* पंख उधार घेवून उडता येत नाही *
विदेशातील सर्वच उत्पादक भारताकडे केवळ एक बाजारपेठ या भूमिकेतूनच पाहतात. अगदी गरीब आदिवासी माणसाला सुद्धा एन.जी.ओ. मार्फत विदेशी वस्तु, पदार्थ पुरवले जातात. देशातील गर्भश्रीमंत, श्रीमंत मध्यमवर्गय आणि गरीबी रेषा ओलांडून मध्यमवर्गात प्रवेश केलेले असे सगलेच, विविध विदेशी वस्तूच वापरतील अशी पद्धतशीर योजनांच केली गेली असावी. भारत संचार निगम तर्फे गावोगावी इंटरनेट व्यवस्था सुरू केली , त्यासाठी असलेली उपकरणं पॉवर प्लग सहीत मेड इन चायना आहे. लाखो करोडो कॉम्प्युटर्स, दुरदर्शन संच हमखास विदेशीच आहेत. वीजेची समस्या असल्यामुळे कोट्यावधी इन्व्हर्टर्सची विक्री झाली आणि विदेशी उपकरणे व बेंटरी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली . अगदी सहजपणे आणि सतत आपण विविध विदेशी वस्तु वापरतो. आणि त्या उत्पादकांना नफा पोहोचवतो. टेलीव्हिजनच्या सिरियल्स किंवा स्पर्धाचं एक व्यसन जडलं आहे, म्हणून केबल , डिशटीव्ही, आणि इन्व्हर्टर या उपकरणांनी घरात जागा बiकावली . विदेशी कंपनीच सेट टॉप बॉक्स, डीव्हीडी, होम थिएटर हट्टाने घरात घुसलं . मोबाईल हँडसेट हा कंबरेचा किंवा गळ्यातला अलंकारच जणू. रिलायनस कं. भारतीय असला तरी हँन्डसेट मात्र विदेशी,कोरियन
कर्ज काढून आपण विविध योजनांदवारे किंवा सरकारी निती नुसार विदेशी उपकरणे विकत घेतो. त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करतो. खंत वाटते की या सगळ्या वस्तू अस्सल भारतीय बनावटीच्या का नसाव्या? पंचतारांकित विदयालयातून तज्ञ बनलेले इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ नेमके काय करताहेत? आपल्या
या देशात विविध तंत्रज्ञान विकसित करून महासत्ता होण्याऐवजी आपण "रेडीमेड-ज्ञान' कर्जाऊ रकमा घेऊन, विकत घेत सुटलो आहे. यातील 90 टक्के गुंतवणूक मनोरंजन किंवा सुखसोई साठी आहे, म्हणजे उत्पादकता शून्य. आज या देशाला गरज आहे मोठ्या उदयोगसमुहाची, भारतीय जनतेची गरज भागवून विदेशी बाजार पेठ गुणवत्तेने काबीज करणाèया उत्पादनांची.
भारतीय उद्योग-कारखाने कां आजारी पडताहेत? उद्योजकांचा उत्साह का मावळतोय? उद्योग-निती, सोई सवलती, करांचा बोझा, वीजेची अनियमितता, अधिकारी वर्गाचा जांच, कायद्यातीb त्रुटी, पळवाटा अशा विविध कारणांनी कारखानदारी त्रस्त आहे का? करोडो हातांना काम मिiवून देणारे उद्योग उभारण्याची गरज आहे. आज जागतीक बँकेचं कर्ज प्रत्येकामागे रू. 15000/- आहे. हे उधारीचं ओझ खांद्यावर घेवून कशी भरारी मारता येणार? समर्थ खांदेच पेलू शकतील महासत्तेचं स्वप्न. या विदेशी उत्पादनांच्या कुबद्यांनी आम्ही असा काय आनंद मिळवतोय? गगनात भरारी घेतांना हे पंख बळकट हवेत, सक्षम हवेत, मुख्य म्हणजे हे भरदार पंख स्वत:चेच हवेत, कारण, कधीही** पंख उधार घेवून उडता येत नाही. **
ुुु सुहास सोहोनी --मोबा .९४०५३४९३५४
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह २०१२]
www.suhassohoni.blogspot.com

No comments:
Post a Comment