Wednesday, January 30, 2013

* मद्यपाश एक भयानक मनोविकार *

       दारूचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून, तो एक रोग आहे. दारूड्या असणारा हा माणूस "मद्यपाश'(अल्‌कोहोलिझम) या रोगाने आजारी असतो. गंमत म्हणून चारचौघे एखाद्यावेळी जेवढी दारू पितात त्यापेक्षा हा रोगी जास्त प्रमाणात आणि सतत दारू पीत असतो. केवळ दारू पिण्याच्या अतिरेकामुळें त्याची आर्थिक, शारिरीक, मानसिक व सामाजिक हानी होत असते आणि तरीही जो दारू पीतच राहतो, असा माणूस ह्या रोगाचा बळी ठरलेला आहे, असे समजावे, दारूमूळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अतोनात नुकसान होत असेल, तरीही मद्यपान करणारे बहुसंख्य मद्यपी ही गोï मान्य करीत नाहीत. दारूचे व्यसन ही भयानक गुलामी आहे. स्वत:च्या हाताने स्वत:चा व पर्यायाने संबंधित कुंटूंबियांचा पुरता विध्वंस करणारा हा भयानक मनोविकार आहे. काही लोक केवळ मजा म्हणून पितात. हलके वाटते, ताण नाहीसा होतो, वेळ कसा छान जातो ही त्यांची भूमिका. पण हे पिणे सोशलं असतं, प्रसंगापुरतं मर्यादित असतं. मद्यपाश झालेल्यांना मात्र असे मद्यपान स्वत:च्या इच्छेने थांबविता येत नाही. त्यांचा स्वत:वरचा, पर्यायाने पिण्यावरील ताबा सुटतो. कुठल्याही स्वभावाचा वा व्यक्तिमत्वाचा माणूस केव्हा या दुश्चक्रात सापडेल, हे सांगता येणार नाही. उलट असे लोक मग चातुर्याने आपल्या पिण्याचे समर्थनच करतात- आणि मग अखेर मद्यपाशाला बळी पडून खऱ्या अर्थाने "दुबळे ' बनतात.

*...आणि सवयीत रूपांतर होते !

ह्या रोगाच्या अनेक पायऱ्या असून कोणत्याही पायरीवरून रोगी परत फिरू शकतो. हे एक दुष्ट चक्र आहे. अध:पतनाकडे नेणाऱ्या या चक्रातून मुक्तता हवी असल्यास स्वत:ला ह्या चक्राबाहेर फेकावे लागेल. दारू किंवा तत्सम अंमली पदार्थ संपूर्णपणे सोडणे हाच ह्यावर एक आवश्यक उपाय आहे.
         सोशल डिं­क्स घेण्यापासून दारूद्या बनण्याच्या प्रवासाच्या सुरवातीच्या टप्प्यात बऱ्याच वेळा मित्राबरोबर पार्टीत-छोट्या छोट्या ओल्या पार्टीत प्याला ओठाला लागतो. नकळत अशी काही वर्षे जातात. हळू हळू मग लक्षात येतं की दारू प्यायल्यानंतरच आपल्याला हलकं हलकं वाटतं- मग दारू पिण्यात एक स्टाईल -सहजता यायला लागते. भीड चेपते- पिण्यातला संकोच नाहीसा होतो. मद्यपान करून घरी किंवा कामावर जाताना आपण सांभाळून घेऊ, याची खात्री वाटू लागते. अशारितीने तो मद्यपाशाचा रोगी बनतो, पुढे पुढे तो एकटाच प्यायला लागतो. पूर्वी 2-3 महिन्यातून एकदा पिणारा पुढे दर आठवड्याला पिऊ लागतो. नंतर मनावर ताण आला, राग आला, आनंद झाला, नुकसान झाले किंवा अशा छोट्या मोठ्या कारणाने जमेल तेव्हा प्यायला लागतो. आपला स्टेमिना सिद्ध करण्याकरीता सुरूवातीचे दोन पेग गटागटा पिऊन टाकतो. गप्पागोष्टी पेक्षा त्याचे लक्ष फक्त भरपूर पिण्यात असते. न पिण्याबद्दल उपदेश करणाऱ्या व्यक्तिंना तो टाळायला लागतो. जमेल तर ते किती वाईट आहेत, त्यांच्या उणीवा जाहीर करून त्यांना बदनाम करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. घरी मुद्दाम उशिरा यायचे, आपल्यासाठी जेवायला ताटकळत बसलेल्या व्यक्तिंना "मला भूक नाही' असे सांगून सरळ झोपून जायचे. सगळ्या आप्तांना सोडायला हा तयार होतो, पण दारू मात्र सोडू शकत नाही. अगदी इच्छा असली तरी! एखादा पेग केव्हा व कसा घेता येईल, ह्याच काळजीत तो असतो आणि एकदा पिणे सुरू झाले की थांबणे जड होते. हळू हळू इतरांकडे ये- जा बंद होते. पूर्वी ज्या व्यक्ती¨च्या शेजारी उभा राहणार नाही अशांच्या मांडीस मांडी लावून बसायला लागतो. सकाळी त्याचे हातपाय कापायला लागतात, डोके दुखते, मळमळते पण दारू प्यायल्यावर बरे वाटते, कधी कधी अती प्यायल्यावर बरे वाटते. कधी कधी अती प्यायल्यावर पुढे काही तास आपण काय केले, कोठे गेलो, काय बोललो हे आठवत नाही.अशा प्रकारची विस्मृती म्हणजे ( ब्लेंक आउट) ही या रोगाची महत्वाची धोकादायक पायरी समजावी.

* विनाशाकडे वाटचाल

पुढे ह्याला कसलेच विधीनिषेध उरत नाहीत. स्वभाव अत्यंत चिडचिडा, हट्टी बनतो, आपलाच हेका चालवून घेतो. इतरांवर घाणेरडे आरोप करतो, जणू काही इतरांनीच गुन्हा केला, अशा प्रकारे आरडाओरडा करतो. कधी कधी नेमकी दारू घेतली नसताना घरातले लोक संशय घेतात, पाळत ठेवतात,खिसे तपासतात म्हणून जास्तच अकांडतांडव करतो आणि जाणून बुजून मुद्दाम त्याकारणाने हटकून पितो. अधूनमधून त्याच्या सद्‌सद्‌विवेकाची टोचणी लागून तो ढसढसा रडतो, इतरांना त्रास होतो हे कबूल करतो, यापुढे पिणार नाही अशा शपथा घेतो. आश्वासने देतो पण त्यात काहीच तथ्य नसते हे लवकरच सिद्ध होते. दारू सोडायची त्याची कितीही इच्छा असली, तरी आता "दारू'' त्याला सोडायला तयार नसते, जसे इतरांना अन्नाची गरज असते त्याप्रमाणे ह्या रोग्याच्या शरीराला अंमली पदार्थ किंवा दारूची गरज असते. ती आता त्याची "फिजिकल रिकवायरमेंट' होते. आता त्याचा नाइलाज असतो आणि हे समजल्यामुळे तो आता बिथरल्यासारखे वागू लागतो. हळू हळू त्याचे सर्व मौल्यवान सामानसुमान संपते, तो पैशासाठी खोटे बोलू लागतो, उधारी करू लागतो आणि पिऊन रस्त्यावर पडल्यावर जवळ चे पैसे, घड्याळ , अंगठी पळवणारी एखादी टोळी त्याच्या अवतीभोवती असतेच. अशा स्थितीत तो स्वत:चे स्वास्थ गमावतो तो स्वच्छ राहू इच्छीत नाही. चांगले कपडे नकोसे होतात. घाणेरडे शरीर, गलिच्छ कपडे, असंयमित मन, असंबद्ध विचार आणि उर्मट विक्षिप्त मुजोर वागणूक अशा अवस्थेत हा रोगी विनाशाची एक एक पायरी उतरत मृत्यूच्या खोल दरीत जात असतो. फक्त जीव जात नाही म्हणून जगत असतो. त्याच्याबाबतीत जवळच्या व्यक्तींच्या राग आणि कीव अशा संमिश्र भावना असतात.

कालांतराने तो बेफाम होतो. बडबडू लागतो. कुणाला ओiखेनासा होतो, घरातल्या सामानांची तोडफोड करतो- आक्रमक बनतो. कानामध्ये भयानक आवाज ऐकू येणे, डोळ्यासमोर भयानक अनाकलनीय अशी दृश्य दिसायला लागणे, चमत्कारीत त्रास होणे, एका जागी न बसू शकणे, डोक्यात कलकल होत राहणे, हिंस्त्र श्वापदासारख्या फेऱ्या मारीत राहणे, कितीही झोपेची औषधे दिली, तरी झोप न येणे या सर्व अवस्थांना "डिलिरियम ट्रेमेन्स'' असे म्हणतात. असा हा रोगी एक प्रकारचा मनोरूग्णच असतो. मजेसाठी एखादा पेग घेण्यापासून तो डिलिरियम ­ट्रेमेन्सपर्यत असा हा प्रवास असतो. सर्वसाधारण रूग्णांची कहाणी याहून भिन्न नसतेच. फक्त फरक असलाच तर स्थळ -काळ व तपशीलात. असा हा मनोविकारी रोगी संशयी बनून मानसिक व शारिरीक सुख देण्यास असमर्थ असून, दुसऱ्या वर घाणेरडे आरोप करायलाही मागेपुढे पहात नाही. स्वत:चा दोष लपविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो. अशा या बेफाम अवस्थेत शेवटी त्याचे सामाजिक, कौटुंबिक आयुष्य संपुष्टात येते.

अशा या मद्यपाशात जखडलेल्या मनोविकारी रुग्णाला"अल्‌कोहोलिक हेंल्युसिनोसिस'' हा विकार शेवटी आपल्यात सामावून घेतो. अशांना घरी सांभाळणे अत्यंत कठिण असते. त्यांना फक्त दवाखान्यातील अनुभवी तज्ञ डॉक्टरच हाताळू शकतात. या मद्यपाशामुळे आणखी अनेक रोग उद्‌भवू शकतात-लहान मेंदूवर परिणाम होणे,भूक मंद होऊन अपचन अथवा जुलाब होणे- यकृतात बिघाड होणे, त्याला सूज येणे , कावीळ होणे-जलोदरासारखे रोग होऊन ¹क्वचितप्रसंगी रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यूला कवटाळतात-थोडक्यात शेवटी स्वत: सुटतात व संबंधितांना पण मुक्त करतात. आधी पैसे नंतर आरोग्य मग माणुसकी व शेवटी प्राण फक्त इतके गमवावे लागते.

*अवघड असले तरी अशक्य नाही!

मद्यापासून मुक्त होणे हे खरोखरीच अत्यंत अवघड असले तरी ते अशक्य मात्र नाहीच. त्याकरीता रोग्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांची चिकाटी किती आहे यावर ते अवलंबून आहे. सतत निराश होऊन सुद्धा त्यांना धीर सोडून चालणार नाही. रोग्याच्या भल्याकरीता परिस्थिती पाहुन मृदू किंवा कठोर व्हावे लागेल. मी दारू सोडू शकतो,दारूवर माझा ताबा आहे, मला झालच काय आहे? अशा प्रकारची वक्तव्य करणारा आयुष्यात कधीच व्यसनमुक्त होऊ शकणार नाही. ताबा, स्वत:वर कंट­ोल , विलपॉवरच्या अभावामुळेच तर तो मद्यपी झालेला असतो, मग व्यसनापासून मुक्त होण्यासाठी त्याच्याजवळ कु ठे असतो स्वत:वर ताबा ? पण खरोखर व्यसनमुक्त व्हावयाचे असेल, तर स्वत:च्या शिल्लक असलेल्या इच्छा शक्तिला एकत्रित करून मदत करण्यास तयार असलेल्यांना मदतीची- कळकळीची हाक मारायला हवी, पश्चात्ताप व्हावयास हवा. अहंकाराचा अडसर दूर करावयास हवा.*""होय, मी दारूड्या आहे, दारूवर माझा ताबा नाही, मी एकट्या ने दारूविरूद्ध लढू शकत नाही, मला मदत हवी आहे'',* असे प्रामाणिकपणे पश्चातापाने पण मनापासून म्हणणाऱ्या व्यक्तिला मद्यपाशातून मुक्तता मिळविता येते. देशात अनेक खाजगी तसेच सरकारी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. तेथे त्याला खरी वैद्यकीय व मानसिक मदत मिळते .अे अे किंवा एन अे सारख्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या मिटींगला जाणे आवश्यक आहे, तेथे त्याला स्वत:चे अनुभव सांगता येतात, दुसऱ्याचे अनुभव ऐकता येतात, थोडक्यात,तो आपली चूक झाली याची प्रत्यक्ष कबुली चार चौघात देतो. शपथा घेण्यापेक्षा शरणागती पत्करतो, कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर विश्वास असावयास हवा. प्रार्थनेने बळ येते, निती-अनितिची जाणीव होते. आणि "आज दारू पिणार नाही', असे ठरवून त्या प्रमाणे वागण्याचे बळ येते . स्वत:चे जुने व्यक्तिमत्व दोषांसहित नष्ट करावे लागते. मगच पुन्हा खरा पुनर्जन्म होतो. व्यसनी माणसाचा खरा शत्रू दारू किंवा अंमली पदार्थ नाही, तर दारूचा पेला ओठाला लावणाऱ्या हाताला ताकद देणारे त्याचे स्वत:चे मन त्याचा खरा शत्रू आहे. व्यसनमुक्तीचा खरा मार्ग म्हणजे व्यसनांची सुरूवात न करणे.

सुहास सोहोनी
उजळते क्षितिज[मराठी लेख संग्रह -२००७ ]
www.mazyasamvedana.com

Saturday, January 26, 2013

* दोन शब्द * लेखन कां करवस वाटलं ?

 * दोन शब्द *
**  लेखन कां करवस वाटलं ? **
           दररोज सतत आपल्या भोवताली  अनेक चांगल्या वा वाईट घटना घडत असतात आणि मनाच्या जलाशयात तरंग उमटतात.  भावना शब्दरूप घेतात, विचारांना दिशा मिळते आणि माझं मत कागदावर लिहिले  जाते.उच्च नितिमुल्ये जपण्यासाठी धडपडणारं कुणी गवसलं  तर दीपस्तंभातून प्रकाशणारे किरण दूरवर पोहोचावे म्हणून लेखणी उचलावीशी वाटते .
         दुष्कृत्यांची लाज वाटेनाशी होऊन नितीमुल्ये पायदळी  तुडवून, काळ्या   करणीची पेरणी होत आहे असे वाटले  तर सामान्य जनांनी त्या दिशेने येणारा वारा सुद्धा टाळावा,  अशी कळकळीची विनंती करण्यासाठी लेखन करावेसे वाटते.  योग्य, अयोग्य, चांगले , वाईट याचे अर्थ स्वार्थानुरूप बदलतात अस समाजचित्र कधी कधी दिसतं, पण बहुसंख्य जनांसाठी अन्यायकारक असेल  तर ते अयोग्य, हे स्पष्ट  करण्यासाठी पत्रप्रपंच करावासा वाटतो.  बऱ्याच वेळा  सुचनांमुळे , आग्रहामुळे  गैरसोई टळतात, दुरूस्त्या होतात "सोय सवलत' उपलब्ध होते हे मी अनुभवलंय.  पण वर्तुळाला  जसं टोक नसतं तसे समस्यांना अंत नसतो हेच सत्य आहे.
       ** जळत असलेल्या घरावर आपल्या इवल्याशा चोचीने दुरून आणून पाणी टाकणाऱ्या  चिमणीला , एक ठिणगी तरी विझवता येईल  अशी आशा वाटते, पण त्याहीपेक्षा चित्रगुप्ताच्या नोंदवहीत तीचा उल्लेख नक्कीच "आग विझविण्यासाठी प्रयत्न करणारी '' असा केला  जाईल ,**
 आणि हेच समाधान मला  लेखना द्वारे मिळाल  तर बस्‌.
        सुहास सोहोनी
        ९४०५३४९३५४
    वर्तुळाच टोक [मराठी लेख संग्रह -२००५]

 वर्तुळाचे टोक
मराठी लेख संग्रह -२००५
लेखक -सुहास सोहोनी

                                        *   अर्पण पत्रिका   *
       देशाच्या सरहद्दीवर डोळ्यात तेल  घालून "ते' रात्रंदिवस सज्ज आहेत म्हणूनच आम्ही निश्चिंत आहोत, अशा त्या महापराक्रमी सैनिकांना व त्यांच्या परिवारास समर्पित............
         ******************************************************************************

Friday, January 25, 2013

* प्लास्टिक कचऱ्याच्या भस्मासुराचे व्यवस्थापन -रिसायकलिंग प्लांट *

    *   प्लास्टिक कचऱ्याच्या भस्मासुराचे व्यवस्थापन -रिसायकलिंग प्लांट   *
          विविध कारखान्यातून उत्पादन जेंव्हा बाजारात आणि शेवटी आपल्या घरांत येत तेंव्हा प्रत्येक वस्तू प्लास्टिकच्या वेष्टनात असते .वेगवेगळ्या आकर्षक आकारांत ,रुपात रंगी बेरंगी अशी हि सर्व प्लास्टिक
 वेष्टने आपल्या घरांत दररोज जमा होत असतात .या बाबतीत आपला पूर्णपणे नाईलाज असतो .आपली इच्छा असो वा नसो ,आपली परवानगी सुद्धा न घेता या प्लास्टिक पिशव्या ,वेष्टने आपल्या घरांत घुसतात ,
कुठेतरी जागा मिळवतात .पुढे कधीतरी कचऱ्याच्या टोपली मधून  सहजगत्या रस्त्याच्या कडेला कचरा
कुंडीत ,आजूबाजूच्या नाल्यांमध्ये फेकले जाते .त्यानंतर कितीतरी काळ हे प्लास्टिक जेथे फेकले तेथे
अस्ताव्यस्त पणे पडून असतं .छोट्या मोठ्या नाल्या अवरुद्ध होतात ,घाण साचते .दरदिवशी पुन्हा प्रत्येक घरातून 'सहजगत्या 'प्लास्टिक पिशव्या /वेष्टने घराबाहेर फेकल्या जातात .
            सर्वच गावें ,शहरे आणि संपूर्ण देशभर जवळ जवळ असेंच चित्र आहे .कोणत्याही वातावरणात प्लास्टिक नष्ट होत नाही ,विरघळत नाही ,जाळले तरी वायू रूपाने वातावरणात साचून राहते .प्रत्येक गावांत दर दिवशी हा प्लास्टिकचा ढीग वाढतच जाणार .त्याची विल्हेवाट लावायची कशी ? त्यासाठी ' रिसायकलिंग 'हा एक चांगला पर्याय होऊ शकतो .जिल्हावार हा उद्योग हवा ....त्यासाठी घरा घरात येउन पोहोचणारे हे प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट्स मध्ये नेलं गेलं पाहिजे .
           * प्रत्येकाने आपल्या घरातील कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक नाल्यात ,रस्त्यावर किंवा बाहेर कुठेही फेकू नये .ते स्वच्छ करून घरातच साठवावे व प्लास्टिक गोल करणाऱ्या व्यक्तीस /एजन्सीस /संस्थेस द्यावे .जेणेकरून ते प्लास्टिक रिसायकलिंग प्लांट मध्ये पोहोचेल .म्हणजेच गावभर कुठेही प्लास्टिक पडून
राहिलेले दिसणार नाही ,नाल्या तुंबणार नाहीत .
            *घरातील विविध प्रकारचा कचरा प्लास्टिकच्या थैलीत  कोंबून नाल्यात टाकले जाते ज्यामुळे नाल्या तुंबतात.आपली हि कृती योग्य नाही हेच नेहमी सिध्द होते .यासाठी मी /माझ्यापासून /स्वतः पासून बदलण्याची गरज आहे .
             *जाड प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या रस्त्यावर फेकण्या  पेक्षा  विविध वस्तू खरेदी साठी त्या वापरण्यास हरकत नसावी .अश्या पिशव्यांचा पुनर्वापर होऊ शकतो .
              *फेकून दिलेले अन्न पदार्थ प्लास्टिक पिशव्या सहित जनावरांच्या पोटात जाऊन पशुधनाची जीवहानी नित्य होत आहे .हे त्वरित थांबवायला हवे .प्लास्टिकच्या कचऱ्याच्या भस्मासुराचा पुनर्वापर  करण्याचे सक्षम व्यवस्थापन हवे .
           सुहास सोहोनी
       www.suhassohoni.blogspot.com
       www.mazyasamvedana.com














Wednesday, January 9, 2013

* नेतृत्वहिन व दिशाहिन जनसमुदाय *

        *    नेतृत्वहिन व दिशाहिन जनसमुदाय   *

    कुठल्‌याही कारणांनी आपbा रोष प्रकट करताना जेव्‌हा जमाव रस्त्यावर उतरतो तेव्‌हा त्या जमावाbा चेहरा नसतो.  परिणामांची पर्वा नसते.  त्यात जर नेतृत्व नसेb तर सैरावैरा bोंढçासारखा उसiणारा जमाव म्हणजे जणू काही फुटbेल्‌या धरणातून रोरांवत निघाbेbे पाणीच.  कधीही, काहीही घडू शकते.  आपल्‌या दैवतावर अतीव भक्‌ती असणारा हा दुखावbेbा समुह नेतृत्वाची वाट पाहात थांबत नसतो, स्वयंस्फूर्तिने निषेध नोंदविण्यास रस्त्यावर उतरbा असतो, आणि म्हणूनच दिशाहिन बनण्याची फार जास्त शक्यता असते.  दिशाहिन संतप्‌त जनसमुह उग्र, कू्रर आणि हिंसक बनbा तर नवb नाही.  सत्ताधारी व प्रस्थापितांविरूद्ध गरi ओकत, माथी भडकbेbा आणि "नित्य दुर्bक्षित राहिbेbा' हा हिंसक बनbेbा जनसमुदाय आडव्‌या येणाèया स्वत:च्‌या कोणत्याही संपत्तीची सहज राखरांगोiी करतो.  कोटçावधीची वित्तहानी होते.  सामान्य जनतेच्‌या पैशातूनच देशाची संपत्ती वाढत असते, विकास होत असतो. पण हे भान संपbेbे असते आणि सुरू होतो हिंसाचार, असं का होते ?
    ही माणसे हिंसा का करतात ? ही जी हिंसा होते ती क्रांती नसते आणि युद्ध तर नसतेच किंवा सशस्त्र बंड ही नसते.  अत्याचार, अपमान कुणी, का ? आणि किती काi सहन करावा.  निषेध व्‌यक्‌त करणं अत्यंतिक गरजेचं आहेच पण देशाच्‌या प्रगतीbा खीi घाbणे आणि स्वत:च्‌याच साधन संपत्तीचा नाश करणे हे योग्य नाहीच.  केवi अत्याचार आणि उपेक्षा ज्‌यांच्‌या वाटçाbा आbी अशा गरिबीने होरपibेbी bाखो करोडो डोकी संतापग्रस्त होत आहेत, उपेक्षित ठेवbे गेbेbे प्रक्षोभित होत आहेत रस्त्यावर उतरण्याची भाषा केbी जात आहे याचा अर्थ कiतोय का ? सन्मानाने जगण्याचा समान अधिकार बहाb केbेल्‌या bोकशाही प्रणाbीत परिपक्‌वता नाही.  समानता नाही, भेदभावांची प्रचंड दरी आहे.  मुiात ऐक्‌य नाही प्रत्येकजण माझं, आमचं वेगiेपण प्रकर्षाने सांभाiतो आहे कसं होईb भारतीय एकतेचं ?
    शिक्षणाने चांगल्‌या वाईटाची जाण असbेbे आजचे तरुण नागरिक स्पर्धेत मागे पडतात, बेरोजगारीने त्रस्त आहेत.  इच्‌छा आकांक्षा वाढल्‌या आहेत पण त्या पुर्ण होत नाहीत कारण हाताbा काम नाही, त्यात चटकन व्‌यसने bागbेbी.  मार्ग दाखवण्यास जबाबदार नेता नाही.  "रिकाम्या मनात सैतानाचा संचार असतो' हे सत्य आहे.  कुणीही यावं, जनसमुहाbा भडकवणारं भाषण करावं, टाùया मिiवाव्‌या आणि दिशाहीन डोकी होरपiण्यासाठी झोकुन द्यावी.  हे थांबायbा हवं.  देशहित सांभाiणारं नेतृत्व bाभण्याची गरज आहे.  प्रत्येक समाजघटकाचा मान सन्मान मन: पुर्वक सांभाiून अनुचीत घटना घडू न देणे आणि जबाबदार नागरिकांच्‌या हातुन कधीही कुठेही हिंसा, नुकसान होऊ न देणे या गोïी कौशल्‌याने हाताiणाèया नेत्यांची गरज आहे.  ज्‌या जनसमुदायाbा अत्यंतिक क्रोध येतो त्यांना पावbोपावbी होणाèया भ्रष्‌टाचाराचा का राग येत नाही? सामान्य नागरीकांना हरतèहेने नाडणाèया वेठीस धरणाèया समाजकंटकांचा का राग येत नाही ? सकारात्मक विचार बिंबवणारे चांगbे शिक्षक, आईबाप कुठे आहेत? आपल्‌या मुbांना सन्मानाने जगायbा शिकवा.  निषेध नक्‌कीच करावा, मतभेद असु शकतात पण त्यांना क्रौर्य व हिंसा करण्यापासून वाचवा, कारण आपण प्रत्येक हिंसक घटनांमुiे अनेक वर्षे मागे जातो हे ओiखायbा हवे.  हिंसेने तात्पुरते फi मिiते आणि युगायुगांचा द्वेश जोपासbा जातो पण आपापसातीb विश्वास आणि प्रेमभाव कायम सुख समृद्धी प्रदान करतो.

* आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात *

 *   आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात   *

    समतोल व संयमीत मन ज्या व्यक्तिजवळ आहे तिचे आरोग्य चांगले आहे असे ठोकळमानाने म्हणता येईल पण खरोखर इतके उच्च दर्जाचे मन:स्वास्थ्य लाभण्याकरीता आज जगभरात योग्य वातावरण आहे का? नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्ती, अज्ञान, अत्याचार, चुकीचे मानवी निर्णय अशा अनेक बाबी आज आपल्या आरोग्याच्या शत्रू बनल्या आहेत.सर्वसामान्य व्यक्तिला आपल्या आरोग्याचे रक्षण करणे जितके आवश्यक आहे तितकेच ते महा कठीण काम आहे.  चांगले आरोग्य ही प्रत्येक व्यक्तिची अमुल्य संपत्ती आहे, त्याचप्रमाणे निरोगी नागरीक ही सुद्धा प्रत्येक देशाची संपत्तीच आहे. ज्याप्रमाणे संपत्ती मिळवून तिचे रक्षण करावे तसेच, आधी आरोग्यवान बनून नेहमीकरीता ते आरोग्य टिकवून ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.
    कारखाने व शहराच्या विकासासाठी आज सपाटून जंगलतोड होत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम हवामानावर होत आहे. कारखान्यामुळे दुषीत वायू, दुषीत पाणी, आजूबाजूचे प्राणी आणि मानव दोघांवर परिणाम करीत आहे.त्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. अनेक खेड्या मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. असेल त्या डबक्यातले पाणी आज माणसाला प्यावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मैल न मैल दूर अंतरावरून पाणी आणण्याची पाळी आजही आमच्या देशवासियांवर येत आहे. पाणी हे जिवन आहे पण ते पाणीच जर जंतूयुक्त असेल, दुषित असेल तर कसले चांगले आरोग्य लाभणार आहे? गरीबी आणि बेकारी इतक्या मोठ्याप्रमाणात आहे की आजचा दिवस कसा पार पडेल ही चिंता, त्यात महागाईचे अक्राळ-विक्राळ  स्वरूप बघितले तर या जनतेला  सकस अन्न कधी मिळणार आहे? साधं दोनवेळचं निट जेवण या महागाईत मिळणे कठीण तिथे मुलांना दुध, फळे , व्हीटामिन्स टॉनिक देणे कसे शक्य आहे? लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे त्यामुळे  कितीही पुरवठा व्यवस्था वाढवली तरी कमी पडते आहे. काही प्रगत देश सोडले तर बहुतेक विकसनशील देशांत कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती आहे.
    खरया अर्थाने आपल्या आरोग्याचे शत्रू कुणी असतील तर ते आहेत गरीबी, दुषित पर्यावरण, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास, व्यवस्थापनातील दोष,आळस, आरोग्यविषयक अज्ञान, अंधश्रद्धा, भेसळ  करणारे लोभी व्यापारी आणि त्यांना पाठीशी घालून स्वत:चे हित पाहणारे आपलेच भाईबंध.   स्वत:च्या आरोग्याच्या रक्षणाकरीता आज सामान्य माणसाला इतक्या शत्रू  विरूद्ध लढाई पुकारावयाची आहे. आपले आरोग्य हीच जर खरी संपत्ती आहे तर या संपत्तीच्या प्राप्ती साठी प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे. आरोग्यवर्धनासाठी आळस झटकून चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत तरच खर्या अर्थाने आपण आरोग्यसंपन्न होऊन प्रसन्न राहू
 सुहास सोहोनी
उजळते क्षितिज[मराठी लेख संग्रह -२००७ ]
www.mazyasamvedana.com




.

सावधान वाळवंट सरकत आहे.

          *    सावधान वाळवंट सरकत आहे.       *
   
     यावत्‌ भूमंडलात धत्रे, सशैल वन काननम्‌
    तावत्‌  तिष्ठंती  मेदिन्याम्‌, संतती पुत्र पौतृकी।।
    हजारो वर्षापूर्व आमच्या दूरदर्शी  पुर्वजांनी आम्हाला बजावून सांगीतले होते की जोपर्यत या पृथ्वीवर हिरवळ , झाडे, पर्वत आणि मुबलक पाणी आहे तोपर्यतच तुमची मुले बाळे  सुखात जगतील. पण वर्तमान स्थिती पाहता नव्या शतकांत  आपल्याला दुषीत पर्यावरणामुळे  निर्माण होणाऱ्या भयानक आपत्तीविरुद्ध झुंजावे  लागणार आहे. वास्तविक मानवाचे निसर्गाशी असलेलं नातं अतुट आहे. ज्या निसर्गाच्या उन सावलीत आमच्या अनेक संस्कृतींनी जन्म घेतला, त्यांचा उत्कर्ष झाला असा हा निसर्ग आम्हाला गुरू समान आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी  व आकाश या तत्वांनी बनलेल्या या निसर्गशक्ती पासून आम्ही अनेक शास्त्रे  शिकलो आहोत.तरी पण आम्ही कळत न कळत या निसर्गावर आघात करीत आहोत.
    सृष्टीचे  कार्य चेतनामय पंचतत्वांच्या सहाय्याने एका संथलयीत, ठाराविक दिशेने अविरत सुरू असते. निसर्ग आपले कार्य सहजपणे करीत असतो. निसर्गाच्या छायेत सर्व जीव, जंतू, पशूपक्षी, वृक्षवेली सुखासमाधानाने नांदत आहेत. जीवसृष्टीतील अनेक संस्कृती स्वत:ची आगळी वेगळी  वैशिष्ट्ये  कायम ठेवून कालक्रमणा करीत आहेत. सर्व जीवाचं पोषण व नाश निसर्ग स्वत:च्या नियमाने संतत आणि सहज करीत असतो. हेच सृष्टीचं जीवनचक्र आहे.
    संपूर्ण जीवसृष्टी  निसर्गाच्या पाच तत्वांच्या जादुई चेतनामय आवरणात सुरक्षित आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक जीव, वस्तू, चल, अचल स्वत:च्याच आवरणात बद्ध असतात. शरीरात वाहणारं रक्त रक्तवाहिनीच्या आवरणात वाहतं तेव्हाच ते सुरक्षित असतं. ग्रंथी, हाडे, मांसपेशी यांना त्वचेचे आवरण लाभलं आहे. मेंदू नावाचं चमत्कारी यंत्र कवटीच्या आवरणातच सुरक्षित आहे. केसांचे आवरण बदलत्या हवामानापासून जीवाचं रक्षण करतं.  प्रत्येक वस्तू , झाडे, पशूपक्षी, जलचर हे सर्व स्वत:च्या तसेच पंचमहाभूतांच्या पाच तत्वांच्या आवरणातच सुरक्षित असतात.
    जोपर्यत पंचतत्वांचा आपसांत समतोल आहे, तोपर्यंतच निसर्ग शांत आहे. निसर्गाच्या शांत व उबदार आवरणात ही जीवसृष्टी  आरामात जगणार आहे. पण जर हा समतोल बिघडला तर? तर विनाश अटळ  आहे आणि या विनाशाला जबाबदार असणार आहे मानव. वसाहत, व्यापार व शेतीकरीता घनदाट जंगलाचा सतत नाश होत गेला, या कृतीचे फळ  भविष्यात मिiणारच आहे. व्यापार व शिकारीच्या उन्मादात मानवाने अनेक प्राण्यांचे वंश नष्ट  केले. शेतातून जास्त पीक घेण्याच्या हव्यासापाई निरनिराळी  विषारी रसायने वापरणे सुरू केले. परिणामत: जमीनीत राहणारी जीव संस्कृती, जी शेतात वावरून जमीनीचा कस वाढवते, नष्ट  होत आहे. विषारी रसायने तथा फवारणीपुढे हे जीव कसे टिकणार?  कारखान्यातील दुषित पाणी नाल्यात, नदीत किंवा समुद्रात सोडल्यामुळे  पाण्याच्या आवरणात सुरक्षित असलेले जीव तडफडून नष्ट  होत आहेत.
    आजच्या प्रगत युगात जगभरातील मानवाजवळ  असंख्य योजना, इच्छा आहेत. त्याला अधिकार व संपत्ती हवी आहे. विज्ञानाद्वारे प्रगत व समृद्ध बनून विकास साधावयाचा आहे. सत्तास्पर्धेत अग्रेसर रहावयाचे आहे. खरे तर निसर्गाच्या लेखी मानव म्हणजे अनंत ब्रम्हांडातील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ  एक जीव. मानवी संस्कृतीचं आयुष्य म्हणजे या सृष्टीच्या आयुष्याच्या मानाने एक छोटासा काळ . असे कित्येक काळ  या ब्रम्हांडात येऊन गेले असतील. कित्येक मानवी संस्कृती काळाच्या ओघात निसर्गाच्या जडण घडणीच्या  प्रक्रियेत नष्ट  झाल्या.
    सृष्टी ने निर्माण केलेला प्रत्येक जीव हा दुसऱ्या कुणा जीवाची अन्नाची सोय आहे. त्या द्वारेच प्रत्येक घटकाचं संतूलन साधलं जातं. मानवेतर अन्य जीव एकमेकांवर हल्ला करतात. तो मुख्यत्वे पोटासाठी व कधीकधी श्रेष्ठत्वासाठी, पण त्यावेळी  कधीही निसर्गहानी होत नाही. संथ जलाशयात दगड पडल्यास थोडी खळबळ  व्हावी एवढाच त्या घटनेचा ठसा राहतो व पुन्हा सृष्टी चं कार्य शांतपणे सुरू होते. नित्य घडणाऱ्या  या घटना निसर्गनियमानुसार सृष्टीच्या जिवनचक्राचाच एक भाग आहेत. पण मानव एकमेकांवर हल्ला करतो तो स्वार्थासाठी.  दुसऱ्यावर  अधिपत्य गाजवून जमीन, संपत्तीची वाढ करतांना शत्रूच्या संपत्तीची राख रांगोळी  तो मुद्दाम करीत असतो. आपल्याच मानव वंशाचा नाश तो इतक्या क्रुरतेने, कुटीलतेने, विश्वासघाताने करत असतो की बुद्धीचा एवढा दुरूपयोग सृष्टीतील कोणताही जीव कधी करत नसावा. नासधूस केलेल्या प्रदेशात निसर्गनियमाचे उल्लंघन होऊन ऋतूमानात अवेळी  अकारण बदल होत आहेत.
    क्षेपणास्त्रे , अण्वस्त्रांचे  हल्ले, भूगर्भातील चाचण्या, आसमंतात पसरणारा कारखान्यातील विषारी रासायनिक धूर, कोळसा, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या अती वापरामुळे  वातावरणात साठणारा कार्बन डॉय आक्साईड, पाण्यात सोडले जाणारे विषारी रसायने, अणू कचरा, ध्वनी प्रदूषण आणि या सगल्यांच  मूळ  असणारी दर क्षणाला वेगाने वाढणारी मानवप्रजा, या अनेक कारणांनी या सुंदर सृष्टी चा नुसता उकीरडा होऊ लागला आहे. दर क्षणाला वातावरणात सोडला जाणारा कार्बन  अनेक वर्षे टिकून राहतो. सूर्याची उष्णता स्वत:मधे सामावून घेतो. परिणामत: दिवसेंदिवस पृथ्वीभोवतीचे तापमान वाढत चालले आहे त्यामुळे  भविष्यात दोन्ही गोलार्धावरील बर्फ वितळुन समुद्राची पातळी  वाढेल. या कारणाने पृथ्वीवर काय हाहाकार होईल ? पृथ्वीवरील सध्याचे जमीन व पाणी यांचे प्रमाण बिघडेल.  पाण्याची पातळी  वाढल्याने बरीच जमीन पाण्याखाली जाईल. आपल्या पृथ्वीभोवती बाह्य  वातावरणापासून रक्षण करण्याकरीता "ओझोन'नामक वायुचे सरंक्षक कवच जागोजागी क्षतीग्रस्त होत आहे. त्याची जाडी कमी होत आहे. ओझोन शिवाय पृथ्वीवर पोहोचणारे सूर्यकिरण अतोनात दाहक असतील त्यामुळे  त्वचेच्या केंन्सर सारखे  रोग होतील. त्या उष्ण किरणांपुढे कित्येक जीवसंस्कृतींचा टिकाव न लागून त्या नष्ट  होण्याची भिती आहे.
    विकसीत देशात प्रगत विज्ञानाद्वारे सर्व सुखसोईंचा मनमुराद उपभोग घेणारे पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ  15 ते 20 टक्के लोक आहेत. पण जगभरात असलेली 80 ते 85 टक्के मानवजमात भूक, अपमृत्यू, अंधश्रद्धा, बेकारी, गरीबी, लाचारी, कुपोषण, प्रदुषणामुळे  होणारी रोगराई अशा  समस्यांमधे जखडली असून त्यांना प्रगत ज्ञानाचा उपभोग घेणे अशक्य आहे. तेव्हा एकीकडे मुठभर श्रीमंतांचे चैन चोचले पुरवण्यासाठी निसर्ग संपत्तीची प्रचंड लयलूट, तर दुसरीकडे कोट्यावधी जनतेच्या मुलभूत गरजासुद्धा भागवता येत नाहीत, हे कितपत योग्य आहे?
    वैयक्तिक स्वार्थ, अहंकार, जात, धर्म,  देश, संपत्ती या सर्वापेक्षा पर्यावरणाचे रक्षण हे प्रथम कर्तव्य असावयास हवे,  कारण आपल्या अस्तीत्वापुढे सर्व काही नगण्यच आहे. "*पर्यावरणाची रक्षा*'ही बाब प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. निसर्गाचा ऱ्हास  करणारी व्यक्ति निसर्ग द्रोही समजून अशा व्यक्तिस पृथ्वीचा शत्रू समजावयास हवे. आपल्या अनंत चुकांचा परिणाम म्हणून वाळवंट नामक क्रुर निष्ठूर आपत्ती हळू हळू  आपल्याकडे सरकते आहे हे आम्हाला माहित आहे?

            सुहास सोहोनी
    उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह -२००७]
       www.mazyasamvedana.com    




* निसर्गातच आहे विपुल अन्न *

   *   निसर्गातच आहे विपुल अन्न    *
   
    प्रत्येक सजीव म्हणजेच प्राणी आणि वनस्पती यांना जगण्यासाठी व वाढीसाठी प्रथम गरज आहे अन्नाची. जगायचं असेल तर आपले अन्न आपल्याला मिळवावेच लागते. प्रत्येक जीव मरेपर्यंत ही धडपड करतच असतो.त्या धडपडीतून त्या जीव-समुहाचा विकास घडत असतो. छोट्याशा किटकांचा सुद्धा मिळवलेले अन्न साठवून ठेवण्याकडे नैसर्गिक कल असतो. आणि त्या विचार प्रेरणेतून एक सुनियोजीत शिस्त अंगीकारली जाते.  अन्न मिळवणे,साठवण करणे,वितरण करणे व सरंक्षण करणे या महत्वाच्या कार्यपद्धती आयोजिल्या गेल्या.   अन्न मिळविण्याकरिता प्रत्येक सजीवाला   वैयक्तीक किंवा सामूहिक शक्ती आणि टोकाची बुद्धीमत्ता वापरून युक्तीचा उपयोग करावा लागतोच. या दोन्ही गोष्टीत जो कमी पडेल त्याचा बळी  गेलाच म्हणून समजावे.
    पंचतत्वा ने निर्माण झालेल्या या निसर्गाने प्रत्येकाला नियमित पणे संधी दिलेली आहे पण वातावरणाचे आणि परिस्थितीचे चक्र मात्र कायम फिरतं ठेवलं आहे. ऋतूमानाप्रमाणे विविध विलोभनीय रूपाने हा निसर्ग सजतो.खुलतो. असतील ते सगळे  रंग सभोवताली उधळून सर्वांगावर रंगप्रावरणे लेवून सजण्याची, नटण्याची हौस फे डून घेतो.  सर्व  सजीवांना आपले अन्न मनसोक्त लुटू देतो, तृप्त  करतो. तोच निसर्ग दाहक उन्हाच्या चटक्यांनी आसमंत भाजून काढतो, थंडीने गारठतो व अतीवृष्टी ने सर्व वाहुंन नेतो. प्रत्येक जीवाला पुन्हा पुन्हा अन्नासाठी व सुरक्षिततेसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतात. संतत बुद्धीमत्तेचा कस लागतो आणि       बुद्धीचा विकास होतो.
     जीवन हे सापशिडीच्या खेळा सारखं आहे, जसं दान पडेल तसं पुढे पुढे जाणारं किंवा तळा पर्यत गडगडणारं, हे चालूच राहणार पण मांडून ठेवलेल्या "सापशिडीच्या पटावरील शिड्याची संख्या वाढवता येईल ?'नुकसानीला आळा  बसेल अस व्यवस्थापन हवं आहे. शिस्तबद्ध सुनियोजित व्यवस्थापना द्वारे प्रत्येकापर्यत सकस अन्न कसे पोहचेल हा विचार होण्याची गरज आहे.अन्नासाठी भांडण्याऐवजी आपल्याला पुरून उरणारे अन्नधान्य वितरीत करण्याची गरज आहे. लाखोंच्या संख्येने कुपोषित बालके असून असंख्य भूकबळी  आपल्या देशात होत आहेत. हे कशाचे लक्षण आहे? समुहाने राहणाऱ्या  मानवाने प्रत्येकाला दोन वेळ चे अन्न मिळेल याची सामुहिकरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी अन्नाची होणारी नासाडी पाहवत नाही. कोठांरामध्ये धान्य पडून सडल्याच्या बातम्या येतात आणि भ्रष्टाचाराचे काय? भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी जिद्द बाळगणारी मने घडविण्याची गरज आहे.जगात कोठेही अन्नधान्याचा तुटवडा नको. या निसर्गदेवतेवर श्रद्धा ठेवा, संवर्धन करा कारण केवळ  हा निसर्गच विपूल धन्यधान्य उदारपणे देणार आहे.
                
               सुहास सोहोनी
           उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह -२००७]
          www.mazyasamvedana.com

          


   *   पाणी व्यवस्थापन- "गाव तेथे तळे '   *
   
    "पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा'. समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. पण हाय! या समुद्रात,या तलावात  पाणी नाही , रेती आहे. फक्त वाळू आणि माती ... आणि सध्या  अशा भयाण दुष्काळाने महाराष्ट्रात तांडवनृत्य सुरू केले आहे. दुष्काळाच्या धगधगत्या यज्ञात आहुत्या पडतात पशुंच्या, पक्षांच्या, मानवी जिवांच्या. छोटे मोठे पाण्याचे साठे सुकून जात आहेत. तशातच मार्च, एप्रिल पासूनच प्रखर उन्हाने जिवाची लाहीलाही होइल  . जंगली पशुपक्षी तर स्वत:च्या बुद्धीची आज्ञा पाळून सुरक्षित ठिकणी स्थलांतरीत होतील . पण मुके पाळीव प्राणी? मानवाच्या आज्ञेत राहण्याची, जगण्याची सवय झालेल्या या पशुंनी कसा निर्णय घ्यावा? मालकाने जेथे वळवले तेथे निघायचे. अशा जनावरांचे स्थलांतर होईल , पण बऱ्याच जिवांना प्राण गमवावा लागतो- केवळ  पाण्याअभावी. पाणी नसेल तर सजीवच राहणार नाहीत या सत्यतेची ही छोटीशी एक झलक आहे. पाणी हेच जिवन आहे . दिवस उजाडला की पाण्याच्या शोधात ही जनता आसमंत तुडवत आहे. मिळेल ते गढूळ  , दुषित पाणी घेत आहेत. वेळ  प्रसंगी संधीसाधू लोकांना वाटेल ती किंमत मोजून पाणी विकत घेत आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे.
    एकीकडे प्रचंड वादळी  वारे व अजस्त्र  उंचचउंच लाटांच्या धडकीने भारताच्या पूर्व किनाऱ्या वर प्रलयंकारी निसर्गाचे तांडवनृत्य होत असते. आणि  पश्चिम भारताच्या किनाऱ्या वर प्रखर उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे  निसर्गाच्या विनाशकारी अस्तित्वाचे दाहक दर्शन होत असते. वर्षानुवर्ष या खंडप्राय देशात सतत कुठेतरी निसर्गाचे फटकारे बसत आहेत. हजारोंच्या संख्येने जिवहानी व अगणीत  मालमत्ता नष्ट  होत आहे. तसे पाहिले तर निसर्गाचा हा नित्याचाच एक खेळ  आहे. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. ऋतुचक्रात अनियमितता दिसून येत आहे. उष्णतेत वाढ व पाण्याची कमतरता यामुळे  झाडांना, जंगलांना धोका आहे. त्यात मानवनिर्मत कारवायांमुळे  जंगलांचे, वातावरणाचे नुकसान होत आहे. जंगलाची वाढ होण्यापेक्षा जंगले नष्ट  होण्याची गती जास्त आहे. या सर्व घटनाक्रमाला एकत्रितपणे विचारपूर्वक विरोध करणे ही काळाची गरज आहे. बुद्धीचा उपयोग शांतता व रक्षणासाठी करण्याची गरज आहे. अशांतता आणि युद्ध केवळ  विनाशच देऊ शकतात आणि शांततेच्या काळातच रचनात्मक कार्ये होऊ शकतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी कार्य व्हायचे असेल तर प्रथम विश्वशांतीची आत्यंतिक आवश्यकता आहे. नाहीतर सापशिडीच्‌या खेळा प्रमाणे या पवित्र कार्याची अवस्था होईल.
    जलसंपत्तीची वाढ करण्यापासून या पवित्र कार्याची सुरवात करावी लागेल. भुगर्भातील पाणी वाचविणे त्याचबरोबर पावसाचे पाणी जमेल तसे साठविणे या विषयीचे महत्व सर्वानी मान्य करायला हवे. त्या करीता जनजागरण हवे. जमीनीच्या उंच सखलपणाचा उपयोग करून – "गाव तेथे तळे ' ह्या  वचनाची  अंमलबजावणी करायला हवी. पावसाच्या पाण्याचा साठा कसा करता येईल, आणि वाहुन जाणारे पाणी जमिनीत कसे जिरवता येईल यावर मन:पूर्वक कार्य करावे लागेल. हा अस्तित्वाचा  प्रश्न आहे, हे सत्य नाही का? प्रत्येक गावाचे पाणी व्यवस्थापन हाच अतिमहत्वाचा विषय समजायला हवा. पाणी व्यवस्थापनासाठी जगात आज उपलब्‌ध असलेल्या सर्व पद्धती– सर्वकष विचार, आमच्या प्रत्येक  गावाला माहिती करून देणे आवश्यक आहे. प्रदुषण टाळण्यासाठी काय करता येईल याचा अंतर्मुख होऊन विचार करणे व कृती करणे गरजेचे आहे. कालवा पद्धतीने एकीकडचे अतिरिक्त पाणी कमी असलेल्या प्रदेशात वiवणे शक्य आहे, पण हे कार्य युद्धपातiीर सुरू करावे. शासन त्याच प्रमाणे गैर– शासकीय संस्था यांनी"गाव तेथे तळे 'हा विचार अस्तित्वाचा प्रश्न समजून या  कार्यास अग्रक्रम द्यावा.
        * *प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरावा द्वारे प्रत्येक गावासाठी किमान दोन एकराची जमीनगावतलावासाठी
निश्चित करून तेथे तलाव निर्माण केला तर पावसाळ्यात कितीतरी पाणी साठवले जाईल .गावातील विहिरींना पाणी झिरपेल .तलावाभोवती स्मृतिवना ची निर्मिती केल्यास पर्यावरणाचा समतोल साधेल निसर्ग चित्र सुंदर दिसेल .दुष्काळावर मात करता येईल .हे व्हावे .***
           सुहास सोहोनी
        उजळते क्षितीज [मराठी लेख संग्रह -२००७]
         www.mazyasamvedana.com

Monday, January 7, 2013

* लसीकरण **काही प्रश्न *

 *     लसीकरण --काही प्रश्न    *
                      आरोग्य शास्त्रातील विविध शोधांचा विचार केला तर मन थक्क होते .अनेक प्रकारच्या शारीरिक कमतरता तसेच आजारांवर हमखास गुण देणारी  औषधे,लसी आज उपलब्ध आहेत ,अगदी मरणाच्या दारातून खेचून आणण्याचे सामर्थ्य आज आरोग्य विज्ञानात आहे .एकदा का रुग्णाला डॉक्टरांच्या ताब्यात दिले की रुग्मुक्त होऊन घरी जाईपर्यंत तज्ञांच्या मताने ठराविक उपचार पद्धती चालू असते .औषधे
आणि उपचारांच्या प्रभावाखाली आरोग्य शास्त्राद्वारे अव्याहतपणे हा एक सकरात्मक प्रयोग सुरु असतो .
सततच्या अभ्यासामुळे आणि योग्य निदान व अचूक औषधांमुळे यश मिळते .
                        परंतु काही वेळा  अपयशाचा सामना करावा लागतो .कधी कधी लसीकरणा नंतर काही दुर्दैवी घटना घडतात हि गंभीर बाब आहे यात सारवासारव करून एकमेकांवर दोषारोप केले जातात .नवजात बालकांना ठराविक कालावधीत विविध लसी दिल्या जातात त्यामुळे त्या बाळाचे संपूर्ण आयुष्य सुखी होते .आरोग्याचे संरक्षण दिले जाते .आधुनिक उपचार पद्धतीत गर्भ राहण्याच्या आधीपासून विविध संप्रेरके किंवा पोषक औषधोपचार केले जातात .सोनोग्राफी सारख्या अनेक उपायांनी गर्भावर सूक्ष्म लक्ष ठेवलेजाते ठेवले जाते . बाळाच्या जन्मानंतरही लसी व औषधे चालूच असतात ,मग लस दिल्यानंतर अपयश का येते ?लहान मुलांना विविध आजार का होतात ?लसीकरण अत्यंत महाग कां असावे ?एखादी लस देण्यासाठी ८०० ते
१०००रु.लागतात पण ताप येऊ नये या कारणांनी त्याच लसीकरणाचे रु. २४००/-घेतले जातात असे कां ?
                    मुळात बहुतेक सर्व  लसी विदेशातून येतात, *आपल्या हवामानाला त्या लसी योग्य आहेत कां ?
*विदेशातील कारखान्यात तयार झाल्यानंतर लस टोचली जाई पर्यंतचा काळ किती असतो ?
*आपला देश लसींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण कां नाही ?*शहरी किंवा ग्रामीण भागांत अनेक तासांचे भारनियमन असते,त्यामुळे लसी  ज्या योग्य वातावरणात,तापमानात ठेवावायला हव्यात ते तापमान
[कोल्ड चेन ]कसे सांभाळले जाणार ? *तापमान सांभाळले न गेल्यामुळे लसीकरणाच्या गुणात काय बदल
 होऊ शकतात ?* लहान बालकांचा जीव वाचवणाऱ्या या लसी साठी आरोग्य केंद्रांना अखंड वीज पुरवठा कां
दिला जात नाही ? *सर्व स्तरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना किती दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते ?*कोणत्या देशात कोणत्या लसीवर बंदी घातली आहे ?*आणि कां ? *इतर देशांत बंदी घातलेल्या लसी आपल्या देशात वापरल्या जात नाहीत ना ?*कोणते ब्रांड सुरक्षित आहेत हे सर्व ज्ञान आरोग्य कर्मचाऱ्यांना असते कां ?
*लसींच्या साठवणुकी विषयी सर्व निकष व मापदंड पाळले जात आहेत कां ?
                      बालकांच्या सर्वच आजारांवर उपलब्ध असलेल्या अनेक लसिंविषयी शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे जनकल्याण कार्यक्रम राबविला जातो .हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो .भावी पिढीच्या आरोग्याचा इथे संबंध आहे .शासनाने योग्य संदेश देऊन जनतेचा विश्वास मिळवावा ,लसीकरणाची भीती नको.लस घेण्यात जर धोका वाटू लागला तर लसीकरण न झाल्याचा धोका किती मोठा आहे ?बाळाच्या जन्मापासूनच डॉक्टरांवर विसंबून लसीकरण व विविध औषधोपचार सुरु असतो आणि हे सर्व विद्नानावर व तद्न्यावर असलेल्या विश्वसापाई सुरु असते .डॉक्टर व रुग्ण यांच्या मधील विश्वासाचे हे नाते जपलं जाणे हे समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे .लसीकरणा विषयी वरील प्रश्नांची अधिकृत उत्तरे अपेक्षित आहेत.आरोग्य शास्त्रातील तज्ञांनी जनतेला मार्गदर्शन करण्याची गरज आहे
                  सुहास सोहोनी
                   अमरावती
            www.mazyasamvedana.com










Friday, January 4, 2013

* मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा *

*  मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा  *
                         प्रत्येक स्त्री पुरुषांच्या मनात सुष्ट आणि दुष्ट असे दोन्ही विचार -तरंग उपजतच असतात .जन्मभर या दोन्ही परस्पर विरोधी विचारांच्या द्वंद्वात मानवी मन हेलाकावे खात असतं .सुविचार -कुविचार ,नीती-अनीती ,विघातक -विधायक ,सत्वगुण -तमोगुण किंवा चांगलं व वाईट या दोघांच्या मध्ये असतं संयमाचे कुंपण ,पण हे कुंपण लवचिक असल्यामुळे ज्या प्रकारच्या विचार तरंगांचे प्राबल्य वाढेल त्याची मनावर व्याप्ती वाढून दुसऱ्या प्रकारचा विचार प्रवाह निर्बल ,निस्तेज होतो .त्यानंतर आपसूकच चांगले किंवा वाईट कृत्य हातून घडते .सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने विचार करावयाचा झाला तर या संयमरूपी कुंपणाची बांधणी मजबूत बांधायला हवी .सुविचारांच्या वाढीमुळे समाजाचे आरोग्य सुधारून हवी तशी सुयोग्य प्रगती प्राप्त होते ,मात्र कुविचारी दुर्वर्तनाने समाजात अस्वस्थता ,असुरक्षितता वाढून स्वतःबरोबर अनेकांचे जीवन उध्वस्त होते .
                           ज्याप्रमाणे एखाद्या पिसाळलेल्या हिंस्त्र श्वापदाचा गावकर्यांना धोका असतो त्यापेक्षा जास्त धोका धोकदायक हे हिंसक ,उद्दाम ,उद्दंड ,मस्तवाल ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे विकृतांध असतात .गरीब ,श्रीमंत व कोणत्याही वयाचे असलेले हे राक्षसी दुराचारी आपल्या इच्छाप्राप्तीसाठी कुठलाही विधिनिषेध बाळगत नाहीत .या विकृत पिसाटांना अत्याचारग्रस्त जीवाचे कुठलेही सोयरसुतक नसते .जिवंतपणी पदोपदी मरण यातना भोगण्याच प्राक्तन किंवा आत्महत्या या निरपराध जीवांच्या वाट्याला येते .का ?आणि हे पिसाट मस्तवाल कायद्याच्या पळवाटा शोधून उद्दामपणे वावरतात ,पुन्हा कित्येकांचे जीवन उध्वस्त करतात .दहशतवादी वा भ्रष्टाचारी वर्गाप्रमाणेच हे विकृत ,दुराचारी गुन्हेगार समाजाला भरपूर त्रास देतात ,आतांकित करतात .
                          संयमाचे बांध फोडून विकृती कां वाढते ? बालवयात बिम्बवलेल्या त्या सुसंस्काराच काय झालं ?कां बरे कमी पडले संस्कार ?व्यस्ततेमुळे आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता कां?आधुनिकतेची धुंदी चढल्यामुळे पारंपारिक संस्कार ,यमनियम ह्या मौल्यवान मूल्यांना पायदळी तुडवले गेले .आपल्या इच्छा ,लालसा व पैशांचा हव्यास पूर्ण करतांना सर्व नितीनियमांना  दूर सारले गेले ,सत
 विचारांची नित्य टिंगल टवाळी आणि भ्रष्टाचारामुळे अकारण आलेल्या श्रीमंतीत कसे घडावे संस्कार क्षम
मन !लायकीपेक्षा जास्त मिळालेलं धन नेहमीच चुकीच्या दिशेने वळायला खुणावत ,व्यसनाधीनता वाढवून विकृत इच्छा पूर्ण करण्याची जिद्द वाढवत आणि परिणामाची पर्व न करता इच्छा प्राप्तीच्या मार्गावर पाऊल पडते .समाजात उजळ माथ्याने वावरत असलेल्या या विकृतांधांवर जरब हवी .या गुन्हेगारांना कठोर शिक्षा हवी ,त्याचबरोबर आजच्या बालकांना सुसंस्कार मिळतील हि व्यवस्था हवी .म्हणजे भविष्यात असे विकृत निर्माण होणार नाहीत .या मस्तवाल विकृतांध गुन्हेगारांना आवरा .
                          सुहास सोहोनी
                        www.suhassooni.blogspot.com
                        www.mazyasamvedana.com






 

Wednesday, January 2, 2013

* गेलं वर्ष ,आले वर्ष -२०१३ *

           *   गेलं वर्ष ,आले वर्ष -२०१३  *
                 पुन्हा एक नवीन वर्ष उजाडलं ,दरवर्षीप्रमाणेच .२०१२ पैकी १२ च्या जागी १३ चा आकडा लागला .
डिसेंबर संपता संपता थोडी थंडी ,उगीच यायची म्हणून आली .वर्षभरात देशात अब्जाधीशांची संख्या वाढली ,गरिबांची संख्या जरा  जास्त प्रमाणात वाढली .सर्व सामान्यांना हव्या असणाऱ्या सगळ्याच वस्तू सहजपणे महागल्या .या वर्षांत बरेच नवीन नेते उदयाला आले तर जुन्या नेत्यांनी सिंहासने घट्ट पकडून ठेवली.सत्तेच्या
खुर्च्या आपल्याच "गटा "कडे राहाव्या यासाठी जनतेला अनेक वस्तू ,अन्न धान्य अगदी फुकटात देणार अशा
घोषणा हसऱ्या  चेहेऱ्याने  केल्या गेल्या .जनता बिचारी भोळी आहे हे सगळ्यांना माहित आहे .शेवटी सत्ता
असेल तर सर्व काही आहे .राजकारणी लोकं सरड्यासारखे रांग बदलवू शकतात हे पुन्हा सिद्ध करून एफ.डी .आय ला मान्यता मिळवली .त्यामुळे आता विदेशी गुंतवणूक वाढणार ,"इंडिया "श्रीमंत होणार ......
महासत्ता होणार  ही खात्रीच झाली .प्रत्यक्षात आपला देश [भारत ] मधुमेह,बलात्कारां च्या बाबतीत महासत्ता बनतो की काय ,आसे चित्र समोर आले .वर्षभरात बालमृत्यू ,भृणहत्या व कुपोषणाचे प्रमाण फारच वाढलं ,
पण श्रीमंतांनी मात्र विविध सोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी नेहमीप्रमाणे केली .
                    वर्षभरात महागाई आणि भ्रष्टाचार का ? कसा ?कुणामुळे ?यावर भरपूर चर्चा [च ]झाली. वर्षा च्या शेवटी मात्र समस्त संवेदनशील देशवासीयांची मान शरमेने खाली घालावी ,अशी लज्जास्पद घटना
घडली .कोणत्याही नेत्याचे बोट न धरता तरुणांनी संयमित राहून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलला हे चित्र खूपच आशादायक आहे .उन्हाळ्यात पाणी समस्येवर जुन्या नव्या लेखकांनी मनसोक्त लिखाण केले ."जल
सिंचन या विषयात अनेक जण मनसोक्त डूम्बले .प्रत्येकाला खात्री आहे कि हळू हळू सगळ विसरलं जाईल .वर्षभरात मद्यपींची संख्या  वाढून देशाला अफाट महसुल उत्पन्न मिळाले .दारूमुळे काही कुटुंब उध्वस्त झालीत एव्हढेच .चमचमणाऱ्या श्रीमंतीचे वारे वाहत असतांना सुद्धा कित्येक शेतकरी ,मजूर ,विध्यार्थी ,तरुण तरुणी नोकरदार व बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात.आत्महत्यांच्या कारणांबाबत अर्थतज्ञ व मानसरोग तज्ञांनी नेहमीप्रमाणे बहुमोल मार्गदर्शन केले .दरवर्षीप्रमाणे लोकसंख्या,अस्वच्छता आणि आजारपणात एकत्रितपणे वाढच झाली .देवाला जे जे लोकं आवडले ते अनेक लाडके नेते, नाट्य कलाकार ,हे जग सोडून गेले .काही लोकांनी पृथ्वीवासीयांना जगबुडीची भीती घातली .लोकं बिचारे खरंच घाबरले .२१  डिसे .च्या आधी
लोकांनी भरपूर हवे ते खरेदी करून घेतले ,चंगळ  केली ,आणि काय जगबुडी झालीच नाही .बरे झाले .
                     देशात कायदा कठोर नाही ,अंमलबजावणी सक्षम नाही ,समाजात विकृती फारच वाढली आहे कुठेही महिला सुरक्षित नाहीत ,पुरुषी मानसिकता ,व्यसंनान्धता ,फेशन ,चित्रपट व चेनल्स वरील अश्लिल दृश्ये ,बिबत्स घटना ,स्त्रियांचा अनादर या सर्व गोष्टींचा यावर्षी अतिरेक झाला .त्यामुळे तरुणाई जागृत होऊन एकत्र येते आहे ,असं दिसतंय .देशाची प्रतिमा मलिन झाली आहे,या निर्ढावलेल्या विकृतान्धांना ठेचून काढायचे असा जनतेने निर्धार केला आहे आणि या  निर्णयाने नव्या वर्षाची ,२०१३ ची सुरुवात झाली
              सुहास सोहोनी
         www.mazyasamvedana.com
        www.suhassohoni.blogspot.com