Wednesday, January 9, 2013

* नेतृत्वहिन व दिशाहिन जनसमुदाय *

        *    नेतृत्वहिन व दिशाहिन जनसमुदाय   *

    कुठल्‌याही कारणांनी आपbा रोष प्रकट करताना जेव्‌हा जमाव रस्त्यावर उतरतो तेव्‌हा त्या जमावाbा चेहरा नसतो.  परिणामांची पर्वा नसते.  त्यात जर नेतृत्व नसेb तर सैरावैरा bोंढçासारखा उसiणारा जमाव म्हणजे जणू काही फुटbेल्‌या धरणातून रोरांवत निघाbेbे पाणीच.  कधीही, काहीही घडू शकते.  आपल्‌या दैवतावर अतीव भक्‌ती असणारा हा दुखावbेbा समुह नेतृत्वाची वाट पाहात थांबत नसतो, स्वयंस्फूर्तिने निषेध नोंदविण्यास रस्त्यावर उतरbा असतो, आणि म्हणूनच दिशाहिन बनण्याची फार जास्त शक्यता असते.  दिशाहिन संतप्‌त जनसमुह उग्र, कू्रर आणि हिंसक बनbा तर नवb नाही.  सत्ताधारी व प्रस्थापितांविरूद्ध गरi ओकत, माथी भडकbेbा आणि "नित्य दुर्bक्षित राहिbेbा' हा हिंसक बनbेbा जनसमुदाय आडव्‌या येणाèया स्वत:च्‌या कोणत्याही संपत्तीची सहज राखरांगोiी करतो.  कोटçावधीची वित्तहानी होते.  सामान्य जनतेच्‌या पैशातूनच देशाची संपत्ती वाढत असते, विकास होत असतो. पण हे भान संपbेbे असते आणि सुरू होतो हिंसाचार, असं का होते ?
    ही माणसे हिंसा का करतात ? ही जी हिंसा होते ती क्रांती नसते आणि युद्ध तर नसतेच किंवा सशस्त्र बंड ही नसते.  अत्याचार, अपमान कुणी, का ? आणि किती काi सहन करावा.  निषेध व्‌यक्‌त करणं अत्यंतिक गरजेचं आहेच पण देशाच्‌या प्रगतीbा खीi घाbणे आणि स्वत:च्‌याच साधन संपत्तीचा नाश करणे हे योग्य नाहीच.  केवi अत्याचार आणि उपेक्षा ज्‌यांच्‌या वाटçाbा आbी अशा गरिबीने होरपibेbी bाखो करोडो डोकी संतापग्रस्त होत आहेत, उपेक्षित ठेवbे गेbेbे प्रक्षोभित होत आहेत रस्त्यावर उतरण्याची भाषा केbी जात आहे याचा अर्थ कiतोय का ? सन्मानाने जगण्याचा समान अधिकार बहाb केbेल्‌या bोकशाही प्रणाbीत परिपक्‌वता नाही.  समानता नाही, भेदभावांची प्रचंड दरी आहे.  मुiात ऐक्‌य नाही प्रत्येकजण माझं, आमचं वेगiेपण प्रकर्षाने सांभाiतो आहे कसं होईb भारतीय एकतेचं ?
    शिक्षणाने चांगल्‌या वाईटाची जाण असbेbे आजचे तरुण नागरिक स्पर्धेत मागे पडतात, बेरोजगारीने त्रस्त आहेत.  इच्‌छा आकांक्षा वाढल्‌या आहेत पण त्या पुर्ण होत नाहीत कारण हाताbा काम नाही, त्यात चटकन व्‌यसने bागbेbी.  मार्ग दाखवण्यास जबाबदार नेता नाही.  "रिकाम्या मनात सैतानाचा संचार असतो' हे सत्य आहे.  कुणीही यावं, जनसमुहाbा भडकवणारं भाषण करावं, टाùया मिiवाव्‌या आणि दिशाहीन डोकी होरपiण्यासाठी झोकुन द्यावी.  हे थांबायbा हवं.  देशहित सांभाiणारं नेतृत्व bाभण्याची गरज आहे.  प्रत्येक समाजघटकाचा मान सन्मान मन: पुर्वक सांभाiून अनुचीत घटना घडू न देणे आणि जबाबदार नागरिकांच्‌या हातुन कधीही कुठेही हिंसा, नुकसान होऊ न देणे या गोïी कौशल्‌याने हाताiणाèया नेत्यांची गरज आहे.  ज्‌या जनसमुदायाbा अत्यंतिक क्रोध येतो त्यांना पावbोपावbी होणाèया भ्रष्‌टाचाराचा का राग येत नाही? सामान्य नागरीकांना हरतèहेने नाडणाèया वेठीस धरणाèया समाजकंटकांचा का राग येत नाही ? सकारात्मक विचार बिंबवणारे चांगbे शिक्षक, आईबाप कुठे आहेत? आपल्‌या मुbांना सन्मानाने जगायbा शिकवा.  निषेध नक्‌कीच करावा, मतभेद असु शकतात पण त्यांना क्रौर्य व हिंसा करण्यापासून वाचवा, कारण आपण प्रत्येक हिंसक घटनांमुiे अनेक वर्षे मागे जातो हे ओiखायbा हवे.  हिंसेने तात्पुरते फi मिiते आणि युगायुगांचा द्वेश जोपासbा जातो पण आपापसातीb विश्वास आणि प्रेमभाव कायम सुख समृद्धी प्रदान करतो.

* आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात *

 *   आमचे आरोग्य - परिस्थितीच्या चक्रात   *

    समतोल व संयमीत मन ज्या व्यक्तिजवळ आहे तिचे आरोग्य चांगले आहे असे ठोकळमानाने म्हणता येईल पण खरोखर इतके उच्च दर्जाचे मन:स्वास्थ्य लाभण्याकरीता आज जगभरात योग्य वातावरण आहे का? नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्ती, अज्ञान, अत्याचार, चुकीचे मानवी निर्णय अशा अनेक बाबी आज आपल्या आरोग्याच्या शत्रू बनल्या आहेत.सर्वसामान्य व्यक्तिला आपल्या आरोग्याचे रक्षण करणे जितके आवश्यक आहे तितकेच ते महा कठीण काम आहे.  चांगले आरोग्य ही प्रत्येक व्यक्तिची अमुल्य संपत्ती आहे, त्याचप्रमाणे निरोगी नागरीक ही सुद्धा प्रत्येक देशाची संपत्तीच आहे. ज्याप्रमाणे संपत्ती मिळवून तिचे रक्षण करावे तसेच, आधी आरोग्यवान बनून नेहमीकरीता ते आरोग्य टिकवून ठेवणे तितकेच महत्वाचे आहे.
    कारखाने व शहराच्या विकासासाठी आज सपाटून जंगलतोड होत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम हवामानावर होत आहे. कारखान्यामुळे दुषीत वायू, दुषीत पाणी, आजूबाजूचे प्राणी आणि मानव दोघांवर परिणाम करीत आहे.त्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. अनेक खेड्या मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. असेल त्या डबक्यातले पाणी आज माणसाला प्यावे लागते आहे ही वस्तुस्थिती आहे. मैल न मैल दूर अंतरावरून पाणी आणण्याची पाळी आजही आमच्या देशवासियांवर येत आहे. पाणी हे जिवन आहे पण ते पाणीच जर जंतूयुक्त असेल, दुषित असेल तर कसले चांगले आरोग्य लाभणार आहे? गरीबी आणि बेकारी इतक्या मोठ्याप्रमाणात आहे की आजचा दिवस कसा पार पडेल ही चिंता, त्यात महागाईचे अक्राळ-विक्राळ  स्वरूप बघितले तर या जनतेला  सकस अन्न कधी मिळणार आहे? साधं दोनवेळचं निट जेवण या महागाईत मिळणे कठीण तिथे मुलांना दुध, फळे , व्हीटामिन्स टॉनिक देणे कसे शक्य आहे? लोकसंख्या दर सेकंदाला वाढते आहे त्यामुळे  कितीही पुरवठा व्यवस्था वाढवली तरी कमी पडते आहे. काही प्रगत देश सोडले तर बहुतेक विकसनशील देशांत कमी अधिक प्रमाणात ही परिस्थिती आहे.
    खरया अर्थाने आपल्या आरोग्याचे शत्रू कुणी असतील तर ते आहेत गरीबी, दुषित पर्यावरण, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास, व्यवस्थापनातील दोष,आळस, आरोग्यविषयक अज्ञान, अंधश्रद्धा, भेसळ  करणारे लोभी व्यापारी आणि त्यांना पाठीशी घालून स्वत:चे हित पाहणारे आपलेच भाईबंध.   स्वत:च्या आरोग्याच्या रक्षणाकरीता आज सामान्य माणसाला इतक्या शत्रू  विरूद्ध लढाई पुकारावयाची आहे. आपले आरोग्य हीच जर खरी संपत्ती आहे तर या संपत्तीच्या प्राप्ती साठी प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे. आरोग्यवर्धनासाठी आळस झटकून चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत तरच खर्या अर्थाने आपण आरोग्यसंपन्न होऊन प्रसन्न राहू
 सुहास सोहोनी
उजळते क्षितिज[मराठी लेख संग्रह -२००७ ]
www.mazyasamvedana.com




.

सावधान वाळवंट सरकत आहे.

          *    सावधान वाळवंट सरकत आहे.       *
   
     यावत्‌ भूमंडलात धत्रे, सशैल वन काननम्‌
    तावत्‌  तिष्ठंती  मेदिन्याम्‌, संतती पुत्र पौतृकी।।
    हजारो वर्षापूर्व आमच्या दूरदर्शी  पुर्वजांनी आम्हाला बजावून सांगीतले होते की जोपर्यत या पृथ्वीवर हिरवळ , झाडे, पर्वत आणि मुबलक पाणी आहे तोपर्यतच तुमची मुले बाळे  सुखात जगतील. पण वर्तमान स्थिती पाहता नव्या शतकांत  आपल्याला दुषीत पर्यावरणामुळे  निर्माण होणाऱ्या भयानक आपत्तीविरुद्ध झुंजावे  लागणार आहे. वास्तविक मानवाचे निसर्गाशी असलेलं नातं अतुट आहे. ज्या निसर्गाच्या उन सावलीत आमच्या अनेक संस्कृतींनी जन्म घेतला, त्यांचा उत्कर्ष झाला असा हा निसर्ग आम्हाला गुरू समान आहे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी  व आकाश या तत्वांनी बनलेल्या या निसर्गशक्ती पासून आम्ही अनेक शास्त्रे  शिकलो आहोत.तरी पण आम्ही कळत न कळत या निसर्गावर आघात करीत आहोत.
    सृष्टीचे  कार्य चेतनामय पंचतत्वांच्या सहाय्याने एका संथलयीत, ठाराविक दिशेने अविरत सुरू असते. निसर्ग आपले कार्य सहजपणे करीत असतो. निसर्गाच्या छायेत सर्व जीव, जंतू, पशूपक्षी, वृक्षवेली सुखासमाधानाने नांदत आहेत. जीवसृष्टीतील अनेक संस्कृती स्वत:ची आगळी वेगळी  वैशिष्ट्ये  कायम ठेवून कालक्रमणा करीत आहेत. सर्व जीवाचं पोषण व नाश निसर्ग स्वत:च्या नियमाने संतत आणि सहज करीत असतो. हेच सृष्टीचं जीवनचक्र आहे.
    संपूर्ण जीवसृष्टी  निसर्गाच्या पाच तत्वांच्या जादुई चेतनामय आवरणात सुरक्षित आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक जीव, वस्तू, चल, अचल स्वत:च्याच आवरणात बद्ध असतात. शरीरात वाहणारं रक्त रक्तवाहिनीच्या आवरणात वाहतं तेव्हाच ते सुरक्षित असतं. ग्रंथी, हाडे, मांसपेशी यांना त्वचेचे आवरण लाभलं आहे. मेंदू नावाचं चमत्कारी यंत्र कवटीच्या आवरणातच सुरक्षित आहे. केसांचे आवरण बदलत्या हवामानापासून जीवाचं रक्षण करतं.  प्रत्येक वस्तू , झाडे, पशूपक्षी, जलचर हे सर्व स्वत:च्या तसेच पंचमहाभूतांच्या पाच तत्वांच्या आवरणातच सुरक्षित असतात.
    जोपर्यत पंचतत्वांचा आपसांत समतोल आहे, तोपर्यंतच निसर्ग शांत आहे. निसर्गाच्या शांत व उबदार आवरणात ही जीवसृष्टी  आरामात जगणार आहे. पण जर हा समतोल बिघडला तर? तर विनाश अटळ  आहे आणि या विनाशाला जबाबदार असणार आहे मानव. वसाहत, व्यापार व शेतीकरीता घनदाट जंगलाचा सतत नाश होत गेला, या कृतीचे फळ  भविष्यात मिiणारच आहे. व्यापार व शिकारीच्या उन्मादात मानवाने अनेक प्राण्यांचे वंश नष्ट  केले. शेतातून जास्त पीक घेण्याच्या हव्यासापाई निरनिराळी  विषारी रसायने वापरणे सुरू केले. परिणामत: जमीनीत राहणारी जीव संस्कृती, जी शेतात वावरून जमीनीचा कस वाढवते, नष्ट  होत आहे. विषारी रसायने तथा फवारणीपुढे हे जीव कसे टिकणार?  कारखान्यातील दुषित पाणी नाल्यात, नदीत किंवा समुद्रात सोडल्यामुळे  पाण्याच्या आवरणात सुरक्षित असलेले जीव तडफडून नष्ट  होत आहेत.
    आजच्या प्रगत युगात जगभरातील मानवाजवळ  असंख्य योजना, इच्छा आहेत. त्याला अधिकार व संपत्ती हवी आहे. विज्ञानाद्वारे प्रगत व समृद्ध बनून विकास साधावयाचा आहे. सत्तास्पर्धेत अग्रेसर रहावयाचे आहे. खरे तर निसर्गाच्या लेखी मानव म्हणजे अनंत ब्रम्हांडातील पृथ्वी नामक ग्रहावरील केवळ  एक जीव. मानवी संस्कृतीचं आयुष्य म्हणजे या सृष्टीच्या आयुष्याच्या मानाने एक छोटासा काळ . असे कित्येक काळ  या ब्रम्हांडात येऊन गेले असतील. कित्येक मानवी संस्कृती काळाच्या ओघात निसर्गाच्या जडण घडणीच्या  प्रक्रियेत नष्ट  झाल्या.
    सृष्टी ने निर्माण केलेला प्रत्येक जीव हा दुसऱ्या कुणा जीवाची अन्नाची सोय आहे. त्या द्वारेच प्रत्येक घटकाचं संतूलन साधलं जातं. मानवेतर अन्य जीव एकमेकांवर हल्ला करतात. तो मुख्यत्वे पोटासाठी व कधीकधी श्रेष्ठत्वासाठी, पण त्यावेळी  कधीही निसर्गहानी होत नाही. संथ जलाशयात दगड पडल्यास थोडी खळबळ  व्हावी एवढाच त्या घटनेचा ठसा राहतो व पुन्हा सृष्टी चं कार्य शांतपणे सुरू होते. नित्य घडणाऱ्या  या घटना निसर्गनियमानुसार सृष्टीच्या जिवनचक्राचाच एक भाग आहेत. पण मानव एकमेकांवर हल्ला करतो तो स्वार्थासाठी.  दुसऱ्यावर  अधिपत्य गाजवून जमीन, संपत्तीची वाढ करतांना शत्रूच्या संपत्तीची राख रांगोळी  तो मुद्दाम करीत असतो. आपल्याच मानव वंशाचा नाश तो इतक्या क्रुरतेने, कुटीलतेने, विश्वासघाताने करत असतो की बुद्धीचा एवढा दुरूपयोग सृष्टीतील कोणताही जीव कधी करत नसावा. नासधूस केलेल्या प्रदेशात निसर्गनियमाचे उल्लंघन होऊन ऋतूमानात अवेळी  अकारण बदल होत आहेत.
    क्षेपणास्त्रे , अण्वस्त्रांचे  हल्ले, भूगर्भातील चाचण्या, आसमंतात पसरणारा कारखान्यातील विषारी रासायनिक धूर, कोळसा, पेट्रोल, डिझेल इंधनाच्या अती वापरामुळे  वातावरणात साठणारा कार्बन डॉय आक्साईड, पाण्यात सोडले जाणारे विषारी रसायने, अणू कचरा, ध्वनी प्रदूषण आणि या सगल्यांच  मूळ  असणारी दर क्षणाला वेगाने वाढणारी मानवप्रजा, या अनेक कारणांनी या सुंदर सृष्टी चा नुसता उकीरडा होऊ लागला आहे. दर क्षणाला वातावरणात सोडला जाणारा कार्बन  अनेक वर्षे टिकून राहतो. सूर्याची उष्णता स्वत:मधे सामावून घेतो. परिणामत: दिवसेंदिवस पृथ्वीभोवतीचे तापमान वाढत चालले आहे त्यामुळे  भविष्यात दोन्ही गोलार्धावरील बर्फ वितळुन समुद्राची पातळी  वाढेल. या कारणाने पृथ्वीवर काय हाहाकार होईल ? पृथ्वीवरील सध्याचे जमीन व पाणी यांचे प्रमाण बिघडेल.  पाण्याची पातळी  वाढल्याने बरीच जमीन पाण्याखाली जाईल. आपल्या पृथ्वीभोवती बाह्य  वातावरणापासून रक्षण करण्याकरीता "ओझोन'नामक वायुचे सरंक्षक कवच जागोजागी क्षतीग्रस्त होत आहे. त्याची जाडी कमी होत आहे. ओझोन शिवाय पृथ्वीवर पोहोचणारे सूर्यकिरण अतोनात दाहक असतील त्यामुळे  त्वचेच्या केंन्सर सारखे  रोग होतील. त्या उष्ण किरणांपुढे कित्येक जीवसंस्कृतींचा टिकाव न लागून त्या नष्ट  होण्याची भिती आहे.
    विकसीत देशात प्रगत विज्ञानाद्वारे सर्व सुखसोईंचा मनमुराद उपभोग घेणारे पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ  15 ते 20 टक्के लोक आहेत. पण जगभरात असलेली 80 ते 85 टक्के मानवजमात भूक, अपमृत्यू, अंधश्रद्धा, बेकारी, गरीबी, लाचारी, कुपोषण, प्रदुषणामुळे  होणारी रोगराई अशा  समस्यांमधे जखडली असून त्यांना प्रगत ज्ञानाचा उपभोग घेणे अशक्य आहे. तेव्हा एकीकडे मुठभर श्रीमंतांचे चैन चोचले पुरवण्यासाठी निसर्ग संपत्तीची प्रचंड लयलूट, तर दुसरीकडे कोट्यावधी जनतेच्या मुलभूत गरजासुद्धा भागवता येत नाहीत, हे कितपत योग्य आहे?
    वैयक्तिक स्वार्थ, अहंकार, जात, धर्म,  देश, संपत्ती या सर्वापेक्षा पर्यावरणाचे रक्षण हे प्रथम कर्तव्य असावयास हवे,  कारण आपल्या अस्तीत्वापुढे सर्व काही नगण्यच आहे. "*पर्यावरणाची रक्षा*'ही बाब प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. निसर्गाचा ऱ्हास  करणारी व्यक्ति निसर्ग द्रोही समजून अशा व्यक्तिस पृथ्वीचा शत्रू समजावयास हवे. आपल्या अनंत चुकांचा परिणाम म्हणून वाळवंट नामक क्रुर निष्ठूर आपत्ती हळू हळू  आपल्याकडे सरकते आहे हे आम्हाला माहित आहे?

            सुहास सोहोनी
    उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह -२००७]
       www.mazyasamvedana.com    




* निसर्गातच आहे विपुल अन्न *

   *   निसर्गातच आहे विपुल अन्न    *
   
    प्रत्येक सजीव म्हणजेच प्राणी आणि वनस्पती यांना जगण्यासाठी व वाढीसाठी प्रथम गरज आहे अन्नाची. जगायचं असेल तर आपले अन्न आपल्याला मिळवावेच लागते. प्रत्येक जीव मरेपर्यंत ही धडपड करतच असतो.त्या धडपडीतून त्या जीव-समुहाचा विकास घडत असतो. छोट्याशा किटकांचा सुद्धा मिळवलेले अन्न साठवून ठेवण्याकडे नैसर्गिक कल असतो. आणि त्या विचार प्रेरणेतून एक सुनियोजीत शिस्त अंगीकारली जाते.  अन्न मिळवणे,साठवण करणे,वितरण करणे व सरंक्षण करणे या महत्वाच्या कार्यपद्धती आयोजिल्या गेल्या.   अन्न मिळविण्याकरिता प्रत्येक सजीवाला   वैयक्तीक किंवा सामूहिक शक्ती आणि टोकाची बुद्धीमत्ता वापरून युक्तीचा उपयोग करावा लागतोच. या दोन्ही गोष्टीत जो कमी पडेल त्याचा बळी  गेलाच म्हणून समजावे.
    पंचतत्वा ने निर्माण झालेल्या या निसर्गाने प्रत्येकाला नियमित पणे संधी दिलेली आहे पण वातावरणाचे आणि परिस्थितीचे चक्र मात्र कायम फिरतं ठेवलं आहे. ऋतूमानाप्रमाणे विविध विलोभनीय रूपाने हा निसर्ग सजतो.खुलतो. असतील ते सगळे  रंग सभोवताली उधळून सर्वांगावर रंगप्रावरणे लेवून सजण्याची, नटण्याची हौस फे डून घेतो.  सर्व  सजीवांना आपले अन्न मनसोक्त लुटू देतो, तृप्त  करतो. तोच निसर्ग दाहक उन्हाच्या चटक्यांनी आसमंत भाजून काढतो, थंडीने गारठतो व अतीवृष्टी ने सर्व वाहुंन नेतो. प्रत्येक जीवाला पुन्हा पुन्हा अन्नासाठी व सुरक्षिततेसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतात. संतत बुद्धीमत्तेचा कस लागतो आणि       बुद्धीचा विकास होतो.
     जीवन हे सापशिडीच्या खेळा सारखं आहे, जसं दान पडेल तसं पुढे पुढे जाणारं किंवा तळा पर्यत गडगडणारं, हे चालूच राहणार पण मांडून ठेवलेल्या "सापशिडीच्या पटावरील शिड्याची संख्या वाढवता येईल ?'नुकसानीला आळा  बसेल अस व्यवस्थापन हवं आहे. शिस्तबद्ध सुनियोजित व्यवस्थापना द्वारे प्रत्येकापर्यत सकस अन्न कसे पोहचेल हा विचार होण्याची गरज आहे.अन्नासाठी भांडण्याऐवजी आपल्याला पुरून उरणारे अन्नधान्य वितरीत करण्याची गरज आहे. लाखोंच्या संख्येने कुपोषित बालके असून असंख्य भूकबळी  आपल्या देशात होत आहेत. हे कशाचे लक्षण आहे? समुहाने राहणाऱ्या  मानवाने प्रत्येकाला दोन वेळ चे अन्न मिळेल याची सामुहिकरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी अन्नाची होणारी नासाडी पाहवत नाही. कोठांरामध्ये धान्य पडून सडल्याच्या बातम्या येतात आणि भ्रष्टाचाराचे काय? भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी जिद्द बाळगणारी मने घडविण्याची गरज आहे.जगात कोठेही अन्नधान्याचा तुटवडा नको. या निसर्गदेवतेवर श्रद्धा ठेवा, संवर्धन करा कारण केवळ  हा निसर्गच विपूल धन्यधान्य उदारपणे देणार आहे.
                
               सुहास सोहोनी
           उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह -२००७]
          www.mazyasamvedana.com

          


   *   पाणी व्यवस्थापन- "गाव तेथे तळे '   *
   
    "पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा'. समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. पण हाय! या समुद्रात,या तलावात  पाणी नाही , रेती आहे. फक्त वाळू आणि माती ... आणि सध्या  अशा भयाण दुष्काळाने महाराष्ट्रात तांडवनृत्य सुरू केले आहे. दुष्काळाच्या धगधगत्या यज्ञात आहुत्या पडतात पशुंच्या, पक्षांच्या, मानवी जिवांच्या. छोटे मोठे पाण्याचे साठे सुकून जात आहेत. तशातच मार्च, एप्रिल पासूनच प्रखर उन्हाने जिवाची लाहीलाही होइल  . जंगली पशुपक्षी तर स्वत:च्या बुद्धीची आज्ञा पाळून सुरक्षित ठिकणी स्थलांतरीत होतील . पण मुके पाळीव प्राणी? मानवाच्या आज्ञेत राहण्याची, जगण्याची सवय झालेल्या या पशुंनी कसा निर्णय घ्यावा? मालकाने जेथे वळवले तेथे निघायचे. अशा जनावरांचे स्थलांतर होईल , पण बऱ्याच जिवांना प्राण गमवावा लागतो- केवळ  पाण्याअभावी. पाणी नसेल तर सजीवच राहणार नाहीत या सत्यतेची ही छोटीशी एक झलक आहे. पाणी हेच जिवन आहे . दिवस उजाडला की पाण्याच्या शोधात ही जनता आसमंत तुडवत आहे. मिळेल ते गढूळ  , दुषित पाणी घेत आहेत. वेळ  प्रसंगी संधीसाधू लोकांना वाटेल ती किंमत मोजून पाणी विकत घेत आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे.
    एकीकडे प्रचंड वादळी  वारे व अजस्त्र  उंचचउंच लाटांच्या धडकीने भारताच्या पूर्व किनाऱ्या वर प्रलयंकारी निसर्गाचे तांडवनृत्य होत असते. आणि  पश्चिम भारताच्या किनाऱ्या वर प्रखर उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे  निसर्गाच्या विनाशकारी अस्तित्वाचे दाहक दर्शन होत असते. वर्षानुवर्ष या खंडप्राय देशात सतत कुठेतरी निसर्गाचे फटकारे बसत आहेत. हजारोंच्या संख्येने जिवहानी व अगणीत  मालमत्ता नष्ट  होत आहे. तसे पाहिले तर निसर्गाचा हा नित्याचाच एक खेळ  आहे. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. ऋतुचक्रात अनियमितता दिसून येत आहे. उष्णतेत वाढ व पाण्याची कमतरता यामुळे  झाडांना, जंगलांना धोका आहे. त्यात मानवनिर्मत कारवायांमुळे  जंगलांचे, वातावरणाचे नुकसान होत आहे. जंगलाची वाढ होण्यापेक्षा जंगले नष्ट  होण्याची गती जास्त आहे. या सर्व घटनाक्रमाला एकत्रितपणे विचारपूर्वक विरोध करणे ही काळाची गरज आहे. बुद्धीचा उपयोग शांतता व रक्षणासाठी करण्याची गरज आहे. अशांतता आणि युद्ध केवळ  विनाशच देऊ शकतात आणि शांततेच्या काळातच रचनात्मक कार्ये होऊ शकतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी कार्य व्हायचे असेल तर प्रथम विश्वशांतीची आत्यंतिक आवश्यकता आहे. नाहीतर सापशिडीच्‌या खेळा प्रमाणे या पवित्र कार्याची अवस्था होईल.
    जलसंपत्तीची वाढ करण्यापासून या पवित्र कार्याची सुरवात करावी लागेल. भुगर्भातील पाणी वाचविणे त्याचबरोबर पावसाचे पाणी जमेल तसे साठविणे या विषयीचे महत्व सर्वानी मान्य करायला हवे. त्या करीता जनजागरण हवे. जमीनीच्या उंच सखलपणाचा उपयोग करून – "गाव तेथे तळे ' ह्या  वचनाची  अंमलबजावणी करायला हवी. पावसाच्या पाण्याचा साठा कसा करता येईल, आणि वाहुन जाणारे पाणी जमिनीत कसे जिरवता येईल यावर मन:पूर्वक कार्य करावे लागेल. हा अस्तित्वाचा  प्रश्न आहे, हे सत्य नाही का? प्रत्येक गावाचे पाणी व्यवस्थापन हाच अतिमहत्वाचा विषय समजायला हवा. पाणी व्यवस्थापनासाठी जगात आज उपलब्‌ध असलेल्या सर्व पद्धती– सर्वकष विचार, आमच्या प्रत्येक  गावाला माहिती करून देणे आवश्यक आहे. प्रदुषण टाळण्यासाठी काय करता येईल याचा अंतर्मुख होऊन विचार करणे व कृती करणे गरजेचे आहे. कालवा पद्धतीने एकीकडचे अतिरिक्त पाणी कमी असलेल्या प्रदेशात वiवणे शक्य आहे, पण हे कार्य युद्धपातiीर सुरू करावे. शासन त्याच प्रमाणे गैर– शासकीय संस्था यांनी"गाव तेथे तळे 'हा विचार अस्तित्वाचा प्रश्न समजून या  कार्यास अग्रक्रम द्यावा.
        * *प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरावा द्वारे प्रत्येक गावासाठी किमान दोन एकराची जमीनगावतलावासाठी
निश्चित करून तेथे तलाव निर्माण केला तर पावसाळ्यात कितीतरी पाणी साठवले जाईल .गावातील विहिरींना पाणी झिरपेल .तलावाभोवती स्मृतिवना ची निर्मिती केल्यास पर्यावरणाचा समतोल साधेल निसर्ग चित्र सुंदर दिसेल .दुष्काळावर मात करता येईल .हे व्हावे .***
           सुहास सोहोनी
        उजळते क्षितीज [मराठी लेख संग्रह -२००७]
         www.mazyasamvedana.com