Tuesday, August 21, 2012

चाळीशीतील मृत्यू

चाळीशीतील  मृत्यू 

            जीवनाची गाडी जन्मापासून असंख्य नागमोडी वळणे घेत घेत, अनेक चढउतार पार करीत शेवटी मृत्यूच्या थांब्यावर थांबते.  फक्त हे स्टेशन केव्हा येणार ही गोष्ट  ते आल्यावरच कळते आणि जेव्हा कळतं तेव्हा उशीर झालेला  असतो.  आयुष्यभर धडधडणारे हृदयाचे  इंजिन बंद पडते,  आणि काही केल्या पुन्हा सुरू होत नाही.  निसर्गातील  प्रत्येक वस्तु व जीवन नाशवंत आहे.  नव्याची उत्पत्ती व जुन्याचा नाश हे निसर्गतत्व आहे.  नाश केव्हा व्हावयाचा ते मात्र कुणाला  माहित नाही.  प्रत्येकाचं हे भविष्य काळाच्या लिफाफ्यात बंद केलेलं  आहे.  वेळ आली  की लिफाफा उघडतो.  मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे.  पण तरीही काही प्रसंग जीवाची कालवाकालव करतात व विचार करायला  लावतात.
    बाह्यता पूर्ण धडधाकट दिसणारा माणूस वय वर्ष फक्‌त बेचाळिस,  जो दैनंदिन जीवनात पूर्ण व्यग्र आहे, ज्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या  आहेत,  तो अचानक छातीत दुखायला  लागून काही उपचार मिळायच्या आत मृत्यूला  शरण जातो,  ही घटनाच मन सुन्न करणारी आहे.  निरनिराळे  आजार किंवा अपघाताने जीवन संपुष्टा त येते हे मान्य पण ऐन चाळीशीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येणारा मृत्यू ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत विचार करायला  लावणारी घटना आहे.  सर्व विकारांमध्ये जशी आधीपासून लक्षणे दिसतात तसेच हृदयविकारात ठराविक लक्षणे नक्कीच दिसतात.  पण बऱ्याच वेळा  धडधाकट दिसणारा माणूस त्या धोक्याच्या लक्षणांकडे सहज दुर्लक्ष   करतो, ज्याप्रमाणे आगगाडी स्टेशनवर येण्याआधी अनेक संदेश येतात,   बेल  वाजते.  आऊटर सिग्नल  दिला  जातो.  गाडी येत असल्याची सुचना दिली    जाते.  तसेच आपले  शरीर रोगांची लक्षणे दाखवून आपल्याला  संदेश देत असते.  हे संदेश आपण ओळखू शकत नाही किंवा आप्तस्वकीय चिंता करतील  म्हणून त्यांना सांगत नाही, किंवा सहजतेने त्याकडे दुर्लक्ष  करतो.
              वयाची चाळीशी हा आयुष्यातील  महत्वाचा टप्पा असतो.  त्यावेळी  नोकरी व्यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाऱ्या  पेलण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  लग्न  होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काळ  लोटलेला  असतो.  चिमुकल्यांचे लाड करण्यात व त्यांचे बोबडे बोल  ऐकण्यात वेळ  आनंदात जात असतो.  भविष्यातील  रम्य स्वप्ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय मग्न  असते.  पण हीच वेळ  स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचीही असते.  काळजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे, असा अर्थ आहे.
    बऱ्याच वेळा  ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्लॉक  'हे कारण सांगीतले   जाते.  अनावश्यक वाढलेलं  वजन कमी केल्याने आपण असे गंभीर विकार टाळू  शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढलेली  चरबी, कमी किंवा जास्त असलेला  रक्तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेळीच करावी लागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या  सर्वांच्या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुळात होऊच नये म्हणून काळजी घेणे केव्हाही  योग्यच आहे .

  **  वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
        सुहास  सोहोनी 9405349354
        www.suhassohoni.blogspot.com


वयाची चाiीशी हा आयुष्‌यातीb महत्वाचा टप्‌पा असतो.  त्यावेiी नोकरी व्‌यवसायात स्थिरता येत असते.  नवीन सामाजिक जबाबदाèया पेbण्यास अनुभवी मन सक्षम असतं.  b¾ होऊन बारा ते पंधरा वर्षाचा काi bोटbेbा असतो.  चिमुकल्‌यांचे bाड करण्यात व त्यांचे बोबडे बोb ऐकण्यात वेi आनंदात जात असतो.  भविष्‌यातीb रम्य स्वप्‌ने बघण्यात आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यात हे वय म¾ असते.  पण हीच वेi स्वत:च्‌या आरोग्याची काiजी घेण्याचीही असते.  काiजी करणे म्हणजे घाबरणे नसून स्वत:ची आरोग्यविषयक माहिती करून घेणे असा अर्थ आहे.
    बèयाच वेiा öदयविकाराच्‌या तीव्र झटक्‌याचे "ओव्‌हरवेट' किंवा "हार्ट ब्‌bॉक 'हे कारण सांगीतbे  जाते.  अनावश्यक वाढbेbं वजन कमी केल्‌याने आपण असे गंभीर विकार टाiू शकतो काय ?  हा विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करावा.  वाढbेbी चरबी, कमी किंवा जास्त असbेbा रक्‌तदाब योग्य प्रमाणात आणणे यासाठी वेiीच करावी bागणारी उपाययोजना स्वत:करीता तसेच आपल्‌यावर अवbंबून असणाèया सर्वांच्‌या करीता फार महत्वाची आहे.  एखादा रोग मुiात होऊच नये म्हणून काiजी घेणे केव्‌हा
    वर्तुळाचे टोक [मराठी लेखसंग्रह 2005]
    सुहास  सोहोनी 9405349354
    www.suhassohoni.blogspot.com

No comments: