Sunday, December 25, 2011

व्यसनमुक्ती... एकविसाव्या शतकाची कळकळीची हाक

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
व्यसनमुक्ती... एकविसाव्या  शतकाची कळकळीची हाक

        ज्याचे  परिणाम  म्हणजे फक्त विनाश आणि केवळ विनाश, अशा  व्यसनरूपी  राक्षसाने आज आपल्या देशातील युवा पिढीला बरबाद करण्याचा जणू  विडाच उचलला आहे. ही युव पिढी  फार मोठ्या  प्रमाणात जोरदार वार्याने पाला पाचोळा उडावा तसे या व्यसनी दुनियेत भीरकावली गेली आहे. या वीनाशकारी वादळाला आत्ताच जर आपण थोपवले नाही तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य  बघण्यासाठी शील्लकच राहाणार नाहीत,  तेंव्हा मित्रहो सावध व्हा.  अजूनतरी जागे व्हा आणि स्वत:ला, स्वत:च्या पिरवाराला आणि या देशाला  व्यसना पासून वाचवा.

        मेंदूला झीण झीण्या आणणा-या तसेच बधीर करणा-या कोणत्याही मादक पदार्थाचे अतिरेकी सेवन करणारी व्यक्ती म्हणजेच व्यसनी जीव. तो केवळ जीव जात नाही तोपर्यंत जीवंत राहतो आणि स्वत:च्या पायाने एक एक पायरी उतरत मृत्यूच्या गर्तेत एके दिवशी संपून जातो. मादक पदार्थ म्हणजे तंबाखू, घोटा, सिगारेट, नस, दारू, गांजा, अफीम,चरस, ब्राऊन शुगर, पाश्चिमात्यांनी शोधून  काढलेली अनेक  मादक पदार्थ. झोपेच्या गोळ्या किंवा गुंगी आणणारी मेंदू बधीर करणारी PENTAZOCAIN, PETHIDINE , LSD. Tab MANDREX या पैकी  कोणत्याही पदार्थाचे प्रमाणाबाहेर सेवन करणा-या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त होते.

        हा व्यसनी जीव स्वतः बायको, मुलं बाळ, आप्त पिरवार, मीत्र पिरवार अशा अगणित कुटुंबांना सतत आणि सहज दु:खात लोटत असतो. आणि मुख्य म्हणजे त्याला बद्दल जाणीव होत ही असली तरी त्याचा नाईलाज असतो इतका तो व्यसनांच्या आहारी जाऊन हतबल झालेला  असतो.

        कोणतीही व्यक्ती व्यसनी होण्याचे मुख्य कारण म्हणजे इच्छा शक्तीचा अभाव आणि पंच महाभूता सारख्या दैवी शक्तींवर असलेला अविश्वास, बर्याचवेळा कर्ज वाढ, घरगुती कलह, कमी वयात कमी अनुभव असतांना लायकी पेक्षा जास्त मिळालेलं धन ही सुद्धा व्यसनाधीनतेची  कारणे असू शकतात.

        पूर्वी असे वाटायच की शैक्षणिक आणि  आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गात हा प्रश्न भीषण होता. पण आज चीत्र पूर्णपणे पालटले आहे. गर्भ श्रीमंत, मध्यम वर्गीय आणि बुद्धीवंत स्वत:  किंवा त्यांची लाडावलेली मुल, मुली या प्रश्नाने ग्रासली गेली आहेत.  सधन व्यावसायिक निरनिराळे अधिकारी आणि शाळा, कॉलेजातील वीद्यार्थी केवळ फॅशन ओण मौज म्हणून या दुष्टच्रकात स्वत:ला अडकवून घेतात  आणि वेळीच जर त्यांच्या कडे लक्ष दिले नाही तर नकळत आश्चर्यकारक गतीने व्यसनाधीनतेच्या  आहारी जातात.

        सध्याच युग हे  खर म्हणजे प्रलोभन युग आहे.  प्रत्येक कुटुंबाने  आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत निकडीच झाल आहे. आपल्या मुलांचे मित्र कोण ? त्याला संगत कोणाची ?  घराबाहेर  असतांना शाळा, कॉलेज व्यतिरिक्त तो कुठे वेळ घालवतो ?  त्याची दिनचर्या कशी आहे ?  समाजात, नातेवाईकात आणि घरात, इतर व्यक्तीनबरोबर  त्याची वर्तणूक कशी आह ?  या आणि अशा अनेक प्रश्नांची जाणीवू पुर्वक माहिती गोळा करणे  प्रत्येक जबाबदार पालकासांठी अत्यंत आवश्यक आहे. बर्याचवेळा या प्रथम उपचारामुळे प्राथामिक अवस्थेतील व्यसनी व्यक्ती हा दुर्दैवी मार्ग सोडून स्वत:चे आणि इतरांच जीवन सुखी करू शकतो.

         इतर अनेक रोगां प्रमाणे  व्यसनाधीनता हा एक रोग आहे.  त्याला मानासिक रोग म्हणता यईल.  अंमली पदार्थाची चटक लागलेल्या व्यक्तीची माहिती हाई पर्यंत बर्याच वेळा फार उशीर झालेला असतो. असा रोगी , इतरां पासून वेगळा, एकांतात राहण्याचा प्रयत्न करतो. सतत पैशांच्या विवंचनेत असतो. घरात शुल्लक कारणां वरून चिडचिड करतो. तब्येतीची खोटी करणे सांगून जास्तीत जास्त वेळ झोपतो. काही कारण नसतांना वेळो वेळी खोटे बोलतो, बाथरूम, संडासात जास्त वेळ घालवतो. त्याची भाषा हळू हळू गलिच्छ बनते, घाणेरड्या शिव्या देतो. व्यसनं पुरती साठी लागणाऱ्या पैशासाठी तो अफरातफर करतो, खोटे बोलतो, उधारी करतो, चोरून घरातल्या वस्तू विकतो आणि शक्य झाले तर घरात खुंटी वर टांगलेल्या कुणाच्याही कपड्यातून पैसे चोरतो. सट्टा, जुगार खेळायला सुरुवात करतो. सरळ सध्या मार्गाने जाणार्या लोकांची चेष्टा करतो. त्यांच्या पासून काळजी पूर्वक दूर राहतो. स्वतःच्या मौल्यवान वस्तू, पैशाचे पाकीट, चोरीला गेल्याचे तो अधून मधून सांगतो, त्याचा स्वभाव उतावळा व अधीर झालेला असतो. आपला क्षुल्लक हट्ट सुद्धा तो पूर्ण केल्या शिवाय राहत नाही. त्याचे स्वास्थ्य खरोखरच बिघडते, त्यामुळे घरातल्या व्यक्तींची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतो आणि सर्वांना मूर्ख बनवितो. आपली प्रियव्यक्ती अश्या भयानक दुश्चाक्रात सापडली असेल अशी कल्पनाच येत नाही व विश्वास तर मुळीच बसत नाही. जेंव्हा चित्र स्पष्ट होते तेंव्हा प्रकरण फार पुढे गेलेले असते. एकावेळी दोन तीन प्रकारचे अमली पदार्थ सेवन करण्याची सवय लागलेली असते अश्या वेळी जे कोणी त्याला व्यसनांपासून परावृत्त करतात त्यांच्या पासून तो दूर पाळतो किंवा त्यांना घालून पडून बोलतो. घरात जे कोणी त्याच्या आकांतांडवाला घाबरतात त्यांच्यावर तो आपली हुकुमत चालवतो. वेळ प्रसंगी त्यांना खोटे बोलण्यास भाग पाडतो. व्यसन पूर्तते साठी असा माणूस अक्षरशः लाखो रुपयांची विल्हेवाट लावतो. बेधुंद अवस्थेत त्याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू खिशातील पैसे चोरणारी टोळी त्याच्या भोवती सक्रीय असते. स्वतःच्या  व्यासंनन पुढे त्याला कोणाचेही सोयरसुतक नसते भावनांची जाणीव नसते, अभ्यासात लक्ष नसते. पूर्वीच्या सगळ्या आवडीच्या गोष्टीतील आवड नष्ट झालेली असते. अश्या व्यक्तीची प्रथम भूक मंद होते, निद्र नाश जडतो, बोलण्या वागण्यात ताळतंत्र नसते, हात पायाला सतत कंपन असते. बधीर पण मुले मेंदूची कार्यशक्ती क्षीण होत जाते. भीतीदायक स्वप्ना पडतात. मनः स्थिती अशांत असते, स्मरण शक्ती क्षीण होते, दुर्ष्टी अधू होते. गुप्त रोग होऊ शकतो, हृदय रोगाची शक्यता वाढते.

         जर व्यसनाधीनता हा मानसिक रोग आहे, हे स्पष्ट आहे, तर आजच्या प्रगत युगात या रोगावर उपचार सुद्धा आहेत. रोग स्पष्ट झाल्यावर मानस रोग तज्ञाची मदत घ्यायला हवी. रोग्याच्या स्वातंत्र्याला हळू हळू बंदी घातल्याने मारलेल्या थापा आता पचत नाहीत हे त्याला स्पष्ट करावे .त्याचे सर्व काही चुकलेले आहे हे त्याला पटवून द्यावे. मात्र त्याची फाजील काळजी घेतली जाणार नाही असे वागावे. वेळप्रसंगी त्याच्यापेक्षा मोठा आवाज चढवून त्याला चूप बसवणे, अत्यंत आवश्यक आहे. असे रोगी पूर्ण बरे व्हायला कमीत कमी दोन ते तीन वर्षांचा काळ लागतो. हा काळ पूर्ण कुटुंबाला फारच कठीण परीक्षेचा काळ असतो. अश्या वेळी आपले मनोधैर्य खचू न देणे आवश्यक आहे कारण जीवनात सुखा मागून दु:ख तसे दु:खा मागून सुखाचे दिवस येतात हे नेहमी लक्षात ठेवावे.

          अगदी स्पष्टपणे सांगायचे तर रोग्याला शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती करणे हाच उपचार खऱ्या अर्थाने प्रभावी आहे. कारण घरात राहून एखाद्याचे स्वातंत्र्य नष्ट करणे वाटते तितके सोपे नाही. त्यांची मित्र सांगत तोडणे, चालू वातावरणात संपूर्ण बदल करणे, प्रसंगी कठोर वागणे आणि रोग्यास त्याच्या व्यसनांपासून दूर ठेवणे, फक्त व्यसनमुक्ती केंद्रातच शक्य आहे. तिथे रोग्याला मनन करण्याची, पश्चात्तापाची संधी मिळते, वेळ मिळतो. सतत व्यसनाधीन असल्याने असा वेळ त्याला कधी मिळालेला नसतो. दवाखान्यात भरती करणे हा शंभर टक्के रामबाण उपाय नाही हे जरी खरे असले तरी या काळात रोग्याचे मन परिवर्तन करण्यास मदत होते, त्याला चांगले आणि वाईट यातील फरक तज्ञ व्यक्तीमुळे समजावल्या जातो. योग्य तो औशोधोप्चार कठोरपणे चालू असतो. त्याची दिनचर्या चाकोरीबद्ध केली जाते. पण सर्वात मुख्य म्हणजे अंमली पदार्थांचा त्याचा खुराक न मिळाल्याने पहिल्या आठवड्यातच रोग्याला जो त्रास सुरु होतो तो घरातल्या व्यक्तींना बघाव्ल्या जात नाही. अश्या त्रासाला withdrawal symptoms असे म्हणतात. हा त्रास रोग्याला सहन करणे भाग आहे. तज्ञ डॉक्टरच अश्या रोग्याला हाताळू शकतात. मोठ्या शहरात सरकारी तसेच खाजगी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. प्रत्यक मेंटल हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्ती केंद्र आहेत. भरती केल्या नंतर डिस्चार्ज मिळे पर्यंत कोणाही आप्त स्वकीयांनी रोग्याला न भेटणे हे आवश्यक आहे. मधेच रोग्याला भेटल्यामुळे उपचार पद्धतीत अडथळे येतात आणि रोग्याची मानसिक स्थिती बिघडते. अश्यावेळी संबंधित डॉक्टरांना भेटत राहणे योग्य आहे आणि रोग्या बाबत आपल्याला माहित असलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या सवयी, घटना स्पष्टपणे डॉक्टरांना सांगाव्या.

         रोग्याला डिस्चार्ज मिळाल्या नंतर आता तू बरा झालास आता आपल्या कामाला लाग अशी भूमिका मुळीच करू नये. मानसोपचार  तज्ञाच्या देखरेखी खाली बरेच महिने त्याने Anti Drug Medicine  घ्यायचे असतात. या दिवसात भूत, वर्तमान व भविष्य हे तिन्ही काळ त्याच्या मेंदूत थैमान घालत असतात. या काळात अल्कोहोलिक अनामोलीस ए. ए. सारख्या समाजसेवी संस्थांची मदत घ्यावी. शक्यतोवर त्याला एकटे राहू देऊ नये. त्याच्या जवळ पैसे राहणार नाही असे बघावे. आध्यात्मिक विचार, ईश्वरभक्ती, धार्मिक पूजाविधी अश्या गोष्टीत त्याला गुंतवण्याचा हळुवार प्रयत्न करावा. यथावकाश या प्रयत्नामुळे त्याचे आत्मबल आणि आत्मविश्वास वाढीला लागेल आणि हाच आत्मविश्वास त्याच्या पुढील आयुष्याची पुंजी ठरणार आहे. मात्र त्याच्यात आत्मविश्वासाची चिन्हे दिसल्यानंतर त्याला आवडीचे काम जरूर करू द्यावे. हळू हळू त्याच्यावर जबाबदारीची कामे सोपवावी पण बारीक लक्ष्य असू द्यावे. खरे म्हणजे व्यसनमुक्त झाल्यनंतर रोग्याने स्वतः च आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू नये. त्याचे शुभ चीन्तानार्या आप्त स्वकीयांच्या काळजीयुक्त प्रमाच्या सावलीतच त्याने मोठा काळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. हा विचित्र बहुरूपी दुनियेच्या अनेक दैनंदिन समस्या स्वतःच्या बळावर सोडवण्य साठी तो खरोखर काही काळ पत्र नसतो हे सत्य ज्या रोग्याला कळले तो खऱ्या अर्थाने सुदैवी. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर या विनाशकारी वादळाची तीव्रता किती भयंकर आहे, हे कळते. प्रत्यक गावात समाजसेवी संस्थांनी हा विषय हाती घेणे आवश्यक आहे. अन्यथा व्यसनाधीन मेंदू कृश आणि सुकलेले खांदे, छातीचा खोका, दुर्बल मन असलेली युवापिढी या महान देशाचा गाढा ताकदीने ओढून एकविसाव्या शतकात पदार्पण करण्यास खरोखर समर्थ होणार आहे काय ?

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६.

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Saturday, December 10, 2011

भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________


भांडवलदारांना हवा असतो फक्‌त नफा-आणखी नफा 
   
       करोडो भारतीयांच्या  पोटात भरपूर किटकांचा प्रादुर्भाव झाला असा शोध लागल्यामुळे, आरोग्याच्या काळजीपोटी पवीत्र सेवाभावी वृत्तीने परदेशस्थ थंड पेयांच्या कंपनींनी थंड पेयात किडनाशकांचा वापर केला असावा काय ? आणि असे जर असेल तर आपण मात्र......... मुख्‌य म्हणजे किटकनाशकांचे प्रमाण जास्त असण्यावर आक्षेप आहे.  दररोज आमच्या पोटात किती विषारी द्रव्य कणाकणांनी जात आहे याबाबत आम्ही खरोखर अज्ञानी आहोत.  पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे काही राज्यांनी या बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणे विक्रीकरात करोडो रूपयांची सवलत देण्याच पवित्र कार्य केल आहे.

           आता महीने न महीने समिती वगैरे नेमुन भारतीय जनता आपला  विस्मरणाचा हक्क बजावण्यास मोकळी  आहेच. पाश्चिमात्यांचे गोडवे गाण्याचा आपला  परिपाठ असतांना त्यांना एकदम गुन्हेगार वगैरे कसं काय म्हणायचं ? याच राक्षसी प्रमाणात उत्पादक असणार्या बहुराष्ट्रीय  परदेशस्थ कंपन्या भारतामधे टाचणी पासुन तर विमानापर्यंत सगळ्या वस्तू व सेवा घरपोच आणुन देणार आहेत, आणि आपल्याला  फक्त उपभोग घेण्याचं काम करायचं आहे, अशा शेकडो कंपन्यांच्या मदतीने आपल्या देशात एक्सप्रेस हायवेज, उड्डाण  पुल, संगीत उद्याने, मोटारी, इंटरनेट, फास्ट  हॉटेल्स खाण्यापिण्याच्या सगळ्या  वस्तु मिळणार आहेत.  एक नवा स्वर्ग इथे अवतरणार आहे.  तुमच्याजवळ पैसे नसतील तर प्रॉपरटी गहाण ठेवून या कंपन्या भरपूर कर्ज ही देणार आहेत.  त्यांना इथे कायम व्यवसाय करायचा आहे.  भांडवलदारांना फक्त हवा असतो नफा आणखी नफा.  श्रीमंतांना व्हावयाचं असतं आणखी श्रीमंत.  या देशातल्या मुठभर 10 टक्के श्रीमंतांना या मानवयोनीतील  मिळालेल्या जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे.   उरलेल्या 90 टक्के गरीबांचा विचार किती काळ , कोणी करावा?  गरिब वगैरे जर कोणी असतील तर त्यांनी सुद्धा झटपट श्रीमंत व्हावं आणि याच जीवनात सगळा उपभोग घेवून टाकावा हे पाश्चात्य तत्वज्ञान इंटरनेट मार्केटिंग सारख्या नवतंत्रात घरोघरी शिकवल जात आहे.
    विदर्भात कापुस पिकत असतांना घरोघरी हातमाग का नाहीत ?  विदर्भात संत्रा पिकत आसतांना संत्राज्युस, संत्र्याचे अनेक पदार्थ का नाही बनत ?  भारतात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या कच्च्या माला पासून त्याच विभागात कारखाने का नाही चालत ?  करोडो हातांना काम का नाही?  सुरक्षीत नोकर्या मधून कामगार का काढले जात आहेत ?  प्रश्न अनेक आहेत आणि जनतेनेच त्यांचा वेध घ्यायचा आहे.

           -------------0--------------------0--------------0---------------------0--------------------


सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती ४४४६०६
फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

 

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज


सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________

व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची गरज
 
       ना होगा कोर्ट, ना मिलेगी तारीख और ना होगी सुनबाई. सिधा उपर भेज दूंगा ।  नायकाच्या तोंडी शोभुन दिसणारे टाळ्या हमखास मिळवणारा प्रेक्षकांच्या पसंतीचा हा डायलॉग नागपूरच्या आतंकाग्रस्त १०० -१५० च्या जमावाने भर कोर्टात पोलीस आणि वकीलाच्या साक्षीने एका कुख्‌यात गुन्हेगाराला यमसदनास पाठविले. तडीपार असलेला गुन्हेगार सतत मोहल्यात येतो. नित्य जबरी गुन्हे करतो. नागरीक आतंकित आहेत, त्रस्त आहेत.  न्यायाची वाट न पाहता, पुर्ण विचार करून पुर्णनियोजित पद्धतीने त्या गुन्हेगाराला संपवले जाते.  संपुर्ण पणे दोषी ठरलेल्या ज्ञात गुन्हेगाराला शिक्षा देण्याकरीता १०० च्या वर नागरीकांनी शस्त्र हाती धरावे ? ज्या पद्धतीने ही घटना घडली. त्या वेळी जास्त दु:खद घटना घडली आहे की १००  ते १५०  नवीन गुन्हेगारांनी जन्म घेतला.

         जगात सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतवर्षाचा न्यायपालीकेवर असीम विश्वास आहे. न्यायसंस्था ही सर्वोच्य आहे आणि ती आदरणीय राहिलीच पाहिजे, ही जबाबदारी आहे लोकशाहीचा पुरस्कार करणार्यांची निरनिराळी पद भूषवित मिरवणार्यांची. जनतेचे रक्षक असणारा पोलीस विभाग आणि शासनाचे सर्व घटक यांनी आपापली जबाबदारी वेळच्यावेळी पार पाडणे ही गोष्ट सर्वांच्या भल्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. दुष्टांच निर्दालन करण्यासाठी जनता जनार्दनाला कायदा हातात घ्यावा लागतोय हे संकेत निश्चीतच धोकादायक आहेत.  व्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी कायद्याची कठोर पकड हवीच.  कायदा आणि त्याचे रक्षक यांचा धाक कमी होत चालला आहे.  ही गोष्ट अशा घटनांवरून सिद्ध होते आहे. कायदेशीर कार्यालयीन कामाला वेग देवून दोषी व्यक्तींवर लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. कायद्याच्या त्रुटीचा लाभ जेव्हा सराईत गुन्हेगारांना मिळतो तेव्हा त्रस्त असलेल्या जनतेचा राग अनावर होतो ही मानसीकता लक्षात घेणे आवश्यक आहे. बेसुमार वाढत चाललेली लोकसंख्या, शिक्षित बेरोजगारांचा खदखदणारा असंतोष आणि भौतिक सुखाची लालसा यातुन गुन्हेगारी प्रवृत्ती प्रबळ होईल यात नवल नाही.  सुदृढ लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी न्यायदेवतेवर भारतीयांचा पुर्ण विश्वास हवा, यात तडजोड नाही करता येणार. जनसमुहाद्वारे केल्‌या गेलेल्या हिंसेच्या उद्रेकाच समर्थन होऊच शकत नाही. गरज आहे ती प्रस्थापित व्यवस्थेने आत्मचिंतन करण्याची. ( लेख संग्रह - वर्तुळाचे टोक - लेख क्रमांक २८ )

सुहास सोहोनी
विवेकानंद कॉलोनी, अमरावती.

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.

Friday, December 9, 2011

मानवी हक्क आयोगाचा आधार वाटायला हवा

सुहास सोहोनी
वीकास वार्ता पुरस्कार -१९९० महा शासन,
राष्टीय एकात्मता फेलोशीप - २००५ अखील महा पत्रकार व पत्रलेखक संघ,
सहसचीव डाय्बेटीक असो. इंडीया, अमरावती ,
सदस्य : महारषट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशन,
please visit at : www.suhassohoni.blogspot.com
_________________________________________
 
मानवी  हक्क  आयोगाचा आधार वाटायला हवा

     मानवी हक्क म्हणजे कोणाही स्त्री पुरुषाचा शांततेने जीवन जगण्याचा अधिकार. या विचार मध्ये मानवता, मानवी भावना, मनुष्य आणि त्याचे मन अखिल मानवता वाद, मानवी अत्याचार, दबाव , जुलूम, असे असंख्य विषय अंतर्भूत असून मनुष्य जातीच्या सुखासाठी झटणे, गुन्हेगारांच्या वागणुकीत सिधार्ण घडवून आणणे , दुख : व क्लेश कमी करून मानव हित कसे वाढवता येईल, हा मानव हित वाद, व त्या अनुषंगाने मानवाधिकाराचे रक्षण कसे करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणे, हे मानवी  हक्क  आयोगच कार्य आहे.

    स्वार्थासाठी, सत्येसाठी  मनुष्य  व्यक्तिगत किंवा समूहाने इतर व्यक्ती किवा समूहाला, जरब दाखवून, जबरीने नाडतो, छळतो, अन्याय करतो किंवा निर्दयी होऊन हत्या करतो. कितीही सुसंस्कृतीच्या गप्पा मारल्या तरी जगभर नित्य या घटना घडतात. कुठलाही विधिनिषेध पाळला जात नाही. मानवी मुल्ये सहज गत्या पायदळी तुडवली जातात . शांततेने व सुखाने जगण्याचा हक्क नाकारला जातो. मानव स्वतः इतर मानवांचा शत्रू बनतो .प्रत्येक देशात मन गोठवणाऱ्या दुख:द दुर्दैवी घटना इतिहासात बद्ध झालेल्या आहेत. पण आपल्या देशात तरी कोणते वेगळे चित्र आहे ? शांततेने उपोषण करणाऱ्या, झोपेत असणार्यां, स्त्री , पुरुषांवर पोलीसी लाठीमार केला जातो, अश्रुधुराचा वापर होतो, स्त्रियांवर अत्याचार होतात, न्याय हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांवर, जमिनधार्कांवर, गोळीबार होतो. छोट्या मोठ्या गुन्हेगारांना अक्षरशः तुडविले जाते . अश्या कितीतरी घटनांचा उल्लेख करता येईल . शेतकऱ्यांवर, व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी विपरीत व्यवस्था निर्माण होऊ देणे हि कृती, परिस्थिती म्हणजे सुद्धा, मानवी हक्क पायदळी तुडवानेच आहे.

    शांततेने व सुखाने जगण्याच्या मानवी मूल्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, व अत्याचार ग्रस्तांना न्याय देण्यासाठी आयोग बनवणे व चौकशी करणे, नंतर मात्र सर्व प्रकरण थंड्या बस्त्यात वर्षानु वर्षे पडून राहणे हा अनुभव भारतीयांना नवीन नाही. जगण्याचा हक्क डावलल्या गेलेल्या  केविलवाण्या  अत्याचारग्रस्त व्यक्तिला मानविहक्कासाठी असलेला हा मंच म्हणजे एक आधार वाटायला हवा, आशेचा किरण वाटायला हवा. मात्र आज देशावर आतंकी हल्ला करुन, कराग्रुहात असलेले, फ़शीची शिक्षा झालेले आतंकवादी यांच्यासाठी मानवि हक्काच्या गोष्ठी देश सांभाळण्याची शपथ घेतलेले महानुभाव करतांना दिसतात. मानवी हक्कांचे रक्षण नेमक  कोणाचे करायला हवे ? shahid झालेले, जखमी असलेले, वाचलेले, आणि सर्व नागरिक यांच्या मानवी मुल्ये व हक्कांच रक्षण होऊन त्यांना न्याय केव्हा मिळणार ? कारण फार उशिरा मिळालेला न्याय किंवा निर्णय हाच खरा अन्याय होय.

सुहास सोहोनी

फोन : ०७२१-२५६७४६३, ९४०५३४९३५४.