* एक वादळ मॉलसंस्कृतीचं *
---------------------------------
इम्पोर्टेड या शब्दाला एक कायम झळाळी लाभली आहे. वस्तु, व्यवस्थापन किंवा विचार जर इंपोर्टेड मिळाले तर जास्त धन्यता वाटते. नजिकच्या भविष्यात विदेशी वस्तुंनी खचाखच भरलेले विदेशी कंपन्यांचे शोरुम्स, सुपरबाजार किंवा चेन रिटेल मॉल्स भारतातल्या छोट्या , मोठ्या शहरात अधिकृत पणे सुरु होत आहेत. परदेशी बनावटीच्या विविध वस्तु आपल्याला सहजपणे मिळाव्या म्हणून शासनाने मान्यतेबरोबरच त्यांचा प्रवेश निर्विघ्न करून दिला आहे. अफाट भांडवल असलेल्या अनेक विदेशी कंपन्यांची हजारो शोरुम्स आज जगभरात आहेतच पण प्रचंड जनसमुदाय असलेला भारत देश या कंपन्यांच्या नजरेत आहे. जगभरातल्या विविध उत्पादकांकडून डायरेक्ट खरेदी केलेली उत्पादने, स्वस्त किंमतीत घेऊन रिटेल मॉल्स द्वारा भारतातल्या प्रत्येक शहरात उपलब्ध होतील. मग काय! आपण फक्त पैसे मोजायचे, हवं ते विकत घ्यायच, मजा करायची, आराम करायचा. आता कुणी म्हणेल आमचा पैसा विदेशात जाईल. तिथल्या कंपन्यांची भरभराट होईल, तिथले कारखानदार गर्भश्रीमंत होतील, त्यांचे जोडधंदे खुप चालतील, त्यांचा माल खपेल, तेथील कामगारांना अविश्रांत काम करावे लागेल, विदेशात नविन कामगारांना काम मिळेल. काय हरकत आहे? "हे विश्वची माझे घर' असंच म्हणायचं.
आपल्या राज्यकर्त्यांचे एक स्वप्न आहे. भारताला बलाढ्य , महाशक्तीशाली बनवण्याचं, प्रत्येक शहरात उड्डाण पुलं हवेत. रंगीबेरंगी कारंजेवाली बाग हवी, विदेशी तंत्रज्ञानाने उभारलेल्या वास्तु हव्यात. सरकते जीने, रिटेल मॉल्स हवीत. आमचे व्यवसाय, व्यवस्थापन, बँक, सेवा या सर्व विषयात परदेशी गुंतवणूक वाढत जावी, ही शासनाची विचारधारा आहे. धनदांडग्या, बलाढ्य , श्रीमंत देशातील अतीबलाढ्य उद्योगपतींनी भारताच्या भूमीवर त्यांच्याच पैशांने सर्व सुख, सोई, सेवा उपलब्ध करून दयाव्यात. प्रत्येक शहर टुमदार, डौलदार, झगमग करून सोडावे. विदेशातून तयार माल येथे आणण्यापेक्षा विदेशी अद्यावत कारखानेच इथे उभारले जाणे सहज शक्य आहे. एवढे होत असताना भारताचा श्रीमंतीचा दर किती टप्प्याने वाढेल हा विचार केला तर भारत श्रीमंत आणि बलाढ्य राष्ट्र झालेच. नाही का? विदेशी वस्तु, सेवा, कंपन्या, व्यवस्थापन, बँक, कारखाने त्या अनुषंगाने त्या त्या देशांच्या वसाहती, शाळा , कॉलेज येणारच. या सर्वांच रक्षण करण्यासाठी त्यांचे रक्षक (बॉडीगार्ड) येणारच . बलाढ्य देशांच्या वसाहती, संस्कृती व रक्षकांमुळे अखील भारत हा रंगीबेरंगी आणि महाशक्तीशाली दिसेल. (असेल?)
आता कुणी म्हणेल की भारतातील व्यवसायाचं काय? उत्तर सोप्प आहे, त्यांनी जागतीक स्पर्धेत उतरावं, हडकुळ्या माणसाने सोकावलेल्या दांडग्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यासारखं आहे हे. जर कुणी गरीब शिल्लक राहिलेच तर त्यांना सकाळी चहा, साखर, किराणा विकावा. नाही तरी सगळ्या भारतीयांना वडापाव आवडतोच, तो धंदा करावा. काहीच जमले नाही तर दारूचा धंदा या देशात हमखास चालतोच. या धंद्यातल्या लोकांना आजकाल फारच मानमरातब मिळतो म्हणे! तसाही सामान्य भारतीयाला वेळच नसतो. एकदा कुण्या नेत्याला खुर्ची रूपी जागा पाच वर्षांकरिता दिली की दोघेही मोकळे . नेता देशाला श्रीमंत, बलाढ्य करण्याच्या चिंतेत गढून जातो. आधी स्वत: श्रीमंत होणं फारच गरजेच आहे. मग विदेशवारी क रणं आवश्यक असतं. सामान्य जन अमक्या महापुरुषाची जन्मतिथी कधी? या असल्या विषयांवर एकमेकांची डोकी फोडत बसतात. जातीभेद, अपमान, आरक्षण महिलांवर,अपंगांवर अत्याचार, शेतकऱ्याच्या आत्महत्या, त्यांना न मिळालेले "पेंकेज' यासाठी आंदोलने, जेलभरो उठाव, जाळ पोळ या कार्यात व्यस्त असतात. पृथ्वीच्या पाठीवर बहुतेक हा एकच देश असावा की जेथे जनता "आम्ही मागासलेले आहोत' असे म्हणण्यासाठी रांगा लावतात आणि सरकारी पेंकेज कडे नजर ठेवतात. भविष्यात या मॉलसंस्कृतीमुळे भारतातील कच्चा माल, व्यापार, कारखाने, वितरण व्यवस्था, कामगार, जोडधंदे, हस्तकला आणि असंख्य बेकार बेरोजगारांवर काय प्रसंग उद्भवेल हा विचार भयावह आहे. हे वादळ कसं सांभाळायचं
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
उजळते क्षितीज [मराठी लेख संग्रह ]२००७
www.suhassohoni.blogspot.com
www.facebook/mazyasamvedana.com