Friday, June 2, 2017

आज शेतकरी त्रस्त आहे,

आज शेतकरी त्रस्त आहे,निसर्गनिर्मित व मानव निर्मित असंख्य समस्या आहेत हे सत्य आहे★
💥 पण स्वतः गडगंज श्रीमंत शेतकरी असलेल्या आणि #सरकारविरोधी #राजकारण्यांची हि खेळी आहे .यात बरेच उद्देश आहेत .शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वार्थी राजकारणाचा खेळ चाललाय .शेतकऱ्यांची व्होटबँक करण्याचं हा प्रयत्न आहे.
💥फक्त शेतमालाला #योग्य #भाव मिळायला हवा ,हे अगदी बरोबर आहे.  
💥धर्म,जात ,पक्ष,विसरून छोटे शेतकरी एकत्र यावे.शेती उत्पादन व विक्री सामुदायिक पद्धतीने व्हावी.  
💥खरा हाडाचा शेतकरी दूध रस्त्यावर नाही ओतणार,मात्र खरे हाडाचे राजकारणी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेऊन काहीही करू शकतात.  
💥जेंव्हा सत्ते पासून दूर रहावे लागतं,कुणी विचारत नाही, तेंव्हा हाडाचे राजकारणी खरे राजकारण सुरु करतात,पण त्याची झळ सुद्धा सामान्य व गरीब नागरिकांनाच बसते .हेच,आणि असच व्हावं ,हीच त्यांची इच्छा असते .राजकारणात फक्त दोनच पक्ष असतात १) सत्ताधारी व २) सत्ताकांक्षी .यानंतर फक्त रंगतो तो #बुद्धिबळा #चा #डाव.👍

No comments: