Thursday, September 1, 2011

समाज मंथनातून भार्ष्टाचार न करणारे नागरिक निर्माण व्हावेत.

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
 
            एकाच वर्षात लागोपाठ भ्रष्टाचाराच्या एकाच  मुद्द्यावर तीन वेळा अहिंसेच्या मार्गाने पण प्राणांतिक उपोषणाच्या निर्धाराने जन आंदोलन होणे हि गोष्ट आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे सिद्ध करते. आंदोलन जरी राजधानीत साकारले तरी ते देशाच्या प्रत्येक गावात, शहरात पसरले. जून ११ चे रामदेव बाबाचे आंदोलन सरकारने हुकुमशाही पद्धतीने उधळून लावले, त्यासाठी साम, दाम, दंड , भेद नीती चा परिपूर्ण वापर केला. तिन्ही आंदोलनात कुणीही राष्ट्रीय वा खाजगी संपत्ती ची लुटालूट केलेली नाही. वास्तविक या तीनही जन आंदोलनात देशातून लाखो करोडो लोक सहभागी झालेले असून हा एक उच्चांक आहे. या गोष्टीची दाखल घेणे गरजेचे आहे. विषय भ्रष्टाचाराचा असो कि विदेशात लपवलेला काळा पैसा हा असो, देशाचे मात्र केवळ आर्थिक नुकसानच आहे. 

            वास्तविक भ्रष्ट्चारी गुन्हेगाराला पकडल्यानंतर शिक्षा करण्याचा कायदा आज अस्तित्वात आहे, पण तरीही अजून सक्षम, कठोर, व व्यापक स्वरूपाचा कायदा म्हणजेच "लोकपाल विधेयक" जे गेल्या ४२ वर्षापासून प्रलंबित आहे. ते २०११ च्या संसदेत पारित व्हावे यासाठी हे आंदोलन आहे. खर्या अर्थाने हे समाज मंथन आहे. आंदोलक, समर्थक जनता , सरकार , सत्ताधारी राजकीय पक्ष , विविध विरोधी पक्ष, या सर्वांच्या निग्रहाची हि एक परीक्षा आहे . बुद्धीचा , जनकल्याणाच्या विचारांचा  कस  लागणार  आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनक्षोभ या निमित्याने बाहेर आला . जन्मताला वाचा फुटली . जनजाग्रुतिची प्रक्रिया सुरु झाली . श्री आण्णा हजारे आणि त्यांचे सहायक असे नेत्तृत्वा देशापुढे आले. यांचा भविष्यात देशाच्या जडण घडणीत योग्य असा फायदा होईल हा विश्वास वाटतो .

                चारित्र्यवान, सज्जन  , निष्ठावान , व सक्षम नेत्तृत्वाची जनतेला नेहमी भुरळ पडते . पण त्याच वेळी आंदोलनाचा मुद्दा संपूर्ण जनहिताचा असावा लागतो . त्यात स्वार्थाचा लवलेशही नको . यावरच चळवळीचे फलित आवलंबून असते . देशाच्या कानाकोपर्यात अक्षरशहा करोडो लोक या चालवलीत उतरलेले आहेत. भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या विचाराने लोक भारले गेलेले आहेत .  हि एक उपलब्धी असली तरी भ्रष्टाचार हा स्वतः पासून प्रथम संपवावा लागेल , हेच खरे सत्य आहे.  जोश , आवेश , भुरळ पडणे , भरून जाणे , नेता मान्य होणे, नेत्याची आज्ञा , आवाहन , आव्हान  तत्काळ मान्य करणे , अंमलात आणणे , प्रसंगी जीव देणे, घेणे , हे सगळे त्या वेळच्या परिस्थितीवर आणि नेत्तृत्वाच्या परीपाक्वतेवर , खंबीर पणावर व योग्य निर्णयावर अवलंबून असते .

                      केवळ कायदा कितीही कठोर , सक्षम केला तरी,  जो पर्यंत लोभ , लालसा , सत्ता, हव्यास या सारखे मनाचे शत्रू प्रबळ असतील , तोपर्यंत भ्रष्टाचार, लाच देणे, घेणे नष्ट होणे कठीण आहे . केवळ  मी अण्णा आहे, मै भी अण्णा तू भी अण्णा असे लिहिलेले कपडे घालून हा भस्मासुर हटणार नाही. तर स्वतः च्या मनात ठाण मांडून बसलेला हा भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट करावा लागेल. सुरुवात स्वतः पासून करावी लागेल. मी भविष्यात कधीही भ्रष्टाचार करणार नाही, लाच घेणार नाही आणि कोणाला घेऊ देणार नाही अशी प्रत्येकाने प्रतिज्ञा करणे आणि  पाळणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाद्वारे होत असलेल्या या समाज मंथनातून भ्रष्टाचार  न करणारे नागरिक निर्माण व्हावेत.

सुहास सोहोनी
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.