*अदभुत रंगमंच *
एकदा पहाटेच्या रम्य वेळी कवी मनाच्या ,स्वप्नाळू डोळ्यांच्या एका नटाला एक स्वप्न
पडलं . सोनेरी पंखांची तेजःपुंज परी त्याचे बोट धरून म्हणाली ,चल तुला खरा खुरा रंगमंच दाखवते . साक्षात देवतांना सुद्धा विहार करण्याचा मोह होतो अशी आपली पृथ्वी आणि तिचा स्वतःचा निसर्ग
यांचे विस्मयकारी दृश्ये त्या नटला दिसू लागली .लाखो वर्षांपासून विविध ठिकाणी क्षणा क्षणाला
बदलणारी हि रंग्सज्जा सूचक रंगांचे डाव मांडून पुन्हा पुन्हा स्वतःच मोडत होती .घनदाट जंगलं ,समुद्र ,
वाळवंट ,बर्फाळ प्रदेश ,गवताळ आणि खडकाळ प्रदेशाच्या रंगमंचावर पुढे सजीव कलाकारांनी प्रवेश केला
आणि निसर्गाच्या सुरु असलेल्या कथानकाला छान वेग आला .एका रम्य वेळी संपूर्ण रंगभूमी प्रेमळ ,मार्दव अशा आवाजाने भारून गेली .ते गूढ ,पण ऐकत राहावे असे संवाद सुरु होते ,एका मातेचे आपल्या नवजात बाळाशी .हुन्काररूपी संवाद म्हणजेच सर्व प्राणिमात्रांची आद्य भाषा होती ती .
या अफाट पसरलेल्या रंगमंचावर विविध दृश्ये मांडून ठेवली आहेत .महान रंगभूषाकार
ऋतू बदला प्रमाणे सतत बदल घडवतो आहे .निसर्गाचा अदृश्य वाद्यवृंद सर्व स्थळी सर्व काळी न थकता सुंदर पण प्रसंगानुरूप साथ करतो आहे .वारा, झाडे,पाणी ,अग्नी व असंख्य प्राणी आपापल्या परीने ध्वनी निर्माण
करून वाद्य वृंदाला साथ करीत आहेत .शिस्तबद्ध रंगमंच व्यवस्था ,विलोभनीय रंगभूषा व स्वर्गसुख देणारा
वाद्यवृंद बिनचूक पणे आपली भूमिका पार पाडू लागले . परमोच्च आनंद म्हणजे काय हे काळात होत .
बुद्धीचं वरदान लाभलेल्या मानवाने पुढे रंगपटावरची विविध दृश्ये ताब्यात घेतली .भूभाग पाणी पर्वत आपसात वाटून घेतले .याच रंग पटावर जगभर वेगवेगळी साम्राज्ये, रामायण ,महाभारत आणि अनेक कथानके निर्माण झालीत .प्रेम,सूड,त्याग ,अहंकार ,महत्वाकांक्षा आणि अमानुष पणे प्रत्यक्ष निसर्गाचा व मानवाने मानवाचाच ,स्वतःचाच संहार सुरु केला .ओद्योगिक क्रांती घडवली व काळ्या धुरांचे राक्षस [खल
नायक] उभे केले.रासायनिक प्रदूषणाने या रंग मंचावर प्रवेश केला आणि अणु बॉम्बचे दुर्दैवी नाट्य साकारले .अनेक सत्ताकांक्षी याच रंग मंचावर आले ,खद खदा हसत त्यांनी अट्टाहास केला .अत्याचार ,दैन्य ,दुखः
दूरदूर पर्यंत पसरवले .पुढे याच कहाण्या कथानकांच्या रूपाने तयार करून १५+२० च्या रंग पटावर दाखवायला
सुरुवात झाली .नव रंगाने आणि नव रसाने ओतप्रोत भरलेल्या कहाण्या सजीव होऊ लागल्या व नामवंत
कलाकार निर्माण झाले .खूप कष्ट घेऊन कला सादर करू लागले .पूर्वी नसलेला एक घटक नित्य दिसू लागला तो म्हणजे प्रेक्षक आणि समीक्षक .
खाडकन डोळे उघडले .स्वप्नाळू डोळ्यांच्या त्या नटाच स्वप्न भंग पावलं होत .समोर सोनेरी पंखांची परी नव्हती .समोर होत पोटाची खळगी भरण्याचं विदारक सत्य ,काम मिळण्याची अनिश्चितता .
मात्र रंगमंच आजही तेव्हढाच सज्ज आहे .कलाकारांनी सच्चा अभिनय करायला हवा ,अमर्याद क्षमता अंगी हवी हे उमगलं आहे .आवाजावर नियंत्रण व देहबोलीचा सुंदर मिलाफ साधायला हवा ,तो सुद्धा सहज आणि नैसर्गिक.स्वप्नात निसर्गाचा अदभुत रंगमंच उलगडलेला पाहिला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की खलनायक कितीही आले आणि गेले ,तरी प्रेम भावनेला कुणीही नष्ट नाही करू शकलं .अमर्याद यशासाठी भविष्य काळ वाट बघतोय .अनेक शुभेच्छा .
सुहास सोहोनी
९४०५३४९३५४
www.suhassohoni.blogspot.com