शुभेच्छा पत्रांद्वारे ओळख विदर्भाची
भारताच्या नकाशावर मध्यभागी असलेला प्राचीन, पौराणिक व ऐतिहासिक काळातील उल्लेख असलेला, भरपूर निसर्ग संपदा व विविधतेने नटलेला आमचा विदर्भ जगात तर नाहीच, पण विदर्भाबाहेरही कुठे फारसा ओळखीचा नाही हा अनुभव बऱ्याच वेळा आला आहे. आपल्या विदर्भात भरपूर निसर्ग सुंदर स्थळ आहेत. पूर्णा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्या आहेत. मेळघाट, ताडोबा, तोतलाडोह, पेंच, नागझिरा, नवेगाव बांध ही राखीव जंगले, वन्यपशू-पक्षी, अभयारण्य आहेत. डोंगरी किल्ले, पुराणकालीन अती प्राचीन उल्लेख असलेली असंख्य ठिकाणे आहेत. दिक्षाभूमि, शेगाव, रामटेक यासारखी धर्मस्थळे आहेत. प्राचीनतम मानवी वस्तीचे अवशेष असलेला दरेकसा व अज्ञात असा गडचिरोली जिल्हा, असे कितीतरी दुर्लक्षित, अप्रकाशित प्रदेश आहेत.
माझ्या मते विदर्भाची बाहेर ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. निरनिराळ्या निमित्ताने प्रत्येकजण शुभेच्छा पत्र पाठवत असतो. वाढदिवस, शुभकार्य, धार्मिक सण, आनंदोत्सव अशावेळी आपण सर्वांनी शुभेच्छा पत्रांद्वारे (ग्रीटिंग कार्ड्स ) विदर्भाबाहेरील इष्टमित्र,नातेवाईकांना ह्या प्रांताची ओळख करून द्यावी . निरनिराळी ठिकाणे, रमणिय निसर्गचित्रांचे प्रिंट व थोडक्यात माहिती द्यावी.
विद्यार्थी संघटना, ग्रुप्स व सर्व विदर्भवासियांनी या लोकप्रिय माध्यमाद्वारे एकत्रितपणे* "शुभेच्छा पत्रांद्वारे ओऴख -विदर्भाची'*हा उपक्रम राबवावा. त्यानंतर देशांत व देशाबाहेर अनेक ठिकाणी सहजच विदर्भ प्रदेशाबाबत विचारांची देवाण-घेवाण सुरू होईल. विचार प्रवाह सुरू होईल त्यातुनच सोईसवलती, उद्योग, योजना व पर्यटन वाढ होईल.
येत्या काही दिवसात अनेक सण, उत्सव यांची सुरवात होत आहे. माझा हा विचार जर विदर्भवासियांना रूचला, पटला तर ह्या विचाराचे प्रायोगिक उत्तर सर्वांना दिसेल. या कल्पनेद्वारे केवळ लाभच होणार आहे. तरी "*शुभेच्छा पत्राद्वारे ओळख विदर्भाची*'हा उपक्रम हाती घ्यावा .
* उजळते क्षितिज [लेखसंग्रह 2007]*
सुहास सोहोनी ---9405349354
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment