* पाणी व्यवस्थापन- "गाव तेथे तळे ' *
"पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा'. समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. पण हाय! या समुद्रात,या तलावात पाणी नाही , रेती आहे. फक्त वाळू आणि माती ... आणि सध्या अशा भयाण दुष्काळाने महाराष्ट्रात तांडवनृत्य सुरू केले आहे. दुष्काळाच्या धगधगत्या यज्ञात आहुत्या पडतात पशुंच्या, पक्षांच्या, मानवी जिवांच्या. छोटे मोठे पाण्याचे साठे सुकून जात आहेत. तशातच मार्च, एप्रिल पासूनच प्रखर उन्हाने जिवाची लाहीलाही होइल . जंगली पशुपक्षी तर स्वत:च्या बुद्धीची आज्ञा पाळून सुरक्षित ठिकणी स्थलांतरीत होतील . पण मुके पाळीव प्राणी? मानवाच्या आज्ञेत राहण्याची, जगण्याची सवय झालेल्या या पशुंनी कसा निर्णय घ्यावा? मालकाने जेथे वळवले तेथे निघायचे. अशा जनावरांचे स्थलांतर होईल , पण बऱ्याच जिवांना प्राण गमवावा लागतो- केवळ पाण्याअभावी. पाणी नसेल तर सजीवच राहणार नाहीत या सत्यतेची ही छोटीशी एक झलक आहे. पाणी हेच जिवन आहे . दिवस उजाडला की पाण्याच्या शोधात ही जनता आसमंत तुडवत आहे. मिळेल ते गढूळ , दुषित पाणी घेत आहेत. वेळ प्रसंगी संधीसाधू लोकांना वाटेल ती किंमत मोजून पाणी विकत घेत आहेत. ही आजची वस्तुस्थिती आहे.
एकीकडे प्रचंड वादळी वारे व अजस्त्र उंचचउंच लाटांच्या धडकीने भारताच्या पूर्व किनाऱ्या वर प्रलयंकारी निसर्गाचे तांडवनृत्य होत असते. आणि पश्चिम भारताच्या किनाऱ्या वर प्रखर उष्णता व पाण्याच्या कमतरतेमुळे निसर्गाच्या विनाशकारी अस्तित्वाचे दाहक दर्शन होत असते. वर्षानुवर्ष या खंडप्राय देशात सतत कुठेतरी निसर्गाचे फटकारे बसत आहेत. हजारोंच्या संख्येने जिवहानी व अगणीत मालमत्ता नष्ट होत आहे. तसे पाहिले तर निसर्गाचा हा नित्याचाच एक खेळ आहे. भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. ऋतुचक्रात अनियमितता दिसून येत आहे. उष्णतेत वाढ व पाण्याची कमतरता यामुळे झाडांना, जंगलांना धोका आहे. त्यात मानवनिर्मत कारवायांमुळे जंगलांचे, वातावरणाचे नुकसान होत आहे. जंगलाची वाढ होण्यापेक्षा जंगले नष्ट होण्याची गती जास्त आहे. या सर्व घटनाक्रमाला एकत्रितपणे विचारपूर्वक विरोध करणे ही काळाची गरज आहे. बुद्धीचा उपयोग शांतता व रक्षणासाठी करण्याची गरज आहे. अशांतता आणि युद्ध केवळ विनाशच देऊ शकतात आणि शांततेच्या काळातच रचनात्मक कार्ये होऊ शकतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी कार्य व्हायचे असेल तर प्रथम विश्वशांतीची आत्यंतिक आवश्यकता आहे. नाहीतर सापशिडीच्या खेळा प्रमाणे या पवित्र कार्याची अवस्था होईल.
जलसंपत्तीची वाढ करण्यापासून या पवित्र कार्याची सुरवात करावी लागेल. भुगर्भातील पाणी वाचविणे त्याचबरोबर पावसाचे पाणी जमेल तसे साठविणे या विषयीचे महत्व सर्वानी मान्य करायला हवे. त्या करीता जनजागरण हवे. जमीनीच्या उंच सखलपणाचा उपयोग करून – "गाव तेथे तळे ' ह्या वचनाची अंमलबजावणी करायला हवी. पावसाच्या पाण्याचा साठा कसा करता येईल, आणि वाहुन जाणारे पाणी जमिनीत कसे जिरवता येईल यावर मन:पूर्वक कार्य करावे लागेल. हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे सत्य नाही का? प्रत्येक गावाचे पाणी व्यवस्थापन हाच अतिमहत्वाचा विषय समजायला हवा. पाणी व्यवस्थापनासाठी जगात आज उपलब्ध असलेल्या सर्व पद्धती– सर्वकष विचार, आमच्या प्रत्येक गावाला माहिती करून देणे आवश्यक आहे. प्रदुषण टाळण्यासाठी काय करता येईल याचा अंतर्मुख होऊन विचार करणे व कृती करणे गरजेचे आहे. कालवा पद्धतीने एकीकडचे अतिरिक्त पाणी कमी असलेल्या प्रदेशात वiवणे शक्य आहे, पण हे कार्य युद्धपातiीर सुरू करावे. शासन त्याच प्रमाणे गैर– शासकीय संस्था यांनी"गाव तेथे तळे 'हा विचार अस्तित्वाचा प्रश्न समजून या कार्यास अग्रक्रम द्यावा.
* *प्रत्येक ग्रामपंचायतीने ठरावा द्वारे प्रत्येक गावासाठी किमान दोन एकराची जमीनगावतलावासाठी
निश्चित करून तेथे तलाव निर्माण केला तर पावसाळ्यात कितीतरी पाणी साठवले जाईल .गावातील विहिरींना पाणी झिरपेल .तलावाभोवती स्मृतिवना ची निर्मिती केल्यास पर्यावरणाचा समतोल साधेल निसर्ग चित्र सुंदर दिसेल .दुष्काळावर मात करता येईल .हे व्हावे .***
सुहास सोहोनी
उजळते क्षितीज [मराठी लेख संग्रह -२००७]
www.mazyasamvedana.com

No comments:
Post a Comment