Wednesday, May 31, 2017

★विषय : * अधिकृत असलेल्या सर्व दारू दुकानांना गाव/ शहराबाहेर जागा उपलब्ध करून द्यावी

प्रति,
गृहमंत्री,
महाराष्ट्र शासन,
★विषय : * अधिकृत असलेल्या सर्व दारू दुकानांना गाव/ शहराबाहेर जागा उपलब्ध करून द्यावी . ***************************************
★ ★ देशातील मद्यप्रेमींची जबरदस्त संख्या पाहता जर संपूर्ण दारूबंदी केली तर करोडो लोकांना दारुअभावी हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल .ही वास्तुस्थिती मान्य केली तरी *देशातील ७०% जनतेचा विचार करता,【 ज्यात स्त्रिया, १८ वर्षापर्यंत मुले,मुली आणि दारू न पिणारे ज्येष्ठ नागरिक आहेत】गाव/शहरात शांतता असावी यासाठी ,गाव/शहरांतर्गत मद्य विक्रीस संपूर्ण बंदी घालावी व सध्या सुरू असलेल्या अधिकृत दारू दुकानांना गाव/शहरांच्या बाहेर काही अंतरावर जागा उपलब्ध करून द्यावी. * सुप्रीम कोर्टाच्या महामार्गावरील दारूबंदी च्या निकालानंतर शहरांतर्गत बऱ्याच निवासी प्रभागात अभूतपूर्व दारू - गोंधळ सुरु झाला आहे, * * वाईन शॉप मधून ५० - १०० बाटल्या खरेदी करून गावभर वेगवेगळ्या मोहल्ल्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे .
* यावर सध्यातरी प्रशासनाचा अंकुश नाही हे वास्तव आहे .
* या वस्तुस्थिती वर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित मार्ग काढावा व शांतता आणि सुव्यवस्था सांभाळावी,
*हि सर्वच त्रस्त नागरिकांची नम्र विनंती. *एक त्रस्त नागरिक*
सुहास सोहोनी ,
सामाजिक विचार मंच,
विवे

कानंद कॉलोनी ,अमरावती 444606 , मोबा : ९४०५३४९३५४

No comments: