .
* यावर सध्यातरी प्रशासनाचा अंकुश नाही हे वास्तव आहे .
* या वस्तुस्थिती वर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित मार्ग काढावा व शांतता आणि सुव्यवस्था सांभाळावी,
*हि सर्वच त्रस्त नागरिकांची नम्र विनंती. *एक त्रस्त नागरिक*
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
विवे

कानंद कॉलोनी ,अमरावती 444606 , मोबा : ९४०५३४९३५४

★शासनाला नम्र विनंती★

★शासनाला नम्र विनंती★
शांतताप्रिय नागरीकांच्या रहिवासी प्रभागात दारूची दुकाने कुणालाच मान्य नाहीत .तरीही दारू प्राशन जीवनात फारच लाभदायक, उपयुक्त असेल ,आणि शासन केवळ महसूल कसे वाढेल याचाच विचार करत असेल, तेंव्हा प्रशासनाने स्वतःच्या देखरेखीत *राज्य उत्पादन शुल्क कार्यालय,प्रत्येक पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय,लोकनेत्यांचे निवासस्थान ,दारू विक्रेत्यांचे स्वतःचे निवासस्थान अशा म्हत्वाच्या जागी एखाद्या खोलीत दारूविक्री करावी , ज्यायोगे शांतताप्रिय नागरिकांना मद्यपिद्वारे होणारा विविध प्रकारचा त्रास भोगावा लागणार नाही.मद्यपींद्वारे होणार त्रास सुद्धा *#प्रशासनिक कार्यालये, #लोकनेते ,#नगरसेवक* यांनीच सहन करावा .दारू न पिणारी सामान्य जनता ,स्त्रिया, मुले ,वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक यांना का मनस्ताप देता ??
★तसेही दारू दुकानाच्या बंदोबस्तात असलेल्या पोलिसदादाच्या उपस्थितीत मद्यपी दारू खरेदी करीत नाहीत का ?★ *मद्यपींच्या अनिरबन्ध उपद्रवामुळे मानसिक संतुलन बिघडलेले ,
*परंतु सामाजिक भान अजून शाबूत असलेेला*
#त्रस्त #ज्येष्ठ #नागरिक.
*सुहास सोहोनी ,
विवेकानंद कॉलनी ,
अमरावती,
पिन 444606


ज्या ऐटबाज खाकी रंगाच्या ड्रेसच मला जबरदस्त आकर्षण आहे

🙏🏼ज्या पोलीस दादाला पाहताच मी मी म्हणणाऱ्या गुन्हेगाराची चड्डी ओली व्हायला हवी,त्या पोलिसदादाला दारूच्या दुकानांना संरक्षण द्यावे लागत आहे,आणि कुणीही चिल्लर गुन्हेगार दारू पिण्याचे परमिट नसतांना, काखेत दारूचा बंपर घेऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसां समोरून दात विचकत सहज " ट्रिपल सीट "भरधाव जातो आहे - हे दृश्य पाहून मला व्यवस्थेची लाज तर वाटलीच पण त्याहीपेक्षा एकूणच सामान्य माणसाच्या भविष्यातील सुरक्षेची जास्त चिंता वाटली.
★ज्या ऐटबाज खाकी रंगाच्या ड्रेसच मला जबरदस्त आकर्षण आहे तो खाकीचा रंग काळा तर होत नाही !!!
★लोकनेत्यांनो कुठे नेवून ठेवला आहे माझा देश !!!!!!!!!!
सुहास सोहोनी,
अमरावती.
मोबा :९४०५

३४९३५४

*दारू दुकाने पुन्हा सुरु करता येऊ नयेत यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करायला हवी .

अमरावतीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी 27 एप्रिल रोजी जनतेच्या व प्रशासनाच्या तक्रारीवरून अनेक दारू दुकानांना सील ठोकले, त्यामूळेच सध्या अमरावतीत शांतता आहे. * यासाठी जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक #आभार#अभिनंदन .मात्र लिकर लॉबी हाय कोर्टात जाऊन दारू दुकाने #पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करू शकतील का ? याचा विचार व्हावयास हवा .त्यामूळे प्रशासन व नागरीकांनी सजग रहावे असे वाटते.
*दारू दुकाने पुन्हा सुरु करता येऊ नयेत यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करायला हवी .
◆या संदर्भात विविध
★सामाजिक संस्था,★महिला मंडळे, ★व्यसनमुक्ती केंद्र ★क्रीडा मंडळे ,★कोचिंग क्लासेस,★मंदिर संस्थान,★शिक्षण संस्था,★स्त्री शक्ती केंद्र ★ सर्व सन्माननीय डॉकटर्स, ★जागृत निर्भीड पत्रकार , ★सजग मीडिया ग्रुप्स ★आरोग्य विषयक केंद्र,★सर्व कर्मचारी संघटना, ★विविध जाती व धार्मिक संस्था
यांना
नम्र विनंती
◆ज्या दारू व अमली पदार्थांमुळे लाखो करोडो सुखी परिवार उद्धवस्त झालेत,सोन्यासारखी आपली माणसं गमावली त्या दारूला नकार द्या .
शहरांतर्गत दारू दुकाने बंद करा किंवा हद्दपार करून शहराबाहेर न्या.
◆अशा आशयाचे पत्र आपल्या संस्थेच्या लेटर हेड वर
★१)जिल्हाधिकारी
★ २)अधीक्षक,राज्य शुल्क विभाग,
★३)पोलीस कमिशनर
याना दयावे.
◆अशी अनेक संस्थांची पत्रे दिल्या गेल्यास शहारांर्गत दारू दुकाने नेहमीकरता कायमची बंद होऊ शकतात.
*शहराच्या #शांततेसाठी कृपया एव्हढे करावे .
■शुभ कार्यास मुहूर्ताची गरज नसावी■
आपला-
सुहास सोहोनी
अमरावती 444606
मोबा : ९४०५३४९

३५४

*धान्य महोत्सव*

👍परिस्थितीच्या दुर्दैवी चक्रातून आपला *शेती उद्योजक*बाहेर पडावा, हा समाज घटक कायम सन्मानित रहावा यासाठी निवडलेल्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजेच *धान्य महोत्सव*  

💥अतिशय परिश्रमाने व स्वकष्टाने पिकवलेला शेतमाल कुणाच्याही दबाव तंत्राला न जुमानता शेतीउद्योजकांनी ,धान्य महोत्सवाद्वारे ,थेट ग्राहका पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे,तो प्रशंसनीय आहे,स्तुत्य आहे व अनुकरणीय आहे .
💥अमरावतीच्या कॅम्प विभागात ५ मे पर्यंत सुरु असणारा हा धान्य महोत्सव शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान,आत्मसन्मान, उद्योजकता आणि संपन्नता निर्माण करण्याच्या दृष्टीने गाठलेला व यश प्राप्त करून देणारा एक महत्वाचा टप्पा असणार आहे .  
💥मला विश्वास आहे की अमरावतीचे /महाराष्ट्राचे करोडो सुजाण नागरिक या उपक्रमाला तन ,मन ,धनाने यशस्वी करतील.जनहितासाठी करोडो नागरिक एकत्रित झाले तर १००% सकारात्मक बदल होणारच,हि खात्री. *आपलाच आणि नेहमी आपल्या सोबत असलेला- *सुहास सोहोनी*
सामाजिक विचार मंच,
विवेकानंद कॉलनी,
अमरावती -444606
मोबा : ९४०५३४९३५४

★विचार करा देश घडवा ★

★विचार करा देश घडवा ★
💥आपल्या देशात लोकसंख्येच्या एकूण 48.5% स्त्रिया आहेत.ज्या दारू पित नाहीत .1.5% महिला दारू पितात असे म्हंटले तरी #47%महिला दारू प्राशन करीत नाहीत.
💥अंदाजे #20% बालके व तरुण(पुरुष) जे २० वर्षे पर्यंतचे आहेत आणि जे दारू पीत नाहीत .
💥 एकूण लोकसंख्येच्या 35% ज्येष्ठ नागरिक असून यातील 15 % पुरुष असून त्यापैकी #10 %ज्येष्ठ नागरिक दारू प्राशन करीत नाहीत. म्हणजेच 47%महिला+20% तरुण(मुले) +10%ज्येष्ठ (पुरुष) = #77% नागरिक दारू पीत नाहीत. याचा अर्थ असा की एकूण लोकसंख्येच्या #23% पुरुष जनता दारूशी संबंधीत आहे.यापैकी सुद्धा गंमत म्हणून कधीतरी,विशेष निमित्याने ,दारूच्या आहारी न गेलेले #10%लोक असून एकूण लोकसंख्येच्या #13% जनता दारूच्या आहारी गेली आहे.
💥या 13% लोकांमुळे दोन महिन्यांपासून हा विषय गाजतो आहे.याच 13% दारुग्रस्त लोकांमुळे 87 % नागरिक विविध प्रकारे त्रस्त आहेत.अनेक परिवार आर्थिक व मानसिकदृष्ट्या प्रभावित झाले आहेत, उध्वस्त झाले आहेत. हा विषय आपला नाही असं समजणारे "#सुपातले #जात्यात" कधी जाऊन पडतील आणि कधी भरडले जातील हे कळणार सुद्धा नाही. 💥शासनाने महसुलाच्या नावाखाली दारूला प्रोत्साहन देऊन दारूबंदी केली नाही तर 13% असलेले हे नागरीक 87% व्हायला कितीसा वेळ लागेल ?
💥विचार करा देश घडवा💥
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
अमरावती -६
मोबा :- ९४०५३४९३५४


🙏🏼दारूच्या दुकानामुळे त्रस्त नागरिकांनी हा मेसेज अवश्य वाचून सजग व्हावे.💥🙏 🏼

🙏🏼दारूच्या दुकानामुळे त्रस्त नागरिकांनी हा मेसेज अवश्य वाचून सजग व्हावे.💥🙏
🏼 ●अमरावतीच्या जिल्हाधिकारी साहेबांनी 27 एप्रिल रोजी जनतेच्या व प्रशासनाच्या तक्रारीवरून अनेक दारू दुकानांना सील ठोकले, त्यामूळेच सध्या अमरावतीत शांतता आहे. *यासाठी जिल्हाधिकारी साहेबांचे मनःपूर्वक #आभार#अभिनंदन* . *मात्र लिकर लॉबी हाय कोर्टात जाऊन दारू दुकाने #पुन्हा सुरु करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतील व लवकरात लवकर कोर्टाद्वारे #स्टे मिळवतील, याचा विचार व्हावयास हवा .त्यामूळे प्रशासन व नागरीकांनी सजग रहावे असे वाटते.
*दारू दुकाने पुन्हा सुरु करता येऊ नयेत यासाठी योग्य कायदेशीर तरतूद करायला हवी .
◆या संदर्भात जी काही १६ -१७ दारू दुकाने शासनाद्वारे सील लावून बंद करण्यात आलीत त्या प्रभागातील नागरिकांनी हायकोर्टात *#इटर्व्हेन्शन* केस दाखल करून आपली बाजू मांडायला हवी .ज्यामुळे त्रस्त नागरिकांची तक्रार ऐकल्या शिवाय बंद दारू दुकानांना सहज *"स्टे"* मिळणार नाही .मात्र असे न केल्यास हि बंद झालेली दारू दुकाने कायद्याने पुन्हा सुरु होऊ शकतात

★ वाहन दुर्घटना तथा प्रदूषण समस्या - एक सर्वेक्षण

★ वाहन दुर्घटना तथा प्रदूषण समस्या - एक सर्वेक्षण
सन्माननीय नागरिक,
देश के सभी शहरोंमे वाहनोंकी बढती संख्या ,बढता प्रदूषण तथा रास्ता दुर्घटनाओंकी अनगीनत वारदाते हमे इन समस्याओंपर सोचने के लिये बाध्य करती है। यातायात और वाहनों के संबंध मी ऐसे कौनसे प्रश्न है जो प्रदूषण और दुर्घटना के *कारण* बन रहे है । हमारी सेवाभावी संस्था एक ऐसा सर्वेक्षण करना चाहती है जीसके द्वारा हम कुछ सुझाव खोज सके। हम आप सबका सहयोग चाहते है। निचे दिये प्रश्नोपर आप अवश्य सोचे। आपकी बहुमुल्य राय अपेक्षित है।
💥 प्रश्नसंच💥
१)आपकी उम्र:---
२)क्या आप खुद वाहन चलाते है ?
३)आपका/ड्रायव्हर का ड्रायव्हिंग लायसन्स /बिमा पॉलिसी अधिकृत है?
४)आपका व्यवसाय ----
५) क्या आप वाहन किराऐसे देते है ?
६)वाहनमे अधिकृत यात्रींओंकी संख्या कितनी है ?
७) क्या वाहन वातानुकूलित है ?
८)आप वाहन की सर्व्हिसिंग/ पी.यु.सी.जांच कितने महिनेमे करते है ?
९) चक्कोंकी हवा जांचते है ?
१०) क्या आप वाहन चलाते समय व्यावसायिक तथा घरेलू समस्या पर सोचते है ?
११)आप कितनी स्पीड से वाहन चलाना पसंद करते है ?
१२) क्या आप वाहन चलाते समय सिगरेट पिते है ? १३)क्या आप शराब पिने केबाद कभी वाहन चालते है ?
१४)वाहन चालते समय क्या आप मोबाईल पर बाते करते है ?
१५) "शॉर्ट कट "लेनेे हेतू क्या आप कभी रॉंग साईड से जाते हो ?
१६)क्या आपके शहर के रास्ते वाहन योग्य है ? १७) क्या "स्वागत कमानी"द्वारा रास्ते मे गढ्ढे होते है ? १८) क्या स्पीड ब्रेकर्स सही ढंग के है,पिले सफेद रंग के पट्टे है ?
१९)क्या आप कभी वाहन चलाने के संदर्भ मे दोषी सिद्ध हुये है ?
२०) गाडी के सभी लाईट इंडिकेटर सही है ? २१) क्या शहर में एक दिशा मार्ग आवश्यक है ? २२) क्या रोड डिव्हाईडर से दुर्घटना पर रोक लगेगा ? २३) क्या आपके वाहनमें एअर-व्हिसल हॉर्न है ?,क्या यह जरुरी है ?
२४)क्या शहर में ऑटो पिकअप स्टॅन्ड बढाना चाहिये ?
२५) क्या हेड लाईट के उपरके आधे हिस्से को कला रंग लगाना चाहिये ?
२६) क्या शहारमे अधिकृत वाहन पार्किंग है ?
◆ आपके सुझाव:-
■वाहन द्वारा दुर्घटना पर रोक-------------------

■वाहनद्वारा प्रदूषण पर रोक-----------------
★कृपया इन सभी मुद्दोपर गँभीरता से सोचे । धन्यवाद.
सुहास सोहोनी ,
(निवृत्त विमा अधिकारी,नॅशनल इन्शु.कम्पनी)
*सामाजिक विचार मंच,*
सोहोनी कॉम्प्लेक्स,
विवेकानंद कॉलोनी,
अमरावती - ४४४६०६ .
मोबा: ८६२६०६०६४६,
९४०५३४९३५४

हा लेख दारू च्या व्यसनाच्या मगरमिठीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित◆

हा लेख दारू च्या व्यसनाच्या मगरमिठीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व मित्रांना समर्पित◆
💥#मनोगत, : - एका दारूच्या आहारी गेलेल्या 'दारू ग्रस्ता'चे आणि त्याच्या परिवाराचे💥
#पत्नी : - आमच्या लग्नाला १७ वर्षे झालीत,सुरवातीची २ वर्षे छान गेलीत.पहिली मुलगी झाली.किती सुखी होते मी.हळूहळू दारूच्या व्यसनाचं असलेलं सत्य समोर आलं .त्यातच आमच्यात एक सुंदर गोंडस बाळ आलं .मुलांना कसं सांभाळू हेच समजेना.तरुणपणीची सगळी स्वप्नं जणूकाही हवेत विरून गेली.रोज वादावादी,मुलांना मारणं,संशय,कितीतरी वेळा माझ्यावर हात सुद्धा उचलला आहे.कां आलं हे जिणं माझ्या वाटेला ! रात्र रात्र मी फक्त रडून काढल्या आहेत .पण अचानक घटना घडू लागल्या ,दारू मिळणे जिकिरीचं झालं,आता तर परिसरातील सगळी दुकानं सील झालीत.१५ -२० दिवसांपासून दारू न मिळाल्याने लडखडत चालणारा माझा नवरा जरा ताठ चालू लागला.बरं झालं ,आता "व्यसन सोडतो" असं म्हणतोय,रोज सकाळी मॉर्निंग वॉक ला जातोय,संध्याकाळी आम्ही चौघे बगिच्यात जातोय .मुळात चांगला असलेला माणूस चांगला वागतोय.हे इश्वरा आम्हाला सुबुद्धी दे .हि दारूची दुकाने पुन्हा उघडू देऊ नयेत हीच सरकारला कळकळीची विनंती.
#मुलगी : - मला माझे बाबा खूप आवडतात पण ते माझ्याशी कधी चांगल बोललेच नाहीत.नेहमी मारझोड आणि आरडाओरडा.आमचं काय चुकतंय हेच मला कधी समजलं नाही.आता मला व्यसनाबद्दल समजू लागलंय ,मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते कि माझ्या बाबांना दारूच्या व्यसनातून मुक्त कर,आणि एक दिवस अचानक दारूची दुकानं सील झाली आणि दारू सहज मिळेनाशी झाली ,काही दिवस बाबांना त्रास झाला पण आता ते दारूला विसरले आहेत.आमच्याशी छान वागतात.फक्त एकच विनंती आहे की हे देवा "हि बंद झालेली दारूची दुकानं पुन्हा उघडू देऊ नको"आम्हाला आमचे बाबा हवे आहेत. ★#मुलगा : - माझे बाबा आणि आई मला खूप आवडतात.सगळे माझे खूप लाड करतात.
#मी : - काही प्रमाणात का होईना पण दारू बंदी एकदाची झाली ,माझ्या परिसरात आता सहज दारू मिळत नाही ,या आश्चर्यकारक व क्रांतिकारक बदलासाठी मी #जिल्हाधिकारी #साहेब व दारू चा विरोध करणाऱ्या सर्व सज्जनां चा मनःपूर्वक ऋणी आहे.मी दारूचे सगळे दुष्परिणाम भोगले आहेत - "#पण #आता #नाही".आता मी व्यसनापासून दूर जातोय,मी निश्चय केला आहे.मला बायको-मुलांकडे लक्ष द्यायचं आहे ,मुलांना खूप मोठं करायचं आहे.माझ्या शेती-व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आहे.माझ्या आई बाबांची काळजी घ्यायची आहे.मी आता फक्त सकारात्मकच विचार करतो.मी माझ्या परिवाराला खूप "आनंदी"ठेवणार आहे.हो आता मला समजले आहे की।
#आयुष्य #खूप #सुंदर #आहे
*सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच,*
अमरावती -६
मोबा : - ९४०५३४९३५४

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥

💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत💥
★जबाबदार सेलिब्रिटी,नेते ,राजकीय प्रतिस्पर्धी असलेले लोकं, आपल्याच सैन्याच्या पाकिस्तान विरुद्ध च्या अतिमहत्वाच्या कारवाई बद्दल जाहीर शंका उपस्थित करतात,प्रेस/चॅनलवर तावातावाने चर्चा किंवा वाद घालतात,अनेक मान्यवर म्हणवणारे त्यांच्या बेताल,उर्मट व्यक्तव्याचे समर्थनही करतात ,हे दुख:दायक आहेच,पण त्यापेक्षा जास्त धोकादायक आहे.
★ आपण कदाचित दीर्घकाळ चालणाऱ्या त्रासदायक युद्धाच्या दिशेने सरकतो आहोत. अशावेळी सैन्याच्या गुप्त हालचाली बद्दल,देशाच्या निर्णया बद्दल, संभ्रम निर्माण होईल असे विचार पसरवणे,जनतेत वैचारिक दुही ,फूट पाडणे,शासनाला/सैन्याला दोषी ठरवणे हा अक्षम्य गुन्हा आहे.या गुन्ह्याला क्षमा नाहीच.
★आपल्या विचारांनी, कृतीने असे लोकं शत्रूचाच फायदा करतात.सैनिक नेहमीच डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करतात त्यामुळेच आम्ही सुखानं झोपू शकतो.आरामात सगळ्या प्रकारचे उपभोग घेत असतो.मात्र युद्धात सैनिक आणि नागरिक दोघेही शत्रूशी लढत असतात.त्यांचा एकमेकांवर १००% विश्वास असतो.हा विश्वास आजही आहेच ,संपूर्ण देश सैन्या सोबत आहेच .
★काही नतद्रष्ट ,देशविरोधी ,सोय व वेळ साधून स्वार्थ साधणारे, शत्रूला कळत नकळत मदत पोह्चवणारे दळभद्री लोकं दुर्दैवाने प्रत्येक कालखंडात असतातच.त्यांना शोधून निष्क्रिय करणे जरुरी आहे,कारण हा देशाच्या हरण्या जिंकण्याचा प्रश्न आहे,देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे .युद्धात झालेलं नुकसान हे कायमचं नुकसान असतं.
★शत्रूशी सीमेवर लढतांना सैन्याला देशांतर्गत विरोधी कारवाया करणारे/देशविरोधी कृती करणारे ,गैरसमज पसरवणारे ,यांच्या विरोधात सुद्धा लढावे लागणार आहे.अन्यथा शत्रूपेक्षा हे लोकं जास्त धोकादायक आहेत.
●हे युद्ध सीमेच्या बाहेर तर लढावे लागणार आहेच पण देशाच्या आत देशद्रोह्यांशी सुद्धा लढावं लागणार आहे,● ■पण देश महत्वाचा.■
💥देशापुढे सगळे दुय्यम आहेत.💥 सुहास सोहोनी
★संवेदना★
(सामाजिक विचार मंच)
अमरावती - ६

💥राजापेठ फ्लाय ओव्हर पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सोईसाठी पर्यायी व्यवस्था असावी💥

प्रति,
सन्माननीय ,
आयुक्त साहेब,
म.न.पा. अमरावती,
विषय: 💥राजापेठ फ्लाय ओव्हर पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सोईसाठी पर्यायी व्यवस्था असावी💥
आदरणीय मान्यवर,
■ राजापेठ फ्लाय ओव्हर चे काम तिन्ही दिशांनी सुरु झाले आहे.कामाचा वेग पाहता हे काम 2 ते 3 वर्षे चालू शकेल असे वाटते. रोज तेथे दोन्ही बाजूने भरपूर गर्दी असणे स्वाभाविक आहे .गर्दी ची विचित्र कोंडी होते .त्यात जड वाहने असतात. गर्दी, धूळ,धूर,घामाच्या धारा,ऊन, पुढे काही दिवसांनी पाऊस,थंडी,हे सगळं असणार आहे.
परन्तु हे सगळं सहन करण्याऐवजी एक पर्याय मला सुचवावासा वाटतो .बेलपुरा रस्त्यावर मोठा नाला असून त्या नाल्यावर रेल्वे ब्रिज आहे ज्याला दोन कमानी आहेत,त्यापैकी एका कमानी खालून रस्ता काढता येईल [ नवाथे नगर येथे बनवला आहे तसा ] ,त्या रस्त्याने सायकल,स्कुटर,मोटरसायकल,छोट्या कार यांची ये जा सहज होऊ शकेल.हा रस्ता राजापेठ पोलीस स्टेशन च्या बाजूने निघून बडनेरा रोड ला लागतो.या पर्याया मुळे राजापेठ फाटका वरील गर्दी नक्कीच कमी होईल .जाणे- येणे सुसह्य होईल . म.न.पा. ने या पर्यायाचा विचार करावा हि विनंती .
सुहास सोहोनी
★सामाजिक विचार मंच,
विवेकानंद कॉलोनी,अमरावती-6
मोबा: ९४०५३४९३५४

◆#ट्रॅफिक #सेफ्टी संबंधी ....

#ट्रॅफिक #सेफ्टी संबंधी ....
★काही प्रश्न आपलेच ...उत्तर ही आपल्याच मनात
१] घरातील सर्वांचे वाहन परवान्यांचे नुतनीकरण झाले आहे ?#अल्पवयीन #मुल-#मुली आपले वाहन सार्वजनिक रस्त्यावर चालवतात का ?
२] वाहनांची नियमित #सर्व्हिसिंग होते ?
३] रस्त्यावरील गड्डे ,अयोग्य व अनधिकृत स्पीड ब्रेकर्स ,पार्किंग, सिग्नल्स,सूचना फलक योग्य आहेत ?
यापासून काही त्रास जाणवतो ?
४] आपल्या #वाहनाचा #वेग योग्य असतो ना?
५] वाहन चचालवतांना आपण #मोबाईलवर #बोलता का ?
६] वाहन चालवतांना ऑफिस /घरातील विचार /हातवारे करणे / पुटपुटणे असे होते का ?
७] घरातील प्रत्येकाचा **#ट्रेफिक #एक्सिडेंट #इन्सुरंस** [रस्ता अपघात विमा ] आहे का ?
८ ] वाहन #क्षमते #पेक्षा #जास्त #व्यक्ती बसवता का ?
९ ] सोईचे होते म्हणुन #रॉंगसाईडने जाता ?
*बर्याच वेळा #निष्काळजी पणाने सुद्धा नुकसान होते*#सावध #व्हा,आपल्या परिवाराची काळजी घ्या.
★नियमांचे पालन करा★
*सुहास सोहोनी ,
मोबा :९४०५३४९३५४
*ट्रॅफिक सेफ्टी ग्रुप
-0:36

💥व्यसनाधीनता - एक राष्ट्रीय संकट

💥व्यसनाधीनता - एक राष्ट्रीय संकट 💥 ★व्यसनाधीनता हा आजच्या समाजाला लागलेला एक महाभयंकर रोग आहे.अतिशय वेगाने या समस्येचा प्रसार आपल्या देशात होत आहे .देशातील प्रत्येक शहर कालमानाप्रमाणे बदलत आहे,श्रीमंत होत आहे ,पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी प्रत्येक वस्तीत क्रीडामण्डळे ,आखाडे स्थापन होण्याची नितांत आवश्यकता आहे त्या ऐवजी ठिकठिकाणी बिअर बार, मसाज केंद्रे,हुक्का पार्लर,कार्ड रुम, पूल पंगा,हेल्थ क्लब्ज ह्या नावाखाली अनेक अनैतिक गैरप्रकार सर्रास चालू आहेत .
★ एकीकडे व्यसनमुक्ती चळवळीला गती यायला हवी,अशी वस्तुस्थिती असतांना मात्र गल्लोगल्ली नवनवीन अवैध,अनैतिक ,हिडिस केंद्रे उघडतांना दिसतात.हि सगळी #चैन #केंद्रे आजच्या युवापिढीला जबरदस्त वेगाने विनाशाकडे आकर्षून घेत आहेत.
★जीवनांत - कमीवयात बऱ्याच गोष्टी सहज व सुलभपणे साध्य झाल्यामुळे अनेक युवक चैनीच्या मार्गाकडे वळतात ,आणि स्वतःबरोबर अनेकांचे जीवन उध्वस्त करतात.ज्या भयंकर वेगाने व्यसनी लोकांची वाढ होत आहे,त्या प्रमाणात #व्यसनमुक्ती ची #चळवळ निश्चित कमी पडते आहे.त्यामुळे व्यसनांच्या परिणामांची भयानकता युवा पिढीला पटणे, पटवून देणे अत्यावश्यक झाले आहे .*हे एक राष्ट्रीय संकट आहे*हेच आधी सर्व समाजाला पटायला हवे,मान्य व्हायला हवे . अवैधरित्या अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या/करवणाऱ्यांना गुन्हेगार समजून त्यांना जास्तीतजास्त कडक शिक्षा होणे जरुरी आहे .अशा गुन्हेगारांचा शोध घेणारी सक्षम यंत्रणा असायला हवी. ★समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था,संघटना,कार्यकर्ते,विचार वन्त आणि व्यसनाधीन व्यक्तींचे कुटुंबीय या सर्वांनी एकत्र येऊन *#समाजमन*जागृत करणे आवश्यक आहे.व्यसनाधीन व्यक्तींना 'व्यसनमुक्त करणे व पुन्हा त्यांना समाजात सामावून घेणे' हे अत्यंत काळजीपूर्वक व्हायला हवे.ह्या मनोरुग्णांना आपुलकीची फार गरज असते.कमकुवत मनामुळे असलेल्या इच्छाशक्तीच्या अभावावर( दुर्बलतेवर)उपचार होणेच आवश्यक असते.व्यसनी रोग्याला रोगमुक्त करणे यापेक्षा #अंमली #पदार्थांवर १००% #निर्बंध घालणे केंव्हाही जास्त परिणाम कारक असणार आहे.
★दारू किंवा अंमली पदार्थ विकणारे मालक व कामगार बेरोजगार होतील याचे वाईटच वाटणार असले तरी त्यांना काही तरी काम नक्कीच मिळेल आणि कामगारांच्या परिवारातील प्रत्येक सदस्यांच्या #अंतर्मनात #मनःशांती #लाभेल .सुखी आयुष्याचा खरा अर्थ त्यांना सुद्धा उमजेल .
★परंतु अंमली पदार्थ व दारूच्या नियमित सेवनाने तरुणांच्या कित्येक पिढ्या बरबाद होणार /उध्वस्त होणार आहेत हे #राष्ट्रीय #नुकसान फार भयंकर असणार आहे.आजूबाजूला व्यसनांची अफाट प्रलोभनें खुणावत असतांना ,केवळ प्रबोधनाने व्यसनांची घट्ट मगर मिठी कशी सुटेल ? म्हणूनच व्यसनांची हि *#दळभद्री #केंद्रे*(दुकाने ) बंद करणे अत्यावश्यक झाले आहे.
★युवकांच्या विचारांना प्रगल्भ करणे,
*स्वच्छ चारित्र्य,*योग्य - आयोग्याची जाण, *कर्तव्यनिष्ठा आणि *बलवान शरीरात खंबीर व बलवान मन असलेले युवक #निर्माण होण्याची काळाची गरज आहे,हे आता समाजाने ओळखण्याची वेळ आलेली आहे .*वेळीच आपल्याला जर जाग आली तर अजूनही होणारे संभाव्य सामाजिक व राष्ट्रीय दुष्परिणाम आपण नक्कीच टाळू शकू .
💥सावध व्हा व्यसनाधीनता हे राष्ट्रीय संकट आहे💥
लेखक : - सुहास सोहोनी, लेख संग्रह : - घे उंच भरारी (२०१६)

Tuesday, May 30, 2017

💥काय महत्वाचे आहे ?

💥काय महत्वाचे आहे ?
*#महसूल* की *#दारूबंदी*💥 💥दारू व्यवसायाद्वारे देशाला महसूल प्राप्त होते असे मानणाऱ्या सर्व मान्यवर नागरिक व सर्व स्तरावरील नेतेमंडळींनी कृपया असे लाजिरवाणे वक्तव्य करू नये. 💥 म्हणजेच देशात जास्त महसूल उत्पन्न मिळावे यासाठी दारू व्यवसायात व दारू पिंणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे.
💥आता तर गवत वा गुलाबाच्या पाकळ्यांपासून दारू निर्मिती शक्य आहे ,असे अभिमानाने व उत्साहाने सांगितले जात आहे .
💥दारू किंवा मद्य देशाला महसूल प्राप्तीसाठी व त्याद्वारे देशाच्या विकासासाठी एव्हढे लाभदायक, आवश्यक आहे तर दारूचे समर्थन करणाऱ्या सर्व मान्यवरांनी,लोकनेत्यांनी मुख्यत्वे स्वतःच्या मुला मुलींना,सर्व नातेवाईकांना रोज
*दारू प्राशन करा व देश घडवा*
असा मौल्यवान उपदेश करायला हवा.
💥 कधीतरी पूर्ण शुद्धीत राहून स्वतःच्या अंतर्मनात डोकावून प्रमाणीकपणे स्वतःलाच उत्तर द्या .
💥जाणीवपूर्वक जनतेला दुर्दैवाच्या खाईत लोटणारे ,जनतेचे अहित चिंतणारे शासक लाभणे हे सुद्धा एकप्रकारे देशाचं दुर्दैवच नाही का ?
*सुहास सोहोनी,
सामाजिक विचार मंच,
अमरावती - ६
मोबा :- ९४०५३४९३५४
[★ 👆वि

द्यार्थी वर्गाने या विषयावर आपले विचार लिहून व्यक्त करावे👆★]

एक विदारक सत्य

◆एक विदारक सत्य◆
💥एखाद्या देशाला हीन-दीन-दुबळें, बरबाद करून टाकायचं म्हणजे नेमकं काय !
★म्हणजे त्या देशातले लहान मुले, तरुण पिढीला सगळ्या व्यसनांमध्ये पूर्णपणे बुडवून टाकायचं,जर्जर करून सोडायचं,त्याबदल्यात शासनाने प्रचंड #*महसूल* गोळा करायचा. ★गोरगरिबांच्या,श्रीमंतांच्या मुलींना वाममार्गाला लावायचं,
★ म्हणजे ती पिढी स्वतःची,माय बापाची,भावाबहिणीची सुद्धा काळजी घेऊ शकणार नाहीत ,मग ते
💥देशाला कसे काय सांभाळणार ??? 
💥 ★अयोग्य व्यक्तीचा मान सन्मान करून त्याला पुरस्कृत करायचे .असे आणखीन काही स्व-फायद्यासाठी सुचेल ते केले म्हणजे त्या देशाचा *अधोगतीच्या / *विनाशाच्या मार्गाचा प्रवास सुरु झालाच म्हणून समजावे.
★विचार करा - देश वाचवा
★तो सर्वश्रेष्ठ ईश्वर,परमात्मा तरी काय करणार ! *सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच,
अमरावती ४४४६०६ ,
*मोबा : ९४०५३४९३५४


अड्डा-२७ w

💥अड्डा -२७,कसबा कॅफे ही ,विदर्भाची सांस्कृतिक नगरी- "अमरावतीची दुर्दैवी नवी ओळख."💥
★एका शांत आणि चांगल्या शहरातील लाडावलेल्या आणि चटावलेल्या धनिक पुत्रांचे लाफडेबाज चाळे नक्कीच दखलपात्र आहेत .आपल्या मुलाने कोणता व्यवसाय निवडावा, तो व्यवसाय आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेसा आहे की नाही !असे विचार या तरुणांच्या आई बापांच्या मनात तरी येतात कि नाही ,हाच खरा प्रश्न आहे .असे आई वडील आपल्या मुलांना अवैध धंद्यासाठी प्रोत्साहन देतात याचे कारणच मुळी अशा घरात पूर्वापार अनैतिक धंदे ,अयोग्य विचारधारणा असू शकते ,त्यामुळे शासकीय नियमांची ऐसी तैसी करण्यासाठी नेहमीच हातमिळवणी झालेली असते.
★नीती - अनीती चा विचार न करता कोणत्याही मार्गाने फक्त भरपूर पैसे मिळविणे एवढा #एक #कलमी #कार्यक्रम ,या मंडळींचा असतो.सध्याचं युग हे #प्रलोभन युग आहे.तरुण - तरुणी ,काही भरकटलेले मध्यमवयीन पुरुष हे अंमली पदार्थ व चैनी च्या दुनिये कडे आकर्षित झालेले आहेत .सगळ्या प्रकारची भौतिक सुखे हर प्रयत्नाने कशी मिळवता येतील याच विचारात हा वर्ग नेहमी गर्क असतो.सट्टा, जुगार ,विविध अंमली पदार्थ याच्याच शोधात हा बिघडलेला समाजघटक गावभर उनाडक्या करत फिरत असतो. चैन आणि पैसे कमविण्याचे सगळे हलके, नीच मार्ग यांना सहज मंजूर असतात. ★देशी विदेशी मद्याची यांची मागणी प्रचंड आहेच पण त्याबरोबरच सट्टा, जुगार, हुक्का,आणि नवं नवीन स्त्रिया आपल्या तावडीत कशा सापडतील याच्या शोधात हि मंडळी असतात.यांना अशा सुखाची चटक लागलेले ग्राहक सुद्धा भरपूर मिळतात .चुकीच्या मार्गाने अफाट पैसा कमावलेल्या घरातील बिघडलेल्या तरुण-तरुणींच्या जवळ पॉकेट मनी च्या रूपाने बराच पैसा खुळखुळत असतो ,आणि तो #चैनकेंद्रात उधळला जातो . ★एकदा व्यसनी बनल्यावर तर काय ! वाटेल त्या मार्गाने पैसे मिळवले जातात .शासनाने समाजाला धोकादायक अशी ही *#चैन #केंद्रे* नष्ट करावी.कारण ही किड आहे आणि वेळेवर कीड नष्ट नाही केली तर संपूर्ण समाजाला हि कीड नष्ट करेल,पोखरून टाकेल.सांभाळा आपल्या तरुणांना,मुला - मुलींना. कुठे वळताहेत यांची पावले ! नक्कीच आणि वेळीच लक्ष द्यायला हवं .
*आपल्या शांत शहराची अशी दळभद्री ओळख व्हायला नकोच* .* *सुहास सोहोनी,
*सामाजिक विचार मंच
अमरावती

- ६

👍करिअरच्या वेगळ्या वाटा

👍करिअरच्या वेगळ्या वाटा💥
💥
★आज आपला एकूणच समाज भौतिक सुखाच्या आकर्षणामुळे चंगळवादाकडे मार्गक्रमण करीत आहे,हे सत्य मान्य करावेच लागेल."मिळालेल्या या जन्मात जगातली सगळी सुखं उपभोगा" हा वर्तमानाचा महामंत्र आहे .गरजांची नवनवी व्याप्ती नजरेसमोर उलगडत चालली असून उपभोगांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी देश तसेच विदेशी व्यापारी,उद्योजक,सेवा संस्था,बँका आपल्या देशात जम बसवू लागले आहेत .नेमक्या यामुळेच रोजगार व्यवसायाच्या नवनवीन वाटा समोर येत आहेत .गरज आहे अशा नव्या संधिकडे डोळसपणे लक्ष ठेवण्याची .सरकारी किंवा खाजगी देशी विदेशी उपक्रमांमध्ये कुशल कामगारांची गरज येत्या पाच वर्षात प्रचंड वाढणार आहे .
★करिअर म्हणजे एखाद्या विषयाचे #शास्त्रशुद्ध #शिक्षण घेऊन व त्यात #पारंगत होऊन केला जाणारा व्यवसाय/नोकरी ज्यामुळे त्या व्यक्तीची #जीवनशैली ठरते व ती त्याच्या उपजीविकेच साधन असते.
★कोणत्याही कालखंडात कुशल कामगारांची गरज असतेच ,प्रशिक्षण देऊन कुशल कामगार घडवले जातात व अशा प्रशिक्षित कामगारांनाच नोकरीत,व्ययसायात प्राधान्य मिळते हि वस्तुस्थिती सुद्धा नजरेआड करता येणार नाही.यामुळेच रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पूर्ण करून प्रशिक्षित असलेल्यांनाच नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे . विविध उपक्रम,विविध संस्था,विद्यापीठे किंवा उद्योग समूह या सर्वांची स्वतःची प्रशिक्षण केंद्रे आज उपलब्ध आहेत .या बाबत समग्र माहिती विद्यार्थ्यांना नसते हि खरी अडचण आहे.
★प्रत्येकाने आपला कल ओळखून करिअर निवडावे.करिअर विषयक अनेक दालनं आज समोर आहेत.विमान सेवा हे उत्तम उदाहरण आहे .त्याशिवाय रिटेलिंग,फॅशन,रत्नशास्त्र,जैव तंत्रज्ञान,इव्हेन्ट मॅनेजमेंट,आर्मी,नेव्ही,एअरफोर्स,इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिन्टमीडिया,हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम,ऍनिमेशन,परफॉर्मिंग आर्ट,मायक्रोफायनांस,रिअल इस्टेट मॅनेजमेन्ट,करिअर इन योगा,टी. व्ही.चॅनल्स, बी.एड,डी.एड,हॉर्टीकल्चर , नर्सरी मॅनेजमेन्ट,एम.बी.ए.,मार्केटिंग, पत्रकारिता,रुग्णसेवक,हॉस्पिटल मॅनेजमेन्ट,मेडिकल टुरिजम,करिअर इन क्लिनिकल रिसर्च ,इंजि.अँड टेक्नॉलॉजी,पब्लिक रिलेशन,एल. एल.बी.,एल .एल. एम.,फायनान्स प्लॅनिंग,स्टाईल मॅनेजमेन्ट,इ-लर्निंग,फेंगशुई,ज्योतिषशास्त्र, इन्शुरन्स,तेल आणि वायू ,फुटवेअर डिझाईन, सामाजिक कार्य,प्लास्टिक टेक्नॉलॉजी,सर्वांना माहिती असलेले इंजि.मेडिकल व आय.टी. क्षेत्र इत्यादी अनेक वेगवेगळ्या वाटा उपलब्ध आहेत.त्याविषयी सविस्तर माहिती,पत्ते, फोन,मोबाईल नं., ई-मेल, वेबसाईट आपणा सर्वांसाठी नेटवर संकलित केलेली आहे .इच्छुकांनी या संधीचा फायदा घेऊन माहिती मिळवावी व आपल्या करिअरच्या वेगवेगळ्या वाटा निवडाव्या. ★मित्रांनो आत्तापासूनच लागा कामाला ,
#शुभेच्छा #आहेतच.★
आपला मित्र
लेख संग्रह :
" घे उंच भरारी " (२०१६)
लेखक :
*सुहास सोहोनी ,अमरावती -६
मोबा:९४०५३४९३५४