Sunday, September 30, 2012

ज्ञानी व अनुभवी म्हणजेच ज्येष्ठ

      ज्ञानी व अनुभवी म्हणजेच ज्येष्ठ
                       वानप्रस्थ हि एक नैसर्गिक अवस्था आहे .याचा फार बाऊ न करता थोड्या पूर्वतयारीने हसत सामोरे जाता येईल का ? ज्येष्ठ नागरिक हा समाजाला उपयुक्त घटक  आहे ,कि तो समाजावरील बोजा आहे ,ह्या प्रश्नाची उत्तरे व्यक्तिगणिक नेहमी निरनिराळी दिली जातात .आपण समाजाचा उपयुक्त घटक म्हणून सक्रीय राहायचं कि परावलंबी जीवन जगायचं हे मात्र ज्येष्ठांनी ज्याच त्याने ठरवायचं आहे .यासाठी मात्र प्रामाणिक  आत्म परीक्षणाची गरज आहे .
                       निवृत्ती हि अटळ गोष्ट आहे .स्त्री आणि पुरुष दोघांनाही ती चुकलेली नाही.परंतु स्त्रियांच्या बाबतीतली निवृत्ती कुणी गृहीत धरीत नाही .नोकरीतील निवृत्ती नंतरही स्त्री ला घरात   निवृत्त जीवन जगता येत नाही .कधी कधी नाईलाजाने कशा न कशात तिला गुंतून राहावे लागते .प्राप्त परिस्थितीत सुसह्य जीवन कसे जगता येईल याची तयारी गृहस्थ आश्रमातच केलेली बरी .त्यामुळे आपले आवडते छंद ,वर्तमान कर्तव्य आणि थकत चाललेले शरीर या सर्व गोष्टींचे संतुलन साधणे शक्य होईल .
                       माणसाचे निवृत्त जीवन वा वृद्धत्व कसे व्यतीत होणार हे त्याच्या मानसिकतेवरआणि वागण्याच्या ,स्वभावाच्या ठेवणीवर अवलंबून असते .माणसाच्या स्वभावाची पाच वर्गात विभागणी होऊ शकते .एक :समंजस वर्ग दुसरा- हौशी-मौजी पण निष्काळजी वर्ग ,तिसरा -  निग्रही वर्ग ,चौथा -रागीट  वर्ग आणि पाचवा स्वतःलाच दोषी समजणारा ,निराश वर्ग .या प्रत्येक वर्गा - तील लोकांचे म्हातारपण हे   नक्कीच वेगवेगळ्या तऱ्हेने व्यतीत होते .आपण कोणत्या वर्गात आहोत आणि भविष्यात कसं राहायचं हे ठरविण्याची वेळ म्हणजे आपला गृहस्थाश्रम किंवा च्लीशी नंतरचा काळ हाच असतो .साठीनंतर कोणतेही स्वभावातील बदल घडविणे सोपे नाहीच .
                         ज्येष्ठ म्हणजे' केवळ वयाने वाढलेले 'एवढाच अर्थ अभिप्रेत नसून ज्येष्ठ हे ज्ञान संपन्न ,अनुभव संपन्न असणार हा विश्वास समाजात निर्माण व्हावयाला हवा .अशा  ज्येष्ठांची समाजाला नितांत गरज आहे .हीच समाजाची अपेक्षा सुद्धा आहे .आजचे ज्येष्ठ नागरिक वर्तमानाशी सुसंगत असे मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला आपल्या पूर्वानुभवाच्या, ज्ञानाच्या बळावर करू शकतात का ?नक्कीच ,अशा मार्गदर्शनाची ज्येष्ठांकडून अपेक्षा आहे, आणि असे अनेक अनुभवी ज्येष्ठ समाजात आहेत .अजून एक  महत्वाचा मुद्दा म्हणजे निवृत्तीनंतर भेडसावणारी आर्थिक समस्या .आयुष्यभर कुटुंबाचा भार सांभाळल्या नंतर अनेक ज्येष्ठांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पण   या आर्थिक नियोजनाचा विचार,
कृती गृहस्थाश्रमात  असतांनाच करावी लागते .या बाबतीत अनेक ज्येष्ठ मंडळी जागरूक नसतात असेच दिसून येते .आर्थिक नियोजनाला निवृत्तीनंतरच्या काळात सर्वाधिक महत्व  आहे  .समंजसपणा आणि सकारात्मक विचारधारा  नेहमीच  प्रचंड उर्जा मिळवून देते. हेच सत्य आहे.


                 सुहास सोहोनी
               ९४०५३४९३५४
           www.suhassohoni.blogspot.com
,


Saturday, September 29, 2012

अहिंसेवर बोलू काही

अहिंसेवर बोलू   काही

    योगसाधनेचा अभ्यास करताना योगाच्या आठ अंगांचा अभ्यास सुचवला  आहे.  त्या अष्टांग योगात प्रथम यम म्हणजे निग्रह - संयम, यात पाच यमापैकी एक आहे "अहिंसा' आपल्या कृतीने उक्तीने मनाने किंवा नजरेने कोणत्याही प्राणिमात्राला  उपद्रव होणार नाही असे वागणे म्हणजे अहिंसा.  क्रोधाचे दृश्य स्वरूप, घडणारी कृती, म्हणजे हिंसा.  अहिंसा हा धर्म आहे, सुसंस्कार आहे.  सजीवांच्या या सृष्टीत मांसभक्षी प्राणी आहेत, तो निसर्गचक्राचा भाग आहे.  त्यांचे वेगळे पण त्यांच्या जबड्या त असलेल्या सुळ्या मध्ये आहे.  मांसभक्षी प्राणी जीभेने आवाज करीत पाणी पितातत परंतु तृणभक्षी प्राणी आणि मानव यांना सुळे  नाहीत आणि ते ओठांनी पाणी पितात.  म्हणजेच उदरभरणासाठी मानवाजवळ  इतर पर्याय आहेत.  तरीही मानव इतर प्राण्याची हिंसा करतो, एवढेच नाही तर मानव स्वप्रजाती आणि स्वकियांची सुद्धा निघृण हिंसा करतो.
      पुरातन काळा पासून संपुर्ण विश्वात योगसाधना, अहिंसा व शाकाहाराचा पुरस्कार करणारं भारत हे एकमेव राष्ट्र  आहे.  सुदैवाने या मुळ  भारतीय जीवनप्रणाली चा प्रसार, विचार व आग्रह आज भारताबाहेर धरला  जात आहे.  अहिंसा हे तत्व  एकटे नसून ते अष्टांग  योगाच्या पेकेज मधील  एक जगण्याचं तत्व आहे.  समृद्ध भारतीय जीवनशैली  जगावयाची असेल  तर अहिंसेसोबत सत्य, चोरी न करणे, मोह नसणे, विकारांवर ताबा, शुचित्व , संतोष, तप, आराधना त्याचबरोबर स्वास्थ्य वृद्धी व अंतर्मुख बनणे या तत्वांचा सुद्धा स्विकार, अभ्यास व प्रसार करणे आवश्यक आहे.  हरणाजवळ  जशी सुगंधी दिव्य कस्तुरी असते तसा भारतीयांजवळ  सुखी जीवनाचा हा अनमोल  खजीना खचाखच भरलेला  आहे.  संपूर्ण विश्वाला  समृद्ध आणि विचारांनी श्रीमंत करण्याचं सामर्थ्य  या भारतीय वैचारिक खजीन्यात आहे.

    अहिंसेचा एखादा दिवस साजरा करावा असे जर वाटत असेल  तर 364 दिवसांच काय? ज्या तत्वाचा आजीवन स्विकार करावयास हवे त्या बाबत सरकारी खाक्याप्रमाणे एकदिवसीय विचार करायचा? खरोखर सुखी जीवनाचा ध्यास असणाऱ्या  प्रत्येक भारतीयाने आत्मचिंतन करावयालाच हवे. आपण जे खातो त्यानुसार आपला  स्वभाव बनतो. तामसी स्वभाव हिंसेला  प्रवृत्त करतो.  हिंसा कधीही एकटी नसते तर सोबतीला  असतो अविवेक आणि क्रौर्य.  अविचाराने हिंसेचा मार्ग धरणारे समाजाला  दु:ख, यातना देत असतात पण त्यांचा शेवटसुद्धा हिंसेनेच होतो, शिवाय आप्तजनांची नाचक्की होते.  हिंसेने काहीच साध्य होत नसतं.  जर काही उत्पन्न होत असेल  तर ती म्हणजे "प्रतिहिंसा'.   जगभर हिंसक घटनांच तांडव चालू  असताना अहिंसेचा आग्रह धरलाच पाहिजे.  जास्तीतजास्त प्रमाणात सर्व समाजघटकांना अहिंसेच्या राजमार्गावर सन्मानाने चालण्याची शिकवण दिली  जाण्याची गरज आहेच.  माणसांनी एकमेकाचा आदर करावा, कुठेही आतंक नसावा असे दिवस पाहण्यासाठी चला  मित्रांनो "अहिंसेवर बोलू  काही'.
                        ुुु  सुहास सोहोनी
                                   ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                         www.suhassohoni.blogspot.com

ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा

ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा

    कोणतीही वस्तू किंवा सेवा यांची नक्की किती किंमत असावी या बाबतीत काहीतरी निर्णय लवकरच व्हावयास हवा.  वस्तूच्या उत्पादन खर्चात, कारखान्यात होणारा सगळा खर्च अंतर्भूत असतो, अगदी कच्च्या माला पासून कामगारांचा पगार, बँकेचे व्याज, एक्साइज टेक्स, सेल्स टेक्स, नफा सगळ  धरून मुळ  किंमत ठरवली  जाते.  ग्राहकांच्या हातात ती वस्तू येते तेव्‌हा मुळ  किंमतीच्या वस्तूंवर पुन्हा विविध कर लागतात.  त्या आधी वस्तूच्या पेंकिंगवर प्रचंड खर्च केला  जातो.  चकचकीत आकर्षक वेष्टण मालाचा खप वाढवतं.  मुळात या वेष्टणाचा व मालाच्या गुणवत्तेचा संबंध असेलच असे नाही.  खऱ्या  अर्थाने वस्तू महागते ती जाहिरातींच्या अवाढव्य खर्चामुळे .  जाहिरातींचे सगळे  प्रकार वापरले  जातात.  टि.व्ही  चेनल , वृत्तपत्रादवारे होत असल्या जाहिराती या प्रचंड महाग असतात, मात्र अत्यंत जिद्दिने अशा जाहिरांतीवर खर्च केला  जातो.  त्यात विविध कर पुन्हा आकारले  जातात.  तेच तेच कर एकाच वस्तूंवर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर लावले  जातात.  आणि किंमत वाढत जाते. खीसा मात्र ग्राहकाचा लुटला  जातो.  यावर कुठेतरी निर्बंध हवा.
      या सर्व समस्यांवर विदेशी एफडीआय च्या भारतात प्रवेश करण्याचा युक्‌तीवाद केला  जातो तो मान्य नसावा.  एफडीआय हा गेट  करारांतर्गत येणारा मुद्दा असून त्यावर आक्रमक चर्चा चालुच राहणार आहे, परंतू भारतीय उत्पादकांनी किंमतीवर बंधन ठेवायला  हवे.  किंवा किंमतीवर अंकूश हवा.  उत्पादनावर जर ग्राहकांचा विश्वास असेल  तर वेष्टणा चा खर्च कमी करता येईल .  केवळ  आकर्षक वेष्टण  म्हणजे दर्जेदार उत्पादन, नक्कीच नाही.  त्याचप्रमाणे चेनल वर दाखवल्या जाणाऱ्या  कितीतरी जाहिराती अतर्क्य  आणि आत्यंतिक फसव्या असतात, भ्रामक असतात.  जाहिरातीसाठी वापरले  जाणारे गुळगुळीत  अभिनेते, नट्या 
यांनी जाहिरातीच्या नावावर कितीही पैसा उकळावा आणि किती चुकीची विधाने करावी याला  काही ताळतंत्र उरला  नाही.  एखादे उत्पादन किती काळ  वापरल्यावर त्यावर मत देता येईल , यावर निर्बंध नाहीच.  ग्राहकाला  एकदम मुर्ख समजून या जाहिराती ग्राहकाच्याच पैशाने सुरू असतात.  कारण हा खर्च सुद्धा वस्तूच्या किंमतीत आकारला  जावून ग्राहकाकडून वसूल  केला  जातो.  सेवा देण्याच्या किंमतीत तर काही काही एम.आर.पी.नाही. अगदी होमिओपेथी किंवा आयुर्वेद डॉक्टरांनी तपासणी व औषधांचे किती पैसे घ्यावे ?  स्पेशालीस्ट त्यांचे, हॉस्पीटल , त्यांच्या तपासण्या, वेळोवेळी  आकारलेली व्हिजीट  फी सगळेच बेहिशोबी वाटतं.  वित्तीय संस्था, होमलोन, कार लोन सर्व ठिकाणी छुपे खर्च सहज आकारतात.  ग्राहकांच्या गरजेप्रमाणे छोट्या  छोट्या  रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव का वाढतात? चैनी विलासी जीवनाची चटक  ग्राहक प्रत्येक टप्प्यावर सहज लुटला  जातोय, म्हणून म्हणावसं वाटतं की हे ग्राहक राजा तुझा रोज वाजतोय बाजा.

                        ुुु  सुहास सोहोनी
                                ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                             www.suhassohoni.blogspot.com       

Tuesday, September 4, 2012

गैट करार, 17 वर्षे व सिंहावलोकन

     गैट करार, 17 वर्षे व सिंहावलोकन
    विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात दि. 14 एप्रिल  1994 रोजी गैटचे अध्यक्ष आर्थर डंकेल  यांनी "डंकेल  ­ड्राफ्ट ' मोरक्को येथे मंजूर करवून घेतला .  विकसनशील   देशांच्या  आर्थिक घडामोडीवर जबरदस्त पकड ठेवून भविष्यात त्यांना जागतिक कायदयानुसार वागायला  भाग पाडणारे, सर्वापेक्षा वरचढ सत्ता केंद्र डब्ल्‌यूटीओ वल्‌र्ड ट­ेड आर्गनायझेशन उदयाला  आले .  भारत सरकारने यथावकाश 31 डिसेंबर 1994 रोजी नवीन पेटंट कायदा तयार करून संसदेमार्फत डब्ल्यू टीओ चा आपल्या देशात शिरकाव करवून घेतला .  देशाच्या भविष्याला  नवी दिशा देणारी ही घटना होती.  आज 17 वर्षाचा काळ लोटला  असून एकवार सिंहावलोकन करण्याची गरज आहे.  जागतिक बँकेच्या कर्जाच्या ओझ्याखाली  भारत असल्याने आणि विकासाच्या रंगीबेरंगी स्वप्नांना भुलून हा करार करताना बेगर्स   हेंव नो चॉईस हे वाक्य ज्येष्ठ  सत्ताधारी नेत्याने देशाला  सुनावले  होते.  या सतरा वर्षात देशाचा काय फायदा झाला ?
    विदेशी बियाणे, विदेशी खते, रासायनिक खते आम्ही विकत घेतली . ट्रेक्टर  , विदेशी शेतीची अवजारे आम्ही विकत घेतली .  आणि आमचं पशूधन गमावल .  बायोटर्मिनल  बियाण्यामुळे  व रासायनिक पद्धतीमुळे  काय अवस्था आहे हे मध्यम व छोट्या  शेतकऱ्याना दरवर्षी  समजते.  आज जैविक शेतीचं महत्व  पटते.  विदेशी उद्योगांना आमंत्रण देऊन विविध सोई सवलती दिल्या जातात तर याउलट भारतीय उद्योगांना जाचक अटींचा सामना करावा लागतोय.  घरघर लागली  आहे.  आज खरोखर भारतीय उद्योग संकटात आहे काय? सार्वजनिक क्षेत्रात बँक व विमा व्‌यवसायाला  विदेशी कंपन्यांनी खिंडार पाडल  आहे.  व्ही.आर.एस. घ्या  व घरी बसा या योजनेत देशाचा फायदा काय झाला ? विदेशी संस्कृतीचा पगडा, इंटरनेट व विदेशी चेंनल्‌स द्वारे प्रत्येक घरात सहजगत्या पण नकळत बसतो आहे.  अष्टांग योगाचा पाया असणाऱ्या  भारतीय संस्कृतीच्या संपूर्ण भिन्न असलेली  व चंगळवादी, भोगवादी संस्कृतीच्या रूपाने भारतीय भाषांमध्ये विकृत, हिडिस, अश्लील  असे विषय माथी मारले  जात आहेत.  मनोरुग्णांच प्रमाण कां वाढतंय हे मानसरोगतज्ञांना अवश्य विचारावे.  मुळ  भारतीय असणाऱ्या  अनेक वस्तू पदार्थ, जडीबूटी यांच पेटंट विदेशी कंपन्यांनी भराभर मिळवले .  स्वत:चा व्यापार कायदेशीरपणे वाढवला , फायदा कमावला , त्यांचे कारखाने भरभराटीस आले .  त्यांच्या कामगारांना, जोडधंदयांना प्रचंड काम मिळाल ,  आणि यापुढे भारतातील  छोटा व्यापार सुद्धा विदेशी कंपन्यांना गिळंकृत  करायचा आहे.  प्रचंड आर्थिक बळ  असणाऱ्या  विदेशी  कंपन्याशी स्पर्धा म्हणजे दुबळ्या  माणसाने सोकावलेल्या पहिलवानाशी कुस्ती खेळण्यासारखे आहे.
    शेकडो एकरात थाटल्या जाणाऱ्या  विदेशी मॉल्‌समुळे  भारतीय उद्योग उत्पादन संकटात सापडेल  ही भिती आहे.  माल  वाहतूकदार, माथाडी कामगार वितरण व्यवस्थेत असलेले   करोडो व्यापारी, मध्यस्थ, मध्यम व मोठे दुकानदार केवळ  किराणा नव्हे तर इतर सगळ्याच वस्तूंचा व्यापार करणारा वर्ग, या सगळ्याना याची झळ  हळुहळू  बसणार आहे.  जागतीक स्पर्धेत तरण्यासाठी भारतीय व्यापारी वर्गाला  किती काळ  लागेल ? विदेशी मॉल्स , कारखाने, त्यांच्या वसाहती, शाळा , इस्पितळे , प्रार्थनास्थळे  व त्यासाठी नेमले  जाणारे रक्षक या सर्वांसाठी देशात अधिकृतपणे, कायदेशीर पणे किती मोठं जाळ  पसरेल  याची अवश्य कल्पना करावी.  सामान्य जनतेला  जाणवणारे बदल  कार्यान्वित होणार आहेत.  शांततेने जगण्याची इच्छा असणाऱ्या  भारतीयांना डावपेचांनी परिपूर्ण असलेल्या गेंट कराराची माहिती नाही.  परंतू दखल  सुद्धा घ्यावीशी वाटत नाही.  समजून घेऊ इच्छित  नाही.  होणारा बदल  भविष्यात  किती पिढ्यापर्यंत निगडीत असणार आहे? डब्ल्यूटीओ च्या नियमाचे मुकाट पालन करून त्या दबावाखाली  जगण्याशिवाय आपल्या समोर काय पर्याय आहेत? याचा अभ्यास व्हावा. भारताने कर्जमुक्त होऊन गेट  करारातून बाहेर पडावे.  स्वावलंबी  व्हावे.
                        ुुु सुहास सोहोनी --९४०५३४९३५४
                               क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                               www.suhassohoni.blogspot.com