Saturday, July 28, 2012

महापुरुषांच्या महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची गरज

    महापुरुषांच्या महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची गरज
                नित्य नेमाने होणारी दुभत्या जनावरांची कत्तलीसाठी होणारी अवैध वाहतूक विविध शहरांमध्ये
 होते आणि जनक्षोभ उसळतो ,जमाव जमतो ,काही ठिकाणी अप्रिय घटना घडतात .भारतात गोवंश  हे दैवत
 आहे .मानबिंदू आहे .त्या गोवंशाची चोरी, अवैध कत्तल आणि मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी मांसाची
 अवैध वाहतूक या  सर्व बेकायदेशीर कृत्यांमुळे समाजमन अस्वस्थ आहे . अशा न आवडणाऱ्या घटनांना
 विरोध करण्यासाठी नागरिक एकत्र येतात तेंव्हा त्यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल केले जातात .
तेही दुर्दैवीच आहे.कत्तलीसाठी शिफारस  नसलेल्या जनावरांची अवैध वाहतूक ,अवैध मांस वाहतूक होते ,
तेव्हा "animal cruality law"या कायद्याचे काय ?
                 जंगलातील हरणांची शिकार व मांसभक्षण या विरोधात कायदा आहे, त्यांच्यावर खटला चालतो.
तसेच दुभत्या जनावरांची "शिकार" केली जाते,तेव्हा कायद्यात फरक कसा ?संपूर्ण देशात वाईल्ड लाईफ,
पशुपक्षी तसेच गोवंश हत्या बंदी कायदा आहे ,मग महापुरुषांच्या  आणि विचारवंत ,संतांच्या महाराष्ट्रात 
गोवंश हत्या बंदीचा कायदा का अमलात आणला जात नाही ?येत्या हिवाळी अधिवेशनात 'प्रलंबित गोवंश  हत्याबंदी 'याबाबत आमचे नेते आणि विविध संबंधित संस्था,शासन हा ठराव पारित करण्यासाठी पुढे येतील
 का ?कायद्यात पळवाटा शोधता येतात हे जरी  मान्य  केले तरी किमान कायदा तर असावा लागतो ना?  
  हे राज्य कायद्याचे कि ?..........
                   भररस्त्यात संतत अप्रिय घटना घडू लागल्या तर वैविध्यतेने एकत्रित राहणाऱ्या या समाजात
 सुसंवाद कसा साधेल ?कोणत्याही क्ष्रेत्राच्या विकासासाठी नागरिकांमध्ये आपसात सलोखा ,शांतता आणि
 मुख्य म्हणजे विश्वास असण्याची गरज आहे.प्रत्येक समाज घटकाने हाच विचार करायला हवा .टाळी  कधीएका हाताने वाजत नाही."गोवंश हत्या बंदी कायद्याची गरज आहे "यावर अवश्य जनमत घ्यायला हवे .त्याच  बरोबर दुध देणे बंद झालेल्या दुभत्या जनावरांची कशा प्रकारे जोपासना केली जाते ?तितक्याच आपुलकीने   निगा राखली जाते का ?याविषयी आत्मचिंतन हवे .शासनाच्या संबंधित विभागाने पकडलेली जनावरे   कोंडवाड्यात ठेवण्याऐवजी जवळच्या गोरक्षण संस्थेत ठेवावी .गोरक्षण संस्थेत जनावरांची खाण्यापिण्याची व्यवस्था असावी, देखभालीसाठी कर्मचारी ,तज्ञ आरोग्य अधिकारी व सरकारची मान्यता आणि सरकारी अनुदान मिळावे.प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी गोरक्षण संस्था असावी व गोपालक /कर्मचारी नोकरीत ठेवावे.जेणेकरून भारतीय पशुधन समृध्द होईल
                                                             सुहास सोहोनी ....९४०५३४९३५४
                                                        pl.visit :suhassohoni.blogspot.com

Friday, July 27, 2012

wishwas

    फांदीवर बसलेल्या पक्षाला 
    फांदी तुटण्याची भीती नसते ,
    कारण त्याला त्या फांदीवर  
    विश्वास नसून
     आपल्या पंखावर विश्वास असतो
     सुहास सोहोनी 

