* हिवाळ्यात पर्यटनाला चला विदर्भात *
भारताच्या मध्यभागी असलेला विदर्भ प्रांत अजून तरी विदर्भाबाहेरील पर्यटकांना आकृष्ट करू शकला नाही हे खरे आहे. वास्तविक कोणत्याही प्रदेशाचे स्वत:चे असे खास वैशिष्ठ्य असतेच. फक्त जरूरी आहे ते जगापुढे मांडण्याची . पर्यटकांना आकर्षण असते अशा गोष्टी महणजे नयनमनोहर निसर्ग, पशुपक्षांनी समृद्ध अशी जंगले , ऐतिहासीक वास्तू किंवा पुराणकालीन संदर्भ असलेली , स्थानमहात्म्य असलेली धार्मिक स्थळे . विदर्भाच्या नकाशावर जरी नजर टाकली तरी लक्षात येते की वरील सर्व वैशिष्ठ्ये येथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. अतिप्राचीन संदर्भ असलेली गणेशाची आठ मंदिरे विदर्भात आहेत, ही गोष्ट येथील रहिवाशांना मुळीच माहीत नाही. वायगावचा रिद्धीसिद्धी गणेश, अदासा येथील शमीविघ्नेश गणेश, कलंबचा चिंतामणी गणेश, भद्रावतीचा वरद विनायक गणेश, केळझर येथील सिद्धी विनायक, पवनीचा सर्वतोभद्रगणेश, भंडारा येथील भृशुण्ड गणेश आणि रामटेकचा अष्टदशभूज गणेश.
सालेकसा दरेकसा येथील काचीकोना नैसर्गिक गुहा, हजारा धबधबा, नागझीरा, नवे गाव बांध, तोतलाडोह, पेंच प्रकल्प, नरनाळा किल्ला व घनदाट जंगल , ताडोबा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प, आणि भरपूर जंगल प्रदेश असलेला संपूर्ण गडचिरोली जिल्हा आजतरी विदर्भाबाहेरील पर्यटकांना खुणावत नाही.या प्रदेशातील नागपूर, रामटेक, शेगांव, लोणार आणि सरहद्दीवरील मुक्तागीरी, माहुर ही नावे काही प्रमाणात ज्ञात आहेत. रेल्वेच्या माध्यमातून शेगांव एक्सप्रेस ओरेंज एक्सप्रेस अशी नावे रेल्वे गाडयाना देता येऊ शकतात. सत्ताधारी व्यक्तीने ठरवले तर बरेच काही चांगले करू शकतात. हे सर्व होण्यासाठी आपल्या प्रदेशाविषयी आत्यंतिक प्रेम, आपुलकी, आग्रही भूमिका आणि पर्यटनादवारे उदयोग उभे रहावे यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. थोडा बारकाईने विचार केला तर असे लक्षात येते की विदर्भातील बहुसंख्य रहिवासी स्थलांतरीत आहेत. तेलांगणा, बस्तर, आंध्र , मध्यप्रदेश , उ.प्रदेश, पंजाब सिंध, राजस्थान, गुजरात, विदर्भाबाहेरील महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून स्थलांतरीत झालेले येथे स्थायिक झाले आहेत. हे सर्व श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय आहेत. मुळचा भूमिपुत्र एकतर न जमणारी शेती करतो आहे किंवा मजुरी करून दिवस कंठतो आहे. या प्रदेशाच्या विकासाच्या आर्थिक नाड्या विदर्भीय भुमिपुत्राच्या हातात नक्कीच नाहीत.
उन्हाळा व पावसाळ्याचा काळ वगळता आगस्ट ते फेब्रुवारी पर्यंत हा प्रदेश पर्यटनासाठी योग्य आहे. कमीतकमी सहा दिवसांसाठी प्रोग्राम आखल्यास सर्व प्रकारच्या पर्यटनाचा आनंद घेता येतो. गरज आहे ती इथल्या स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीची. विदर्भातील आदरातीत्थ्य सर्वश्रुत आहे . या काळात इथला प्रसन्न निसर्ग, सणवार, हस्तकला , खानपान, धार्मिक स्थाने आणि जंगलातील असंख्य पशुपक्षी पर्यटकांना नक्कीच आकर्षित करू शकतात. आर्थिक समृद्धीसाठी पर्यटन हा एक फार मोठा उद्योग आहे हे जागतिक सत्य विदर्भाला समजेले आहे म्हणूनच हिवाळ्यात पर्यटनाला या आमच्या विदर्भात .
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
वर्तुळाचे टोक [मराठी लेख संग्रह २००५]
www.suhassohoni.blogspot.com
हिवाळ्यात पर्यटनाला या आमच्या विदर्भात आपले स्वागत आहे