* व्यसनमुक्ती हवी आजपासून *
दारू किंवा अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्यांची संख्या सतत वाढते आहे. केवळ गंमत म्हणून सुरू झालेले हे व्यसन क्रमाक्रमाने अधोगतीच्या गर्तेत नेऊन सोडते. हा एक मनोविकार आहे. दारूचे व्यसन ही एक भयानक गुलामी आहे. या व्यसनातून मुक्तता अत्यंत अवघड असली तरी ते अशक्य मात्र नाहीच. रोग्यापेक्षा नातेवाईकांची चिकाटी किती यावर ते अवलंबून आहे. दारू मुक्ती मनापासून हवी असल्यास खालिल प्रश्नांची उत्तरे शोधावी.
दारूमुळे बरेच प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत का? कोणते ? * तरीही दारू प्याविशी वाटते का ?
* आपल्या दारूपिण्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे का? * कुटुंबाचे हाल होतात का? * नेमके दारूड्या कुणाला म्हणावे? * आपले स्वत:बद्दल काय मत आहे? *दारूमुक्ती हवी आहे का? त्यासाठी आजवर काही प्रयत्न करून पाहिला आहे का? *आपल्या व्यक्तिमत्वात काही दोष आहेत? कोणते? *ते दोष दुरूस्त व्हावेत असे वाटते का? *स्वत:च्या गुणदोषाची उजळणी करावीशी वाटते का? * जिथे चुक झाली त्याची कबुली दयायची आहे का? *आपल्या हातून जे कोणी दुखावले गेले आहेत त्यांची मनापासून क्षमा मागायची आहे का? *व्यसनापासून मुक्त होण्यासाठी इतरांना मदतीची हाक मारावीशी वाटते का? * मदत मागण्याची मनाची तयारी असल्यास अडचण काय आहे? * आपण ईश्वर समजतो अशी एक शक्ती नक्कीच आहे. यावर विश्वास आहे काय? *ती शक्ती व्यसनापासून मुक्ती साठी बळ देईल असे खरंच वाटते? घरातल्या प्रत्येकाला असं वाटतं का? *आई वडील भाऊ बहिण आणि पत्नीवर मनापासून प्रेम आहे का? *ही सगळी नाती आणि जीवनातला आनंद टिकून रहावा असंच वाटत ना? *व्यसन पुर्णपणे सुटल्यास सुखी भविष्याचे चित्र रंगवता येईल का? *प्रयत्न करावासा वाटतो ना? *मग सुखी भविष्याकडे वाटचाल करण्यास आज या क्षणापासून सुरवात करणार?
आपल्या मनाची ताकद अमर्याद असते. कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गरज आहे प्रामाणीक प्रयत्नांची आणि त्याचबरोबर समर्थ सहकार्याची. सोबत हवी चांगल्या विचारांची व विचारी मित्रांची. मनाचा निग्रह पक्का झाल्यास व्यसनापासून मुक्तता मिळवता येते. मद्यपानाची कितीही प्रलोभने आली तरी दारूचा ग्लास मी "आज' हातात घेणार नाही व पिणार नाही". असे रोज म्हणावयाला हवे. दारू मुक्ती ही मनापासून हवी. आयुष्य हे सुंदर आहे. त्याचा मनमुराद आनंद घ्या .
ुुु सुहास सोहोनी--- मोबा .९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेखसंग्रह २०१२]
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment