Wednesday, May 31, 2017

*धान्य महोत्सव*

👍परिस्थितीच्या दुर्दैवी चक्रातून आपला *शेती उद्योजक*बाहेर पडावा, हा समाज घटक कायम सन्मानित रहावा यासाठी निवडलेल्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग म्हणजेच *धान्य महोत्सव*  

💥अतिशय परिश्रमाने व स्वकष्टाने पिकवलेला शेतमाल कुणाच्याही दबाव तंत्राला न जुमानता शेतीउद्योजकांनी ,धान्य महोत्सवाद्वारे ,थेट ग्राहका पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे,तो प्रशंसनीय आहे,स्तुत्य आहे व अनुकरणीय आहे .
💥अमरावतीच्या कॅम्प विभागात ५ मे पर्यंत सुरु असणारा हा धान्य महोत्सव शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान,आत्मसन्मान, उद्योजकता आणि संपन्नता निर्माण करण्याच्या दृष्टीने गाठलेला व यश प्राप्त करून देणारा एक महत्वाचा टप्पा असणार आहे .  
💥मला विश्वास आहे की अमरावतीचे /महाराष्ट्राचे करोडो सुजाण नागरिक या उपक्रमाला तन ,मन ,धनाने यशस्वी करतील.जनहितासाठी करोडो नागरिक एकत्रित झाले तर १००% सकारात्मक बदल होणारच,हि खात्री. *आपलाच आणि नेहमी आपल्या सोबत असलेला- *सुहास सोहोनी*
सामाजिक विचार मंच,
विवेकानंद कॉलनी,
अमरावती -444606
मोबा : ९४०५३४९३५४

No comments: