Thursday, December 20, 2012

* मनोगत [ "क्षण वेचतांना' ] *

       *  मनोगत   [  "क्षण वेचतांना'  ]  *

      "क्षण वेचतांना' हा माझा तिसरा bेखसंग्रह वाचकांच्‌या हाती देताना मbा विशेष आनंद होत आहे.  "वर्तुiाचे टोक' व "उजiते क्षितिज' या दोन्ही पुस्तकांचं वाचकांनी कौतुक केbं. उजiते क्षितिजbा "स्वामी विवेकानंद राज्‌यस्तरीय साहित्य गौरव प्रथम पुरस्कार-2007' मिiाbा.  त्याचा आनंद आहेच, पण असंख्‌य वाचकांच्‌या भेटीगाठी, फोनवर गप्‌पा, पत्रव्‌यवहार हे प्रत्येक क्षण माÂयासाठी पुरस्कारासारखेच आहेत.
    खरं तर आयुष्‌यातीb काही कटू घटनांनी आम्ही व्‌यथीत होतो, पण माÂया अनेक मित्रांनी, चाहत्यांनी मbा वेiोवेiी bेखनास प्रवृत्त केbे. संदीप गोडबोbे, मंगbाताई जोशी, हेमेन्द्रजी जोशी, किरणभाऊ राजोपाध्ये, माझे मित्र अ°ड. श्री. के.एस. मानवतकर, श्री. भुपेंद्र कुसiे, पायगुण प्रकाशनचे श्री राजेश बाहे, डॉ. जोशी ट­स्टचे आदरणीय श्री. बाiासाहेब जोशी, महाराï­ वृत्तपत्र bेखक असोसिएशनचे सर्व पदाधिकरी, माझे आप्‌तेï, मित्रमंडiी अशा अनेक मित्र व चाहत्यांनी मbा विविध विषय दिbे, चर्चा केbी आणि मbा bिहीते केbे.  मी या सर्वांच्‌या ऋणात राहÿ इच्‌िछतो.
    या पुस्तकाच्‌या मुखपृðाद्वारे एक विचार मांडbा आहे की, समुद्राच्‌या उसiत्या वादiी bाटेbा बेगुमानपणे धडक देणारा पक्षिराज गरूड म्हणजे जणू काही अगणीत समस्यांशी bढा देणारी एक शक्‌ती.
    वर्षामागून वर्षे गेbी. पिढçा बदbताहेत पण सामाजिक समस्या तशाच मुi धरून आहेत.  जनता त्रस्त आहे.  व्‌यवस्था सुस्त आहे.  गरीबी श्रीमंतीची दरी रूंद होत चाbbी आहे.  विकास कशाचा व कुणाचा साधbा हा प्रश्नच आहे.  bोकसंख्‌यावाढ, शिक्षण, आरोग्य, विकृती, आर्थिक कोंडमारा, आतंकी हल्‌bे, हत्या, आत्महत्या, स्त्रियांवर अत्याचार, भ्रïाचार या सगùया समस्या फेर धरून नाचताहेत.  नसंपणाèया समस्या हीच एक मोठी समस्या झाbी आहे.  रोज जाणवणारे हे क्षण वेचण्याचा छोटासा प्रयत्न या bेखसंग्रहात केbा आहे.  सकारात्मक प्रयत्नाने गुंता कसा सोडवता येईb, याचा विचार केbा आहे. या bेखसंग्रहातीb bेख विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराï­ व कांेकण भागातीb विविध नियमकाbीकांत प्रसिद्ध झाbेbे आहेत. गडद काiोखात एक पणती आजुबाजूची वाट दाखवते, दिशा देते, त्याबरोबरच हिच एक पणती हजारो पणत्यांना उजiवू शकते. मग काiोखाbा नï व्‌हावंच bागेb, ही खात्री आहे.
                   

* खाकीचा रंग काळा होतोय *

    *   खाकीचा रंग काळा  होतोय  *
--------------------------------------------
    पोलीस दलात नोकरी करणारे जवान म्हणजे नक्की कोण असतात? सर्व प्रथम ते देशाचे नागरीक असतात त्याचबरोबर ते कुणाचे तरी भाऊ, बहिण, आई, बाप असतात.  मुळात सामान्य जनतेचा एक घटक असलेला , कुणीतरी, केवi नोकरीच्या निमित्याने पेशाने पोलीस बनतो.  शांततेने जगू इछिणाऱ्या  सामान्य माणसाचे रक्षण करणे, गुन्हेगारांवर जरब बसवणे, ताब्यात घेवून त्यांना शिक्षा होण्यासाठी न्यायसंस्थेला  मदत करणे, कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी तैनात राहणे, बंदोबस्त सांभाळणे अशा विविध कार्यात पोलीस नेहमी व्यस्त असतात.  कितीतरी वेळा  दंगल , संप, बंद अशा प्रसंगी हिंसक जमावाला  सामोरे जाताना एका विचित्र मानसिक तणावाखाली  असणं अगदी साहजिक आहे.  पोलीसांना सुद्धा कुटुंब आहे, मुलं बाळ  आहेत, समस्या आहेत, महागाईसुद्धा आहे.  वरिष्ठांचा चा धाक आहे, कार्यालयीन लालफीतशाही, अव्यवस्थेचा ताण  पोलीसांना सुद्धा सहन करावाच लागतो.
    पोलीस जनतेचे मित्र असतात, लोकांनी सुद्धा पोलीसांना त्यांच्या कामात मदत करावी असे विचार वेळो वेळी  मांडले  जातात.  जनतेच्या रक्षणासाठी सदैव तैनात असणारा हा एक घटक आहे.  माणसाचे सगळेच गुणदोष पोलिसांमध्ये असणारच,  वेळो वेळी  ते सिद्धही होत असते.  गुन्हेगार असलेल्या पोलीसांना शिक्षा झालेली  आपण नेहमीच बघतो, पण तरीही कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा हा समाजघटक आहे, आणि तसा तो असलाच पाहिजे.  हा एक व्यवस्थेचाच भाग आहे.  जोपर्यंत गावात, शहरांत शांतता आहे तोपर्यंत सर्व ठिक आहे पण ज्याक्षणी जमाव हिंसक बनतो, बसेस पेटवल्या जातात, वाहनांची तोडफोड होते, दुकानांना , घरांना आगी लावल्या जातात, हिंसक बनलेला  जमाव परस्परांचे मुडदे पाडतो, लुटालुट होते, स्त्रीयांची अब्रू लुटली  जाते अशावेळी  क्षणात चित्र पालटते.  कायदा, सुव्यवस्था, शांततेसाठी तोच पोलीस सज्ज होवून त्यांची फौज तैनात होते.
    जमाव हिसंक का होतो? रस्त्यावर उतरलेले  लोकं आगी का लावतात? लोकांना भडकाऊ भाषणांनी कोण भडकावतं? परिस्थिती चिघळे पर्यंत वर्षानुवर्षे शब्‌दांच्या ठिणग्या कोण फेकतं? लोकांना एकमेकांविरूद्ध चिथावून शस्त्र कोण पुरवतं? प्रश्न राजकीय असो भावनीक असो की सामाजीक, ती समस्या कायमची कधी सोडवायचीच नाही, पार गुंता करून टाकायचा.  मात्र त्या हिंसक परिस्थितीत जमावाला  थोपवायला  असतात पोलिसांचे ताफे.  जनतेचा रोष निघतो सर्वप्रथम पोलिसांवर.  त्यानंतर नाट्य घडते, त्यात जमावावर पाण्याचा मारा, अश्रुधूर, लाठीचार्ज आणि दुर्दैवी गोळीबार.  लुटालुट, तोडफोड करणाऱ्या  हिंसक जमावाला  दिसतो तो अडवणारा खाकी रंग.  रोषाला  बळी  पडतो तो खाकीधारी.  व्यवस्थेकडून जनतेवर अन्याय, अत्याचार होतो.  भाषणबाजी आणि माफीया राज मुळे  जनता त्रस्त होते.  राजकीय खेळीमुळे  जनतेला  प्रक्षुब्ध केले  जाते.  शांततेचा संप असला  तरी समाजकंटकाद्वारे वातावरण युद्धखोर बनवले  जाते पण संपूर्ण भार मात्र पोलीस यंत्रणेवर पडतो.  आदेशाच पालन करताना आणि जमाव काबूत येत नसल्याने जिद्दीला  पेटलेला  खाकीधारी, भान हरपलेला  आमचा पोलीस दादा हातात शस्त्र घेवून काय करून बसेल  याचा अंदाज नाही बांधता येत.  डोक्‌यात गेलेला  राग समोर सापडेल  त्याच्यावर बरसतो.  पोलिसी अत्याचाराच्या कहाण्या जन्म घेतात.  समस्याग्रस्त जनता विरोध प्रदर्शत करते आणि शेवट मात्र पोलिसी अत्याचारात होतो.  जखमी तर पोलीसही होतात.  संयम कुणी पाळायचा हा सल्ला  देणे सोपं आहे.  जनतेला  भुलावणाऱ्यानी संयम पाळावा तसा पोलिसांनी सुद्धा संयम पाळायला  हवा, मात्र काही दुर्दैवी  घटनांमुळे  खाकीचा रंग काळा  होतोय.
              ुुु  सुहास  सोहोनी
                       ९४०५३४९३५४
                क्षण  वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
                  www.suhassohoni.blogspot.com
                  www.mazyasamvedana.com

*आतंकवाद आणि भारताची ओळख*


*आतंकवाद आणि भारताची ओळख*

    आमच्‌या देशातील  कोणतेही एखादं मोठं शहर, जागा बाजारपेठेची, अत्यंत गर्दी ची, वेळ  शक्यतो सायंकाळ ची, एका पाठोपाठ एक सिरिअल  बॉम्ब ब्लास्ट होतात, कितीतरी जीव अचानक मृत्युमुखी पडतात, शेकडो लोक  जखमी होतात, पांगळे  होतात.  आनंदी जीवनाचा रंग क्षणात विस्कटून जातो, जाणवतो, आणि उरतो तो केवळ रक्ताचा लाल  रंग.  वर्षानुवर्ष निरपराध भारतीयांचे रक्ताचे पाट वाहताहेत, मुडदे पडताहेत.  का? का? नेमकं कशासाठी? कोण घडवून आणतो हा विध्वंस? देशात कानाकोपऱ्यात विनासायास या विध्वंसक कारवाया आखल्या जातात व चारही दिशांतील  कोणत्याही शहरात स्फोट घडवले  जातात.  कोट्‌यावधी नागरीकांना कायम दहशतीत जगायला  भाग पाडणारी ही यंत्रणा एवढी सक्षम कशी बनली ? नित्यनेमाने विध्वंसक घटना घडवून आणून आतंकवादी संघटना निर्ढावल्या आहेत.  त्यातही कहर म्हणजे अशा स्फोटांची जबाबदारी घ्यायला  या मस्तवाल  संघटना बेधडक पुढे येतात. 
    विविध ठिकाणी घडलेल्या या सगळ्या  घटना परराष्ट्रतील  आतंकवादी संघटनांनी घडवल्या नसून काही वेळा   भारतातल्या संघटनेने हे घृणित कार्य केले  आहे.  खुद्द प्रशासन व विविध प्रसारमाध्यमे ही गोष्ट  मान्य करताहेत.  पोलिसांची उपस्थिती असताना हजारो नागरीकांच्या अवतीभवती हे आतंकवादी सराईतपणे वावरताहेत.  विविध तèहेने विविध प्रकारे स्फोटके सहजपणे पेरली  जातात,  तेव्ह्ढ्याच सहजतेने त्या जागेवरून त्वरीत दूर जातात आणि काही मिनिटांच्‌या अंतराने ते भयनाट्य  सुरू होते.  अनेक वेळा  मानवी बाँम्बचा देखील  वापर झाला  आहे.  भारतीय असलेल्या आतंकवादी संघटनेला  स्फोटके, पैसा, तंत्रज्ञान व शिक्षण कोण देतं? आमच्या देशातील  सर्वदूर पसरलेला  भ्रष्टाचार  आतंकवादी संघटनांच्या कारस्थानाला  कळत नकळत हातभार लावतो का? त्या शिवाय या अतिरेक्यांचा सहज वावर कसा शक्य आहे? अतिरेक्यांचं कार्य पद्धतीसाठी असलेल्या यंत्रणेचं जाळ  किती सक्षम आहे ही गोष्ट  वारंवार सिद्ध होते आहे, परंतु देशाची सुरक्षा यंत्रणा अजुनही अतिरेक्यांचा कायम बिमोड करू शकली  नाही.  ज्ञात असलेल्या अतिरेकी संघटना कायमच्या नष्ट  का करता येत नाहीत?  यासाठी विशेष दहशतवाद विरोधी कायदा का तयार करता येऊ नये?
    आमच्या भूमीवर आतंकवादी संघटना फोफावत असतील , प्रबळ  होत असतील  तर जगाच्या नजरेत भविष्यातील  भारताची कशी प्रतिमा तयार होईल ? स्वत:च्या नागरीकांच्या प्राणाचे रक्षण ही शासन व्यवस्था करू शकत नसेल  तर आजचा भारत बलवान आहे का? देशाच्या विकासावर या विचारांचा परिणाम कसा होईल ? देशांतर्गत आतंकवादी शत्रू समोर आणून त्यांना कठोर शिक्षा होणे, या प्रश्नाला  अग्रक्रम देण्याची गरज आहे. "भ्रष्टाचाचारादवारे आतंकवादाला  खतपाणी घालणारं राष्ट्र ' किंवा "आतंकवादामुळे  हतबल  झालेलं  राष्ट्र  अशी आमची ओळख आम्हाला  नको आहे.
सुहास सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २ ० १ २ ]
www.facebook.com/mazyasamwedana


                        ुुु

शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतीम लढाई नक्कीच नाही


* शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतीम लढाई नक्कीच नाही *

    परिक्षेत कॉपी करू दिली  नाही म्हणून मोठ्या  प्रमाणात मुले  नापास होत आहेत, हा विचार आणि निष्कर्ष चुकीचा तसेच दुर्दैवी आहे.  म्हणजेच कॉपी करून बरीचशी मुले  आजपर्यंत पास होत गेली .  अभ्यास नसतांना हिच मुले  पुढे जबाबदारीची पदे सांभाळणार आहेत.  पायाच जिथे कच्चा असेल  तर अपेक्षा काय ठेवायची ! कठोर परिश्रमाने पास झालेल्या चांगल्या मुलांची  संधी नक्कीच डावलली  गेली  असेल .  चुकीच्या मार्गाने हवं ते मिळवणारे भविष्यात नेहमीच शॉर्टकटचा अयोग्य मार्ग निवडणार कारण एकदा लागलेली  सवय आणि मिळालेल  यश प्रत्येकवेळी  वाकडं पाऊल  टाकायला  आकृष्ट  करणार, हे अगदी सहज आहे.  प्रश्न पत्रीका आधीच मिळवणे, कॉपी करणे, गुण वाढवून घेण्यासाठी साम, दाम, दंड, नितीचे सर्व प्रयत्न करणे आणि लायकी नसतांना पास होऊन चांगल्या नोकऱ्या  पटकावणे या  सर्व गोष्टी  निरोगी अशा समाजासाठी हिताच्या नाहीत.
    गुणवान, प्रज्ञावान, शीलवान मुले शाळां मधून तयार होतात का? वेळोवेळी  नित्य, शिक्षणपद्धतीत बदल  करीत राहण्याने त्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो आहे का ? या प्रश्नांचा विचार होत नसावा.  आजच्या मुलांना भविष्यातील  अनिश्चितता सतत भेडसावते आहे, त्याचवेळी  पालक व नातेवाईकांच्या अवास्तव अपेक्षा व हट्ट मुलांचा ताण वाढवण्यास मदतच करीत आहे.  शाळे व्यतिरिक्त व्यस्त असलेल्या ट्युशन क्लासमध्ये सुद्धा अभ्यास ……? "समजत' नाही.  हेच या वर्षी   सिद्ध झाले  आहे.  ज्या शाळां चे 8 टक्‌के, 10 टक्के निकाल  लागले  आहेत त्या शाळा  नक्की कशाप्रकारे मुलां कडून अभ्यास करवून घेतात? दोष शिक्षण पद्धतीचा, संस्थेचा, शिक्षकांचा, पालकांचा कि मुलांचा? सर्व प्रकारचे अनुदान मिळवून आज शिक्षकांना भरपूर पगार दिला  जातो, पालक मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊन खर्च करतात, काळजी करतात, काळजी घेतात पण फळ  मिळत नसेल  तर चुक कुठे होते आहे, आणि पुढे काय?
    मन लावून अभ्यास करणे, अभ्यासाची आवड कशी निर्माण होईल  यासाठी पालक, गुरुजनाची अमुल्य मदत घेणे, एकाग्रता आणि परिश्रमाने विद्यार्जन करून प्रत्येक टप्प्यावर सुयश मिळवणे हेच विद्यार्थ दशेतील  प्रमुख कर्तव्य आहे हे मुलांना पटेल , समजेल  असे सांगण्याची गरज प्रत्येक पिढीत कायम असणार आहे.  उज्वल   भविष्यासाठी परिक्षा उत्तम दर्जाने उत्तीर्ण होणे आवश्यक आहेच. मुलां सोबत नेहमीच सुसंवाद हवा, चर्चा हवी, मात्र ताणतणाव आणि आग्रह टाळला  पाहिजे.  परिक्षेत कमी गुण मिळणे किंवा नापास होणे सुद्धा शक्य आहे.  पण अशा मुलांना निराश न होऊ देणे,  त्यांना सकारात्मक ऊर्जा देणे, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे हे पालकांचे काम फारच महत्वाचे आहे.  कारण शालेय परिक्षेत अव्वल  नसेल  तरी भविष्यात जीवनाच्या संघर्षात नक्कीच विजय प्राप्त होऊ शकतो, फक्त गरज आहे दृष्टीकोन बदलण्याची व परिश्रम करण्याची.  शाळा , कॉलेजची परिक्षा ही अंतिम लढाई नक्कीच नाही.जीवनाच्या संघर्षात भविष्यात
कितीतरी प्रसंगी अनेक प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात आणि अडचणीतून यशस्वी मार्ग काढावा लागतो
हे मुलांना निट समजावून सांगायला हवे .
             सुहास सोहोनी 
         क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२ ० १ २ ]
           www.facebook.com/mazyasamvedana                ुुु

मोबाईलचा वापर जरा जपून


*मोबाईलचा वापर जरा जपून*

    विज्ञानाचा एक चमत्कारी अविष्कार म्हणजे मोबाईल , भ्रमण यंत्र. अफलातून उपयुक्त संशोधन.  जीवाभावाचा सोबती.  तळहातावर मावणारे हे छोटेसे यंत्र आणि यंत्रणा दिवसरात्र किती अफाट काम करीत असतं की आश्चर्याला  पारावार नाही.  एक फार मोठा उद्योग समुह मोबाईल  या उपकरणाच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची उलाढाल  करतो आहे.  जगभर असलेल्या मोबाईल  ग्राहकांसाठी नवनवे डावपेच लढवले  जात आहेत.  किफायतशीर दर, तत्परसेवा, प्रलोभनांचा अतिरेक अशा विविध क्ल्रुप्‌त्यांचा कल्पक वापर करून अजस्त्र अस नेटवर्क अविरत कार्यरत आहे.  विज्ञानाचा अविष्कार आणि प्रगत मार्केटींगचा हा सुरेख यशस्वी मेळ  आहे.
    मोबाईलची उपयुक्तता नाकारण्याचा प्रश्नच नाही पण प्रत्येक नाण्याला  दोन बाजू असतात.  योग्य अयोग्य, चांगले , वाईट, हितकारक नुकसानकारक, खरी गरज आहे ती या दोन्ही बाजू तपासून समजून घेण्याची.  दिवसेदिवस मोबाईल  फोनचा वापर प्रचंड वाढणारं आहे.  ती एक क्रेज बनणार आहे.  अबाल वृद्ध सर्वच याचा अतिरेक करणार आहेत.  त्यातच अभिमान, कौतुक दर्शवले  जाणार आहे.  खरे तर निसर्गाचा एक अत्यंत साधा, प्राथमिक नियम आहे "अति तेथे माती.'  निसर्ग स्वत:चे नियम कधीही मोडित काढत नाही आणि कधीही कुणालाही क्षमा करत नाही.  अतिरेकाच्या हव्यासापाई आपण नेहमीच प्राथमिक सत्य विसरून जातो.  शरीराला  बिलगून असलेलं  मोबाईल चं उपकरण व प्रत्येक शहरात दिमाखात उभे असलेल्या टॉवरच जाळ , त्यातून प्रसारित होणारे किरणांचे प्रभाव शरीराला  धोकादायक आहेत हे सत्य नाकारता येणार नाही.
    पशुपक्षांवर या टॉवरच्या फ्रिक्वेन्सी रेंज चा प्रभाव पडतो आहे हे आता मान्य झाले  आहे.  मोबाईल  टॉवरच्या रेंजमध्ये राहणारे नागरीक नित्य रेडिएशनच्या धोक्यात आहेत त्यांना मेंदूचे विकार, त्वचा विकार, क°न्सर, या विकारांची शक्यता जास्त असते. शहरांमध्ये गर्दीच्या  वसाहतीत घरांवर टॉवर उभे करण्यास परवानगी नसावी. रेडिएशनचा धोका कसा कमी करता येईल  यासाठी ठोस कठोर पावले  उचलण्याची गरज आहे.  मोबाईल  उपकरण कधीही निर्जिव नसतं.  ते कायम सुक्ष्म लहरींची देवाण घेवाण करीत असतं.  म्हणजेच आपल्या शरीरावर त्या लहरींचा हळु हळू  प्रभाव सुरू असतो आणि नेमका हाच धोका आपण सहज विसरून जातो.  आपल्या शर्टाच्या डाव्या खिशात मोबाईल  ठेवणे, म्हणजे जिवंत बाँम्ब खिशात ठेवण्यासारखेच आहे, ही गोष्ट  समजून घ्यायला  हवी.  कानाद्वारे आवाजाद्वारे सुक्ष्म लहरी मेंदूत पोहोचतात.  त्वचेवर परिणाम होऊ शकतो.  रस्त्यावर फोनवर बोलत हातवारे करत मोठमोठ्या ने हसत, बडबडत जाणारे महाभाग, यांची संख्या वाढत आहे.  खांद्यावर मोबाईल  ठेवून मान कलती करून भरधाव वाहन चालवणारे तर खूपच आहेत त्यांना मानेच्या नसांचा विकार होण्याची, मानेतील  स्नायूंमधे कायमचे वाकडेपण येण्याची जास्त शक्यता आहे.  लहान मुलांच्या मानेच्या नसा नाजूक असतात.  ही सवय घातक आहे.  कृपया मोबाईल वर बोलत असताना वाहन चालवू नये.  अपघात होण्याची शक्यता वाढते.  प्रत्येक मोबाईल धारकांनी धोक्याच्या शक्यतेची माहिती मिळवावी.  काही चुकत असल्यास दुरुस्ती अवश्य करावी. मोबाईलचा वापर अवश्य करावा पण जरा जपून.
सुहास सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -  ]
www.facebook.com/mazyasamvedana
                        ुुु

काय म्हणता ! देशातच उघडली स्वीस बँक !


काय म्हणता ! देशातच उघडली  स्वीस बँक !

    मोठçा शहरात खाजगी व्‌हॉल्‌टस (bॉकर) चा व्‌यवसाय सध्या फारच तेजीत आहे.  बँकेतीb bॉकर्सचा व्‌यवहारात त्रास असावा म्हणून कदाचीत धनाढç वर्ग खाजगी bॉकर्स कडे वibा असावा.  साधारणत: दागीने, मौल्‌यवान वस्तू, कागदपत्रे  bॉकरमध्ये ठेवbी जातात पण एका एका bॉकरमध्ये करोडो रूपये नगदीस्वरूपात ठेवल्‌याचे उघडकीस येण्यावा सपाटा सुरू झाbा आहे.  देशात विविध शहरात हजारोच्‌या संख्‌येने खासगी bॉकर्स आहेत, आणि तपास अधिकाèयाच्‌या कारवाईत उघडbेल्‌या bॉकर मधून करोडोच्‌या नगदी नोटा सापडताहेत.  इतका अफाट पैसा आणि बंदिस्त!  त्यासोबत सोने चांदीचा खजीना.  त्यात bॉकर्स बेनामी, हक्‌क सांगण्यास कोण पुढे येणार ! म्हणजे हा बेहिशोबी काiा पैसा आहे.  प्रश्न हा आहे की असा किती पैसा देशातच दडवbेbा आहे, आणि कुणी bपवbा?
    खरा प्रश्न हा आहे की असे bॉकर्स बेनामी किंवा खोटçा नावाने कसे असू शकतात? त्यांची काहीही शहानिशा होत नसेb का? bॉकर वापरणाèयाची इत्यंभूत माहिती नसावी किंवा दडवbी असावी.  आपण एखादे संस्थेचे खाते बँकेत उघडbे तर बँकेचे अधिकारी दिbेल्‌या पत्यावर हजर होऊन शहानिशा करतात, मात्र या व्‌यवसायात असा अनागोंदी कारभार हेतूपुरस्पर चाbतो, म्हणजेच गुन्हेगारांसाठी गुन्हेगारांनी सुरू केbेbी व्‌यवस्था, असेच म्हणावे bागेb. प्रामाणिकपणे साधारण माणूस कमावतो तेव्‌हा संपूर्ण आयुष्‌यात त्याच्‌या कमाईची बेरीज एक कोटीसुद्धा होत नाही आणि करोडोची बेनामी अवैध संपत्ती bॉकर्समध्ये दडवून ठेवbी आहे.  कोणत्या कामासाठी हा पैसा वापरbा जात असेb, कल्‌पना करवत नाही.
    विदेशामध्ये भारतीयांचा अमाप काiा पैसा बँकामध्ये दडवून ठेवbा आहे ही गोï सर्व स्तरावर मान्य केbी जात असताना आता भारतातच काiे धन bपवण्याची सोय उपbब्‌ध करून दिbेbी आहे.  एकूण काय! भ्रïाचार करा आणि देशातच पैसे ठेवा, किंवा विदेशातीb बँकेतीb पैसा हiू हiू या खासगी bॉकर्समध्ये जमा तर होत नसेb? भ्रïाचाराने धन कमावण्याची सवय व चटक bागbी की काय काय हिकमती bढवाव्‌या bागतात, ते धन bपवून वापरण्यासाठी. खरी चिंता ही आहे की देशाचे धन देशाच्‌या विकासासाठी कधी वापरता येईb ? कारण आता तर देशातच आbी आहेे स्वीस बँक.
                        ुुु

भारताने अणूऊर्जा कार्यक्रम स्थगित करावा


भारताने अणूऊर्जा कार्यक्रम स्थगित करावा

    भारत देशाचा विकास हा अणूऊर्जेशिवाय शक्‌य नाही.  आम्हाbा जागतीक स्पर्धेत टिकून रहायचे असेb तर देशाचा विकास करावाच bागेb.  अणूऊर्जा प्रकल्‌प वाढवावेच bागतीb, असं आम्हाbा पटवून देण्याचा प्रयत्न संबंधित मान्यवर करीत आहेत, असे चित्र आहे.  जागतीक दर्जाचे मॉल्‌स येथे येऊ इच्‌िछतात.  विदेशी उद्योग, कारखाने इथे यावेत असं आपल्‌याbा वाटतयं.  जगभरातीb चेन हॉटेल्‌स, रेस्टॉरेन्ट यांना आपण आमंत्रित करीत आहोत.  फुडप्‌bाझा, खेiांचे प्रशिक्षण केंद्रे, प्रचंड उत्पादन देणारे कत्तbखाने या देशात उभारायचे आहेत.  संपूर्ण जगाbा पुरून उरेb इतकी विदेशी दारू आम्हाbा या देशात निर्माण करायची आहे.  प्रत्येक शहरात जास्तीतजास्त उÈाणपुbं  बनविण्याकरीता विदेशी कंपन्यांना कंत्राटे दिbी आहेत.  मोठे गार्डन्स, फनक्‌bब नविन पर्यटन स्थiे निर्माण करायची आहेत.  भारतीयांना हव्‌या असणाèया प्रत्येक विदेशी वस्तू इथेच कारखाने उभारून मिiतीb, हे महान कार्य होणारच आहे.  भारतीय हे जगात प्रथम क्रमांकाचे उपभोक्‌ता असणार आहेत.  प्रचंड विदेशी कारखाने, त्यातून संतत बाहेर पडणारा घनकचना, प्रदुषण देशभर झाbे तरी विकास मात्र व्‌हायbाच हवा.  हे सर्व 24 तास चाbण्याकरीता अणूऊर्जेद्वारे विज हवी, पाणी हवे.  bोकसंख्‌येच्‌या 25% bोकांना परवडणारा हा विकासाचा महान प्रकल्‌प आहे.  मानवी खेi आहे.
    सध्या अशा अनेक समस्या आहेत ज्‌यात अणूऊर्जेचा संबंध  नसतांना देशाचा विकास का अडbा? कुपोषित माता बाbके, सतत वाढणारी  bोकसंख्‌या, शिक्षणाचा खेi-खेi, शेतकèयांच्‌याच नव्‌हे तर व्‌यापारी, पोbीस, डॉक्‌टर, शिक्षक, युवा वर्ग अशा सर्वांच्‌या आत्महत्या, असø भाववाढ (त्याचवेiी गोदामात धान्य सडत असणे), आजारी आरोग्य यंत्रणा, कुठे पाण्याचे दुर्भिक्ष तर कुठे महापूराने उध्वस्त असहाæय जनता, शौचाbय तर सोडा पण रहायbा छोटं घर नसणारी करोडो कुटूंबे, कचरा व प्‌bास्टीकने वेढbेbे देशातीb बहुसंख्‌य bहान मोठी शहरे, अस्वच्‌छता त्यात विषाणू, जिवाणू, व्‌हायरस मुiे नवनवे आजार.  असाध्य रोग, बाbके व वृद्धांची हेiसांड, अगतिकता, आपbे अनेक समाजघटक जर त्रस्त असतीb तर विकास नेमका कुणाचा व्‌हावा अस वाटते? देशात आत्यंतिक विषमता आहे.  सक्षम दयाद्र्र नेतृत्वाने ही विषमता जरी दुर केbी तरी त्यात देशाचा खरा विकास होणार आहे.  विदेशी कंपन्यांच्‌या मॉल्‌समध्ये विके्रता म्हणून नोकèया मिiण्याव्‌यतिरिक्‌त भारतीयांचा काहीही फायदा नाही.  ग्रामीण भारत जेव्‌हा स्वावbंबी होईb तो खरा विकास.  यासाठी अणूऊर्जा नको आहे.  त्या ऐवजी जb ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊ र्जा, यांचा विचार व्‌हावा.  भारतीय शास्त्रज्ञांनी काही वेगiा पर्याय शोधावा.  सौर उर्जेचा उपयोग करून पाण्याच्‌या विघटनातून उत्पन्न होणाèया हायड­ोजनद्वारे उर्जा निर्मितीचा बèयाच प्रमाणात यशस्वी प्रयोग आ°स्ट­ेbिया सहित काही देशांत केbा जात आहे.   मात्र स्पष्‌ट पणे म्हणावेसे वाटते की, भारताने अणूऊर्जा कार्यक्रम स्थगित करावा.
                        ुुु

आपल्या देशाची नक्की लोकसंख्या ?


*आपल्या देशाची नक्की लोकसंख्या ?
    एक विचार नेहमीच मनात येतो की आपल्या खंडप्राय देशाची खरी लोकसंख्‌या किती? जन्मदर हे एक महत्वाचे कारण आहे हे मान्य, पण इतरही अनेक कारणे वाढत्या लोकसंख्येला  जास्त जबाबदार आहेत.  सिमेपलिकडच्या प्रत्येक देशातून आपल्या देशात नित्य अनेक कारणांनी असंख्य लोक प्रवेश करतात.  बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, जुलूम, गुन्हेगारी यामुळे  त्या देशात त्यांना राहणे अशक्य प्राय होतं, आणि सर्व युक्त्या वापरुन ही मंडली  आपल्या देशात दाखल  होतात.  कालांतराने त्यांची वेगळी  वसाहत तयार होते.  वास्तविक हा जगातल्या बऱ्याच देशांचा प्रश्न आहे.  मानवतेच्या दृष्टीने अशा वसाहतींना सर्व जीवनावश्यक सोईसवलती पुरवल्या जातात.  हळू   हळू  या वसाहती मोठ्या  होतात.  ही मंडळी  परत जायचं नाव घेत नाहीत.  छोटा मोठा रोजगार करीत इथेच टिकून राहतात.  मात्र 1947 च्‌या फाळणीमुळे  आलेल्यांसाठी  हा विषय नाही. 
    या आश्रीत म्हणून आलेल्या या लोकांमध्ये काही नेतृत्वगुण असलेली  मंडळी  येथील  प्रादेशीक  नेतृत्वाशी हातमिळवणी करून आपले  बस्तान बसवतात.  वर्षामागून वर्षे जातात.  पुर्वच्या वसाहती वाढत असतांना नविन लोंढे  प्रवेश करतातच.  ही समस्या कायम आहे.  परंतु या प्रश्नाने प्रशासनावर जास्तीचा बोझा वाढतो.  त्या त्या प्रांतातीb नागरीकांना सोई सुविधा पुरवणे शासनाला  कठीण असताना, या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करावा लागतो.  या सर्व निर्वासितांना भारतीय नागरीकत्व दिले  जाते काय? ही मंडळी  इथल्या निवडणुकामध्ये मतदान/ बोगस मतदान करतात का? या निर्वासितांच्या पूर्वच्या मूळ  देशातील  नागरिकत्वाचे काय होत?की या लोकांकडे दुहेरी नागरीकत्व आहे? ल पत छपत येत असलेले  हे लोक  जीवाच्या सुरक्षेसाठी भ्रष्ट मार्ग तर निवडत नसतील ?
       समस्यांचं मूळ  वाढती लोकसंख्या हेच आहे, ही गोष्ट  सर्व स्तरावर मान्य केली  जाते, मग भारताची सर्व व्यवस्था कोलमडून जाईल  अशा निर्वासितांच्या प्रश्नावर आम्ही खंबीर का नाही? शीरगणना करताना देशात विखुरलेले  आदिवासी खरोखर मोजले  जातात का? दुर्गम प्रदेशातील  मूळ  आदिवासी, ग्रामीण, देशभरातील  भिकारी, रुग्णालयातील  सर्व रुग्ण, वृद्ध, अपंग, मतीमंद, अतीदाट वस्तीच्या झोपडपट्या मध्ये राहणारे सर्व भारताचे अधिकृत नागरीक असून त्यांची मोजदाद होते काय? शहरातील  कित्येक वार्डाच्या लोकाची नावे मतदार यादीत नसतात, या कारणाने त्यांना मतदानापासून वंचीत रहावे लागते, हे सत्य असताना वरील  विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे असावीत, हे सुज्ञास सांगण्याची गरज नसावी.  तेव्हा 100% मतदान म्हणजे नेमके काय? नेमके या देशाचे मतदार कोण? प्रत्येक नागरिकास स्वतंत्र ओळखपत्र असावे काय? बहुमत, जनादेश, हे शब्द फसवे नाहीत का? सत्ताप्राप्तीसाठी गदारोळ , एकमेकांवर आरोप, लांगुल  चालन, लालुच, शेवटी मतदानाचा मुहर्त आटोपून पुन्हा शेतकरी, मजूर, कामगार ग्रामीण व आदिवासी पुढील  पाच वर्षाकरीता जैसे थे. प्रकर्षाने असे वाटते की कोणत्याही पक्षापेक्षा देश महत्वाचा आहे.
सुहास  सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -]
                        ुुु

आरोग्ययंत्रणा सक्षम कशी व कधी होणार?


    *   आरोग्ययंत्रणा सक्षम कशी व कधी होणार?   *

    शासनाची आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम होत आहे असे चित्र सध्यातरी दिसत आहे.  जिल्हा तसेच ग्रामीण हॉस्पिटल्स मध्ये विविध स्तरांवर पदे रिक्त आहेत, आणि ती वर्षानुवर्षे रिक्त असतात.  वेगवेगळ्या  विभागात तज्ञ डॉक्टर सेवेत नसतात.  ती पदे का भरली  जात नाहीत? नेहमी औषधांचा तुटवडा का असतो? अद्ययावत यंत्रे, उपकरणे खरेदी केली  जातात पण बऱ्याचवेळा  ती नादुरुस्त आहेत असे सांगितले  जाते.  जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्याची ज्या आरोग्य खात्याची जबाबदारी आहे ते आरोग्य खातच जर आजारी असेल  तर ग्रामीण जनतेला  आजारपणात कोण सावरणार?
    निसर्ग फारच लहरी झाला  असून वर्षभर विविध साथीचे आजार होत असतात आणि जागोजागीची अस्वच्छता, घाण हे आजार फैलावण्यास मदत करतात.  अस्वच्छता आणि आजारपण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.  कितीही कृती आराखडे तयार केले  असले  तरी स्वच्छता आणि आरोग्यसेवा या दोन्ही बाबतीत ग्रामीण तर नाहीच पण शहर विभागसुद्धा समाधानकारक नाही.  इतकी बेरोजगारी असताना ज्यादा कर्मचारी का नियुक्त होत नाहीत, आरोग्य सेवक, तज्ञ डॉक्टर्स यांची पदे रिक्त का ? दर महिन्याला  पगार सुद्धा दिला  जात नाही अशी तज्ञांची तक्रार का असावी? आरोग्यासारख्या अती महत्वाच्या बाबतीत असे का घडते आहे? जनतेचा रोष वाढतो आहे याची जाणीव आहे का?
    सरकारी आरोग्य यंत्रणेचं निराशाजनक चित्र असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय (कि सेवा?) अतीशय तेजीत आहे.  गरीब जनतेला  सुद्धा खाजगी डॉक्टरांकडे जाणे भाग पडते.  असे का व्हावे?  अनेकानेक प्रकारचे सरकारी कर भरणाऱ्या  सामान्य जनतेला  उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे.  यासाठी प्रशासनाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे.  शासन वर्षानुवर्षे वैद्यकीय शिक्षणासाठी कितीतरी खर्च करते.  विविध शैक्षणिक योजना, सवलती, आर्थिक मागासलेल्या वर्गाला  सोई सवलती, हा आर्थिक बोजा शासन सहन करून दरवर्ष कितीतरी डॉक्टर्स पदवी घेतात.  अशा वैद्यकिय पदवीधरांनी कमीत कमी 7 वर्षे सरकारी रुग्णालयात शहर तसेच ग्रामीण विभागात नोकरी केलीच पाहिजे, हे बंधन असण्याची गरज आहे.  उत्तम आरोग्य आणि मार्गदर्शन जर जनतेला  मिळाले  तर लोकं स्वस्थ व सुखी होतील , या भावनेने अंतर्मुख होऊन आपले  उत्तरदायित्व पार पाडावे. यातच सर्वांचे कल्याण आहे.
                        ुुु    सुहास सोहोनी
                                   ९४०५३४९३५४
                                   क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह- २०१२]
                                www.suhassohoni.blogspot.com
                                 www.mazyasamvedana.com

आर्थिक अरिष्ट आणि भारतीय जीवनमुल्ये


        *    आर्थिक अरिष्ट  आणि भारतीय जीवनमुल्ये     *

    भारतीय जीवनपद्धतीत नित्य काही तत्वे शिकवली  जातात.  अंथरुण पाहून पाय पसरावे, कर्ज शक्यतो कधी घेऊ नये, सट्टा, जुगार, व्यसने यापासून नित्य दूर असावे.  आरोग्य सांभाळावे, मन:शांती असू द्यावी.  ह्या  विचारसरणीचं पालन करणारे असंख्य परिवार त्यांच्या दृष्टीने सुखी, समाधानी आहेत.  मात्र अट्टाहासाने याविरूद्ध जीवनशैली  जगणारे, मग ते कोणत्याही देशातले  असोत, समाधानी आहेत ?  कितीही कालखंड बदलले  तरी चांगली  तत्वे ही सुसंस्कार असतात, ती नेहमीच दीपस्तंभासारखीच असणार आहेत.  हेच सत्य आहे.  भारतीयांवर अमेरिकेचा [ विदेशाचा ] पगडा आहे हे खरे आहे. क्रेडीट कार्डद्वारे कर्ज घ्या , हवं ते खरेदी करा, आजच सगळी  सुखं मिळवा, कर्ज घ्या  आणि सेकंड होम घ्या , वाहन घ्या , विमानप्रवास करा. आणखीन सुखाच्या काय काय कल्‌पना सुचतील  त्या पुर्ण करा.  असे हे अमेरीकी विचाराचं आक्रमण भारतीयांवर सतत होतं आहे.  अनुत्पादित वस्तूंसाठी  आमच्या श्रमाच्या मिळकतीतील  मोठा वाटा आम्ही खर्च करत चाललो  आहे.
    सट्टा, जुगार, लॉटरी व शेअरबाजार ही सगळी  भावंडच आहेत.  परंतु शेअरबाजाराचा तंत्रशुद्ध अभ्यास करून व्यवसाय रुपाने स्विकार करण्याचे प्रोत्साहन दिले  जाते.  अनेक पटीत फायदा होण्याची स्प्‌ने दिसत असल्याने असेल  नसेल  ती पूंजी शेअर खरेदीत ओतली  जाते.  राज्यकर्त्याच्या नितीप्रमाणे सगळा  काळा , गोरा अगदी स्वीस बँकेतील  पैसा सुद्धा शेअर बाजारात पोहोचला .  आमचया अनेक वित्तिय कंपन्यांनी लेहमन सारख्या विविध कंपन्यात गुंतवणुक केली .  पण हर्षद मेहता भारताबाहेरही आहेत हे सिद्ध झाल्यामुळे  पुन्हा आता, कोट्याधिशांचे लखपती झाले .  शेअर बाजाराच्या उलाढालीच्या या खेळात दया माया नसते.  इथे कितीतरी रावांचे रंक झालेत.  रक्तदाब व हृदयरोग हे जोडीने सोबती असतात.  टेंशन, चिडचिड असते.  पाण्याबाहेर काढलेल्या मासळी सारखी तडफड होते.  पण व्यसन आणि आशावाद माणसाला  स्वस्थ बसू देत नाही, आणि नावाजलेल्या चांगल्या कंपन्यांचे कमी भाव झाल्‌यामुळे , असे शेअर तो पुन्हा विकत घेतो.
    आपला  श्रमाने मिळवलेला  पैसा कसा सांभाळावा हे शिकवणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र.  **  दर्जेदार उत्पादनांवर आमच्या देशाचं अर्थशास्त्र अवलंबून असण्याऐवजी परदेशातल्‌या शेअर निर्देशांकावर दुर्दैवाने आधारीत आहे.  **  हे वेळो वेळी  सिद्ध होत आहे.  पूर्वीच्या काळी  परदेश व्यापार हा आमच्या बहुआयामी अर्थ शास्त्रातील  एक भाग होता, परंतु आज अवाढव्य कर्जाची उभारणी, अनुत्पादीत खर्चावर भर आणि परदेशात विविध प्रकारे योगदान, गुंतवणुक यांचा अर्थशास्त्रावर भार आहे, अर्थनितीवर भर आहे. भविष्यात कधीही   गडगडणाऱ्या  सेंसेक्सचा फारसा प्रभाव भारतावर पडणार नाही असे म्हणणे ही दिशाभूल  आहे.  खिऴ खिळया  झालेल्या नियंत्रण सुटलेल्या वाहनाचा अपघात झाला , आणि त्या वाहनात आम्ही असूनही आम्हाला  मात्र दुखापत होणार नाही हे कसे ? उंच टेकडीवरून सुटलेला , गडगडणारा दगड मध्ये भक्कम आधार असला  तरच स्थिरावतो. अन्यथा !!
                        ुुु   सुहास सोहोनी
                                  ९४०५३४९३५४
                                  क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                  www.mazyasamvedana.com
                                  www.suhassohoni.blogspot.com
                                  

अन्न मदत नको, उद्योग उभारा-रोजगार द्या


*  अन्न मदत नको, उद्योग उभारा-रोजगार द्या   *

    टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठीच माणूस दिवसरात्र राबराब राबतो.  आपले  मूळ गाव सोडून आप्तेष्टा पासून दूर कुठेही नोकरी किंवा व्यवसायासाठी जातो.  स्थलांतर करतो, जुळवून घेतो, स्पर्धा करतो व यशाची एक एक पायरी चढत जातो,  म्हणजे प्रत्येकाला  आपले  अन्न कष्ट  करूनच मिळवावे लागते.  अन्नासाठी दाहीदिशा आम्हा फिरविसी जगदिशा हेच खरे आहे. पण जर केवळ  गरीबीच्या नावाखाली  वर्षानुवर्षे मोफत धान्य मिळत गेलं  तर तो संपूर्ण समाजघटक अन्न मिळविण्यासाठी कुठलेही कष्ट का करेल ? फुकट किंवा दोन रूपये दराने धान्य मिळत असेल  तर ही जनता ऐतखाऊ होणारच.  कुशल  कामगार फारसे काम करणार नाही.  मजूर मजूरी करणार नाही.  पैसे, कपडे, औषधे, छोट्या  मोठ्या  गरजेच्या वस्तू, चैनीच्या गोष्टी  सुद्धा फुकटात कशा मिळतील  या शोधातच प्रत्येकजण राहील , म्हणजेच निष्क्रीय बनेल .  रिकामं डोक   हे नेहमीच सैतानाचं घर असतं त्यातच व्यसनांची पुर्तता करण्यासाठी चोख व्यवस्था प्रत्येक गावात शासनमान्यच आहे.
    भूकंप, महापूर किंवा विविध आपत्तीकाळात अन्नधान्याची मदत अत्यावश्यक आहेच पण इतरवेळी  हा अयोग्य खेळ  आहे.  असा खेळ  मांडून देशाचा विकास साधला  जाईल ? त्यापेक्षा गावागावांत विविध कुटीर उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन द्या.  प्रत्येक हाताला  काम कसे मिळेल   याची काळजी घेऊन कामाचे योग्य दाम द्या आणि प्रत्येकाचे अन्न त्यालाच खरेदी करू द्या.  गोदामात धान्य सडत ठेवण्यापेक्षा संपूर्ण देशातच महागाई कमी व्हावयास हवी.  प्रत्येकालाच अन्नधान्य सकस व स्वस्त मिळू  द्या.  अनियंत्रीत लोकसंख्या हेच प्रत्येक समस्येच मूळ  आहे.  गरीब व आदिवासीबहूल  भागात परिवार नियोजन कार्यक्रमाचा बट्ट्या बोळ  झाला  आहे, त्यातच कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे, म्हणजेच भविष्यातील  देशाचे आधारस्तंभ मजबूत आहेत?
    गावागावात स्थानिक उपलब्धतेप्रमाणे असणाऱ्या  कच्च्या मालावर आधारीत छोटे उद्योग उभे करण्याची गरज आहे, त्यासाठी बचतगटांचे कार्य मोलाचे ठरणार आहे.  जिल्हास्तरावर पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारखे प्रकल्प हवेत त्याद्वारे कमीतकमी पथदिवे तरी लागतील  आणि ऊर्जा बचत साधेल .  इतस्तत: उडत असलेल्या प्लास्टिकच्या थैल्या पर्यावरणासाठी संकट आहेत.  त्यासाठी रिसायकलिंग प्लांट  जिल्हास्तरावर व्हावेत.  ज्या प्रदेशात कापूस पिकतो तेथे हातमाग का नसावेत? उत्पन्नाप्रमाणे त्या त्या प्रदेशात गृहउद्योगाला  प्रोत्साहन दिले  गेले  पाहिजे.  मोठ्या  प्रकल्पांना धरून अनेक लहान उद्योग यशस्वीरित्या चालत असतात, मात्र शासनाने आणि खासगी उद्योगपतींनी सकारात्मक पाऊल  टाकणे महत्वाचे आहे.
 फुकटात वाटप करून जनतेला  निश्क्रिय, आळशी बनवण्याऐवजी छोट्या मोठ्या  उद्योगांची उभारणी करून प्रत्येकाला  रोजगार उपलब्ध करून दिला  तर जनता सन्मानाच जीणं जगेल , उद्योग व उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील , पर्यायाने देश प्रगती करेल .  म्हणजेच विकास साधेल , म्हणून फुकट अन्न मदत नसावी, त्याऐवजी उद्योगांची उभारणी करा, म्हणजेच रोजगार द्या.
                        ुुु  सुहास सोहोनी
                               ९४०५३४९३५४
                            क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                            www.mazyasamvedana.com

बुद्धीची निर्यात थांबवा


       * बुद्धीची निर्यात थांबवा *

    आजकाल  इयत्ता चौथीत मुलाला /मुलीला  98 ते 100 टक्के मार्कस्‌ मिळाले  (आजकाल  सगळ्या  शाळा  ही काळजी घेतात.) कि आईबाबांचा आनंद फेसाळत्या कारंज्यासारखा गिरक्या घेत असतो.  कुणीतरी काका किंवा मामा भविष्य वर्तवितो की आमचा बाळ्या  मोठेपणी अमेरिकेत  जाणारच.  मग हेच स्वप्न आणि ध्येय घेऊन मुले  मोठी होतात की, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन तेथेच नोकरी करायची.  परदेशात पैसा कमवायचा आणि भारतात प्रतिष्ठा  मिळवायची.  परदेशी शिकणारी किंवा नोकरी करणारी मुले  असणाऱ्या  परिवारांसाठी हा एक स्टेट्‌स सिंबॉल  झालेला  आहे.  ब्रिटीशांच्या शासन काळात अनेक भारतीय विख्यात व्यक्तिनी परदेशी शिक्षण घेतले .  तेव्‌हा पासून आजतागायत ही क्रेझ वाढलेली  आहे.  मुळात भारतीयांचा मेंदू दर्जेदार आहेच त्याचे कारणही भारतीय संस्कार आणि शांततेने विविध ज्ञान आकलन करण्याची लालसा आणि क्षमता हे आहे.  याच गुणांच्या बळावर भारतीय बुद्धीमत्ता जगात प्रभावी आहे.
    विदेशातील  स्थानीक कामगारांपेक्षा भारतीय कामगार स्वस्तात उपलब्ध होतात पण तीच रक्कम आपल्याकडे भरपूर वाटते.  त्याचप्रमाणे विदेशात भारतीय व्यक्‌तीला  सहसा दुय्यम दर्जाचेच काम दिले  जाते, आणि त्यांचा अधिकारी हा स्थानिक असतो हे सुद्धा सत्य आहे.  पाश्चिमात्य देशांमध्ये आशियाई तरुणांकडे बघण्याची दृष्टी  ही नक्कीच पुर्वग्रह दुषीत आहे.  ही गोष्ट  वेळो वेळी  सिद्ध झालेली  आहे.  अनेक दुर्दैवी घटनांमध्ये अनेकवेळा  आशियाई तरुणांचा सहभाग होता हे सुद्धा खरं आहे.  अशा अनेक बाबींचा परिणाम दिसून येतो.  भारतीय विद्यार्थ्यावर, कामगारांवर होत असलेले  जीव घेणे हल्ले  हा एक काळजी करण्याचा विषय नक्कीच आहे.  जागतिकीकरणाच्या कितीही गप्पा होत असल्या तरी शिक्षणासाठी तसेच व्यवसाय वा नोकरी साठी येऊन वसणारे परदेशीय कुणाही स्थानीकांना कधीही आवडत नसतात आणि त्यातूनच विविध नको असलेल्या घटना घडतात.
    उच्चशिक्षित भारतीय तरुण भारतात उद्योग सुरू करून चांगले  दर्जेदार उत्पादन का निर्माण करीत नाहीत, हा एक वेगळा  अभ्यासाचा विषय होऊ शकतो.  दैनंदीन जीवनात दररोज उपयोगी असलेल्या असंख्य वस्तू आपल्याच देशात तयार होत नाहीत, तोपर्यंत उद्योजकता वाढीस लागणार नाही.  विदेशी कारखानदार इथे कारखाने थाटतात तर भारतीय उद्योजकांची पिछेहाट का होते आहे? भारतीय उत्पादनांचा दर्जा, जाहिरात, विपणन व्यवस्था यात कमतरता का भासते? प्रत्येक वस्तूसाठी ग्राहक विदेशी वस्तू का स्विकारतो? भारतीय वस्तूंचा तुलनात्मक दर्जा कमी प्रतीचा असून किंमत मात्र जास्त आहे.  शासनाकडून सोयी सवलतीत दिरंगाई होत असेल , तर का? जमीन, पाणी, मजूर मुबलक असून आमचा तरुण वर्ग विदेशात नोकरीसाठी आकृष्ट  का होतो आहे? याचा शासनाने गांभिर्याने विचार करावा.  प्रखर बुद्धिमत्ता असलेले  तरुण आपल्या देशाच्या कामाचे नाहीत.  त्यांच्या बुद्धीचा उपयोग विदेशी उद्योजक करून घेतात ही खंत आहे.  या परिस्थितीत लवकर बदल  होणे आवश्यक आहे.  भारतीय दर्जेदार मालाची निर्यात व्हावयास हवी असेल  तर आधी भारतीय बुद्धीची निर्यात थांबवा.
सुहास सोहोनी   ९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
www.facebook.com/mazyasamvedana

                        ुुु

घुसमट, नैराश्य आणि आत्महत्या


 *     घुसमट, नैराश्य आणि आत्महत्या    *

    साधी टाचणी टोचली  तरी विव्हळणारी माणसे परिस्थिती आणि विचारांच्या भोवऱ्यात सापडून झटक्यात स्वत:ला  नष्ट  करतात.  निराशेच्या गर्तेत डुंबलेलं  दुर्बळ  मन आत्महत्या करण्याच्या काही काळ  आधी विचारांच्या झंझावातात सापडून कसे कुरतडले  जात असेल  ! डिप्रेशन या विकारातील  अती औदासिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आत्महत्येच्या घटना घडतात मग ती व्यक्ती शेतकरी असो की प्रेमवीर.  विद्यार्थी , नोकरीतील  कुणीही पदाधिकारी, पोलिस किंवा सैन्यातील  अधिकारी सुद्धा आपले  मौल्यवान जीवन संपवू शकतात.  प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याचे टाळुन आत्महत्येची पळवाट कां स्विकारावीशी वाटते? मनावरचा ताण गुरुजन मित्र, आप्तेष्ट  या कुणाच्या लक्षांत कां येत नाही? आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणारी व्यक्ती काही सुचक इशारे देत असते.  कुणीतरी सावध रहायला  हवे.  सुंदर भविष्यासाठी कुणीतरी उर्जा, उमेद द्यायला  हवी. अपयश, फसवणूक, गुन्ह्याची तीव्र टोचणी, विषाद, वैफल्य, चीड, क्रोध, सुड, छळ , बेरोजगारी, गरीबी, अत्यंतीक व्यसनाधिनता, जुनाट व्याधी, वेदना, कायम गडगडणारा शेअर बाजार अशा अनेक संकटांशी मुकाबला  करण्याची मनाची ताकद हरवली  असते, तोच माणूस आत्महत्येचा मार्ग शोधतो.
    स्वत:च्या परिवाराला  वाऱ्यावर सोडून मृत्यूला  जवळ  करणारे असतात, पण आपल्या लाडक्या परिवाराची हत्या करून स्वत:चं जीवन संपवणाऱ्या  अगतीकतेला  काय म्हणावं! ही मानसिकता आमच्या समाजमनाला  ओळखता येत नाही, हे समाजाचं अपयश म्हणावं लागेल .  दुर्बळ  मन नेहमीच निराशावादी असून आव्हाने किंवा समस्येशी झुंझण्याची इच्छा संपलेली  असते.  प्रत्येक प्रश्न त्या व्यक्तीला  नामोहरम करत असतो.  पलायनवादाचा मार्ग स्विकारण्यामुळे , केवळ  आत्महत्येचा विचार बळावून घोर निराशेच्या अंतीम क्षणात, मनाच्या एका चमत्कारीक अवस्थेत आत्महत्या घडून जाते.  कर्जबाजारी असलेलं  कुटुंब, कामाचा ताण असह्य  झालेले  पोलिस, अपयश पचवता न आलेले  मुले  मुली , निवासी डॉक्‌टर, शेअर ब्रोकर, व्यावसायीक या समाज घटकांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला .  का ? काय साधले  त्यामुळे ? सामाजीक समस्या समुळ  नाहीशी झाली  का?
    आपण जे पेरतो तेच उगवतं.  भ्रष्टाचारांचं बीज सहज पेरलं  जात आहे. देशी विदेशी दारुला   (म्हणजे वाईन नाही, असं म्हणतात) सध्या राजाश्रय आहे.  मटका, लॉटरी सेंटर, शेअर बाजार हे सगळ  अधिकृत सरकारी आहे, अवैध मार्गाने उपलब्ध असलेले  अंमली  पदार्थ, पराकोटीची विषमता, चंगळवादी भोगवादी जीवन शैली , या आणि अशा वृक्षवल्लींना  फळे  ती कोणती लागणार !  हे असेच जर चालू  राहिले  तर पुढील  पाच वर्षात आत्महत्यांच्या घटनांमध्ये शेकडो पटीने वाढ होईल  अशी साधार भिती वाटते.  नैराश्याच्या दिशेने वाटचाल  करणाऱ्या साठी समुपदेशनाची व्यवस्था हवी, ती एक गरज असते. परंतु कुणावर अशी वेळच येवू नये यासाठी समाधानी वृत्ती, सत्वगुण व सत्‌विचारांची वैचारीक बैठक, ईश्वरीय तत्वांवर पूर्ण श्रद्धा, मेडिटेशन या सर्वांद्वारे जीवनशैलीत अमुलाग्र बदल  घडवून आणायला  हवा.  अडचणीच्या वेळी  आपण एकटे नाही ही सार्थ भावना आणि खात्री हवी.  नैराश्य आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखून त्यांना काळजीपुर्वक मदत व दिलासा देण्याची  व्यवस्था समाजसेवी संस्था वा व्यक्तींनी सांभाळावी.  प्रगतीच्या आणि विकासाच्या झगमगाटात उजळुन निघत असलेल्या समाजमनाच्या तळाशी डोकावून पाहिलं  तर नैराश्य लपेटून काही आपले  सगेसोयरे घुसमटताहेत, आक्रंदत आहेत.  त्यांना मदत करायची ना?
                        ुुु  सुहास सोहोनी
                                 क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
                                  www.mazyasamvedana.com
                              







अपघात, वेगनियंत्रण आणि संयम


अपघात, वेगनियंत्रण आणि संयम

    शहर कोणतेही असो, दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या आणि वेग यात प्रचंड वाढ होत आहे.  त्याचबरोबर रस्त्यांवरील   अपघाताच्या संख्येतही प्रचंड वाढ दिसते आहे.  वाहनांची गुणवत्ता निश्चितच सुधारत आहे.  पूर्वी पेक्षा  रस्ते मोठे होत असून दर्जा तात्पुरता सुधारतो आहे.  दुभाजकांमुळे  वाहन चालवणे सोपे आहे, मग अपघातांची संख्या का कमी होत नाही? खरा प्रश्न हा आहे की वाहनांच्या संख्येइतकी कुशल  वाहन चालकांची संख्या आहे काय? वाहतुकीच्या नियमांचे पालन न झाल्यास अपघाताची शक्यता वाढते.  15 ते 18 वर्ष वयाची किती मुले  मोटरसायकल  वेगात चालवतात? प्रत्येक वाहन नियमीत पणे सुस्थितीत ठेवले  जाते का? दुचाकीवर तीन, चार व्यक्ती कां प्रवास करतात? चालका जवळ  योग्य लाईसेन्स नसणे, गावात आणि गावाबाहेर भयानक वेगात वाहन चालवणे, रात्री अपरात्री भन्नाट वेगात प्रवास करणे, त्याही पेक्षा अंमली  पदार्थ/दारूच्या नशेत वाहन चालवणे या सर्वच गोष्टींचा  अचानक घडणाऱ्या  अपघाताशी अगदी जवळ चा संबंध आहे.
    कोणतेही वाहन, चालकाच्या मर्जनुसार हळू  किंवा वेगात धावते, वेगाचे नियंत्रण संपूर्णत: चालकाच्या हाती असते, पण वाहन चालवतांना मन जागृत,सावध आणि संयमी असेल  तरच वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहून अपघात टाळता येतील .  अपघाताबाबत दैवयोग हा मुद्दा असेल , त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही परंतु मानवी चुकांमुळे  होणाऱ्या  अपघातांबाबत नक्कीच विश्लेषण  व्हावयास हवे.   शहरातील  व हायवेवरील  खड्डे  , अयोग्य उंचीचे स्पिडब्रेकर्स हा प्रशासनाचा हलगर्जीपणाच आहे.  रस्त्यातील  खोल  खड्यात  गाडीला  उसळून कितीतरी लोकांना जीव गमवावा लागला  आहे.  अनेक लोक कायमचे जायबंदी झाले  तर अनेकांना स्पॉन्डीलिसीस सारखे दुर्धर आजार जडले  आहेत.  वाहन चालवतांना घडणाऱ्या  अनंत चुका टाळता येतात.  होणाऱ्या  नुकसानीची तिव्रता कमी करता येईल , कारण अपघातानंतर केवळ  हळहळणे  एवढेच आपल्या हाती उरते.  प्रत्येक व्यक्ती परिवारासाठी मौल्यवान असते. वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेच, त्याबरोबर सावधचित्त असणे, वेगाने वाहन न चालवणे जास्त महत्वाचे आहे. दोन चाकी, तीन चाकी किंवा चार चाकी प्रत्येक वाहनचालकांसाठी ठराविक काळा नंतर नियमीत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था हवी. प्रत्येक वाहनचालक हा प्रशिक्षित, कुशल  व्हावा तरच संयमाने वेग-नियंत्रण साधुन अपघातात आपला  माणूस गमावण्याची वेळ  येणार नाही. कृपया वाहन चालवतांना मोबाईल वर बोलू  नका व कर्कश हॉर्न वाजवू नका.
                        ुुु  सुहास सोहोनी
                                   ९४०५३४९३५४
                             क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]
                             www.mazyasamvedana.com

* कायदा असावा इच्‌छामरणाचा ! *


    *    कायदा असावा इच्‌छामरणाचा !    *

    इच्छामरणाचा कायदा असावा की नसावा याबाबत वर्षानुवर्षे चर्चा सुरू आहे.  वास्तविक जीवन व मृत्यू दोन्ही विषय सर्वस्वी निसर्गाच्या नियमाने सांभाळले  जातात.  सुखदु:खाच्या सर्व पातळी वरून प्रवास करावाच लागतो, पण--- एखाद्याच्या नशीबी पराकोटीचे दु:ख, यातना, पराधीनता, असहाह्यता आणि मुख्यत्वे हतबलता निर्माण होते की संपूर्ण समाजघटकांना त्या व्यक्तीविषयी हळ हळ , चिंता, करूणा उत्पन्न होते.  अत्याधुनिक वैद्यक शास्त्राच्या मर्यादा संपतात आणि वर्षामागुन वर्ष लोटतात, केवळ  प्राण आहे म्हणून त्याला  जीवंत आहे असे म्हणायचे, परंतु त्या संवेदना शुन्य जीवाच्या यातना, तडफड, असह्य  असा बेभानपणा असहाय्य पणे बघत बसण्याशिवाय काहीही करता येत नाही.
    केवळ  वृद्धत्वामुळे च अशी परिस्थिती असेल  असे नाहीच. विविध वयोगटातील  कितीतरी व्यक्ती आज अशा अवस्थेत केवळ  प्राण आहे म्हणून जीवंत आहेत, असे म्हणायचे.  अशा व्यक्तींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीसाठी इच्छामरणाचा (दयामरणाचा) प्रस्ताव मांडला  तर त्यात नवल  नाही.  प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा वर्षानुवर्षे विविध प्रकारे छळ  करून त्या जीवनाला  मुक्त करीत नाही, दयावान होऊन मरण देत नाही.  केवढी ही जीवनमृत्युची शोकांतीका ! अशावेळी  "समाजमन' विदिर्ण होते आणि दयामरणाची मागणी कायद्याच्या तज्ञांद्वारे केली  जाते.
    इच्‌छामरणाचा कायदा केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असा युक्‌तीवाद केला  जातो.  मुख्यत्वे इस्टेटीच्‌या लोभापाई कायद्याच्या परवानगीने रुग्णाचा काटा काढला  जाईल  असा धोका वाटतो, परंतु हे विधान प्रत्येकच कायद्याला  लागू आहे.  कायदे असताना त्यात पळवाटा  शोधून गुन्हे घडतात.  इतरत्र काही देशांमध्ये इच्छामरणाचा कायदा अस्तित्वात आहे.  तेथील  वास्तविक कसे आहे?  या कायद्याची तेथील  न्यायपालीका कशाप्रकारे अंमलबजावणी करते याचा सखोल  अभ्यास भारतीय तज्ञ करीत असतीलच.  त्याप्रमाणे काही निकष लावता येतील .
    सर्वप्रथम आत्महत्या हा गुन्हा समजण्यात येऊ नये अशी मानसीकता तयार होणे गरजेचे आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे इतर उपचार पद्धतीच्या तज्ञांचे मत इच्छामरणाच्या रुग्णासाठी विचारात घ्यावे हा आग्रह धरावा.  आणि विविध उपचार पद्धतीने सुद्धा रुग्ण बरा होणार नसल्यासच अशा रुग्णासाठी सर्व संमतीने कायदा असावा.  कायद्याचा कुणाकडूनही गैरवापर होणार नाही, अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. बऱ्याच वेळा  गरीबी  दारिद्र्य , शासकीय अत्याचार, मानसिक रोग, व्यसने, वृद्धत्व अशा कारणांनी इच्छामरणाची मागणी केली  जाते ती नक्कीच मान्य होणार नाही.  या कायद्यासाठी स्पष्ट  निकष आवश्यक आहे.  मात्र अत्यंतिक दयाळू  बुद्धीने लवकरच इच्छामरणाचा कायदा असावा, या विचारात सुद्धा तिव्र दु:खच आहे.
                        ुुु   सुहास सोहोनी
                                क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                                 www.mazyasamvedana.com

* वाटमारीला उत्तर - दक्षता पथके *


* वाटमारीला  उत्तर - दक्षता पथके *

    ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो , किंवा वर्षानुवर्षे राहात आहोत तेथे दिवसारात्री कधीही निर्धोकपणे आपल्याला  वावरता यावे अशी परिस्थिती असायला  हवी पण वास्तवात अशी परिस्थिती नसल्याचं सतत जाणवतं.  शुकशुकाट असलेल्या रस्त्यांच्या वळणांवर वाटमारीचे,महिलांवरील अत्याचाराचे  प्रकार कायम घडताहेत.  सुजाण नागरीकांच्या चांगल्या शहरासाठी अशा घटना म्हणजे एका वेगळ्या  धोक्याची सुरवात आहे.  अगदी निर्ढावल्याप्रमाणे हे प्रकार शहराबाहेर आणि मध्यवस्तीत सुद्धा घडत आहेत.  का वाढते आहे ही गुन्हेगारी प्रवृत्ती? बेरोजगारी हे केवळ  एकच कारण आहे काय ? वाटमारी हाच व्यवसाय होऊ पाहतोय, असे तर नाही?
    शहरांच्या वाढत्या समस्या आणि आकार या गोष्टी  पोलिस यंत्रणेला  कायम व्यस्त ठेवत असतात आणि एकांतात सापडलेला  वाटसरू हे वाटमारी करणाऱ्याचं सहज सावज ठरत. गुन्हेगार हे नेहमी मुठभर असतात पण निश्क्रीय नागरीक असल्यामुळेच त्यांचं फावतं.  वाटमारीला  बळी  ठरलेल्या बद्दल  हळ हळ  व्यक्त करायची, आपण काय करू शकतो? हे पोलिसांचे काम आहे.  त्यांनी बंदोबस्त चोख ठेवावा, अशा चर्चा करून आपापल्या कामाला  लागावे असे हे आजचे समाजमनाचे चित्र आहे.  या विचारसरणीत बदल  करण्याची भविष्यात गरज आहे.  पोलिस यंत्रणेवर ठपका ठेवण्यापेक्षा प्रत्येक वार्ड किंवा कॉलनी निहाय, युवकांचे, ज्येष्ठांचे दक्षता पथक उभारण्याची गरज आहे.  शहरभर दक्षता पथकांचे जाळे  उभारून आपसात समन्वय असावा.  धोक्याच्या जागांवर कायम नजर असावी.  तज्ञ पोलिस अधिकाऱ्याद्वारे या पथकांना नित्य मार्गदर्शन दिले  जावे.  चर्चासत्रे आयोजित केली  जावीत.  दक्षता पथकातील  सदस्यांना ओळखपत्र दिले  जावे.  संपुर्ण रात्र शहरावर, रस्त्यावर, नजर राहील  अशा प्रकारे सदस्यांना वेळा  ठरवून द्याव्यात.  विविध गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा दक्षता पथकांचा उपयोग होईलच, पण अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती च्या काळात या पथकाचा विशेष उपयोग होईल .  अपघातग्रस्तांना त्वरीत मदत मिळेल , रक्त उपलब्ध होईल . नागरीकांना सुरक्षितता मिळेल .
    सूर्य प्रकाशाला  जसे पिशाच्य घाबरतात तसे नागरीकांच्या एकीला  गुन्हेगार घाबतात.  आपल्या शहरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या  युवकांनो एकत्र या, दक्षता पथकात सामील  व्हा, धैर्य आणि संयम या दोन गुणांची तुमच्यात आवश्यकता आहे. स्वत: कायदा हातात घेऊ नका.  कायद्याला  मदत करा.  सुजाण नागरीकांच्या चांगल्या शहराला  सुरक्षा देण्यासाठी एकत्र  होण्याची गरज आहे.  सर्व भेदाभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.  शहरभर दक्षता पथकांचं जाऴ  सज्ज करा मग बघू कोण मंगळ सुत्र हिसकावण्याची हिंमत करतो आणि कोण कुणाला  रस्त्यात अडवून लुटतो? छेडखानी करतो ? लोकसंख्यावाढ व बेरोजगारी या कारणाने आज गुन्हेगारी वाढत असली  तरी गुन्हेगारीकडे वळलेल्यांच्या मनात धाक निर्माण करणे हे फारच गरजेचे आहे.
                        ुुु  सुहास सोहोनी
                                 ९४०५३४९३५४
                                क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
                              www.mazyasamvedana.com
29
एकटेपणात ऊर्जा हवी नाम:स्मरणाची

    माणूस हा मुiातच समुहाने राहणारा प्राणी आहे.  रक्‌ताच्‌या नात्यापासून दूर जरी गेbा तरी, विविध ठिकाणी नोकरी व्‌यवसायामुiे विविध प्रकारच्‌या, स्वभावाच्‌या माणसांसोबत समुहाने राहतो.  मात्र काbचक्राच्‌या बदbत्या स्थीतीत अशा काही घटना घडतात की माणूस हiू हiू एकटा होत जातो.  नोकरी व्‌यवसायातून निवृत्ती, आजारपण व मुख्‌यÎवे वृद्धावस्था या कारणांनी एकटेपण येऊ शकते.  निवृत्तीनंतर प्रवृत्तीनुसार विविध छंद, कार्य यामध्ये स्वत:bा गुंतवून घेतbे तर एकटेपणाची शक्‌यता नसते, bोकसंग्रह वाढून आपल्‌याbा आवडणाèया नविन विचार प्रवाहात आपण व्‌यस्त होतो.    या काiात एखादे कार्य किंवा छंदाद्वारे bाभणारे समाधान फार मोbाचे असून अर्थप्राप्‌तीbा दुæयम स्थान असावे कारण धनाbा कधीच मर्यादा नसते.
    आजारपण आणि वृद्धावस्थेतीb एकटेपणा यासारखे क्‌bेशकारक दुसरे काही नाही.  सुना, जावई, मुbे, नातवंडे दूर कुठेतरी असल्‌यमुiे कितीतरी वृद्ध जोडपी एकमेकांची साथ देत वेi काढतात.  भौतिक सुखाची सगiी साधनं उपbब्‌ध असतीbही पण ज्‌यांच्‌यासाठी मोठीमोठी स्वप्‌नं पाहिbी, ती स्वप्‌नं प्रत्यक्षात उतरत असताना खुप दूर राहÿन त्या आनंदित करणाèया बातम्याच फक्‌त ऐकाव्‌या bागतात, हेही एकटं राहÿन, हा दैवयोग नाही का?  काही प्राप्‌त करावयाचे असल्‌यास काही गोïींचा त्याग करावा bागतो.  मोठी झेप ¿यायची असेb तर पिल्‌bांनी घरटं सोडणं आवश्यक आहे.  आई वडिbांच्‌या प्रेमाच्‌या तbम धाग्यांनी विणbं गेbेbं भावनेचं तbम वस्त्र मजबूत असतं, सतत आशावादी असतं, त्या आधारावर आपbं एकटेपण ते सहन करीत असतात. 
    विविध कारणांनी एकटं रहावं bागणाèया व्‌यक्‌तींनी एकत्रित होणे ही आजच्‌या काiाची गरज आहे, समाजामध्ये वृद्ध मंडiीचा एक फार मोठा घटक आहे.  काही प्रमाणात फंड, पेन्शन, असल्‌याने थोडेफार धन गाठीशी असते त्यामुiे समाजकंटकापासून अशा एकटे राहणाèया वृद्धांना धोका पोहोचतो.  एकत्रीत जाण्यायेण्याने बरेच त्रासदायक प्रश्न सुटतात, आधार वाटतो.  एकटेपणाचे आयुष्‌य वाटçाbा येणे हे त्या त्या व्‌यक्‌तीचे प्राक्‌तन म्हणावे bागेb.  हा काi आनंददायक आणि सोपा नक्‌कीच नाही, तरीही आपण जरा हात पुढे केbा तर मैत्रीचा हात आपल्‌याbा सापडेb, दुसरा एक प्रभावी उपाय आहे, पण प्रत्येकाने हा उपाय प्रौढावस्थेते सुरू करणे योग्य ठरेb.  हा मार्ग म्हणजे जग्‌नायकाचे अखंड नामस्मरण. आराध्य देवतेचं नाम:स्मरण करताना जी ऊर्जा संचित होते त्याने सगiं भय आपोआप संपतं.  सुखद आनंद, आगiावेगiा विश्वास आणि एक अगम्य शक्‌ती आपल्‌याbा साथ देते आणि नामस्मरणाची पवित्र ऊर्जा आपणास bाभावी यासारखे भाग्य दुसरे नाहीच.
                        ुुु