Wednesday, January 2, 2013

* गेलं वर्ष ,आले वर्ष -२०१३ *

           *   गेलं वर्ष ,आले वर्ष -२०१३  *
                 पुन्हा एक नवीन वर्ष उजाडलं ,दरवर्षीप्रमाणेच .२०१२ पैकी १२ च्या जागी १३ चा आकडा लागला .
डिसेंबर संपता संपता थोडी थंडी ,उगीच यायची म्हणून आली .वर्षभरात देशात अब्जाधीशांची संख्या वाढली ,गरिबांची संख्या जरा  जास्त प्रमाणात वाढली .सर्व सामान्यांना हव्या असणाऱ्या सगळ्याच वस्तू सहजपणे महागल्या .या वर्षांत बरेच नवीन नेते उदयाला आले तर जुन्या नेत्यांनी सिंहासने घट्ट पकडून ठेवली.सत्तेच्या
खुर्च्या आपल्याच "गटा "कडे राहाव्या यासाठी जनतेला अनेक वस्तू ,अन्न धान्य अगदी फुकटात देणार अशा
घोषणा हसऱ्या  चेहेऱ्याने  केल्या गेल्या .जनता बिचारी भोळी आहे हे सगळ्यांना माहित आहे .शेवटी सत्ता
असेल तर सर्व काही आहे .राजकारणी लोकं सरड्यासारखे रांग बदलवू शकतात हे पुन्हा सिद्ध करून एफ.डी .आय ला मान्यता मिळवली .त्यामुळे आता विदेशी गुंतवणूक वाढणार ,"इंडिया "श्रीमंत होणार ......
महासत्ता होणार  ही खात्रीच झाली .प्रत्यक्षात आपला देश [भारत ] मधुमेह,बलात्कारां च्या बाबतीत महासत्ता बनतो की काय ,आसे चित्र समोर आले .वर्षभरात बालमृत्यू ,भृणहत्या व कुपोषणाचे प्रमाण फारच वाढलं ,
पण श्रीमंतांनी मात्र विविध सोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी नेहमीप्रमाणे केली .
                    वर्षभरात महागाई आणि भ्रष्टाचार का ? कसा ?कुणामुळे ?यावर भरपूर चर्चा [च ]झाली. वर्षा च्या शेवटी मात्र समस्त संवेदनशील देशवासीयांची मान शरमेने खाली घालावी ,अशी लज्जास्पद घटना
घडली .कोणत्याही नेत्याचे बोट न धरता तरुणांनी संयमित राहून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलला हे चित्र खूपच आशादायक आहे .उन्हाळ्यात पाणी समस्येवर जुन्या नव्या लेखकांनी मनसोक्त लिखाण केले ."जल
सिंचन या विषयात अनेक जण मनसोक्त डूम्बले .प्रत्येकाला खात्री आहे कि हळू हळू सगळ विसरलं जाईल .वर्षभरात मद्यपींची संख्या  वाढून देशाला अफाट महसुल उत्पन्न मिळाले .दारूमुळे काही कुटुंब उध्वस्त झालीत एव्हढेच .चमचमणाऱ्या श्रीमंतीचे वारे वाहत असतांना सुद्धा कित्येक शेतकरी ,मजूर ,विध्यार्थी ,तरुण तरुणी नोकरदार व बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात.आत्महत्यांच्या कारणांबाबत अर्थतज्ञ व मानसरोग तज्ञांनी नेहमीप्रमाणे बहुमोल मार्गदर्शन केले .दरवर्षीप्रमाणे लोकसंख्या,अस्वच्छता आणि आजारपणात एकत्रितपणे वाढच झाली .देवाला जे जे लोकं आवडले ते अनेक लाडके नेते, नाट्य कलाकार ,हे जग सोडून गेले .काही लोकांनी पृथ्वीवासीयांना जगबुडीची भीती घातली .लोकं बिचारे खरंच घाबरले .२१  डिसे .च्या आधी
लोकांनी भरपूर हवे ते खरेदी करून घेतले ,चंगळ  केली ,आणि काय जगबुडी झालीच नाही .बरे झाले .
                     देशात कायदा कठोर नाही ,अंमलबजावणी सक्षम नाही ,समाजात विकृती फारच वाढली आहे कुठेही महिला सुरक्षित नाहीत ,पुरुषी मानसिकता ,व्यसंनान्धता ,फेशन ,चित्रपट व चेनल्स वरील अश्लिल दृश्ये ,बिबत्स घटना ,स्त्रियांचा अनादर या सर्व गोष्टींचा यावर्षी अतिरेक झाला .त्यामुळे तरुणाई जागृत होऊन एकत्र येते आहे ,असं दिसतंय .देशाची प्रतिमा मलिन झाली आहे,या निर्ढावलेल्या विकृतान्धांना ठेचून काढायचे असा जनतेने निर्धार केला आहे आणि या  निर्णयाने नव्या वर्षाची ,२०१३ ची सुरुवात झाली
              सुहास सोहोनी
         www.mazyasamvedana.com
        www.suhassohoni.blogspot.com