Thursday, December 20, 2012

आपल्या देशाची नक्की लोकसंख्या ?


*आपल्या देशाची नक्की लोकसंख्या ?
    एक विचार नेहमीच मनात येतो की आपल्या खंडप्राय देशाची खरी लोकसंख्‌या किती? जन्मदर हे एक महत्वाचे कारण आहे हे मान्य, पण इतरही अनेक कारणे वाढत्या लोकसंख्येला  जास्त जबाबदार आहेत.  सिमेपलिकडच्या प्रत्येक देशातून आपल्या देशात नित्य अनेक कारणांनी असंख्य लोक प्रवेश करतात.  बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, जुलूम, गुन्हेगारी यामुळे  त्या देशात त्यांना राहणे अशक्य प्राय होतं, आणि सर्व युक्त्या वापरुन ही मंडली  आपल्या देशात दाखल  होतात.  कालांतराने त्यांची वेगळी  वसाहत तयार होते.  वास्तविक हा जगातल्या बऱ्याच देशांचा प्रश्न आहे.  मानवतेच्या दृष्टीने अशा वसाहतींना सर्व जीवनावश्यक सोईसवलती पुरवल्या जातात.  हळू   हळू  या वसाहती मोठ्या  होतात.  ही मंडळी  परत जायचं नाव घेत नाहीत.  छोटा मोठा रोजगार करीत इथेच टिकून राहतात.  मात्र 1947 च्‌या फाळणीमुळे  आलेल्यांसाठी  हा विषय नाही. 
    या आश्रीत म्हणून आलेल्या या लोकांमध्ये काही नेतृत्वगुण असलेली  मंडळी  येथील  प्रादेशीक  नेतृत्वाशी हातमिळवणी करून आपले  बस्तान बसवतात.  वर्षामागून वर्षे जातात.  पुर्वच्या वसाहती वाढत असतांना नविन लोंढे  प्रवेश करतातच.  ही समस्या कायम आहे.  परंतु या प्रश्नाने प्रशासनावर जास्तीचा बोझा वाढतो.  त्या त्या प्रांतातीb नागरीकांना सोई सुविधा पुरवणे शासनाला  कठीण असताना, या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करावा लागतो.  या सर्व निर्वासितांना भारतीय नागरीकत्व दिले  जाते काय? ही मंडळी  इथल्या निवडणुकामध्ये मतदान/ बोगस मतदान करतात का? या निर्वासितांच्या पूर्वच्या मूळ  देशातील  नागरिकत्वाचे काय होत?की या लोकांकडे दुहेरी नागरीकत्व आहे? ल पत छपत येत असलेले  हे लोक  जीवाच्या सुरक्षेसाठी भ्रष्ट मार्ग तर निवडत नसतील ?
       समस्यांचं मूळ  वाढती लोकसंख्या हेच आहे, ही गोष्ट  सर्व स्तरावर मान्य केली  जाते, मग भारताची सर्व व्यवस्था कोलमडून जाईल  अशा निर्वासितांच्या प्रश्नावर आम्ही खंबीर का नाही? शीरगणना करताना देशात विखुरलेले  आदिवासी खरोखर मोजले  जातात का? दुर्गम प्रदेशातील  मूळ  आदिवासी, ग्रामीण, देशभरातील  भिकारी, रुग्णालयातील  सर्व रुग्ण, वृद्ध, अपंग, मतीमंद, अतीदाट वस्तीच्या झोपडपट्या मध्ये राहणारे सर्व भारताचे अधिकृत नागरीक असून त्यांची मोजदाद होते काय? शहरातील  कित्येक वार्डाच्या लोकाची नावे मतदार यादीत नसतात, या कारणाने त्यांना मतदानापासून वंचीत रहावे लागते, हे सत्य असताना वरील  विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे असावीत, हे सुज्ञास सांगण्याची गरज नसावी.  तेव्हा 100% मतदान म्हणजे नेमके काय? नेमके या देशाचे मतदार कोण? प्रत्येक नागरिकास स्वतंत्र ओळखपत्र असावे काय? बहुमत, जनादेश, हे शब्द फसवे नाहीत का? सत्ताप्राप्तीसाठी गदारोळ , एकमेकांवर आरोप, लांगुल  चालन, लालुच, शेवटी मतदानाचा मुहर्त आटोपून पुन्हा शेतकरी, मजूर, कामगार ग्रामीण व आदिवासी पुढील  पाच वर्षाकरीता जैसे थे. प्रकर्षाने असे वाटते की कोणत्याही पक्षापेक्षा देश महत्वाचा आहे.
सुहास  सोहोनी
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -]
                        ुुु

No comments: