* मद्यपाश एक भयानक मनोविकार *
दारूचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून, तो एक रोग आहे. दारूड्या असणारा हा माणूस "मद्यपाश'(अल्कोहोलिझम) या रोगाने आजारी असतो. गंमत म्हणून चारचौघे एखाद्यावेळी जेवढी दारू पितात त्यापेक्षा हा रोगी जास्त प्रमाणात आणि सतत दारू पीत असतो. केवळ दारू पिण्याच्या अतिरेकामुळें त्याची आर्थिक, शारिरीक, मानसिक व सामाजिक हानी होत असते आणि तरीही जो दारू पीतच राहतो, असा माणूस ह्या रोगाचा बळी ठरलेला आहे, असे समजावे, दारूमूळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अतोनात नुकसान होत असेल, तरीही मद्यपान करणारे बहुसंख्य मद्यपी ही गोï मान्य करीत नाहीत. दारूचे व्यसन ही भयानक गुलामी आहे. स्वत:च्या हाताने स्वत:चा व पर्यायाने संबंधित कुंटूंबियांचा पुरता विध्वंस करणारा हा भयानक मनोविकार आहे. काही लोक केवळ मजा म्हणून पितात. हलके वाटते, ताण नाहीसा होतो, वेळ कसा छान जातो ही त्यांची भूमिका. पण हे पिणे सोशलं असतं, प्रसंगापुरतं मर्यादित असतं. मद्यपाश झालेल्यांना मात्र असे मद्यपान स्वत:च्या इच्छेने थांबविता येत नाही. त्यांचा स्वत:वरचा, पर्यायाने पिण्यावरील ताबा सुटतो. कुठल्याही स्वभावाचा वा व्यक्तिमत्वाचा माणूस केव्हा या दुश्चक्रात सापडेल, हे सांगता येणार नाही. उलट असे लोक मग चातुर्याने आपल्या पिण्याचे समर्थनच करतात- आणि मग अखेर मद्यपाशाला बळी पडून खऱ्या अर्थाने "दुबळे ' बनतात.
दारूचे व्यसन ही केवळ वाईट सवय नसून, तो एक रोग आहे. दारूड्या असणारा हा माणूस "मद्यपाश'(अल्कोहोलिझम) या रोगाने आजारी असतो. गंमत म्हणून चारचौघे एखाद्यावेळी जेवढी दारू पितात त्यापेक्षा हा रोगी जास्त प्रमाणात आणि सतत दारू पीत असतो. केवळ दारू पिण्याच्या अतिरेकामुळें त्याची आर्थिक, शारिरीक, मानसिक व सामाजिक हानी होत असते आणि तरीही जो दारू पीतच राहतो, असा माणूस ह्या रोगाचा बळी ठरलेला आहे, असे समजावे, दारूमूळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अतोनात नुकसान होत असेल, तरीही मद्यपान करणारे बहुसंख्य मद्यपी ही गोï मान्य करीत नाहीत. दारूचे व्यसन ही भयानक गुलामी आहे. स्वत:च्या हाताने स्वत:चा व पर्यायाने संबंधित कुंटूंबियांचा पुरता विध्वंस करणारा हा भयानक मनोविकार आहे. काही लोक केवळ मजा म्हणून पितात. हलके वाटते, ताण नाहीसा होतो, वेळ कसा छान जातो ही त्यांची भूमिका. पण हे पिणे सोशलं असतं, प्रसंगापुरतं मर्यादित असतं. मद्यपाश झालेल्यांना मात्र असे मद्यपान स्वत:च्या इच्छेने थांबविता येत नाही. त्यांचा स्वत:वरचा, पर्यायाने पिण्यावरील ताबा सुटतो. कुठल्याही स्वभावाचा वा व्यक्तिमत्वाचा माणूस केव्हा या दुश्चक्रात सापडेल, हे सांगता येणार नाही. उलट असे लोक मग चातुर्याने आपल्या पिण्याचे समर्थनच करतात- आणि मग अखेर मद्यपाशाला बळी पडून खऱ्या अर्थाने "दुबळे ' बनतात.
*...आणि सवयीत रूपांतर होते !
ह्या रोगाच्या अनेक पायऱ्या असून कोणत्याही पायरीवरून रोगी परत फिरू शकतो. हे एक दुष्ट चक्र आहे. अध:पतनाकडे नेणाऱ्या या चक्रातून मुक्तता हवी असल्यास स्वत:ला ह्या चक्राबाहेर फेकावे लागेल. दारू किंवा तत्सम अंमली पदार्थ संपूर्णपणे सोडणे हाच ह्यावर एक आवश्यक उपाय आहे.
सोशल डिंक्स घेण्यापासून दारूद्या बनण्याच्या प्रवासाच्या सुरवातीच्या टप्प्यात बऱ्याच वेळा मित्राबरोबर पार्टीत-छोट्या छोट्या ओल्या पार्टीत प्याला ओठाला लागतो. नकळत अशी काही वर्षे जातात. हळू हळू मग लक्षात येतं की दारू प्यायल्यानंतरच आपल्याला हलकं हलकं वाटतं- मग दारू पिण्यात एक स्टाईल -सहजता यायला लागते. भीड चेपते- पिण्यातला संकोच नाहीसा होतो. मद्यपान करून घरी किंवा कामावर जाताना आपण सांभाळून घेऊ, याची खात्री वाटू लागते. अशारितीने तो मद्यपाशाचा रोगी बनतो, पुढे पुढे तो एकटाच प्यायला लागतो. पूर्वी 2-3 महिन्यातून एकदा पिणारा पुढे दर आठवड्याला पिऊ लागतो. नंतर मनावर ताण आला, राग आला, आनंद झाला, नुकसान झाले किंवा अशा छोट्या मोठ्या कारणाने जमेल तेव्हा प्यायला लागतो. आपला स्टेमिना सिद्ध करण्याकरीता सुरूवातीचे दोन पेग गटागटा पिऊन टाकतो. गप्पागोष्टी पेक्षा त्याचे लक्ष फक्त भरपूर पिण्यात असते. न पिण्याबद्दल उपदेश करणाऱ्या व्यक्तिंना तो टाळायला लागतो. जमेल तर ते किती वाईट आहेत, त्यांच्या उणीवा जाहीर करून त्यांना बदनाम करण्यात त्याला आसुरी आनंद मिळतो. घरी मुद्दाम उशिरा यायचे, आपल्यासाठी जेवायला ताटकळत बसलेल्या व्यक्तिंना "मला भूक नाही' असे सांगून सरळ झोपून जायचे. सगळ्या आप्तांना सोडायला हा तयार होतो, पण दारू मात्र सोडू शकत नाही. अगदी इच्छा असली तरी! एखादा पेग केव्हा व कसा घेता येईल, ह्याच काळजीत तो असतो आणि एकदा पिणे सुरू झाले की थांबणे जड होते. हळू हळू इतरांकडे ये- जा बंद होते. पूर्वी ज्या व्यक्ती¨च्या शेजारी उभा राहणार नाही अशांच्या मांडीस मांडी लावून बसायला लागतो. सकाळी त्याचे हातपाय कापायला लागतात, डोके दुखते, मळमळते पण दारू प्यायल्यावर बरे वाटते, कधी कधी अती प्यायल्यावर बरे वाटते. कधी कधी अती प्यायल्यावर पुढे काही तास आपण काय केले, कोठे गेलो, काय बोललो हे आठवत नाही.अशा प्रकारची विस्मृती म्हणजे ( ब्लेंक आउट) ही या रोगाची महत्वाची धोकादायक पायरी समजावी.
* विनाशाकडे वाटचाल
पुढे ह्याला कसलेच विधीनिषेध उरत नाहीत. स्वभाव अत्यंत चिडचिडा, हट्टी बनतो, आपलाच हेका चालवून घेतो. इतरांवर घाणेरडे आरोप करतो, जणू काही इतरांनीच गुन्हा केला, अशा प्रकारे आरडाओरडा करतो. कधी कधी नेमकी दारू घेतली नसताना घरातले लोक संशय घेतात, पाळत ठेवतात,खिसे तपासतात म्हणून जास्तच अकांडतांडव करतो आणि जाणून बुजून मुद्दाम त्याकारणाने हटकून पितो. अधूनमधून त्याच्या सद्सद्विवेकाची टोचणी लागून तो ढसढसा रडतो, इतरांना त्रास होतो हे कबूल करतो, यापुढे पिणार नाही अशा शपथा घेतो. आश्वासने देतो पण त्यात काहीच तथ्य नसते हे लवकरच सिद्ध होते. दारू सोडायची त्याची कितीही इच्छा असली, तरी आता "दारू'' त्याला सोडायला तयार नसते, जसे इतरांना अन्नाची गरज असते त्याप्रमाणे ह्या रोग्याच्या शरीराला अंमली पदार्थ किंवा दारूची गरज असते. ती आता त्याची "फिजिकल रिकवायरमेंट' होते. आता त्याचा नाइलाज असतो आणि हे समजल्यामुळे तो आता बिथरल्यासारखे वागू लागतो. हळू हळू त्याचे सर्व मौल्यवान सामानसुमान संपते, तो पैशासाठी खोटे बोलू लागतो, उधारी करू लागतो आणि पिऊन रस्त्यावर पडल्यावर जवळ चे पैसे, घड्याळ , अंगठी पळवणारी एखादी टोळी त्याच्या अवतीभोवती असतेच. अशा स्थितीत तो स्वत:चे स्वास्थ गमावतो तो स्वच्छ राहू इच्छीत नाही. चांगले कपडे नकोसे होतात. घाणेरडे शरीर, गलिच्छ कपडे, असंयमित मन, असंबद्ध विचार आणि उर्मट विक्षिप्त मुजोर वागणूक अशा अवस्थेत हा रोगी विनाशाची एक एक पायरी उतरत मृत्यूच्या खोल दरीत जात असतो. फक्त जीव जात नाही म्हणून जगत असतो. त्याच्याबाबतीत जवळच्या व्यक्तींच्या राग आणि कीव अशा संमिश्र भावना असतात.
कालांतराने तो बेफाम होतो. बडबडू लागतो. कुणाला ओiखेनासा होतो, घरातल्या सामानांची तोडफोड करतो- आक्रमक बनतो. कानामध्ये भयानक आवाज ऐकू येणे, डोळ्यासमोर भयानक अनाकलनीय अशी दृश्य दिसायला लागणे, चमत्कारीत त्रास होणे, एका जागी न बसू शकणे, डोक्यात कलकल होत राहणे, हिंस्त्र श्वापदासारख्या फेऱ्या मारीत राहणे, कितीही झोपेची औषधे दिली, तरी झोप न येणे या सर्व अवस्थांना "डिलिरियम ट्रेमेन्स'' असे म्हणतात. असा हा रोगी एक प्रकारचा मनोरूग्णच असतो. मजेसाठी एखादा पेग घेण्यापासून तो डिलिरियम ट्रेमेन्सपर्यत असा हा प्रवास असतो. सर्वसाधारण रूग्णांची कहाणी याहून भिन्न नसतेच. फक्त फरक असलाच तर स्थळ -काळ व तपशीलात. असा हा मनोविकारी रोगी संशयी बनून मानसिक व शारिरीक सुख देण्यास असमर्थ असून, दुसऱ्या वर घाणेरडे आरोप करायलाही मागेपुढे पहात नाही. स्वत:चा दोष लपविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो. अशा या बेफाम अवस्थेत शेवटी त्याचे सामाजिक, कौटुंबिक आयुष्य संपुष्टात येते.
अशा या मद्यपाशात जखडलेल्या मनोविकारी रुग्णाला"अल्कोहोलिक हेंल्युसिनोसिस'' हा विकार शेवटी आपल्यात सामावून घेतो. अशांना घरी सांभाळणे अत्यंत कठिण असते. त्यांना फक्त दवाखान्यातील अनुभवी तज्ञ डॉक्टरच हाताळू शकतात. या मद्यपाशामुळे आणखी अनेक रोग उद्भवू शकतात-लहान मेंदूवर परिणाम होणे,भूक मंद होऊन अपचन अथवा जुलाब होणे- यकृतात बिघाड होणे, त्याला सूज येणे , कावीळ होणे-जलोदरासारखे रोग होऊन ¹क्वचितप्रसंगी रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यूला कवटाळतात-थोडक्यात शेवटी स्वत: सुटतात व संबंधितांना पण मुक्त करतात. आधी पैसे नंतर आरोग्य मग माणुसकी व शेवटी प्राण फक्त इतके गमवावे लागते.
*अवघड असले तरी अशक्य नाही!
मद्यापासून मुक्त होणे हे खरोखरीच अत्यंत अवघड असले तरी ते अशक्य मात्र नाहीच. त्याकरीता रोग्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांची चिकाटी किती आहे यावर ते अवलंबून आहे. सतत निराश होऊन सुद्धा त्यांना धीर सोडून चालणार नाही. रोग्याच्या भल्याकरीता परिस्थिती पाहुन मृदू किंवा कठोर व्हावे लागेल. मी दारू सोडू शकतो,दारूवर माझा ताबा आहे, मला झालच काय आहे? अशा प्रकारची वक्तव्य करणारा आयुष्यात कधीच व्यसनमुक्त होऊ शकणार नाही. ताबा, स्वत:वर कंटोल , विलपॉवरच्या अभावामुळेच तर तो मद्यपी झालेला असतो, मग व्यसनापासून मुक्त होण्यासाठी त्याच्याजवळ कु ठे असतो स्वत:वर ताबा ? पण खरोखर व्यसनमुक्त व्हावयाचे असेल, तर स्वत:च्या शिल्लक असलेल्या इच्छा शक्तिला एकत्रित करून मदत करण्यास तयार असलेल्यांना मदतीची- कळकळीची हाक मारायला हवी, पश्चात्ताप व्हावयास हवा. अहंकाराचा अडसर दूर करावयास हवा.*""होय, मी दारूड्या आहे, दारूवर माझा ताबा नाही, मी एकट्या ने दारूविरूद्ध लढू शकत नाही, मला मदत हवी आहे'',* असे प्रामाणिकपणे पश्चातापाने पण मनापासून म्हणणाऱ्या व्यक्तिला मद्यपाशातून मुक्तता मिळविता येते. देशात अनेक खाजगी तसेच सरकारी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. तेथे त्याला खरी वैद्यकीय व मानसिक मदत मिळते .अे अे किंवा एन अे सारख्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांच्या मिटींगला जाणे आवश्यक आहे, तेथे त्याला स्वत:चे अनुभव सांगता येतात, दुसऱ्याचे अनुभव ऐकता येतात, थोडक्यात,तो आपली चूक झाली याची प्रत्यक्ष कबुली चार चौघात देतो. शपथा घेण्यापेक्षा शरणागती पत्करतो, कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर विश्वास असावयास हवा. प्रार्थनेने बळ येते, निती-अनितिची जाणीव होते. आणि "आज दारू पिणार नाही', असे ठरवून त्या प्रमाणे वागण्याचे बळ येते . स्वत:चे जुने व्यक्तिमत्व दोषांसहित नष्ट करावे लागते. मगच पुन्हा खरा पुनर्जन्म होतो. व्यसनी माणसाचा खरा शत्रू दारू किंवा अंमली पदार्थ नाही, तर दारूचा पेला ओठाला लावणाऱ्या हाताला ताकद देणारे त्याचे स्वत:चे मन त्याचा खरा शत्रू आहे. व्यसनमुक्तीचा खरा मार्ग म्हणजे व्यसनांची सुरूवात न करणे.
सुहास सोहोनी
उजळते क्षितिज[मराठी लेख संग्रह -२००७ ]
www.mazyasamvedana.com
No comments:
Post a Comment