Friday, November 16, 2012

* या वर्षी पण दिवाळी आली ..............*

       *       या वर्षी पण दिवाळी आली ..............*
               या वर्षी पण दिवाळी आली ,गेल्यावर्षी आली होती तशीच .स्वेटर,शाली,रजया ,कपाटातून निघाल्याच नाहीत ,कारण थंडीच नव्हती .सर्व भाज्या ,धान्य ,तेल,तूप,गेस सिलेंडर महाग झाले पण टीव्ही ,फ्रीज ,कार ,संगणक यांच्या किमती मात्र कमी झाल्यात ,शिवाय त्यावर भेटवस्तू पण मिळाल्यात .देशाचा विकास दर वाढला असे सांगितले जाते पण कितीतरी गरिबांना ही गोष्ट माहितीच नव्हती देशात अब्जाधीशांची संख्या यावर्षी पण वाढली.तितकीच गरिबांची संख्या सुद्धा वाढली .परदेशी गुंतवणूक दारांनी यावर्षी जास्त गुंतवणूक केली ,त्यामुळे आपले राष्ट्र श्रीमंत झाले ,असे गरिबांना वाटू लागले .खूप धान्य आयात झाले,गोदामात अतोनात धान्य सडले ,कुपोषणाचे प्रमाण सुद्धा वाढलं ,यावर्शी पण हजारोंनी कुपोषित बालके दगावली .मोठी आंदोलने झाली ,जनजागृती होता होता त्यांच्यातच आपसात फुटही पडली .
                 करोडो रुपयांचा फटाक्याचा धूर आकाशात उडाला .मागच्या वर्षीच्या धुरांत मिसळला .जागतिक तापमानात थोडी वाढ हे खरे असले तरी मुलांना फटाक्याची मजा आली .मात्र नक्षलवाद्यांनी दरवर्षी प्रमाणे खरोखरीची स्फोटके उडवून अनेक पोलीस व नागरिकांना शहीद केले .मुलांनी घरोघरी मातीचे किल्ले केले ,पण सुतळी  बॉम्बने उडवले .हा मुलांचा खेळ होता .बाजारात तयार फराळाचे पदार्थ मिळत असल्याने काही गृहिणींना हायसे वाटले ,पण बऱ्याच घरांत यावर्षीही फराळाचे पदार्थ बनले .फराळ करता करता महागाई कां झाली ?कुणामुळे झाली ?यावर घरोघरी चर्चा झाली ,गेल्यावर्षी सारखीच .मिठाई ची विक्री झाली पण त्यापेक्षा जास्त मद्य विक्री झाली .मद्यपिंन्ची  संख्या वाढून  महसूल शुल्क भरपूर मिळाले .वाईनरी उद्योग भरभराटीला यायला हवा ,यासाठी तज्ञाची एक समिती गठीत झाली आहे असे कळलंय .यावर्षी सुद्धा टीव्ही वाल्यांनी खूप मनोरंजन केले .श्रीमंतांच्या सासू सुनांची खलनायकी ,खुनशी भांडणे दाखवली .,फराळाचे पदार्थ बनवले व खाऊन दाखवले. आम्ही प्रेक्षकांनी तृप्त होऊन बघितले .
                  प्रत्येक गावांत यावर्षी भिकाऱ्याचे प्रमाण वाढले आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडाही वाढला .ही गोष्ट जबाबदार नागरिकांनी एकमेकाला फराळ करता करता सांगितली,आणि या विषयावर घरा घरांत सखोल  चर्चा  (च )  झाली .अनेक कवी मंडळींनी विनोदी कविता करून पाहिल्या.काही लोकांना मात्र मुळीच हसता येत नाही असा निष्कर्ष निघाला .यावर्षी सुद्धा पुढारी व अधिकारी वर्गाची दिवाळी छान झाली . घोटाळ्यांचे फटाके फार जास्त फुटले .पण नुसतेच आवाज झाले .खाजगी प्रवासी बसेसनी यावर्षी पण भाववाढ केली .जमेल तसे लुटले .पालकांनी मुलांसाठी अभिमानाने परदेशी बनावटीची खेळणी आणली.मुले आनंदली,मात्र विदेशी उद्योगांची भरभराट झाली .यावर्षीसुद्धा दिवाळीपूर्वी आतंकवादी आणि शेजारी देशांची भीती दाखवली गेली .हळव्या मनाच्या समाजसेवकांनी नेहमीप्रमाणे अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात जाऊन दिवाळी साजरी केली ;पण परदेशात स्थाईक झालेल्या मुले,सुना,नातवंडांची आठवण काढत कित्येक आई बापांनी यावर्षी सुद्धा दिवाळी साजरी केली ,गेल्या वर्षा सारखीच.
         सुहास सोहोनी
         ९४०५३४९३५४
     www.suhassohoni.blogspot.com
     facebook/mazyasamvedana











Wednesday, November 7, 2012

गोमुत्र हे एन्टी केन्सर आहे

              *   गोमुत्र हे एन्टी केन्सर आहे   *  
              कर्क रोग झाल्यावर मानवाच्या शरीरातील पेशी गुणाकार पद्धतीने वाढतात .त्यामुळे कर्क रोगाची गाठ वाढते व रुग्ण खंगत जातो .
               गोमुत्र अर्क कर्करोग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील कर्क कोषीकांना निवडून मारतो व चांगल्या कोशिकांना पुनरुज्जीवित  करतो ,यासोबतच रक्ताचे शुद्धीकरण करतो ,प्रतिकार क्षमता वाढवतो व कर्क पेशी संपण्यासाठी शरीराची सुसह्य स्थिती निर्माण करतो .त्यामुळे कर्करोगी बरा होऊ लागतो .या अर्काने रुग्णाचे आयुष्य वाढते .प्रकृतीत सुधारणा होऊ लागते .
               देशात पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेदांवरील शास्त्रोक्त ग्रंथांमध्ये  अनेक दुर्धर  आजारांवर  औषधि शोधण्यात आल्या आहेत .गोमुत्राचा उपचार सुरु ठेवायला हवा .रोगी बरा होणे हेच अंतिम ध्येय असायला हवे .
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४

Sunday, November 4, 2012

अदभुत रंगमंच

                                    *अदभुत रंगमंच *
                        एकदा पहाटेच्या रम्य वेळी कवी मनाच्या ,स्वप्नाळू डोळ्यांच्या एका नटाला एक स्वप्न
     पडलं . सोनेरी पंखांची तेजःपुंज परी त्याचे बोट धरून म्हणाली ,चल  तुला खरा खुरा रंगमंच दाखवते          .   साक्षात देवतांना सुद्धा विहार करण्याचा मोह होतो अशी आपली पृथ्वी आणि तिचा स्वतःचा निसर्ग
    यांचे विस्मयकारी दृश्ये त्या नटला दिसू लागली .लाखो वर्षांपासून विविध ठिकाणी क्षणा क्षणाला
बदलणारी हि रंग्सज्जा सूचक रंगांचे डाव मांडून पुन्हा पुन्हा स्वतःच मोडत होती .घनदाट जंगलं ,समुद्र ,
वाळवंट ,बर्फाळ प्रदेश ,गवताळ आणि खडकाळ प्रदेशाच्या रंगमंचावर  पुढे सजीव कलाकारांनी  प्रवेश केला
आणि निसर्गाच्या सुरु असलेल्या कथानकाला छान वेग आला .एका रम्य वेळी संपूर्ण रंगभूमी प्रेमळ ,मार्दव अशा आवाजाने भारून गेली .ते गूढ ,पण ऐकत राहावे असे संवाद सुरु होते ,एका मातेचे आपल्या नवजात बाळाशी .हुन्काररूपी संवाद म्हणजेच सर्व प्राणिमात्रांची आद्य भाषा होती ती .
                         या अफाट पसरलेल्या रंगमंचावर विविध दृश्ये मांडून ठेवली आहेत .महान रंगभूषाकार
ऋतू बदला प्रमाणे सतत बदल घडवतो आहे .निसर्गाचा अदृश्य वाद्यवृंद सर्व स्थळी सर्व काळी न थकता सुंदर पण प्रसंगानुरूप साथ करतो आहे .वारा, झाडे,पाणी ,अग्नी व असंख्य प्राणी आपापल्या  परीने ध्वनी निर्माण
करून वाद्य  वृंदाला साथ करीत आहेत .शिस्तबद्ध रंगमंच व्यवस्था ,विलोभनीय रंगभूषा व स्वर्गसुख देणारा
वाद्यवृंद बिनचूक पणे आपली भूमिका पार पाडू लागले . परमोच्च आनंद म्हणजे काय हे काळात होत .
                   बुद्धीचं वरदान लाभलेल्या मानवाने पुढे रंगपटावरची विविध दृश्ये ताब्यात घेतली .भूभाग पाणी पर्वत आपसात वाटून घेतले .याच रंग पटावर जगभर वेगवेगळी  साम्राज्ये, रामायण ,महाभारत आणि अनेक कथानके निर्माण झालीत .प्रेम,सूड,त्याग ,अहंकार ,महत्वाकांक्षा आणि अमानुष पणे प्रत्यक्ष निसर्गाचा व मानवाने मानवाचाच ,स्वतःचाच संहार सुरु केला .ओद्योगिक क्रांती घडवली व काळ्या धुरांचे राक्षस [खल
नायक] उभे केले.रासायनिक प्रदूषणाने या रंग मंचावर प्रवेश केला आणि अणु बॉम्बचे  दुर्दैवी नाट्य साकारले .अनेक  सत्ताकांक्षी याच रंग मंचावर आले ,खद खदा हसत त्यांनी अट्टाहास केला .अत्याचार ,दैन्य ,दुखः
दूरदूर पर्यंत पसरवले .पुढे याच कहाण्या कथानकांच्या रूपाने तयार करून १५+२० च्या रंग पटावर दाखवायला
सुरुवात झाली .नव रंगाने आणि नव रसाने ओतप्रोत भरलेल्या कहाण्या सजीव होऊ लागल्या व नामवंत
कलाकार निर्माण झाले .खूप कष्ट घेऊन कला सादर करू लागले .पूर्वी नसलेला एक घटक नित्य दिसू लागला तो म्हणजे प्रेक्षक आणि समीक्षक .
                    खाडकन डोळे उघडले .स्वप्नाळू डोळ्यांच्या त्या नटाच स्वप्न भंग पावलं होत .समोर सोनेरी पंखांची  परी नव्हती .समोर होत पोटाची खळगी भरण्याचं विदारक सत्य ,काम मिळण्याची अनिश्चितता .
मात्र रंगमंच आजही तेव्हढाच सज्ज आहे .कलाकारांनी सच्चा अभिनय करायला हवा ,अमर्याद क्षमता अंगी हवी हे उमगलं आहे .आवाजावर नियंत्रण व देहबोलीचा सुंदर मिलाफ साधायला हवा ,तो सुद्धा सहज   आणि नैसर्गिक.स्वप्नात निसर्गाचा अदभुत रंगमंच  उलगडलेला पाहिला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की खलनायक  कितीही आले आणि गेले ,तरी प्रेम भावनेला कुणीही नष्ट नाही करू शकलं .अमर्याद यशासाठी भविष्य काळ वाट बघतोय .अनेक शुभेच्छा .  
              सुहास सोहोनी
              ९४०५३४९३५४
www.suhassohoni.blogspot.com