* निसर्गातच आहे विपुल अन्न *
प्रत्येक सजीव म्हणजेच प्राणी आणि वनस्पती यांना जगण्यासाठी व वाढीसाठी प्रथम गरज आहे अन्नाची. जगायचं असेल तर आपले अन्न आपल्याला मिळवावेच लागते. प्रत्येक जीव मरेपर्यंत ही धडपड करतच असतो.त्या धडपडीतून त्या जीव-समुहाचा विकास घडत असतो. छोट्याशा किटकांचा सुद्धा मिळवलेले अन्न साठवून ठेवण्याकडे नैसर्गिक कल असतो. आणि त्या विचार प्रेरणेतून एक सुनियोजीत शिस्त अंगीकारली जाते. अन्न मिळवणे,साठवण करणे,वितरण करणे व सरंक्षण करणे या महत्वाच्या कार्यपद्धती आयोजिल्या गेल्या. अन्न मिळविण्याकरिता प्रत्येक सजीवाला वैयक्तीक किंवा सामूहिक शक्ती आणि टोकाची बुद्धीमत्ता वापरून युक्तीचा उपयोग करावा लागतोच. या दोन्ही गोष्टीत जो कमी पडेल त्याचा बळी गेलाच म्हणून समजावे.
पंचतत्वा ने निर्माण झालेल्या या निसर्गाने प्रत्येकाला नियमित पणे संधी दिलेली आहे पण वातावरणाचे आणि परिस्थितीचे चक्र मात्र कायम फिरतं ठेवलं आहे. ऋतूमानाप्रमाणे विविध विलोभनीय रूपाने हा निसर्ग सजतो.खुलतो. असतील ते सगळे रंग सभोवताली उधळून सर्वांगावर रंगप्रावरणे लेवून सजण्याची, नटण्याची हौस फे डून घेतो. सर्व सजीवांना आपले अन्न मनसोक्त लुटू देतो, तृप्त करतो. तोच निसर्ग दाहक उन्हाच्या चटक्यांनी आसमंत भाजून काढतो, थंडीने गारठतो व अतीवृष्टी ने सर्व वाहुंन नेतो. प्रत्येक जीवाला पुन्हा पुन्हा अन्नासाठी व सुरक्षिततेसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतात. संतत बुद्धीमत्तेचा कस लागतो आणि बुद्धीचा विकास होतो.
जीवन हे सापशिडीच्या खेळा सारखं आहे, जसं दान पडेल तसं पुढे पुढे जाणारं किंवा तळा पर्यत गडगडणारं, हे चालूच राहणार पण मांडून ठेवलेल्या "सापशिडीच्या पटावरील शिड्याची संख्या वाढवता येईल ?'नुकसानीला आळा बसेल अस व्यवस्थापन हवं आहे. शिस्तबद्ध सुनियोजित व्यवस्थापना द्वारे प्रत्येकापर्यत सकस अन्न कसे पोहचेल हा विचार होण्याची गरज आहे.अन्नासाठी भांडण्याऐवजी आपल्याला पुरून उरणारे अन्नधान्य वितरीत करण्याची गरज आहे. लाखोंच्या संख्येने कुपोषित बालके असून असंख्य भूकबळी आपल्या देशात होत आहेत. हे कशाचे लक्षण आहे? समुहाने राहणाऱ्या मानवाने प्रत्येकाला दोन वेळ चे अन्न मिळेल याची सामुहिकरित्या काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी अन्नाची होणारी नासाडी पाहवत नाही. कोठांरामध्ये धान्य पडून सडल्याच्या बातम्या येतात आणि भ्रष्टाचाराचे काय? भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी जिद्द बाळगणारी मने घडविण्याची गरज आहे.जगात कोठेही अन्नधान्याचा तुटवडा नको. या निसर्गदेवतेवर श्रद्धा ठेवा, संवर्धन करा कारण केवळ हा निसर्गच विपूल धन्यधान्य उदारपणे देणार आहे.
सुहास सोहोनी
उजळते क्षितिज [मराठी लेख संग्रह -२००७]
www.mazyasamvedana.com

No comments:
Post a Comment