प्रति,
महाराष्ट्रातील शांतताप्रिय सन्माननीय नागरिक,
नमस्कार,
★आपणा सर्वांना माहीतच आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सुद्धा सर्व दारूची दुकाने ,बार,परमिट रूम बंद आहेत त्यामुळे गावात/शहरात शांतता आहे,केवळ शहरातील काही दुकाने सुरु असून तेथे मात्र कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ★अशा परिस्थितीत दारू व्यावसायिकांच्या अथक प्रयत्नाने राष्ट्रीय व राज्य महामार्ग महानगरपालिका ,नगरपालिका ला हस्तांतरीत करण्याचा घाट घातला जात आहे,वास्तविक ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना आहे ,असे असूनही जर केवळ दारू दुकाने पूर्ववत सुरु व्हावी म्हणून असे अनैतिक हस्तांतरण झालेच तर आपणा सर्वांना आपल्या परिसरात ती #बंद झालेली दारूची दुकाने आपल्या नाकावर टिच्चून पुन्हा सुरु झालेली दिसतील.मग तोच ओंगळवाणा गोंधळ आपल्या अजूबाजूला असणार आहे. निर्णय आता आपल्याला घ्यायचा आहे.लाभलेली हि शांतता टिकवायची कि दारू दुकाने पुन्हा सुरु होऊ द्यायची.
★शांतताप्रिय नागरिकांनी/महिलांनी आता सक्रिय होण्याची फारच गरज आहे ,आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे,आणि त्यासाठी
★ 1) महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे.
★ 2) गाव/ शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही.
★मनपा आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना अशा आशयाची पत्रे व्यक्तिगत किंवा सामाजिक हित जोपासणाऱ्या सार्वजनिक/धर्मदाय संस्थां /महिला संगठना/बचत गट या सर्वांनी द्यावीत .एकत्रित समोर येऊन प्रखर विरोध करायला हवा . संस्थेच्या पत्रकाद्वारे लेखी निवेदन द्यावे,हि आपणा सर्वांस नम्र विनंती.
*सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शांतताप्रिय व दारू विरोधी नागरिकांना एक संधी मिळाली आहे ,या संधीचा लाभ घ्या,
*दारूला हद्दपार करा.
*आपल्या परिसरात शांतता कायम ठेवा. *शुभेच्छा आहेतच*
आपला शुभेछुक
सुहास सोहोनी
*संवेदना* ,
सामाजिक विचार मंच ,
अमरावती -४४४६०६
मोबा : ९४०५३४९३५४

No comments:
Post a Comment