Thursday, June 23, 2011

विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
___________________________________
विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो
जगभरातील शात्रज्ञ, जोतीशी, विचारवंत, वैज्ञानिक आणि प्रत्येकच घटनेवर चर्चा करणारे तज्ञ मंडळी या सगळ्यांना नागीक्च्या भविष्यात पृथ्वीच्या नष्ट होण्याची जरा जास्तच काळजी वाटते आहे. अनेक पुरावे, दाखले, पूर्वी नष्ट झालेली माया संस्कृती, नोस्त्रदामची भविष्यवाणी, अधूनमधून जगभर घडणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, या सगळ्या घटनांचा दाखला हि मंडळी पुढे करतात. सगळे टीव्ही चानल्स प्रलय, भूकंप, ज्वालामुखी यावर आधारित सिनेमांच्या क्लिप्स दिवसभर दाखवत तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करतात. वृत्तपत्रातून हे काल्पनिक चित्रण रंगवले जाते, जनता भयभीत होते, रक्तदाब वाढतो, चिंता वाढते, आणि उद्याची शाश्वती नसल्याने आज जास्तीतजास्त भोगवादी बना, मजा करा, चंगळ करा, ही मानसिकता वाढीस लागते. विज्ञानाने जी प्रगती साधली ती एका झटक्यात नष्ट होईल कि काय हा एक भयगंड सध्या थैमान घालतो आहे. बुद्धीवादि घटकांना जडलेला झा मानसिक विकार आहे.
भ्रम्हांडाची रचना अद्भूद संरक्षित आहे. अनेक आकाशगंगा, त्यात अगणित तारे, त्यांचे ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, याशिवाय आपल्याला माहिती नसलेल्या अगणित गोष्टी हे सगळ संतुलित आहे. अंतर आणि वेगात बांधलेले आहे, नियंत्रित सुधा आहे. या सगळ्या पसाऱ्यात आपली छानशी पृथ्वी चुबकीय प्रभावाच्या अदृश्य धाग्यांनी संतुलित आहे. पृथ्वीच्या उगमापासून अनेक स्थित्यतरे घडून गेली आहेत. नैसर्गिक कारणांनी विविध ठिकाणी विविध वेळी भूपृष्ठावर नित्य बदल झालेले आहेत, होत आहेत आणि पुढेही होत राहणार आहेत. भूगर्भातील सूक्ष्म वेगाने सरकणारे महाकाय खडक (प्लेट्स) नित्य बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात. हे सर्व बदल घडत असतांना त्या त्या वेळेची जीव्संस्कृती फक्त नष्ट होते. त्या भूभागापुरताच हा विनाश असतो. कालांतराने पुन्हा उपलाभ्ध पर्यावरणाला साजेसे मान्य असणारे नवीन जीव उत्पन्न होतात. पुन्हा कधीतरी नष्ट होईपर्यंत ही जीव्संस्कृती फुलते, खुलते.
हे निसर्गाचे बदल मान्य असतांना आत्ताच जगबुडीची भीती का ? याचे कारण म्हणजे प्रचंड विध्वंसक क्षमता असलेले आजच्या युगातील मानवाने निर्माण केलेले ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब. स्वतः ला समर्थ नामाज्णारी अण्वस्त्रधारी राष्ट्रे जेंव्हा अणुयुधाची दुर्दैवी चूक करतील तेंव्हा मानव निर्मित आपत्ती आपले रौद्रस्वरूप दाखवेल. स्वतः सकट संपूर्ण जीवसृष्टीला नष्ट करण्याच सामर्थ्य या आपत्तीत आहे. मानवातील आपसातील इर्षा सत्तकांक्षा व आत्यंतिक द्वेष याची परिणीती एकमेकांवर कुरघोडी करून बेचिराख करून नष्ट करण्यातच होणार हे निश्चित. समजलेले आणि मान्य असलेले हे स्वतः च भविष्य कितीही भयभीत करीत असले तरी आता काय उपयोग ? आपणच निर्माण केलेला अण्वस्त्ररुपी भस्मासुर मान्य असला तरीही विनाशाच खापर ब्राम्हन्दातील ग्रहतार्यांच्या टक्कर होण्यावर फोडले जात आहे. ब्रम्हांड संतुलित व सुनियंत्रित आहे, अण्वस्त्रांच्या स्फोटांच्या प्रभावाने सुद्धा पृथ्वीची शकले होणार नसून भूपृष्ठावरील अयोग्य झालेल्या आवरणात असलेली मानवासहित जीवसृष्टी नाहीशी होऊ शकेल. त्यानंतर जे शिल्लक असेल त्या सहित आपली पृथ्वी मार्गक्रमण करणारच आहे. विशाल वृक्षाच्या फांदीवर बसून आपणच ती फांदी तोडतो आहोत. अजूनही वेळ गेली नाही. सर्वच राष्ट्रांनी अण्वस्त्रे नष्ट करणे आवश्यक आहे. शास्त्र प्रयोगाने शास्त्र वादाचा अंत होऊ शकत नाही. विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो.
सुहास सोहोनी. अमरावती.