Friday, September 18, 2015

देवळातील संपत्तीद्वारे जनहित व्हावे *

देवळातील संपत्तीद्वारे जनहित व्हावे *
देवळात होणार्या चोऱ्या यावर नेहमीच चर्चा सुरु असते .चर्चा वा लिखाणाद्वारे होणारे विचार मंथन नेहमीच लाभदायक असते .त्यामुळे विविध दृष्टीकोन समजतात .हजारो वर्षांपासून देवालयांवर वेगवेगळ्या टोळ्यांचे हल्ले होऊन अगणित संपत्ती लुटली गेली .काहीवेळा आकर्षक कलात्मक मौल्यवान मुर्त्या सुद्धा लुटल्या गेल्या ,कारण त्यांची विदेशातील बाजारांत मिळणारी मोठी किंमत .म्हणजेच लुटारू किंवा चोर यांना देवाशी काहीही देणे घेणे नसून त्यांना नित्य आकर्षित करते ती देवळातील संपत्ती, सोने ,दागिने .माणसांनीच देवाला दागिने घालायचे आणि माणसातल्या चोरांनी ते चोरायचे .या संपत्तीचे रक्षण देवाला करता येत नाही म्हणून दोष सुद्धा देवालाच द्यायचा आणि मुख्य म्हणजे एवढ्याच कारणावरून देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावायचे .हि वैचारिक भ्रमितावास्था सुद्धा मानवी मेंदूचीच निर्मिती आहे .
अजूनही न उलगडलेलं अफाट ब्रम्हांड ,त्यात असलेली आपली छानशी पृथ्वी ,जी अदृश्य अशा खगोलीय चुंबक शक्तीने संतुलित असून निर्मिती ,वृद्धी आणि विनाश यांचं अद्वितीय संतुलन सांभाळणाऱ्या या आपल्या ओळखीच्या निसर्गालाच म्हणजे पंच महाभूतांनाच आपण देव मानायला हवे .तो स्थूल आणि सूक्ष्म सुद्धा तितकाच शक्तिमान आहे .मानवाने देवाला मान्य करणे न करणे याचं सुद्धा निसर्गाला काहीही कर्तव्य नाही .विविध देवळे ,त्यातील प्रत्येकाला आवडणाऱ्या देवांच्या मुर्त्या ,ज्या मानवी कल्पनेतून साकारल्या असून त्या सुशोभित करण्याकरिता माणसालाच मौल्यवान वाटते ते सोने ,हिरे,चांदी यांचे हार, सिंहासन ,कपडे कळस वगैरे वगैरे त्या देवळात साठवल जात .पुढे कधीतरी या संपत्तीची चोरी होते .मनातील देवाची कल्पना आपण मूर्तीत विराजमान करून नतमस्तक होतो .पूजा करतो ,श्रद्धा ठेवतो .मूर्ती तर निसर्गाचाच एक अंश आहे .अगदी देवाला न मानणारे सुद्धा निसर्ग आहे हे मान्य करतात ना ?कारण प्रत्येक प्राणीमात्र हा सुद्धा निसर्गाचाच एक अंश आहे .खर तर प्रत्येकान आपल्या देवाला शोधावे .
देवालयांमध्ये अफाट संपत्तीचे प्रदर्शन करण्या ऐवजी मिळालेल्या दानाचा योग्य विनियोग करून सुसज्ज हॉस्पिटल्स ,शाळा,कॉलेज,सुसज्ज ग्रंथालये,दर्जेदार प्रयोगशाळा ,संस्कार केंद्रे ,आरोग्य केंद्रे ,क्रीडा प्रतिष्ठाने निर्माण करायला हवीत म्हणजे दान राशीचा समाजाला उपयोग होईल .मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीत समाजाला मदत होईल .अन्यथा देवालयात साठवलेलं ,प्रदर्शना सारख ठेवलेलं सोने ,हिरे अलंकार चोरांना आकर्षित करतील यात नवल ते काय ?
लेखसंग्रह ;
*घे उंच भरारी *
लेखक :सुहास सोहोनी ९४५३४९३५४

Wednesday, September 9, 2015

                                                          #  मैत्री कट्टा #
             आजूबाजूला संतत काही चांगल्या वाईट घटना घडतच असतात ,अगदी आपल्या बाबतीतही विविध घटना घडत असतात ऽअपल्यल मिळालेलं हे आयुष्याच देण जगतांना सुसह्य व्हावं ,सुरक्षित असावं ,यशस्वी जगावं असंच   प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही .परिपूर्ण सुखी आयुष्य म्हणजे नक्की काय ?काय करावे म्हणजे आपण व आपला परिवार निश्चिंत राहू ?अशा विविध विचारांनी सामान्य व्यक्ती त्रस्त असते . 
              विविध उत्तरोत्तर भेडसावणाऱ्या समस्या अचानक उद्भवणारे अनारोग्य ,मधुमेह , कुणालातरी असणारं अपंगत्व ,शिक्षणासाठी नेमके कोणते विषय निवडावे ?कोणती दिशा धरावी ?नोकरी मिळवण्याची चिंता ,व्यवसाय टिकवण्याची चिंता ,यासाठी  सतत योग्य प्रयत्न करण्याची गरज . विवाह समस्या ,नाते संबंधातील ताण तणाव ,द्विधा मनस्थिती ,भविष्याची हुरहूर ,वाढत्या वयाची सुप्त चिंता ,बर्याच बाबतीत योग्य निर्णयाचा अभाव ऽश अनेक समस्यांबाबत कुणाशीतरी बोलायचं असतं . आपल्या मनातील विचार 
कुठेतरी व्यक्त करावेत असं वाटत ,हे खरे आहे . 
                 अशा वेळी हवा असतो एक" जिव्हाळ्याचा मित्र "जो आपलं बोलणं ,आपली समस्या समजून घेईल व आपल्याला सकारात्मक प्रोत्साहन देईल . अशी मैत्रीयुक्त वातावरणातील जागा म्हणजेच"  कट्टा "जो 
आपल्याला हवा असतो . खरंय ना ?
                या "मैत्री कट्ट्या "पर्यंत किती जण पोहोचतात हाच प्रश्न आहे. स्वगत आहे .
                                                                                                                सुहास सोहोनी 
                                                                                           सोहोनी कॉम्प्लेक्स विवेकानंद कॉलोनी ,
                                                                                                              अमरावती ४४४६०६
                                                                                          फोन ०७२१-२५६७४६३,  मोबाईल -९४०५३४९३५४