Thursday, July 26, 2012

नसावा गावात प्लास्टिकचा कचरा

          नसावा गावात प्लास्टिकचा कचरा
           खेळण्यांपासून ते यंत्रसामुग्री ,सुटे भाग ज्यापासून बनवले जातात ते प्लास्टिक ,अद्भुत जगभर मान्यता पावलेलसंशोधन .शेकडो वर्ष टिकून राहत,कुजत नाही ,सडत नाही कि गळत नाही ,आगीत जळल   तरी  वायुरूपाने आपल अस्तित्व कायम ठेवत ,"वापरा आणि फेका "या वृत्तीत काम संपले की सहजपणे" निरुपयोगी कचरा "म्हणून हेप्लास्टिक भिरकावले जाते .जगभर प्लास्टिकच्या वस्तू ,  थैल्या ,आवरणं अवतीभवती पसरते व पडून असते.रस्त्याच्या कडेने,रेल्वलाईनच्याबाजूने,मैदानात,नाल्यांमध्ये,झादाझुदुपात ,विविध पर्यटन स्थळांवर हा कचरा सहजपणे भिरकावला जातो .शेकडो वर्षाचे आयुष्यमान  लाभलेला हा कचरा साचायला लागतो ,ढीग तयार होतात आणि मग त्या कचर्याची मानवाशी निसर्गाशी लढाई सुरु होते .
            संथ गतीने सुरु असलेल्या निसर्गाच्या कार्यात हा प्लास्टिकचा कचरा सतत अडथळा आणतो .वनस्पतींची वाढ खुंटते ,शेतजमिनीची प्रत निकृष्ट होते .जनावरांच्या पोटात गेल्याने कित्येक जीव प्राणाला मुकतात  .गटारात नाल्यात साठल्याने पाणी वाहून जात नाही ,अस्वच्छता रोगराई पसरते .सहजपणे भिरकवलेला हा कचरा आपलं किती नुकसान  करतो हे त्यावेळी उमजतच नाही .आज सर्वच शहरांसाठी हा प्रश्न डोकेदुखी ठरत आहे .जागोजागी साठलेले हे ढीग आधुनिक काळातील राक्षसच आहेत .पर्यटन स्थळांवर हजारो पोटी प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातो .क्यारीब्याग्ज,बाटल्या डिशेश झुडुपातून पडूनअसतात
.इतर जीव संस्कृती निसर्गाच्या जीवन चक्राला   हातभार लावतात,पण माणूस !उकिरडा निर्माण
करतो ,बेफिकीरपणे .
             काय होऊ  शकत  या प्लास्टिकच्या कचऱ्याचे ?  उकीरड्यावर फेकण्यापेक्षा हे प्लास्टिक पुन्हा कारखान्यात नेता आल पाहिजे ."प्लास्टिक  रिसायकलिंग प्लांट "निर्माण व्हावयाला  हवेत .प्रत्येक जिल्ह्यात हा उद्योग होऊ शकतो .कापडी पिशव्या सोबत बाळगण्याची सवय करून घेणे जरुरी आहे .घरातल्या बाकीच्या कचऱ्याचे खत करता येईल. प्रत्येक गावाने किंवा शहरातील प्रत्येक विभागाने प्लास्टिक कचरा साचू न देण्याचा उपक्रम राबवायला हवा.कायद्याची सक्ती करण्यापेक्षा स्वयंनिर्णय महत्वाचा. आपला परिसर नित्य स्वच्छ राहावा म्हणून "नसावा गावात प्लास्टिकचा कचरा "
        [उजळते क्षितीज -लेखसंग्रह २००७ ]
           सुहास सोहोनी ९४०५३४९३५४
         visit:www.suhassohoni.blogspot.com   


                       यांत्रिक कत्तलखान्याचे शहर --भविष्यातील  अमरावतीची नवी    
       प्रती
    मा . ---------------------
    विषय -अमरावती म. न. पा .चा प्रस्तावित कत्तल खाना रद्द व्हावा .
           सन्माननीय महोदय ,
                       आपण एक अधिकृत लोकप्रिय जनेते आहात .जनतेसाठी कल्याणप्रद अभियान आपण
     नित्य राबवीत असता.आपणास माहीतच आहे की अमरावती म. न. पा.तर्फे प्रस्तावित कत्तलखाना
      लवकरच सुरु होणार    असे कळते मुळात या यांत्कत्तलखान्याची शहर  व जिल्ह्याला खरच गरज
     आहे का ?कारण जिल्ह्यात  सध्या अधिकृत ३कत्तलखाने अस्तित्त्वात आहेत. त्यातुन्जीळ्याची
      मांसाची गरज नक्कीच पूर्ण होते .म्हणजेच ह्या  अजस्त्र यांत्रिक कत्तलखान्याचे उत्पादन निर्यातक्षम
 आहे .एवढा मोठा मांस विक्रीचा  व्यवसा  करण्यासाठी आपलेच अमरावती शहर का निवडले ?उर्वरित
 महाराष्ट्र का नाही ?या कत्तलखान्यामुळे  दररोज हजारो दुभती जनावरे नष्ट होणार आहेत .जनावरांची
चोरी फार मोठ्या प्रमाणात होणार आहे पशुधनाचा ऱ्हास म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास .दुधाच्या उत्पादनात
 प्रचंड घट संभवते.  दुध सर्वचजनावरांची आबालवृद्धांना हवे आहे दुधाच्या बाबतीत  जात धर्म पंथ हा भेदभाव
 नसतो .पशुधन नष्ट करून कुपोषणावरकशी मात करणार ?संतांच्या,विचारवंतांच्या  इंद्रपुरी  अंबा नगरीत
 हा एक कलंक आहे .            
             नगरसेवकांच्या बहुमताने पारित झालेला कत्तल खाना रद्द चा ठराव शासनाने त्वरित विखंडीत केला 
    लोकशाहीत जनप्रतीनिधींच्या ठरावाला केराची टोपली .नगरसेवकांची किंमत शून्य .असे का?   लोकसंखेच्या ४०%
    लोकांची मांसाहार हि गरज आहे .पण आपले पशुधन नष्ट करून जगाला मांस का पुरवावे?पशुधानाद्वारे दुध
    दुधाचे पदार्थ ,औशधे,  खते असे फायदे आहेत .दारू ,सिगारेटचे कारखाने ,शिक्षण संस्था मेडिकल इंजी .कॉलेज
    यात अफाट पैसा गुंतवणारे धनाढ्य कधीही गोरक्षण आणि त्याद्वारे उभारले जाणारे विविध उद्योगात का गुंतवणूक
     करत नाहीत?कत्तल खान्याचे शहर -आशी अमरावतीची नामुष्कीची ओळख चालेल का ?  अहिंसा हा प्रत्येक
     धर्माचा मुळ गाभा आहे.भारतीय पशुधनाचे रक्षण करण्यासाठी आपणसुद्धा मनःपूर्वक करून या कत्तल खान्याला
    संपूर्ण  विरोध करावा हि विनंती या कार्यास आपले योगदान आवश्यक आहे .
     आपले नागरिक
 
           सुहास सोहोनी   ९४०५३४९३५४

Monday, July 16, 2012

व्यसनमुक्ती हवी आजपासून

                        व्यसनमुक्ती हवी आजपासून
                          प्रयत्न करावासा वाटतो ना ?
                    आज या क्षणापासून सुरवात करणार?
                          मग एक माहिती असू द्या .
                       मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र ,पुणे .-
                   फोन :०२०-६४०१४५९८ ,०२०-२६६९७६०५
                 संपर्क केंद्रे महाराष्ट्रात अनेक शहरात आहेत
                   अल्कोहोल एनानिमस  हेल्प लाईन ,मुंबई
                         फोन :०२२- २३०१६७६७
           जागतिक अंमली पदार्थ विरोधी   दिन

निसर्गाचा संगीतकार हरवला आहे

                                                 निसर्गाचा संगीतकार हरवला आहे
                पाऊस आल्या आल्या जमिनीवर आपला हक्क सांगत गवत व  गाजर गवत उगवले .झाडांना पालवी व
        फुले आली  पण अजूनपर्यंत आला नाही तो बेडकांचा सामुहिक गोंगाट .रिमझिम बरसणाऱ्या पावसाळ्यातील
       निसर्गचीत्राला सजीव करणार पार्श्वसंगीत देणारा हा सृष्टीचा कलाकार आहे तरी कुठे ?निसर्गाच्या जीवनचक्रातील
        महत्वाचा  घटक असलेला हा इवलासा जीव हरवला आहे .नामशेष होण्याच्या मार्गाला लागलेला तर नाही ?
                    जगभर किटकनाशके आणि रासायनिक द्रव्यांच्या फावारनि द्वारा   असंख्य जीव, जंतू ,प्राणी नष्ट
         केले जात आहेत.अशा विषारी द्रव्यांच्या वापरामुळे विषारी धान ,कडबा चारा खाउन कितीतरी प्राणी मरतात,
         अश्या बातम्या नेहमीच असतात .हे सगळे प्राणी जीवजंतू निसर्गाच्या जीवनचक्रातील एक कडी आहेत याचे
         संपूर्ण विस्मरण झाले ,असे दिसते .
                   गांवभर घाण साचू द्यायची .त्या घाणीच्या शेजारी जगायचं .आरोग्य्शास्त्रातले  सगळे नियम धाब्यावर
          बसवायचे ,मग आजाराची साथ आली कि सगळ्या जीव जंतू व प्राण्यांवर मानवी संक्रांत बरसणार .एक डास   
          मारण्याकरता  ओतलेल्या विषारी द्रव्यांमुळे कितीतरी उपकारी जीव मारले जात आहेत याचे भान आम्हाला
          नाही प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे बंद झालेल्या नाल्या ,तुडुंब भरलेली गटारे ,कचरा पेटीच्या सभोवताली साचलेली
           घाण ,रस्त्याच्या कडेची अस्वच्छता .प्रत्येक वेळी फक्त प्रशासनालाच दोष द्यायचा काय ?
                     डासांना संपविण्याचे काम बेडूक ,गप्पी मासे यांना करू द्या .प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाचे अन्न आहे ,
            त्यांचे काम त्यांनाच करू द्या .आपण फवारलेल्या विषारी द्रव्यांचे किती कण अन्नावाते आपल्या पोटात
             जात असतील? एखादी कृती घडून गेल्यावर परिणामावर नियंत्रण कसे राहील ?मात्र प्रत्येक कृतीबाबत फेरविचार
            होऊ शकतो .बुद्धीचा तोरा मिराविणार्यांनी निसर्ग रुपी ईश्वराकडे सुबुद्धीच वरदान मागावयास हवे .
            सुहास  सोहोनी [वर्तुळाचे  टोक 2005]लेख संग्रह 

लक्ष्य हवे फक्त भारतीय असण्याचे

                                             *  लक्ष्य हवे फक्त भारतीय असण्याचे*
                        विदेशात आपण असतांना आपल्याला जात ,पंथ किंवा प्रांतनिहाय कुणीही ओळखत नाही तर
        फक्त भारतीय वा इंडिअन म्हणूनच ओळखलं जातं.संपूर्ण भारतीयांची एकी दर्शवणार "मिले सूर मेरा तुम्हारा '  हे भाराऊन टाकणारे गीत लाखो करोडो भारतवासीयांनी केवळ कंठातून गाण्याऐवजी हृदयातून गाण्याची गरज आहे . भारतीयत्वाचा ध्यास असणार सक्षम नेतृत्व कुठेही दृष्टीपथात दिसत नाही .एखाद्या विशिष्ट घटनेमुळे खडबडून एकतेच्या गर्जना करणारी जनता थोड्याच वेळात जातपात ,धर्म ,भाषा,प्रांत आणि मुख्य  म्हणजे विविध राजकीय पक्षांमध्ये विभागली जाते .या सगळ्या अडथळ्यातून पार होऊन केवळ भारतीय'असण्याची "गरज आहे. आसेतुहिमाचल पसरलेल्या आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा ,सोयी सवलती तत्परतेने उपलब्ध व्हाव्या  या हेतूने भाषाप्रभुत्व  असलेल्या प्रदेशानुरूप, प्रांतनिहाय विभागणी केली गेली ही वस्तुस्थिती आहे,याचे भान सर्वांनीच ठेवावयास हवे .
                  नेते हे मुठभर असतात पण त्यांचे समर्थक कारोडोंच्या संख्येत असतात .नेतृत्व हे साहजिकच महत्वाकांक्षी असते .त्यांच्या सुप्त आणि गुप्त इच्छा असणारच ,त्यानुसारच नेत्यांची चाली बदलत असते ,पण करोडो समर्थक आपसात विभागले जातात .असे विभागले गेलेले ,विखुरलेले पक्षीय अस्मिता जपणारे लाखो समर्थक, कार्यकर्ते  देशातल्या प्रत्येक शहरात ,गावात आणि मोहल्ल्यात जागोजागी आहेत . आपली ओळख सांगतांना प्रत्येक जण जात पात,प्रांत किंवा राजकीय पक्षाची ओळख सांगतो  आणि इथेच अखंड भारतीयत्वाच्या संकल्पनेला छेद जातो.देशाच्या कनाकोपर्यात प्रत्येक भारतीय सुरक्षित हवा  . मानवी  स्वभावधर्मा प्रमाणे जात किंवा प्रांतवादातून वर्चस्व प्रस्थापित करण्याची कितीही इच्छा असली तरी सूड वृत्तीला थारा नकोच.*जात पात धर्म, दुषित पूर्वग्रह  या चौकटीतून बाहेर या .
                              आज वर्तमानात सर्व जग विविध समस्यांनी ग्रस्त व त्रस्त आहे .दहशतवाद असंख्य फणे काढून डुख धरून बसला आहे .आर्थिक मंदी ,घोटाळे अविश्वास्नियता,कामगार कपात, बेरोजगारी ,गरिबी ,अनारोग्य ,  प्रदूषण असूनही प्रतिकूल परिस्थितीत विज्ञानातील प्रगती व विकासाचा वेग यामुळे भारताकडे सगळ्या जगाचे लक्ष्य आहे .आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या  सकारात्मक  अश्या विचारप्रवाहाचा प्रभाव जगभर वाढतो आहे .नेमक्या याच वेळी भारतात कुठेही अंतर्गत कलह नको .प्रत्येकाच्या मनात जागृत असलेली फक्त  भारतीयत्वाची मनीषा तीव्र करण्याची आवश्यकता आहे .या इच्छेला 'सकारात्मक  उर्जा 'कशी प्राप्त होईल या विचारांनी भरलेल्या  सक्षम नेतृत्वाची गरज आहे .विचारवंतांनी देशविघातक कार्याला एकत्रित विरोध करण्यास समोर यायला हवे .प्रत्यक्ष कृतीतून एकी स्थापित होण्याची गरज आहे ,केवळ कल्पना विलास नको .शंभर कोटीपेक्षा जास्त असलेल्या जनतेने अखंड भारतीयत्वाच लक्ष्य कृतीतून सिद्ध केले तर भविष्यातील भारत  देश  नक्कीच बलवान ,समर्थ , व  धर्मनिरपेक्ष आणि सक्षम असेल .सगळी किल्मिष दुर करून एकदा फक्त *आपण सगळे  भारतीय आहोत *ही संकल्पना दृढ करा .
---------------------------------------------------------------------------------------------------
        सुहास सोहोनी
    घे ....उंच भरारी [लेख संग्रह २०१६  ]मोबा .९०५३४९३५४




हिडीस मानवी चेहरा हिडीस मानवी चेहरा

                                                                            हिडीस मानवी चेहरा
                    मातेच्या गर्भात बाळ नक्कीच सुरक्षित असत आणि निसर्गाची सुद्धा तीच इच्छा आहे ,पण ते बाळ
     जर कन्या असेल [भ्रूण], तर मात्र आज मातेच्या गर्भातही कन्या सुरक्षित नाही ,हे आजचं विदारक वास्तव  आहे .
      त्यातूनही कन्येचा जन्म झाला ....आणि विकृतीने पछाडलेल्या बापाच्या तावडीत ती सापडली तर तिचे काय
      हाल होतात ते उघडकीस येत असलेल्या अनेक घटनांवरून दिसत आहे .कुणी एक बाप आपल्या कोवळ्या नवजात
      मुलीवर विविध प्रकारे अत्याचार करू शकतो ,हा विचार सुद्धा मनाचा थरकाप उडवतो .त्याहीपेक्षा अशा उघडकीस
      न आलेल्या घटना देशभरात किती असाव्यात हा विचारसुद्धा मन सुन्न करतो .
                    या विकृतांधांना कुणी दिला  हा जीवन संपवण्याचा अधिकार ? काय गुन्हा आहे त्या निष्पाप निरागस
      बाळांचा आणि त्या निर्दोष मातेचा ? पालन पोषण शिक्षण, संरक्षण, विवाह, फसवणूक ,अत्याचार आशा भविष्यातल्या
      अनेक संभाव्य धोकेदायक घटनांचा विचार करून 'कन्या नकोच 'अशी भावना बळावत चालली असावी .मुलगी
      परक्याच धन आणि मुलगा वृद्धापकाळाचा आधार ,वंशाचा दिवा या सगळ्या संकल्पना किती तकलादू आहेत हि 
      गोष्ट सतत सिद्ध होत आहे .मुळात पुत्र किंवा कन्याजन्म होणे हे त्या मातापित्याच्या हातात नाही हेच सत्य आहे .
       हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांनी विवाह बंधनात अडकू नाही किंवा मुलच  होऊ देऊ नये .पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये
       [काही अपवाद वगळता] स्त्री आणि पुरुष [नर व मादी ]या दोनच मुळ जाती आहेत पण त्या परस्परांसाठी निर्माण
       केल्या गेल्या .हीच निसर्गाची इच्छा आहे .आपण जर जाणीवपूर्वक हा समतोल बिघडवला तर अनर्थ ओढवेल .हि
       गोष्ट सामान्ज्स्पणे   मान्य करण्याची बौद्धिक पात्रता आणि तारतम्य आज आपण गमावत चाललो असेच दिसते .
                    अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आत्यंतिक  व्यस नान्ध , विकृत ,मनोरूग्ण आणि हिडीस
         क्रूरकर्मा चेहरा असलेले किती " बाप "खुलेआम वावरताहेत हा विचार भीतीदायक आहे .
                                          सुहास  सोहोनी