डायबेटिक असोसिएशन ,अमरावती ,
जनहितार्थ
*
मधुमेह मार्गदर्शन केंद्र *
मधुमेह जनजागृती अभियान – एक प्रयत्न
मधुमेह ही आजच्या काळातील जागतिक समस्या
आहे .सध्या या विषयात बरीच माहिती उपलब्ध आहे .भविष्यात आपल्याला मधुमेह होईल का ?
या प्रश्नाच उत्तर शोधण्यासाठी आम्ही एक छोटी प्रश्नावली केली आहे . मधुमेही
असणारे किंवा नसणारे अशा ३० वर्षावरील सर्वांनी स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक
असावे या हेतूने प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्यावीत व आपली मधुमेहाची शक्यता
तपासावी .भविष्यातील मधुमेहाचा धोका जाणून घ्यावा .
सध्या मधुमेह नियंत्रणात असल्यास “तो
नियंत्रणात कसा ठेवावा “व मधुमेह नसल्यास त्याला दुर कसे ठेवायचे ?” रक्तातील
साखरेची पातळी ‘ थोडी जास्त ‘[बोर्डर लाईन] जर असेल तर #काही विशिष्ठ अथक प्रयत्नाने # साखरेची पातळी नॉर्मल राहू शकते
.ज्यामुळे गोळ्या सुरु होत नाहीत ,म्हणजे भविष्यातील धोका टळतो. *बोर्डर लाईन
मधुमेही या गंभीर धोक्यातून बाहेर पडावे हाच या जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश
आहे .मधुमेहाची सर्वांगीण माहिती मिळावी ,चर्चा व्हावी [ निशुल्क ] यासाठी
इच्छुकांचे स्वागत आहे .
पत्ता :: सुहास सोहोनी ,सहसचिव डायबेटिक
असोसिएशन ,अमरावती .
सोहोनी कॉम्प्लेक्स, विवेकानंद
कॉलोनी ,अमरावती ४४४६०६ .
फोन :०७२१-२५६७४६३ ,मोबा
:८६२६०६०६४६ ,९४०५३४९३५४
******मधुमेह -आरोग्य प्रश्नावली व उत्तरांवर
आधारित गुण .******नाव ...................................................................... स्त्री /पुरुष ........... ता. / / 2013
१.वय ............. ३० ते ३५= -२, ३६ ते ४५ = +५, ४६ ते ५५ = +१०,
५६ ते ६५ = +१५, ६६ ते ७५ =+१ ८ [ ]
२. रक्ताच्या नातेवायीकांपैकी कुणाला मधुमेह आहे /होता ? हो=+५ / नाही= 0[ ] हो/नाही [ ]
३.तुम्हाला मधुमेह आहे का ? हो=+ ४ / नाही =0 [ ]
४ .रोज सकाळी कमीत कमी ३ की.मी.फिरायला जाता ? हो =+१ / नाही= +४ [ ]
५ .रोज व्यायाम [३० मिनिटे किंवा जास्त ]करता ? हो =-२ / नाही =+२ [ ]
६ .तुमचं काम /जीवनशैली शारीरिक श्रमाची आहे की बैठी ? बैठी =२ /श्रम =0 [ ]
७.मानसिक ताण /घाई /महत्वाकांक्षा ? हो =+२ / नाही=0 [ ]
८.इतरांना मनातील भावना मोकळेपणाने सांगता ? हो =0 /नाही=+२ [ ]
९.जीवनात दृष्टीकोन आशावादी ,सकारात्मक आहे ? आशावादी =0/ नकारात्मक =+२ [ ]
१०.आहारात लोणी, तूप, अंडी, तळलेले पदार्थ,
मिठाई,नॉनव्हेज....रोज = +३, / मधे मधे = +१ / क्वचित = 0 [ ]
११.जेवणात रोज फळे/हिरव्या भाज्या /सलाद भरपूर खाता का? हो=-२ /नाही= +२ [ ]
१२.बॉडी मास इंडेक्स किती? किलोग्राम वजन / उंची [मीटर ]चा वर्ग
:२२=-२,२२ ते २५ =+१, २५ ते ३० =+३, ३० पेक्षा अधिक = +४ [ ]
१३.वेस्ट /हिप रेश्यो किती?
०.८५ =0/0.८५ ते 0.९0 = + १ /0.९0 ते 0.९९ = +२ /१ .० ० पेक्षा जास्त = + ३ [ ]
१४.रक्तदाब किती? ......वरचे .......खालचा ..... नॉर्मल = 0 नॉर्मल नाही = + ५ [ ] १५.रक्तातील साखर किती? सकाळी उपाशी पोटी .........
जेवणानंतर २ तासांनी ......साखर आहे=+३साखर नाही =-१ [ ]
१६. रक्तातील एकूण कोलेस्टेरोल किती? एल डी एल ...., एच डी एल .....१४०ते१६०=-३,
१६१ते२०० =+३ ,२००ते२४० =+७ ,२४०ते३०० =+१० ,३००च्या पुढे =+११ [ ]
१७. मधुमेह असल्यास काय औषधोपचार सुरु आहे ?
इंश्युलीन इंजेक / गोळ्या +व्यायाम / काहीनाही +१, +२, +३ [ ]
१८.पायांची काळजी घेता? नखे काढणे / जोडे वापरणे/ मालिश हो=+१, / नाही =+३ [ ]
१९. मधुमेहामुळे सध्या काही समस्या आहेत का? कोणत्या ? हो =+४ / नाही= ० [ ]
२०.मधुमेहासाठी सध्या कोणती उपचार पद्धती सुरु आहे ?
अलोप्याथी/आयुर्वेद /होमिओपॅथी = १, २, २ [ ]
२१. रक्तातील साखर खूप कमी झाल्यामुळे कधी बेशुध्द अवस्था आली होती का?
हो =+४ / नाही= +१ [ ]
२२. मधुमेहाची सर्वांगीण माहिती मिळवावी असे वाटते का? हो=० / नाही =२ [ ]
२३.समुपदेशका सोबत मनमोकळी चर्चा करावी असे वाटते का? हो = ० /नाही =+३ [ ]
२४ हिमोग्लोबिन किती? ८ पर्यंत = +६,१० =+४ ,१२ =० ,१३ च्या पुढे = -३ [ ]
एकूण गुण .............
** गुणाप्रमाणे मधुमेहाचा धोका ८ पेक्षा कमी = क्वचित, ८ ते २० =मध्यम,
२०ते ३० =बराच, ३०किंवा जास्त =खूप**
**अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा
अध्यक्ष सचिव पी आर ओ . सहसचिव डॉ प्रफुल्ल कडू डॉ .मिलिंद जगताप राजेश पिदडी सुहास सोहोनी डायबेटिक असोसिएशन ,अमरावती प्रकल्प संयोजक