सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________

---तर---गावा गावात व्यसनमुक्ती केंद्रे काढावी लागतील
देशभर दारूचे कारखाने प्रचंड प्रमाणात दारूचे उत्पादन
करताहेत .हा एक प्रमुख उद्योग आहे . प्रत्येक गाव आणि शहराच्या गल्ली बोळात
देशी विदेशी दारूची दुकाने सहज उपलब्ध असून कोणत्याही व्यवसायापेक्षा तेथे
जास्त गल्ला जमतो .देशाला महसूल प्राप्त होतो .सिगारेट ,गुटख्याचे भरपूर
कारखाने, लघु उद्योग सुद्धा आहेत .देशभर प्रत्येक पानटपरीवर ,दुकानांमध्ये
गुटखा ,सिगारेट सहज उपलब्ध आहेत . बिअरबार पहाटेपर्यंत उघडे राहावेत हे
शासनाचे धोरण आहे .विविध देशांतून विविध प्रकारे भारतातल्या शहरा शहरांत
विविध ड्रग्ज बिनदिक्कत पोहोचतात. विकेंड छोट्या मोठ्या पार्ट्या आयोजित
केल्या जातात त्यात ड्रग्ज उपलब्ध असतात .कधी एल.एस.डी.,गांजा ,कोकेन,नशा
येण्यासाठी विविध तंत्र ,शीरेवाते टोचून घेण्याची नशा आणणारी विविध मेडिसिन
,ड्रग्ज आणि असंच बरंच काही,या पार्श्वभूमीवर आज व्यसनांच साम्राज्य मजबूत
आहे ,हे आजचं वास्तव आहे
चैन आणि व्यसनांची दुनिया सुसज्ज असून आपण मोहजालात यावे यासाठी खुणावत आहे .अधोगतीच्या गर्तेत एक एक आहूती पडते आहे .एका व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण परिवार उध्वस्त होत आहे. तरुणी सुद्धा या दुष्टचक्रात अडकल्या आहेत हे वास्तव असतांना जगात ",अमली पदार्थ विरोधी दिन" साजरा करायचा आहे .सर्वसामान्यांच्या हिताला बाधक अशा कोणत्याही व्यवस्थेला शासनाचे प्रोत्साहन असणे, हि नीती मुळातच लांच्छनास्पद आहे .जन सामान्यांना सहजपणे व्यसनांच्या दलदलीत ढकलून द्यायचे ,सोन्यासारख्या आयुष्याची फरफट होऊ द्यायची ,घरच्या घरं बरबाद होऊ द्यायची आणि कोडगेपणाने,अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी ,शहाजोगपणे व्यसनमुक्तीचा उपदेश करायचा या नीतीचा ,वृत्तीचा धिक्कार आहे .देशाचे भावी आधारस्तंभ असणारे तरुण तरुणी व्यसनांनी पोखरले जात आहेत .तरुणी रेव्ह पार्टीच्या नावाखाली वाममार्गाला वळताहेत .दुर्बल मन असलेला प्रत्येक जण सहज व्यसनांच्या साम्राज्याच्या सीमारेषेजवळ पोहोचला आहे ,हे आजचे वास्तव आहे .दुर्दैवाने आपल्या देशाला हे सत्य मान्य आहे .
अन्यथा ,आमच्या जीवनाची ,आरोग्याची काळजी असलेल्या आपल्या शासनाने
सिगारेट ,दारू उत्पादनाचे सगळे कारखाने बंद केले असते.विषवृक्षाची मुळे
संपूर्ण पणे नष्ट केली असती.गैरप्रकाराचे समस्त अड्डे नष्ट केले असते
.पूज्य महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत कसा असायला हवा याचा अभ्यास
करायला आपल्या शासनाला वेळच नाही .समाजसेवेचा वसा घेतलेल्या संस्था आणि
संवेदनशील माणसांनो कंबर कसा .भविष्यात आपल्याला खूप काम करायचे आहे .गावा
गावात " व्यसनमुक्ती केंद्रे "काढावी लागतील ना?
चैन आणि व्यसनांची दुनिया सुसज्ज असून आपण मोहजालात यावे यासाठी खुणावत आहे .अधोगतीच्या गर्तेत एक एक आहूती पडते आहे .एका व्यसनी व्यक्तीमुळे संपूर्ण परिवार उध्वस्त होत आहे. तरुणी सुद्धा या दुष्टचक्रात अडकल्या आहेत हे वास्तव असतांना जगात ",अमली पदार्थ विरोधी दिन" साजरा करायचा आहे .सर्वसामान्यांच्या हिताला बाधक अशा कोणत्याही व्यवस्थेला शासनाचे प्रोत्साहन असणे, हि नीती मुळातच लांच्छनास्पद आहे .जन सामान्यांना सहजपणे व्यसनांच्या दलदलीत ढकलून द्यायचे ,सोन्यासारख्या आयुष्याची फरफट होऊ द्यायची ,घरच्या घरं बरबाद होऊ द्यायची आणि कोडगेपणाने,अमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी ,शहाजोगपणे व्यसनमुक्तीचा उपदेश करायचा या नीतीचा ,वृत्तीचा धिक्कार आहे .देशाचे भावी आधारस्तंभ असणारे तरुण तरुणी व्यसनांनी पोखरले जात आहेत .तरुणी रेव्ह पार्टीच्या नावाखाली वाममार्गाला वळताहेत .दुर्बल मन असलेला प्रत्येक जण सहज व्यसनांच्या साम्राज्याच्या सीमारेषेजवळ पोहोचला आहे ,हे आजचे वास्तव आहे .दुर्दैवाने आपल्या देशाला हे सत्य मान्य आहे .
सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.